Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील विसंगती (अँनोमली) स्कॅन

गरोदरपणातील विसंगती (अँनोमली) स्कॅन

गरोदरपणातील विसंगती (अँनोमली) स्कॅन

गरोदरपणात तीन तिमाह्या असतात आणि प्रत्येक तिमाहीला बाळाच्या जन्मचक्रात महत्त्व असते. बाळाची वाढ सामान्य आणि योग्य मार्गाने होत आहे ह्याची खात्री करण्यासाठी गरोदरपणात विविध स्कॅन आणि आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. विसंगती स्कॅन हा त्यापैकीच एक स्कॅन आहे. मुख्यतः गर्भाच्या वाढीच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये हा स्कॅन केला जातो.

स्कॅन दरम्यान, सोनोग्राफर (चाचणी करणारी व्यक्ती) बाळाच्या अवयवांची वाढ सामान्यपणे होत आहे ह्याची खात्री करण्यासाठी शरीराची रचना तपासतात. विसंगती स्कॅनबद्दल अधिक तपशील ह्यालेखाद्वारे समजून घेऊ.

विसंगती स्कॅन (स्तर २ अल्ट्रासाऊंड) म्हणजे काय?

विसंगती स्कॅनला लेव्हल २ अल्ट्रासाऊंड असेही म्हटले जाते. गरोदरपणाच्या मध्यावर हा स्कॅन केला जातो. ह्या स्कॅन दरम्यान तुमचे बाळ आणि गर्भाशय यांचे जवळून निरीक्षण केले जाते. या स्कॅनदरम्यान, सोनोग्राफर बाळाचा विकास सामान्यपणे होत आहे की नाही हे पाहू शकतात. बाळाच्या सभोवतालची नाळ आणि गर्भजलाची स्थिती देखील तपासू शकतात. या स्कॅनला मॉर्फोलॉजी स्कॅन किंवा २० व्या आठवड्यातील स्कॅन असेही म्हणतात. ह्या स्कॅनचा उद्देश तुमच्या बाळाचे आरोग्य तपासणे हा आहे, लिंग निश्चित करणे नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

तुम्ही विसंगती स्कॅनसाठी का जावे?

वर नमूद केल्याप्रमाणे, ह्या स्कॅन दरम्यान तुमच्या बाळाची वाढ आणि आरोग्य तपासले जाते तसेच त्याच्या संरचनात्मक सामान्यतेसह, विसंगती स्कॅन केले जाते. बाळामध्ये कुठली असामान्यात तर नाही ना हे सुद्धा ह्या स्कॅन दरम्यान तपासले जाते, जेणे करून पुढील चाचणीची आवश्यकता असल्यास ते समजू शकते. ह्या स्कॅन मध्ये हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूसह बाळाचा डोक्यापासून पायापर्यंतचा अभ्यास केला जातो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, तुमच्या बाळाच्या अवयवांच्या विकासाचे मोजमाप करून त्याच्या वाढीचे निरीक्षण करण्यासाठी हा स्कॅन करणे अनिवार्य आहे. विसंगती स्कॅन म्हणजे पालकांसाठी काही सुंदर आठवणी, गर्भाच्या प्रतिमा/चित्रांच्या रूपात घरी घेऊन जाण्याची एक चांगली संधी आहे.

विसंगती स्कॅन कधी केले जाते?

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत विसंगती स्कॅन केले जाते. साधारणपणे गरोदरपणाच्या १८२० आठवड्यांच्या दरम्यान हा स्कॅन केला जातो. बाळाची वाढ सामान्य आहे आणि सर्व महत्वाचे अवयव योग्यरित्या विकसित होत आहेत ह्याची खात्री करण्यासाठी हा स्कॅन केला जातो.

विसंगती स्कॅनची तयारी कशी करावी?

विसंगती स्कॅनची तयारी कशी करावी?

गरोदरपणात विसंगती स्कॅन करणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. यासाठी कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही. परंतु, खाली दिलेल्या काही टिप्स, हा स्कॅन जलद, आरामदायी आणि कार्यक्षम करू शकतात:

  • स्कॅन करण्यापूर्वी आराम करण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी केंद्रात लवकर पोहोचा आणि आराम करा.
  • या स्कॅनसाठी, तुम्ही चाचणीसाठी याल तेव्हा तुमचे मूत्राशय पूर्ण भरलेले असणे उत्तम आहे, कारण हा स्कॅन मूत्राशय रिकामे असताना करता येत नाही. स्कॅन करण्यासाठी तुम्ही लवकर पोहोचू शकता आणि पुरेसे पाणी पिऊ शकता.
  • गरोदरपणातील इतर नियमित स्कॅन प्रमाणे, अगदी विसंगती स्कॅनसाठी देखील बेंबीपासून ओटीपोटापर्यंत पोट उघडे असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.
  • तुमचे मागील सर्व चाचण्यांचे अहवाल आणि वैद्यकीय नोंदी सोबत ठेवा जेणेकरून गरज पडल्यास ते सहज उपलब्ध होतील.

विसंगती स्कॅन कसे केले जाते?

शरीराच्या आत प्रतिमा तयार करण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करून विसंगती स्कॅन केले जाते. सोनोग्राफर पोटावर पाण्यासारखे जेल लावून परत उसळणाऱ्या ध्वनी लहरी गोळा करण्यासाठी ट्रान्सड्यूसर वापरतील. संगणकाद्वारे या लहरी तुमच्या बाळाची प्रतिमा तयार करण्यासाठी वापरल्या जातील.

स्कॅनमुळे दुखापत होत नाही, परंतु सोनोग्राफर प्रतिमा मिळविण्यासाठी पोटावर थोडासा दबाव टाकू शकतात. स्कॅन पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 मिनिटे लागतात, त्यानंतर तुम्हाला प्रतिमा पाहण्याची परवानगी दिली जाते. सोनोग्राफर तुम्हाला बाळाच्या शरीराचे वेगवेगळे भाग ओळखण्यास मदत करू शकतात आणि कधीकधी बाळाचे धडधडणारे हृदय देखील दाखवू शकतात. बाळाचे लिंग कधीही उघड केले जात नाही, कारण भारतात प्रीनॅटल डायग्नोस्टिक तंत्रांवर कडक कायदे आहेत आणि रुग्णालयांना तसे करण्यास मनाई आहे.

विसंगती स्कॅन काय शोधू शकते?

कोणत्याही विकृतीशिवाय बाळाची चांगली वाढ होत आहे हे शोधून काढणे हा ह्या स्कॅनचा प्रमुख उद्देश आहे. विसंगती स्कॅन दरम्यान सोनोग्राफर बाळाच्या विकसनशील शरीराचे खालील भाग तपासतो:

  • बाळाचे हृदय सोनोग्राफर बाळाचे हृदय विकसित होत आहे आणि योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे तपासेल. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या सर्व धमन्या आणि शिरा देखील तपासल्या जातात.
  • फाटलेले ओठ फाटलेल्या ओठांसाठी बाळाचा चेहरा तपासला जातो. तथापि, फाटलेले ओठ दिसणे कठीण आहे आणि स्कॅन करताना ते दिसेलच ह्याची खात्री नसते.
  • बाळाच्या किडन्या तुमच्या बाळाला दोन किडन्या आहेत की नाही आणि मूत्राशय भरलेले आहे की नाही हे सोनोग्राफर तपासतील. चाचणीच्या सुरुवातीला मूत्राशय रिकामे असल्यास, स्कॅन करताना मूत्राशय भरलेले असावे जेणेकरून बाळाचे अवयव पाहणे सोपे जाते.
  • डोक्याचा विकास गर्भाच्या डोक्याचा आकार देखील तपासला जातो. मेंदूच्या विकासाशी संबंधित समस्या असल्यास त्या लगेच दिसतात.
  • मणक्याचा विकास बाळाच्या मणक्याचा विकास योग्य प्रकारे होत आहे की नाही आणि पाठीवरची त्वचा योग्य प्रकारे झाकली आहे की नाही हे देखील सोनोग्राफर तपासतील.
  • अवयवांचा विकास सोनोग्राफर बाळाच्या अवयवांचा योग्य विकास होत आहे की नाही हे देखील तपासतील.
  • ओटीपोटाची भित्तिका ओटीपोटाची भित्तिका सर्व अवयवांना झाकते आहे ना ह्याची खात्री केली जाईल. सोनोग्राफर बाळाच्या पोटावर देखील लक्ष ठेवतील आणि त्यावरून पोटाशी संबंधित कोणतीही विकृती असेल तर ती हायलाइट करतील.
  • गर्भजल बाळाला संरक्षण देण्यासाठी पुरेसे गर्भजल आहे का हे सोनोग्राफर तपासतील.
  • नाळ स्कॅन दरम्यान नाळेची स्थिती तपासली जाते. तुमच्या गर्भाशयात नाळ खाली सरकली असेल तर, तुमचे डॉक्टर तुम्हाला ते कळवतील. नाळ गर्भाशयाच्या मुखापासून दूर आहे ना हे पाहण्यासाठी डॉक्टर तिसऱ्या तिमाहीत दुसरा अल्ट्रासाऊंड लिहून देईल. वैद्यकीय भाषेत, या परिस्थितीला प्लेसेंटा प्रेव्हिया म्हणतात. तिसऱ्या तिमाहीत खाली सरकलेल्या नाळेमुळे प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो, परंतु गरोदरपणाच्या १८ ते २० आठवड्यांच्या दरम्यान खाली सरकलेली नाळ चिंतेचे कारण नाही.
  • गर्भाचे मोजमाप स्कॅन करताना सोनोग्राफर तुमच्या बाळाच्या शरीराच्या अवयवांचे मोजमाप करतील आणि गरोदरपणाच्या त्या टप्प्यातील मानक वाढीशी त्याची तुलना करतील. सोनोग्राफर विसंगती स्कॅन दरम्यान खालील मोजमापे घेतील.
  • डोक्याचा घेर.
  • ओटीपोटाचा घेर
  • मांडीच्या हाडाचे मोजमाप

विसंगती स्कॅन बाळाबद्दल काय प्रकट करते?

विसंगती स्कॅन बाळाबद्दल काय प्रकट करते?

स्कॅन तुमच्या बाळाची कृष्णधवल प्रतिमा दाखवेल. केला जाणारा स्कॅन हा सहसा 2D स्कॅन असतो आणि तुम्ही तुमच्या बाळाची फक्त एक बाजू पाहू शकता, परंतु 3D किंवा 4D स्कॅन केल्यास, तुम्ही वेगवेगळ्या कोनातून तुमच्या बाळाची अधिक अचूक प्रतिमा पाहू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे, स्कॅन तुमच्या बाळाच्या शरीराची सामान्य स्थिती दर्शवेल. त्यामध्ये बाळाची वाढ, विकास आणि असामान्यता (असल्यास) यांचा समावेश होतो. स्कॅन तुम्हाला एकाधिक बाळे आहेत का याची पुष्टी करण्यात देखील मदत करते.

विसंगती स्कॅन आई किंवा बाळाला हानी पोहोचवू शकते का ?

क्षकिरणांच्या विपरीत, अल्ट्रासाऊंड विसंगती स्कॅन आयनीकरण विकिरण वापरत नाही आणि म्हणूनच आई किंवा बाळासाठी हे स्कॅन हानिकारक नाही. तसेच, स्कॅन दरम्यान गरोदर स्त्रीला आरामदायक वाटते आहे ना ह्याची सोनोग्राफर काळजी घेतात.

जेल आणि ट्रान्सड्यूसरमुळे स्कॅनिंग करताना थोडी अस्वस्थता येऊ शकते, परंतु स्कॅन करणे हानिकारक किंवा वेदनादायक नाही.

विसंगती स्कॅनचा उद्देश काय आहे?

विसंगती स्कॅनचा मुख्य उद्देश म्हणजे बाळाच्या वाढीचे निरीक्षण करणे आणि त्याच्या महत्वाच्या अवयवांचे आरोग्य चांगले आहे ना हे निश्चित करणे हा आहे. बाळाच्या शरीराच्या कोणत्याही अवयवामध्ये काही विकृती असल्यास त्या ह्या स्कॅनद्वारे ओळखता येतात आणि त्याचे मूल्यांकन केले जाते. बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी गरोदरपणाच्या मध्यावर अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याची शिफारस केली जाते. मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि गर्भाच्या पाठीचा कणा, आईचे गर्भाशय, नाळेची स्थिती इ. आणि यांसारख्या अवयवांवर लक्ष केंद्रित केले जाते.

विसंगती स्कॅनच्या निकालाचा अर्थ काय आहे?

विसंगती स्कॅनच्या रिपोर्ट वरून गर्भाचा विकास लक्षात येतो. गर्भाच्या वाढीचा आलेख निर्धारित करण्यास देखील त्यामुळे मदत होते. गर्भाची वाढ सामान्यपणे होते आहे का किंवा गर्भामध्ये काही विकृती आहे का हे स्कॅनच्या निकालावरून समजते. दोष आढळल्यास, तुमचे डॉक्टर सुधारात्मक कृतींबद्दल चर्चा करतील.

विसंगती स्कॅनमध्ये कोणत्या विकृती आढळतात?

विसंगती स्कॅन करताना सोनोग्राफरने केलेल्या निरीक्षणांची यादी खाली दिलेली आहे. ह्या यादीमध्ये गर्भाच्या विकृतींचा देखील समावेश आहे. ह्यापैकी काही समस्यांवर बाळाच्या जन्मानंतर उपचार केले जाऊ शकतात, तर काही समस्या, गंभीर असल्यास, त्वरित वैद्यकीय लक्ष दिले जाऊ शकते.

येथे काही विकृती आहेत ज्या विसंगती स्कॅनमध्ये शोधल्या जाऊ शकतात:

  • दुभंगलेले ओठ
  • स्पायना बिफिडा (पाठीच्या कण्यातील दोष)
  • हृदयाच्या समस्या
  • किडनी समस्या
  • ऍनेसेफली, किंवा डोक्याचा वरचा भाग नसणे
  • हातपायांमध्ये समस्या, उदाहरणार्थ, खूप लहान हातपायस्कॅनमध्ये कोणत्या विकृती आढळतात.

विकृती शोधण्याच्या उद्देशाने स्कॅन केले जात असताना, बाळामध्ये असलेली एखादी विकृती शोधणे नेहमीच सोपे नसते. उदाहरणार्थ, पोटाची भित्तिका, मूत्रपिंड, हातपाय किंवा पाठीच्या कण्यामध्ये समस्या असल्यास, स्कॅनने शोधणे सोपे असते. परंतु, हृदयातील दोष, छाती आणि पोट वेगळे करणाऱ्या स्नायूमध्ये छिद्र किंवा मेंदूमध्ये जास्त प्रमाणात द्रव जमा होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असणे ह्यासारख्या असामान्यता आढळल्यास, सोनोग्राफर केलेल्या निरीक्षणाची पुष्टी करण्यासाठी आणि नंतर करावयाच्या उपाय योजनेवर चर्चा करण्यासाठी अहवाल दुसर्‍या व्यक्तीकडे पाठवू शकतात.

विसंगती स्कॅन अचूक आहे का?

गरोदरपणाच्या मध्यावर अल्ट्रासाऊंड स्कॅन खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे गर्भाची वाढ नीट होत आहे ना हे समजण्यास मदत होते आणि गर्भामध्ये विकसित होत असलेल्या असामान्यता लवकर शोधून काढता येतात. विसंगती स्कॅन प्रतिमा देतात. परंतु स्कॅन नेहमी 100% अचूक असतात असे नाही.

ह्याचे कारण म्हणजे बाळाच्या शरीरातील, विशेषत: महत्वाच्या अवयवांमधील विकृती निश्चित करणे कठीण आहे आणि विसंगती स्कॅनमध्ये ते दिसून येऊ शकते किंवा दिसत सुद्धा नाही. बाळाचे स्पष्ट चित्र मिळविण्यासाठी सोनोग्राफरला अनेक वेळा पोटाचा स्कॅन करावा लागेल. सहसा, स्कॅनचे परिणाम 100% अचूक असू शकत नाहीत हे समजण्यासाठी पालकांना देखील संमतीपत्र देण्यास सांगितले जाते.

स्कॅन समस्या दर्शवित असल्यास काय?

विसंगती स्कॅनचा अहवाल नेहमीच 100% अचूक नसतो हे पुन्हा एकदा समजून घेणे महत्वाचे आहे आणि निरीक्षणे नेहमीच बरोबर असू शकत नाहीत. तसेच, ह्या टप्प्यावर गंभीर समस्या ओळखण्याची शक्यता दुर्मिळ आहे. परंतु, एखादी समस्या दिसल्यास, त्यास कसे सामोरे जावे याबद्दल आपल्याला सल्ला दिला जाईल. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी खालील मुद्द्यांवर तुम्ही तयारी केली पाहिजे.

  • तुमच्या बाळाच्या स्थितीमुळे अल्ट्रासाऊंड, प्रतिमांच्या कोणत्याही लहरींशी सुसंगत होत नाही आणि त्यामुळे सोनोग्राफरला सर्व काही पाहणे शक्य नसते. तसेच, तुमचे वजन जास्त असल्यास स्कॅन सुसंगत नसेल कारण शरीरातील चरबी सोनोग्राफीमध्ये व्यत्यय आणू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्यात स्कॅन पुन्हा करावे लागेल. जर सोनोग्राफरला एखादी समस्या वाटल्यास, तुम्हाला ताबडतोब तसे सूचित केले जाईल आणि स्कॅनचे निकाल आल्यानंतर ७२ तासांच्या आत तुम्हाला बाळाच्या डॉक्टरांना भेटण्यास सांगितले जाते.
  • तुमच्या बाळाला हृदयाची समस्या असू शकते असे निरिक्षणातून सूचित झाल्यास तुम्हाला बाळाचे इको स्कॅन करण्यास सांगितले जाऊ शकते. तुमचे डॉक्टर नंतर आढळलेल्या समस्येसाठी योग्य उपाय सुचवतील. हे समस्येच्या तीव्रतेवर आणि ह्या टप्प्यावर हस्तक्षेप आवश्यक आहे की नाही यावर अवलंबून असेल. काही वेळा, बाळाच्या जन्मानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागते, तर काही वेळा, बाळ गर्भाशयात असताना शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात.

गर्भाशयात बाळाचा विकास होताना पाहणे हा पालकांसाठी एक अनोखा अनुभव असतो. बहुतेक वेळा, या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पतीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी असते. हे स्कॅन करणारी डायग्नोस्टिक केंद्रे सहसा तुमच्या ह्या सुंदर क्षणांच्या आठवणी संकलित करण्यासाठी स्कॅनची चित्रे आणि व्हिडिओ कॉपी देतात. तरीही, विसंगती स्कॅन करण्‍याचा नेहमी सल्ला दिला जातो कारण बाळाची वाढ चांगली होते आहे किंवा नाही हे समजण्यासाठी हा स्कॅन महत्वाची भूमिका बजावतो.

आणखी वाचा:

गरोदरपणातील डेटिंग स्कॅन – काय अपेक्षित असते?
गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article