Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांच्या एक्झिमासाठी १० सर्वोत्तम नैसर्गिक उपाय

बाळांच्या एक्झिमासाठी १० सर्वोत्तम नैसर्गिक उपाय

बाळांच्या एक्झिमासाठी १० सर्वोत्तम नैसर्गिक  उपाय

आपल्या मुलाला जास्त प्रमाणात औषधोपचार करू नयेत असे वाटणे खूप सामान्य आहे. बाळाच्या रोगप्रतिकारक यंत्रणेस परिस्थितीशी लढा देऊ दिल्यास त्याचा दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. काही प्रसंगी एक्झामासारख्या परिस्थितीचा सामना एकट्या रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारे होऊ शकत नाही. म्हणूनच अशावेळी नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरू शकतात. बाळांच्या एक्झामासाठीचे नैसर्गिक उपचार आपल्या बाळाच्या शरीराला प्रतिकार करण्यास मदत करत नाहीत तर त्या स्थितीचे व्यवस्थापन करण्यात देखील मदत करू शकतात. एक्झिमाची समस्या व्यवस्थापित करणे खूप कठीण झाल्यास तुम्हाला त्यासाठी औषधे वापरण्याची शिफारस केली जाते.

बाळाच्या एक्झिमावर १० सोपे आणि प्रभावी घरगुती उपचार

बाळांच्या एक्झिमासाठी कोणते घरगुती उपचार केवळ दंतकथा आहेत आणि कोणते उपचार खरंच मदत करू शकतात हे समजून घेणे हे एक आव्हान असू शकते म्हणूनच तुमच्या बाळासाठी हर्बल औषधांची यादी आम्ही येथे तयार केलेली आहे.

. कोमट पाण्याने अंघोळ

एक्झिमच्या सर्वात कठीण लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे खाज सुटणे आणि ते व्यवस्थापित करणे कठीण जाते. कोमट पाण्याने स्नान केल्यास त्वचा मऊ होते, यामुळे खाज सुटणे कमी होते. तसेच त्वचेचे निर्जलीकरण थांबविण्यास देखील मदत होते. आपल्या बाळाला आंघोळ घालताना, सुवासिक साबण वापरा आणि अँटीबॅक्टेरियल साबण वापरणे टाळा.

. ओट्स घातलेल्या पाण्याने अंघोळ

ओट्सचे जाडेभरडे पीठ घातलेल्या पाण्याने स्नान करणे त्वचेला आराम देण्याचा एक चांगला मार्ग मानला जातो. ओटचे जाडे भरडे पीठ खाज कमी करते आणि त्वचेसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर असते. आपल्या मुलाला ओट्सचे स्नान देण्यासाठी, ब्लेंडरमध्ये २३ वाट्या ओट्सचे मिश्रण बारीक होईपर्यंत वाटून घ्या. नंतर कोमट पाण्यात ही पावडर घालून मिक्स करा आणि आपल्या मुलास त्या पाण्यात २० ते ३० मिनिटे ठेवा आणि नंतर त्यास पाण्याने धुवून काढा.

. शुद्ध (कोल्ड प्रेस) नारळ तेल

शुद्ध नारळ तेलामध्ये जिवाणू विरोधक गुणधर्म असतात, यामुळे एक्झिमचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. शिवाय, कोल्ड प्रेस केलेल्या नारळाच्या तेलात सजलीत करण्याचे गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा शांत होते. शुद्ध नारळाचे तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. ते एक्झिमा व्यवस्थापित करते. फक्त आपल्या बाळाच्या त्वचेवर तेल लावा आणि काही सेकंदांसाठी हळूवारपणे मालिश करा.

. शुद्ध (कोल्ड प्रेस) सूर्यफूल तेल

शुद्ध (कोल्ड प्रेस) केलेल्या सूर्य फूल तेल फॅटी ऍसिड्सने समृद्ध असते. आपल्या त्वचेद्वारे शोषून घेतलेले हे फॅटी ऍसिड्स त्वचेच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या एक्झिमाचा सामना करण्यास मदत करतात. शुद्ध सूर्यफूल तेल देखील एक अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. हे तेल आपल्या मुलाच्या त्वचेवर लावा. घड्याळाच्या दिशेने आणि काही क्षणांसाठी घड्याळाच्या उलट दिशेने मालिश करा.

. अंघोळीच्या पाण्यामध्ये सागरी मीठ घालणे

सागरी मीठामध्ये जिवाणू विरोधी गुणधर्म आहेत जे संक्रमण टाळण्यास मदत करतात. मिठात असलेल्या खनिजांमुळे समुद्री मीठ घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्यास सर्वसाधारणपणे ते त्वचेसाठी अत्यंत चांगले असते. आपल्या बाळाला २० मिनिटांपर्यंत समुद्री मीठ घातलेल्या पाणयात भिजवा. यामुळे खाज सुटणे कमी होईल आणि त्वचेला आराम मिळेल. हे अंघोळीचे पाणी तयार करण्यासाठी फक्त कोमट पाण्यात समुद्री मीठ घाला. मीठ विरघळेपर्यंत चांगले मिसळा.

. टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइल त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शुद्ध टी ट्री ऑइल बाळांच्या त्वचेसाठी अत्यंत तीव्र ठरू शकते म्हणून ते कोमट पाणी घालून सौम्य करावे. टी ट्री ऑईलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे एक्झिमाचा संसर्ग रोखला जाऊ शकत. टी ट्री ऑइल मध्ये कोरड्यात्वचेचे नुकसान दुरूस्त करणारे, तसेच त्वचेला सजलीत करणारे गुणधर्म देखील आहेत. कोणत्याही मॉइश्चरायझरमध्ये ह्या तेलाचे दोन थेंब वापरल्याने एक्झिमचा सामना करण्यास मदत होते.

टी ट्री ऑइल

. कॅमोमाइल टी बाथ

कॅमोमाइल चहा त्वचेसाठी अत्यंत चांगला आहे, त्यात सुखदायक गुणधर्म आहेत ज्यामुळे खाज सुटणे कमी होते. जेव्हा त्वचेमध्ये हे तेल शोषले जाते तेव्हा खराब झालेली त्वचा हायड्रेट होते आणि त्वचा बरी होण्यास मदत होते. हे अंघोळीचे पाणी तयार करण्यासाठी, कॅमोमाईल चहाच्या ५ पिशव्या फक्त १५ मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजवा, नंतर आपल्या बाळाला त्यामध्ये २० मिनिटांसाठी ठेवा.

. सूर्यप्रकाश

तुमच्या बाळाला २० मिनिटे उन्हात नेणे खूप फायदेशीर ठरू शकते. सूर्याच्या नैसर्गिक अतिनील किरणांमध्ये व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे त्वचेतून कोलेस्टेरॉल शोषून घेण्यास मदत होते आणि मेलेनिन देखील मिळते. यामुळे आपल्या मुलाची त्वचा शांत होते आणि त्वचा बरी होते. सावध रहा, जर ऊन खूप जास्त असेल तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सनस्क्रीनशिवाय आपल्या बाळाला २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात ठेवू नका.

. ह्युमिडिफायर्स

आर्द्रता त्वचेसाठी चांगली असते, यामुळे शरीर सजलीत होते, दाह कमी होतो आणि खाज सुटण्यास मदत होते. एक्झामा व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी आपल्या बाळाला नियमितपणे ज्या खोलीत ठेवले जाते त्या खोलीत एक ह्यूमिडिफायर वापरा, तसेच बाळाला मॉइश्चरायझर लावा.

१०. सैल कपडे

तुमच्या बाळाला सैल कपडे घाला आणि त्या कपड्यांमध्ये हवा खेळती राहते आहे ह्याची खात्री करा. घट्ट कपड्यांमुळे घाम येऊ शकतो. घाम आल्यामुळे जीवाणू पसरतात आणि त्यामुळे एक्झिमा होऊ शकतो. त्वचेवर पुरळ उठू शकते आणि खाज सुटते. त्वचेला घट्ट बसणारे कपडे घालू नका. आरामदायक कपडे घातले आहेत हे देखील सुनिश्चित करा.

अन्नपदार्थांच्या ऍलर्जीमुळे एक्झिमा होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलास स्तनपान देत असाल तर तुमच्या मुलास कुठल्या अन्नपदार्थांची ऍलर्जी आहे का ह्याची तपासणी करा आणि ते पदार्थ बाळाला खायला देऊ नका.

दिवसातून कमीतकमी दोनदा आपल्या मुलाच्या शरीरावरील एक्झिमा रॅशेस कॉटनच्या मऊ ओल्या कापडाने थोडे पुसून घ्या. असे केल्याने त्यांची त्वचा मऊ होण्यास मदत होईल.

ही परिस्थिती व्यवस्थापित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वर सांगितलेल्या उपचाराच्या पद्धती एकत्रित रित्या अमलात आणणे. तुमच्या मुलाला १५ मिनिटे बाहेर उन्हात न्या. वर सांगितल्याप्रमाणे एक्झिमा साठी बाळाला अंघोळ घाला. शुद्ध नारळाच्या तेलासारखे नैसर्गिक मॉइश्चरायझर वापरा. तसेच ह्युमिडीफायरचा वापर करा. बाळाला नेहमी आरामदायक सैल कपडे घाला. असे केल्याने तुम्ही ही परिस्थिती नीट हाताळू शकता. तसेच, बाळाची खोली थंड असल्याची खात्री करा. उन्हाळ्यात वातानुकूलन आणि सिलिंग फॅनचा वापर केल्यास घामामुळे त्वचेला येणारी खाज कमी होईल.

एक्झिमा बाह्य ऍलर्जी मुळे होतो जसे की धूळ माइट्स इत्यादी. तुम्ही तुमच्या मुलास स्वच्छ वातावरणात ठेवले पाहिजे आणि त्यांना नियमितपणे अंघोळ घातली पाहिजे. तुमच्या मुलाला एक्झिमा झालेला असल्यास टॉवेलचा वापर कधीही वापरू नका. बाळाच्या शरीरावरचे पाणी अलगद टिपून घ्या किंवा हवेने सुकू द्या. टॉवेलने पुसण्यामुळे जिवाणू पसरू शकतात आणि इतर ठिकाणी हे पुरळ दिसण्याची शक्यता वाढू शकते.

लक्षात ठेवा हे समजून घेणे देखील आवश्यक आहे की ही हे उपाय किरकोळ स्वरूपाचा एक्झिमा बरा करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करून हे उपाय केले जाऊ शकतात परंतु डॉक्टरांच्या पूर्व परवानगी शिवाय नाही.

आणखी वाचा:

बाळाच्या मुरुमांवर १० घरगुती उपाय
बाळांना डास चावण्याची कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article