Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य महिलादिन २०२३: सर्वोत्तम कोट्स, शुभेच्छा आणि मेसेजेस

महिलादिन २०२३: सर्वोत्तम कोट्स, शुभेच्छा आणि मेसेजेस

महिलादिन २०२३: सर्वोत्तम कोट्स, शुभेच्छा आणि मेसेजेस

आपल्या आयुष्यातील महिलांच्या योगदानाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. स्त्रियांचे निःसंशयपणे आपल्या हृदयात एक विशेष स्थान असते आणि आपण त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. हा दिवस त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी आदर दर्शविण्यासाठी आहे. म्हणून, आमच्याकडे तुमच्यासाठी भरपूर छान छान कोट्स, शुभेच्छा आणि संदेश आहेत त्यातून तुम्हाला आवडणारे शुभेच्छा संदेश निवडून तुमच्या प्रियजनांना ते पाठवू शकता.

आंतरराष्ट्रीय महिलादिनासाठी कोट्स, शुभेच्छा आणि संदेश

ज्या स्त्रियांचा आपण आदर करतो आणि ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिलेला आहे त्यांचा हे शुभेच्छा, संदेश, आणि कोट्स वापरून सन्मान करूयात.

महिलादिनासाठी सुंदर कोट्स

आपण किती काळजी घेत आहात आणि तिचा आदर करीत आहात हे तिला सांगायचे असल्यास तिला महिलादिनासाठी हे प्रेरणादायक कोटस पाठवा!

कोट्स

1. ” कधीही भीतीमुळे आपल्याला जे योग्य आहे ते करण्यास प्रतिबंध होऊ देऊ नका.” – ऑंग सॅन सू की

2. “प्रत्येक मुलीला हे माहित असावे की तिचा आवाज जग बदलू शकतो.” – मलाला यूसुफजई

3. “सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळी न पडता तुमच्या जीवनाची नायिका व्हा.” – नोरा एफ्रोन

4. “प्रत्येक स्त्रीचे यश हे दुसर्‍यासाठी प्रेरणास्थान असले पाहिजे. जेव्हा आपण एकमेकांना आनंदित करतो तेव्हा सर्वात मजबूत असतो–   सेरेना विल्यम्स

5. “राणीसारखे विचार कर. राणी अपयशी होण्यास घाबरत नाही. अपयश हे महानतेसाठी आणखी एक पायरी आहे. ” – ओप्राह विन्फ्रे

6. “मी महिलांच्या शांततेची गर्जना ऐकू शकतो.” – थॉमस संकरा

7. “समाज बदलण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे जगातील महिलांना एकत्रित करणे.” – चार्ल्स मलिक

8. “महिलांना सर्व प्रकारच्या अत्याचारातून मुक्त केले नाही तर स्वातंत्र्य मिळू शकत नाही.” – नेल्सन मंडेला

9. “तुला तुझ्या आयुष्यात प्रेम भेटलं आहे का? आरशात पहा. ” – बायरन केटी

10. “कोणत्याही स्त्रीचे सर्वात उत्तम संरक्षण म्हणजे धैर्य होय.” – एलिझाबेथ कॅडी स्टॅनटन

11. “जेथे स्त्री आहे, तेथे जादू आहे.” – नॉटोझाके शंगे

12. “मुलींनी हुशार होण्यास कधीही घाबरू नये.” – एम्मा वॉटसन

13. “आयुष्य खूप कठीण आहे, माझ्या प्रिये, पण तूही तशीच आहेस.” – स्टेफनी बेनेटहेन्री

14. “सामर्थ्यवान स्त्रीला डोळ्यासमोर एक आव्हान दिसते आणि ती डोळे मिचकावते. ” – जीना केरी

15. “कधीकधी ही ती राजकुमारी असते जी राक्षसाला ठार मारते आणि राजपुत्र वाचवते.” – सॅम्युएल लो

16. “मी करू शकते आणि करेनकॅरी ग्रीन

17. “स्त्री परिधान करू शकणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आत्मविश्वास.” – ब्लेक लाईव्हली

18. “पुरुषाला काय करायचे आहे ते त्याने केले. एखाद्या स्त्रीने जे करू शकत नाही ते केलेच पाहिजे.” – रोंडा हॅन्सोम

महिलादिनासाठी सुंदर कोट्स, शुभेच्छा आणि संदेश

तुमच्या जीवनातल्या प्रिय स्त्रियांसाठी महिला दिन शुभेच्छा आणि संदेश

खालील भावनात्मक संदेश आणि शुभेच्छा आपल्या आयुष्यातील खास महिलांना पाठवून महिला दिन साजरा करा आणि त्या खूप खास आहेत हे त्यांना सांगा.

बायकोसाठी

1. तुझ्या रूपाने कल्पनेपलीकडची एक भेट मला मिळाली आहे. तू एक साहसी स्त्री आहेस तू माझी पत्नी आहेस आणि त्यासोबत एक चांगली मैत्रीण सुद्धा आहेस. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. एक स्त्री नाजूक दिसू शकते परंतु सर्वात कठीण समस्यांना तोंड देण्याची क्षमता तिच्यात आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिये!

3. नेहमी प्रेमळ, काळजी घेणारी, दयाळू, तडजोड करणारी तू सतत प्रेरणा देतेस. स्वतःची नोकरी सांभाळून माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. महिला दिनाच्या शुभेच्छा, प्रिये!

4. ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात प्रवेश केलास तो धन्य! तू माझ्यात अनेक चांगले बदल केलेस. माझ्या पाठीशी नेहमीच राहिल्याबद्दल धन्यवाद. महिला दिनाच्या शुभेच्छा, प्रेम!

5. तू एका नदीसारखी आहेस जी तिच्या अंत: करणात सर्वकाही घेऊन दूरवर पोहोचते, प्रिय बायको, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. तू खूप शौर्याने संकटांचा सामना केला आहे. तू सर्व चिंता आपल्या अंत: करणात लपवून ठेवल्या आहेत. तू खरोखर एक सामर्थ्यवान स्त्री आहेस! महिला दिनाच्या शुभेच्छा, प्रिये!

7. तुझ्याशिवाय माझे आयुष्य सूर्याशिवाय आकाशाप्रमाणे आहे, ताऱ्यांशिवाय चंद्रासारखे आहे. तूच माझ्यासाठी जग आहेस. महिला दिनाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिये!

8. मला अभिमान आहे की मला एक पत्नी मिळाली, जी दिसावयास एक राजकुमारी आहे आणि मनाने योद्धा आहे. तुझ्यासारख्या अत्यंत प्रेरणादायक महिलेसाठी, हॅपी वुमेन्स डे.

9. जेव्हा एखाद्याला फक्त एकाच नजरेने आपली समस्या समजते तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. मी माझ्या सुंदर पत्नीला महिला दिनाच्या शुभेच्छा देतो!

10. जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला पूर्णत्व प्राप्त झाले. महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक क्षण आनंद घेऊन आलेला आहे. महिलादिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा

12. तुला कायम असेच उत्तुंग यश लाभो. तू सतत आनंदी राहो महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईसाठी

1. प्रिय आई, तू मला लहानाचे मोठे केलेस, शिकवलेस आणि सुरक्षित ठेवलेस. माझ्या पाठीशी नेहमी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या स्त्रिया अपवादात्मक आहेत आणि तू त्यांच्यापैकीच एक आहेस. आई तुला महिलादिनाच्या शुभेच्छा!

3. आई, तू जी मूल्ये माझ्यामध्ये रुजवलीस त्याने मला एक चांगली व्यक्ती बनवले. महिला दिनाच्या शुभेच्छा!

4. काहीही असो तू नेहमीच माझ्या पाठीशी असतेस. तू माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छित आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा, आई!

5. या जगातील सर्वोत्कृष्ट आई मला लाभलेली आहे हा मला खरोखरच आशीर्वाद मिळाला आहे. आई तुला महिला दिनाच्या शुभेच्छा!

6. आईच्या प्रेमाचे आणि काळजीचे शब्दात वर्णन केले जाऊ शकत नाही. आई, तू एक अतिशय सुंदर व्यक्ती आहेस जी प्रत्येक परिस्थितीत आमचे समर्थन करते. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. एक आई आपल्या मुलाचे रक्षण करते त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि जगासाठी त्याला तयार करते. सर्व मातांना सलाम आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

8. प्रत्येक स्त्री सुंदर असते. पण जेव्हा ती आई बनते तेव्हा तिचा गौरव आणखी वाढतो आणि तिची शक्ती वाढते. महिला दिनाच्या शुभेच्छा, आई!

9. तू मला आनंदी ठेवण्यासाठी आतापर्यंत खूप कष्ट घेतलेले आहेस. तुलाही असाच आनंद मिळत राहो महिलादिनाच्या तुला खूप शुभेच्छा!

10. तू घरी आणि ऑफिसमध्ये सदैव कामात व्यस्त असतानाही कधीच माझ्याकडे दुर्लक्ष केलेले नाही महिलादिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा

बहिणीसाठी महिला दिन शुभेच्छा आणि संदेश

बहिणीसाठी

1. प्रिय ताई! तू मला खूप समजून घेतेस. महिला दिनाच्या शुभेच्छा!

2. मेहनती बहिण असणे खरोखर प्रेरणादायक आहे. खूप कष्ट करण्यासाठी तू मला प्रोत्साहन देतेस. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. तुझ्या मार्गदर्शनाने माझे वागणे चांगल्या पद्धतीने बदलले आणि माझे आयुष्य मार्गी लागले. माझ्या बहिणीसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा!

4. तू मोठी असल्याने आम्हा सर्व भावांसाठी रोल मॉडेल आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा!

5. वर्षानुवर्षे, मी तुझ्याबरोबर अनेक गोष्टी शेअर केल्या. तू मला खूप दिलासा दिलास, मला अनेक प्रकारे मदत केलीस मी तुला मनापासून मानतो. महिला दिनाच्या शुभेच्छा!

6. आई बाबांनंतर तू मला बऱ्याच गोष्टी शिकविल्यास आणि मार्गदर्शन केले ती तूच आहेस प्रिय ताई! तू मला नेहमी प्रेरित केलेस. महिला दिनाच्या शुभेच्छा!

7. भगवंताने मला बहिणीच्या रूपाने सर्वात अमूल्य भेट दिली आहे. तू माझी बहुमोल अशी संपत्ती आहेस. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. तू माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेस! ताई तुला महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व स्त्रियांसाठी महिला दिन शुभेच्छा आणि संदेश

सर्व स्त्रियांसाठी

1. सूर्यासारख्या चमकणाऱ्या, आकाशाप्रमाणे शांत असणाऱ्या आणि चंद्रासारख्या सुंदर दिसणाऱ्या तुझ्यासारख्या स्त्रीला महिला दिनाच्या माझ्याकडून शुभेच्छा.

2. शौर्याचे प्रतीक आणि उत्कृष्टतेचे चिन्ह असलेल्या स्त्रियांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

3. उच्च महत्वाकांक्षा आणि खऱ्या प्रेमामुळे कोणीही स्त्रीशी स्पर्धा करू शकत नाही. तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा!

4. स्त्रीचा दृढनिश्चय आणि तिचे धैर्य ही तिने धारण केलेली दोन शास्त्रे आहेत यासह, ती सर्वकाही बदलू शकते! महिला दिनाच्या शुभेच्छा.

5. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचे तेज म्हणजे तिचे सौंदर्य नाही तर तिची इच्छाशक्ती आणि चारित्र्य आहे. तुमची इच्छाशक्ती मजबूत आणि चारित्र्य अतुलनीय बनवा आणि जग तुमचा आदर करताना दिसेल!

6. स्त्रिया आता यशस्वी होत आहेत आपण आपल्या कर्तृत्वाने आणि धैर्याने त्यांचे नेतृत्व करीत आहात. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. जीवनाच्या प्रवासात, आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत बनले पाहिजे. कधीही निराश होऊ नका आणि आपणास पाहिजे ते नेहमी मिळवा. महिला दिनाच्या शुभेच्छा!

8. प्रत्येक स्त्री अद्वितीय आहे आणि वेगळ्या प्रकारे विचार करते. आपण ज्यासारखे नाही त्यासारखे बनण्याचा कधीही प्रयत्न करु नका आणि स्वतःवर प्रेम करा. महिला दिनाच्या शुभेच्छा!

9. कोणत्याही परिस्थितीत कधीही कमकुवत होऊ नका आणि जगाला आपले खरे सामर्थ्य दाखवा. महिला दिनाच्या शुभेच्छा!

10. ज्या स्त्रीचा हेतू चांगला असतो आणि दृढ निश्चय कठोर असतो अशा स्त्रीबरोबर काम करणे माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा!

11. धैर्याचे प्रतीक आणि परिपूर्णतेचे चिन्ह असलेल्या स्त्रीला सलाम. महिला दिनाच्या शुभेच्छा!

12. वेळ व्यवस्थापित करणे, गोष्टी अमलात आणणे आणि कठोर परिश्रम करणे हे तुमचे तीन सर्वोत्तम गुण आहेत. तुम्ही दृढनिश्चयाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहात. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

13. तुमच्या संयमला सलाम. तुम्ही इतर महिलांसाठी एक आदर्श आहे. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

14. मैत्री ही सर्वात अद्भुत बंध आहे आणि एखाद्या स्त्रीशी मैत्री करणे हा खरोखर एक आशीर्वाद आहे. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

15. इतक्या कमी वेळात आपण काय आणि किती साध्य केले आहे ह्याची मी कल्पना करू शकत नाही. मला कधीतरी तुझ्यासारखं व्हायचं आहे. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

16. एक स्त्री ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे. महिलादिनाच्या शुभेच्छा!

तर, हे कोट्स, संदेश आणि महिला दिनाच्या शुभेच्छा या सर्वसमावेशक सूचीमधून तुम्हाला आवडतील ते संदेश निवडा. आपल्या आयुष्यातील महिलांना त्यांच्याबद्दल तुम्ही किती अभिमान बाळगता हे सांगा आणि त्यांना त्यांच्या सर्व गोष्टींबद्दल प्रेम वाटू द्या!

आणखी वाचा: आंतरराष्ट्रीय महिला दिवस – इतिहास, तथ्ये आणि तो कसा साजरा करतात?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article