देवी दुर्गा हे सकारात्मक उर्जेचे शुद्ध रूप म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये दुर्गेचा अर्थ “अजेय” असा आहे. एकीकडे ती उर्जास्थान आहे तर दुसरीकडे ती सर्व गोष्टींचा नाश करणारी आहे. दुर्गा ही देवता भगवान शिवाची पत्नी पार्वती देवीचा अवतार आहे. हिंदू घरात पार्वती देवीची पूजा केली जाते. देवी दुर्गेची नावे मुलींसाठी ठेवणे शुभ मानले जाते.
देवी दुर्गेची प्रेरणा घेऊन तयार केलेली देवीची नावे
देशभरातील पालक आपल्याकडे असलेल्या सुंदर गुणांसाठी आपल्या मुलींचे नाव देवी दुर्गा ठेवतात. जर तुम्ही दुर्गा देवीचे भक्त असाल तर तुम्ही आपल्या लहान मुलीचे नाव देवी दुर्गेचे ठेवणे स्वाभाविक आहे. हिंदू पुराणकथांमध्ये दुर्गा देवीची १००८ नावे आहेत. आम्ही या लेखात आपल्याला देवी दुर्गेच्या नावांचा एक संग्रह देत आहोत. मुलींसाठीची देवी दुर्गेची काही नावे पाहू या.
| नाव | नावाचा अर्थ |
| आद्या | प्रथम, पृथ्वी |
| आर्या | देवी पार्वतीचे परोपकारी स्वरूप |
| ऐशानी | शक्तीचे प्रतीक, दुर्गा देवीचे एक नाव |
| अनिका | देवीचे दुसरे नाव तिची कृपा, तेज आणि सुंदर चेहरा प्रकट करते |
| बरुनी | देवी दुर्गाचे स्त्रीचित्रण आहे |
| भार्गवी | हे देवी दुर्गेचे अत्यंत सुंदर आणि मोहक प्रतीक आहे |
| भवानी | देवी पार्वती, श्री शिवाची पत्नी |
| भव्या | जो देवी पार्वतीप्रमाणेच सुंदर आणि पुण्यवान आहे |
| चंद्रिका | चंद्र |
| चिटी | देवाची भेट, प्रेम, फुलपाखरू, लहान |
| चित्तरुप | देवी पार्वतीसारख्या विचार–स्थितीत असणारी |
| दक्षियानी | देवी दुर्गा पराक्रमी राजा दक्षची कन्या होती म्हणून तिला दक्षियानी देखील म्हणतात. |
| देविशीं | देव प्रमुख, देवी |
| ईशा | पार्वती देवी स्वरूप |
| गौरी | देवी दुर्गेप्रमाणे गोरी |
| गायत्री | देवी पार्वतीचे दुसरे नाव आहे आणि हे भारतभर लोकप्रिय आहे |
| हिमानी | हिमालयातील हिमनदी. पार्वती देवीचे देखील हे नाव आहे |
| ईशा | प्रत्येकाचे रक्षण करणारी |
| इशी | इशी म्हणजे देवी दुर्गा |
| जया | देवी दुर्गेचे दुसरे नाव म्हणजे विजय |
| जयललिता | विजयी होण्यासाठी जन्मलेली, देवी दुर्गेचे दुसरे नाव |
| कामकाय | शुभेच्छा देणारी, इच्छा पुरवणारी |
| कैशोरी | देवी पार्वती |
| कालका | देवी दुर्गेचे समानार्थी नाव आहे |
| कलावती | देवी पार्वतीप्रमाणेच कलात्मक |
| कन्यका | सर्वात लहान आणि अविवाहित |
| करणिका | फाडणारी |
| कात्यायनी | लाल रंगाचे कपडे घातलेली |
| कौशिकी | देवी दुर्गेचे समानार्थी नाव, रेशमी वस्त्र नेसलेली असाही अर्थ होतो |
| किराती | भगवान शिव यांचे दुसरे नाव किरतेश्वर आहे देवी दुर्गेला बहुतेकदा किरतेश्वरची पत्नी किराती असे संबोधले जाते |
| क्रिया | कामगिरी, धार्मिक किंवा शुद्ध क्रिया |
| कुजा | पृथ्वीची कन्या |
| महागौरी | देवी दुर्गेच्या सर्वोच्च गुणाचा संदर्भ देते. |
| महामाया | हिंदू संस्कृतीत धार्मिक शब्दावलीनुसार आपले अस्तित्व एक भ्रम मानले जाते. हे नाव भ्रम संदर्भित करते आणि देवी दुर्गेचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते |
| महाश्वेता | हे दुर्गा देवीची शक्ती दर्शवते |
| निरंजना | हे नाव देवी दुर्गेचे प्रतीक आहे. ह्याचा अर्थ नदी आणि पौर्णिमेची रात्र देखील आहे |
| नित्या | अनंत आणि स्थिर आहे |
| प्रगल्भा | एक अद्वितीय नाव ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये शक्ती आणि सामर्थ्याची देवी आहे – दुर्गा |
| पुरला | हे नाव देवी दुर्गेचे आहे आणि तिच्या शौर्य व निष्ठेचे प्रतिबिंब आहे. ह्याचा अर्थ सर्व किल्ल्यांचा संरक्षक देखील आहे |
| रत्नाप्रिया | दागदागिने आवडणारी |
| रीमा | ही देवी दुर्गेचे तिच्या शक्ती अवतारात प्रतिनिधित्व करते. ह्याचा अर्थ पांढरा मृग आहे. |
| साध्वी | सद्गुण, नम्र, सोपी, निष्ठावंत |
| संस्कारी | चांगली नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्ये |
| संताती | शुभेच्छा देणारी |
| सरबानी | नाव बंगाली घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि देवी दुर्गा यांचे दुसरे नाव आहे. |
| सरिता | देवी दुर्गेचा आणखी एक प्रतिशब्द आहे आणि ते देखील नदीचे प्रतीक आहे |
| सर्वानी | देवी दुर्गा ही स्त्रीत्वची प्रतीक आहे आणि तिची उपस्थिती कृपा व शांती आणते. हे देवी दुर्गेचे आणखी एक नाव आहे आणि याचा अर्थ सार्वत्रिक आहे. |
| सात्विकी | देवी दुर्गा म्हणजे शुद्धता आणि प्रामाणिकपणा. सात्विकी शुद्धतेचे प्रतीक आहे. |
| सत्य | सत्य, वास्तविक, संस्कृत |
| शाम्भवी | हे देखील देवी पार्वतीच्या रूपात शंभूच्या पत्नीचे नाव आहे |
| शरिका | पार्टनर, सहभागी |
| शिवानी | पार्वती देवी |
| शिला | पर्वतावर राहणारी |
| स्तुती | देवी दुर्गाची स्तुती |
| सुंदरी | सुंदर |
| तन्वी | देवी दुर्गेचे दुसरे नाव, ह्याचा अर्थ सुंदर आहे |
| तारिणी | ती मुक्त करणारी , तारणारी |
| तोशानी | हे नाव देवी दुर्गेचे गौरव रूपात आहे. |
| त्रिती | संस्कृतमध्ये ह्या नावाचा अर्थ देवी दुर्गेप्रमाणे कुशल, वेगवान आणि चपळ आहे |
| त्रिनेत्र | हिंदू पौराणिक कथांनुसार, देवी दुर्गा तीन डोळ्यांचा किंवा त्रिनेत्र आहे. |
| त्वरिता | हे देवी दुर्गेचे एक अद्वितीय नाव आहे आणि तिच्या सामर्थ्याने उभे आहे. |
| उमा | देवी दुर्गेचे आणखी एक अद्वितीय नाव |
| वरुणिका | पावसाची देवता |
| यती | हे आणखी एक अद्वितीय नाव आहे जे देवी दुर्गेचे समानार्थी आहे |
देवी दुर्गा म्हणजे स्त्री शक्ती. ह्या लेखात आम्ही देवी दुर्गेची वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्यापैकी काही कदाचित पारंपारिक असतील तर काही अगदी वेगळी आणि एकमेकाद्वितीय असतील. आम्हाला आशा आहे की आपणास या लेखामधून आपल्या प्रिय मुलींसाठी आवडते नाव सापडले असेल.
आणखी वाचा:
तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे
एकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे

