Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार

गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार

गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार

जेव्हा गरोदरपणात सर्दी होते तेव्हा परिस्थितीला समजून घेणे नेहमीच चांगले असते. आपल्याला सर्दी का होते आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो इथपासून ते त्यासाठी सर्वोत्तम उपाय आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे माहिती असणे जरुरी आहे.

सर्दी आणि खोकल्याची कारणे

होणाऱ्या आईच्या रोगप्रतिकारक यंत्रणेमध्ये होणारे बदल तिला सर्दी आणि फ्लू होण्यासाठी कारणीभूत असतात. सर्दी बर्‍याच प्रकारच्या विषाणूंमुळे उद्भवते, सर्वात सामान्य विषाणू म्हणजे ऱ्हिनोव्हायरस. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर सर्दी पसरते आणि विषाणू नाक, डोळे आणि तोंडातून प्रवेश करतात.

श्वसनमार्गामध्ये विषाणू किंवा जिवाणूंच्या संसर्गामुळे खोकला होतो, जो सर्दीमुळे होऊ शकतो. हवेतील प्रदूषकांमुळे खोकला वाढू देखील शकतो. असे होणे संपूर्ण भारतातील बर्‍याच शहरांमध्ये सामान्य आहे.

जुनाट खोकला, सर्दीनंतरही चालू राहतो. विषाणू तुमच्या प्रणालीमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा, तुमचा श्वसनमार्ग अद्याप सूजलेला, नाजूक राहू शकतो. आपण योग्यरित्या हायड्रेटेड नसल्यास खोकला देखील राहू शकतो, ज्यामुळे श्लेष्माची निर्मिती वाढते.

सर्दीची लक्षणे

सर्दीची लक्षणे

इथे काही सामान्यतः आढळणारी सर्दीची लक्षणे दिलेली आहेत

 • सर्दी वाढत असताना वाहणारे नाक चोंदते
 • शिंका येतात
 • कधीकधी सर्दीसोबत हलका ताप येतो
 • घसा खराब होतो
 • खोकला, जो कोरडा होतो आणि काहीवेळा तो सर्दीपेक्षा जास्त काळ टिकतो
 • थकवा आणि निर्जलीकरण

खोकला आणि सर्दी आपल्या बाळाला हानी पोहोचवू शकते का?

थोडक्यात, सामान्य सर्दी किंवा इन्फ्लूएंझा आणि त्याच्याशी संबंधित लक्षणांमुळे बाळावर प्रतिकूल परिणाम होत नाही. गर्भवती आईला कदाचित शारीरिक ताणामुळे जास्त थकवा वाटेल. बाळ गर्भजलाने वेढलेले असल्याने खोकल्याचा बाळावर परिणाम होत नाही. तथापि, खोकला तीव्र किंवा हिंसक होण्यापूर्वी त्यावर उपचार करणे व्यावहारिक आहे.

लक्षात ठेवा की खोकला आणि सर्दी होणाऱ्या आईला कमकुवत करते आणि तिच्या पोषणावर देखील परिणाम करते, ज्याचा दीर्घकाळापर्यंत बाळाच्या विकासावर हानिकारक परिणाम होतो. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे आणि लक्षणे जास्त काळ कशी टिकून राहणार नाहीत ह्यावर लक्ष दिले पाहिजे.

साधी सर्दी किंवा फ्लू आहे हे कसे ठरवायचे?

आपण आपल्या सर्दीचे फ्लू असे किंवा फ्लूचे सर्दी असे निदान केले नाही याची खात्री करा. फ्लू ही सर्दीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे आणि त्यासाठी अधिक लक्ष आणि काळजी घ्यावी लागते.

या दोघांमधील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फ्लूमध्ये तीव्र ताप, सर्दी, डोकेदुखी आणि घसा खवखवणे समाविष्ट आहे जे दुसर्‍या दिवसापासून किंवा तिसर्‍या दिवसापर्यंत आणखी वाढते. जेव्हा आपल्याला फ्लू होतो तेव्हा स्नायूंमध्ये देखील वेदना जाणवतील आणि शारीरिक दुर्बलता देखील जाणवेल. फ्लू सर्दीपेक्षा जास्त काळ टिकतो.

अगदी तीव्र सर्दीत देखील फ्लूसारखी तीव्र लक्षणे दिसत नाहीत म्हणूनच त्या दोघांमध्ये फरक करणे खूप सोपे आहे. सर्दी असल्यास तुम्ही कार्यरत राहू शकता आणि खवखवणारा घसा दुसऱ्या दिवशीपर्यंत कमी होतो. वाहणारे नाक आणि खोकला ही सर्दीची दोन मुख्य लक्षणे आहेत.

सर्दी आणि खोकल्यासाठी सुरक्षित औषधे

गरोदरपणात खोकल्यासाठी औषधोपचार शोधताना, हुशारीने आणि काळजीपूर्वक निवडा. आपण दुकानातून औषधे घ्यायला जाण्यापूर्वी तुम्ही घरगुती उपाय करून करून बघू शकता. कधीकधी, गरम पाण्याने शॉवर घेणे, आल्याचा चहा आणि चिकन सूप पुरेसे नसते. एक किंवा दोन गोळ्या बरे होण्याच्या प्रक्रियेस वेगवान करतात. औषधे घेताना ती आपल्या डॉक्टरांना विचारून घ्या. आणि खालील काही गोष्टी लक्षात ठेवा.

सर्दी आणि खोकल्यासाठी सुरक्षित औषधे

औषधे कशी निवडायची ते जाणून घ्या. जेव्हा तुम्ही गरोदरपणात सर्दी आणि खोकल्यासाठी औषधे निवडता तेव्हा त्यातील घटकांचा अभ्यास करा आणि कमीतकमी घटक असलेले उत्पादन निवडा. एक कंपाऊंड किंवा केमिकल तुमच्या सर्दी खोकल्याच्या लक्षणांवर लढा देते, अनेकांचा कॉम्बो नव्हे. येथे एक मूलभूत सुरक्षित यादी आहे.

 • अ‍ॅसिटामिनोफेन (वेदना कमी करणारे औषध)
 • डिफेनहायड्रॅमिन बेस (बेनाड्रिल) सह खोकला सिरप
 • क्लोरासेप्टिक स्प्रे (मीठाच्या पाण्यातील गुळण्यांच्या ऐवजी ह्याचा वापर करता येतो)
 • लोरॅटाडीन (ऍलर्जी उपचारांसाठी वापरले जाते)
 • स्यूडोएफेड्रिन (एक डीकेंजेस्टंट एजंट म्हणून वापरला जातो)

तुम्ही टाळली पाहिजेत अशी औषधे

अशी काही औषधे आहेत जी तुम्हाला सर्दी झाल्यावर तुम्ही टाळली पाहिजे कारण त्यांचे दुष्परिणाम गर्भवती महिला किंवा मुलांसाठी हानिकारक आहेत. तथापि, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.

 • आयबुप्रोफेन, एस्पिरिन आणि नेप्रोक्सेन सारखी काही वेदनाशामक औषधे
 • हर्बल औषधे (बऱ्याच हर्बल औषधांवर काही नियंत्रण नसते आणि त्यांचा जन्म कसा होतो याबद्दल काही माहिती नाही)
 • ऑक्सिमेटाझोलिन असलेले नाकाचे फवारे
 • बहुसंख्य डीकंजेस्टंट्स (विशेषत: पहिल्या तिमाहीत)
 • पूरक जीवनसत्त्वे (वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्याशिवाय)

घरगुती उपचार

जर तुम्हाला गरोदरपणात सर्दी किंवा फ्लू झाला तर काळजी करण्याचे काही कारण नाही. खरं तर, खोकला आणि सर्दीसाठी बरेच नैसर्गिक उपाय आहेत जे सहजपणे केले जाऊ शकतात.

 • दिवसभर सारखे थोडे थोडे कोमट पाण्याचे घोट घेत रहा.
 • ताज्या लसणामध्ये अनेक अँटीव्हायरल गुणधर्म असतात.तुम्ही सूप मध्ये लसूण घालू शकता किंवा एक दोन पाकळ्या तशाच खाऊ शकता.
 • आल्याचा चहा एक गरमागरम आणि कडक पेय आहे जो आपला घसा साफ करण्यास मदत करते.
 • सर्दीच्या भारतीय घरगुती उपचारांमध्ये तुळशीच्या पानांचा चहा किंवा तुळशी आणि आल्याचे मिश्रण ह्यांचा समावेश होतो.
 • सलाईन स्प्रे, नाकाचे थेंब वापरून सुद्धा नाकाचा भाग हायड्रेट होण्यास मदत होते.
 • घसा खवखवत असेल तर गरम पाण्याच्या गुळण्या करणे हा एक चांगला उपाय आहे.
 • कोरड्या खोकल्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. मध लिंबू एकत्र करून दिले जाऊ शकते.
 • कोमट दूध आणि हळद हा एक जुना भारतीय उपाय आहे त्यामुळे झोप चांगली लागण्यास मदत होते आणि सर्दीशी सामना करताना ते महत्वाचे आहे.
 • थोडेसे लिंबू आणि मध असलेले जवसाचे पाणी खोकला आणि सर्दीची लक्षणे दूर करते.
 • जीवनसत्वांनी समृद्ध असलेला गाजराचा रस देखील एक चांगला पूरक आहार आहे जो सर्दीच्या विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करतो.
 • ह्युमिडिफायर आसपास असणे उपयुक्त आहे कारण त्यामुळे नाकाचा भागास ओलावा देण्यास मदत होते.

प्रतिबंध

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि सर्दीचा संसर्ग रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. सर्दी होऊ नये म्हणून स्वच्छता राखणे ही आणखी एक महत्वाची बाब आहे. तसेच,तीव्र हवामान असलेल्या ठिकाणी जाऊ नका त्यामुळे शरीरावर ताण येऊन शरीराची प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते.

 • नियमितपणे हात धुवा, सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी हा सर्वात सामान्य मार्ग आहे
 • सर्दीमुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवू नका
 • चांगली झोप आणि थोडा व्यायाम रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यात मदत करते
 • निरोगी आणि स्वच्छ आहार घ्या जास्त प्रमाणात खाणे टाळा
 • आपला परिसर स्वच्छ ठेवाखासकरुन ज्या पृष्ठभागावर तुमचा खूपदा स्पर्श होतो
 • तो भाग स्वच्छ ठेवा उदा: डोअर नॉब , कीबोर्ड, फोन इ.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जेव्हा थंडीची लक्षणे काही दिवसांनंतर जात नाहीत किंवा वाढतात तेव्हा आपल्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. तीव्र खोकला येत असेल तरीसुद्धा डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. लक्षणे गंभीर असताना स्वतःचे स्वतः औषधोपचार करू नका. डॉक्टर, गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असलेली औषधे लिहून देतील.

गरोदरपणात खोकल्यासाठी स्वतः सिरपची निवड करू नका. तुमच्यासाठी सुरक्षित असलेले औषध डॉक्टरांकडून लिहून घ्या.

गरोदरपणामुळे उद्भवलेल्या अनेक आव्हानांपैकी एक म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणे. खोकला आणि सर्दीसारखे विकार होणाऱ्या आईसाठी त्रासदायक होऊ शकतात. प्रतिबंधात्मक उपाय केल्यास आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित औषधे घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.

आणखी वाचा:

गरोदरपणात होणारा ‘मॉर्निंग सिकनेस’
गरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article