Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

गरोदरपणाच्या क्षणापासून ते प्रसूतीपर्यंत, तुमच्या उदरात बाळाची वाढ वेगाने होत असते. सुरुवातीच्या काळात बाळाचे वय अल्ट्रासाऊंड स्कॅन वापरुन गर्भाशयाची लांबी आणि डोक्यापासून कुल्ल्यांपर्यंतची लांबी, मार्करचा वापर करून मोजून निश्चित केले जाते. कारण प्रत्येक बाळ गर्भारपणाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत समान वेगाने वाढत असते. येथे आम्ही उदाहरण म्हणून फळांचा आणि शाकाहारी पदार्थांचा वापर करून प्रत्येक बाळ आठवड्यात किती मोठे होते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

तुमचे बाळ केवढे आहे?

गर्भधारणेदरम्यान आपल्या बाळाच्या आकाराचा अभ्यास करणे मोहक आहे. गर्भधारणेच्या वेळी, गर्भाचा आकार खूप सूक्ष्म असतो. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर गर्भाच्या आकारात सामान्यपणे प्रगती होत आहे का आणि बाळ हवे तसेच वाढत आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी गर्भाच्या आकाराचे मोजमाप केले जाते. जेव्हा तुम्ही नुकत्याच गर्भवती होता, तेव्हा तुमच्या बाळाचा आकार केवळ बियाण्याइतका असतो. या आकारापासून, बाळाचा जन्म होईपर्यंत तुमचे बाळ ३.५ किलो वाढेल.

बाळाचा आकारः १ ते ३ आठवडे

या अवस्थेत, स्त्रीबीजाचे गर्भाधान आईच्या शरीरात होते आणि भ्रूण गर्भाशयाला चिकटते. तुमच्या बाळाची निर्मिती नुकतीच झालेली आहे आणि दोन पेशींपासून त्याच्या वाढीस सुरुवात होते.

बाळाचा आकार: ४ था आठवडा

वैद्यकीय भाषेत, ह्या टप्प्यात बाळाला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. एखाद्यास बाळाकडे पहाण्याची संधी मिळाल्यास, तो पेशींचा समूह एखाद्या चेंडूसारखा दिसेल. एका खसखशीच्या दाण्यासोबत ह्याची तुलना करता येईल.

बाळाचे वजन:

या अवस्थेत बाळाचे वजन एक ग्रॅमपेक्षा कमी असते.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर तुमचे बाळ खूपच लहान आहे आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये छोटी थैली म्हणून ओळखली जाऊ शकते. बाळाची लांबी 3 मिमीपेक्षा कमी असते.

आपल्याला कसे वाटेल: आपण गर्भवती असल्याची ही सुरुवातीची लक्षणे आहेत. उदाहरणार्थ रक्तस्त्राव आणि सौम्य पेटके येणे. परंतु बहुतेक स्त्रिया ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात कारण ही लक्षणे मासिक पाळी सुरू होण्याच्या लक्षणांसारखीच असल्याने बऱ्याचशा स्त्रिया गोंधळात पडतात.

बाळाचा आकार: आठवडा ५

तुमचे बाळ साधारणतः सफरचंदाच्या बियाण्याच्या आकाराचे आहे. ह्या टप्प्यात यकृत आणि मूत्रपिंडासारखे अवयव तयार होण्यास सुरवात होते.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर बाळाचे वजन अगदी नगण्य असते आणि ते एका ग्रॅमपेक्षाही कमी असते.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर, बाळ सुमारे ०. १३ इंच लांब आहे.

आपल्याला कसे वाटेल:

मॉर्निंग सिकनेस आणि वारंवार लघवी करणे ह्यासारखी काही स्पष्ट लक्षणे अनुभवण्यास आता तुम्ही प्रारंभ कराल.

बाळाचा आकार: आठवडा ६

आपल्या बाळाच्या आकाराची तुलना हिरव्या मटारसोबत केली जाऊ शकते. ह्या टप्प्यावर डोळे, नाक, जीभ आणि स्वरयंत्र तयार होण्यास सुरुवात होते.

बाळाचे वजन:

बाळ अजूनही खूपच लहान आहे त्यामुळे त्याचे वजन नगण्य आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी फक्त ०.२५ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्या पोटाचा आकार अजूनही वाढलेला दिसत नसेल परंतु तुम्हाला मूड स्विंग्स, पेटके आणि दुखरे, हळूवार स्तनांसारख्या गरोदरपणाशी संबंधित समस्यांचा अनुभव येईल.

बाळाचा आकार: आठवडा ७

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाचा आकार ब्लूबेरी एवढा असतो आणि मेंदू त्याच्या पूर्ण आकाराच्या जवळजवळ एक तृतीयांश इतका वाढलेला असतो.

बाळाचे वजन:

बाळाचे वजन अद्याप नगण्य आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर, आपल्या बाळाची लांबी १३ ते १८ मिमी दरम्यान असते.

आपल्याला कसे वाटेल:

काही मॉम्सटूबी भाग्यवान असतील आणि त्या कोणतीही लक्षणे मुळीच अनुभवणार नाहीत, परंतु बहुतेक गर्भवती स्त्रिया मळमळ, अन्नाची लालसा आणि मुरुमांचा अनुभव घेतील.

बाळाचा आकार: आठवडा ८

जेव्हा तुमचे गर्भारपणाचे ८ आठवडे पूर्ण होतात तेव्हा आपल्या बाळाची लांबी अर्धा इंच आणि राजम्याच्या दाण्या आकार एव्हढा असेल. बाळाचा शेपटासारखा दिसणारा भाग नाहीसा होतो आणि आणि बोटे एकमेकांना चिकटलेली असतात.

बाळाचे वजन:

या टप्प्यावर आपल्या बाळाचे वजन सुमारे १.१ ग्रॅम (. ०४ औंस) असेल.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी अर्धा इंच असते.

आपल्याला कसे वाटेल:

या टप्प्यात सामान्यत: गरोदरपणाची लक्षणे जाणवू लागतात. संप्रेरकांमधील बदलांमुळे अगदी सौम्य वासाला सुद्धा संवेदनशीलता वाढते. मळमळ, चक्कर येणे, पोट बिघडणे ह्यासारख्या इतर समस्या येतात.

बाळाचा आकार: आठवडा ९

बाळाचा आकार आता द्राक्षाएवढा झाला आहे. हेअर फॉलिकल्स तसेच दुधाचे दात ह्या टप्प्यावर तयार होतील.

बाळ वजन:

या टप्प्यावर बाळाचे वजन १. ९ ग्रॅम (. ०७ औंस) आहे.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर गर्भ सहसा ०. ९ इंच लांब असतो.

आपल्याला कसे वाटेल:

गर्भारपणाची नेहमीची लक्षणे जसे की डोकेदुखी आणि मॉर्निंग सिकनेस जाणवू लागतील.

बाळाचा आकार: आठवडा १०

या टप्प्यावर, तुमच्या बाळाचा आकार लहान म्हाळुंगच्या (टॅनंगेरीन) फळाएवढा असतो. तुमच्या बाळाचे हृदय आता पूर्णपणे कार्यरत आहे आणि त्याच्या हातापायांच्या वाढीला सुरुवात झाली आहे.

बाळ वजन:

ह्या अवस्थेत बाळाचे वजन अंदाजे ३.९ ग्रॅम (. १४ औंस) असते.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर बाळाची लांबी १.२५ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

नेहमीच्या लक्षणांव्यतिरिक्त, गर्भाशयाचा आकार वाढत असल्याने तुमच्या पोटात वेदना होऊ शकतील

बाळाचा आकार: आठवडा ११ वा

तुमचे बाळ आता अंजिराइतके मोठे आहे आणि रक्तवाहिन्या आणि नसा विकसित करण्याच्या मार्गावर आहे.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ७ ग्रॅम (. २५ औंस) असेल.

बाळाची लांबी:

बाळाची लांबी १. ६१ इंच इतकी असून ती वेगाने वाढत आहे.

आपल्याला कसे वाटेल:

नेहमीच्या लक्षणांसोबतच तुम्हाला गॅसच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, म्हणूनच आपण सोयाबीनचे आणि तळलेले अन्न टाळावे आणि तंतुमय पदार्थ जास्त असलेले अन्नपदार्थ खावेत.

बाळाचा आकार: आठवडा १२ वा

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचा आकार लिंबाएवढा आहे आणि बाळाच्या मऊ शरीरात हळूहळू हाडे विकसित होऊ लागली आहेत.

बाळ वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन १४ ग्रॅम (. ४९ औंस) असेल.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी २. १३ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आता मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झालेला असेल आणि तुमची ऊर्जा वाढलेली असते. तथापि, रक्तदाब बदलल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.

बाळाचा आकार: आठवडा १३ वा

तुमच्या बाळाचा, डोक्यापासून पायापर्यंतचा आकार आता वाटाण्याच्या शेंगेएवढा असेल. अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये आपण हात, पाय आणि डोके स्पष्टपणे पाहू शकता. अल्ट्रासाऊंड दरम्यान तुम्हाला दिसेल की ह्या अवस्थेत बाळ सतत फिरत असते आणि खूप सक्रिय असते.

बाळ वजन:

तुमच्या बाळाचे वजन २३ ग्रॅम (.८१ औंस) असेल.

बाळाची लांबी:

. ९१ इंच लांबीचे तुमचे बाळ अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये दिसू शकेल.

आपल्याला कसे वाटेल:

हा तुमच्या गर्भारपणातील सर्वात चांगला टप्पा असेल कारण मळमळ कमी होईल, तुमची उर्जा पातळी वाढेल आणि तुमच्या कामवासनामध्ये वाढ होईल.

बाळाचा आकार: आठवडा १४ वा

तुमच्या बाळाचा आकार आता मोठ्या लिंबाएवढा आहे आणि ते त्याच्या चेहर्यावरील स्नायूंचा व्यायाम करण्याच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत राहतील.

बाळ वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ४२ ग्रॅम (दीड औंस) पेक्षा जास्त असेल.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी ३. ९ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुमचे केस आता जाड आणि रेशमी असतील आणि यापुढे तुम्हाला सुस्तपणा जाणवणार नाही.

बाळाचा आकार: आठवडा १५ वा

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची तुलना सफरचंद किंवा लहान पेपरच्या आकाराशी केली जाऊ शकते. तुमच्या बाळाची श्रवणशक्ती विकसित होत आहे आणि बाळ कदाचित तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची लय ऐकू शकते.

बाळ वजन:

या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ६८ ग्रॅम (. ४ औंस) आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी जवळजवळ ४ इंच इतकी असते.

आपल्याला कसे वाटेल:

तुम्ही दुस ्यांदा आई होत असल्यास, तुम्हाला बाळाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत असे वाटू शकते. नवीन मातांना बाळाची हालचाल ओळखण्यात किंवा जाणवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

बाळाचा आकार: १६ वा आठवडा

तुमच्या बाळाचा आकार आता अवोकाडो इतका झाला आहे आणि बाळाची पूर्णपणे कार्यशील रक्ताभिसरण प्रणाली तयार झाली आहे.

बाळाचे वजन:

१०० ग्रॅम (. ५३ औंस), तुमच्या बाळाचे वजन वेगाने वाढत आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची लांबी ४.५ इंचापेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर तुम्ही मिश्र लक्षणे अनुभवाल. एकीकडे, तुम्ही पाठदुखी आणि बद्धकोष्ठतेचा सामना कराल आणि दुसरीकडे तुमची त्वचा चमकदार होईल.

बाळाचा आकार: १७ आठवडे

673972408-H.jpg (1024×700)

तुमचे बाळ आता पेअरच्या आकाराचे आहे आणि आपला अनोखा ठसा विकसित केला आहे.

बाळाचे वजन:

१४० ग्रॅम (.९४औंस), आपले बाळ आता गर्भाशयातली जागा आता हळूहळू व्यापित आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची लांबी सुमारे ५. १२ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

बाळ वेगवान वेगाने वाढत असताना तुम्हाला विचित्र स्वप्ने, वजन वाढणे आणि शरीरात द्रवपदार्थ वाढणे इत्यादींचा अनुभव येऊ शकेल.

बाळाचा आकार: आठवडा १८ वा

329058440-H.jpg (1024×700)

तुमच्या बाळाचा आकार रताळ्याएवढा आहे आणि बाळाचे लिंग स्पष्ट होईल.

बाळ वजन:

या टप्प्यावर बाळाचे वजन १९० ग्रॅम (. ७० औंस) असते.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी ५. ५ इंचांपेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुम्हाला बाळाच्या हालचाली जाणवण्यास सुरुवात झालेली असेल.

बाळाचा आकार: आठवडा १९ वा

तुमचे बाळ आता आंब्याइतके मोठे असेल आणि संवेदी अवयव वेगाने विकसित होत जातील.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन सुमारे २३८ ग्रॅम (. ४ औंस) आहे.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर तुमचे बाळ ६ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर अस्थिबंधनातील वेदना असामान्य नाहीत. जसे की तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढतो आणि त्यामुळे शरीरावर दाब येतो, चक्कर येणे आणि डोके हलके झाल्यासारखे जाणवू शकते. ह्या टप्प्यावर काही स्त्रियांच्या पायात पेटके येऊ शकतात आणि कुल्ले दुखू शकतात.

बाळाचा आकार: आठवडा २० वा

626207750-H.jpg (1024×700)

तुमचे बाळ आता केळ्याइतके मोठे आहे. दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांना ह्या टप्प्यावर बाळाची हालचाल जाणवू शकते आणि बाळ दिवसेंदिवस सक्रिय होते.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाचे वजन २८३ ग्रॅम (१० औंस) आहे.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर बाळाची लांबी १०.५ इंचापेक्षा जास्त आहे.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर शरीरावर सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य आहे. तुम्ही कधीकधी उच्च उर्जा देखील अनुभवू शकता.

बाळाचा आकार: आठवडा २१ वा

97806197-H-768x525.jpg (768×525)

तुमच्या बाळाचा आकार आता मोठ्या गाजराएवढा आहे. या क्षणी, बाळाच्या वाढीचा दर वेगवान होण्यास सुरवात होईल.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन सुमारे ३४० ग्रॅम (१२ औंस) आहे.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ १०. ५८ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर तुमच्या पोटाचा आकार वाढलेला सहज लक्षात येतो. पायाचे पेटके अधिक तीव्र वाटू शकतात. तुम्हाला योनि स्राव देखील होऊ शकतो आणि ते खूप सामान्य आहे.

बाळाचा आकार: आठवडा २२ वा

224254879-H.jpg (1024×700)

एकदा तुम्ही या टप्प्यावर पोहोचल्यावर, बाळांच्या वाढीचा दर वेगवेगळा असतो. म्हणून, जेव्हा बाळ ह्या टप्प्यावर पोहोचते तेव्हा अपेक्षेनुसार वाढ झाली आहे किंवा कसे हे सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर बाळाच्या शरीराच्या लांबीचे मोजमाप करतात. २२ व्या आठवड्यात बाळाचा आकार स्क्वाश एवढा असतो.

बाळाचे वजन:

४२५ ग्रॅम्स (१५ औंस) पेक्षा जास्त वजनअसते, आपल्या बाळाचे वजन आता जवळजवळ अर्धा किलो आहे.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ सुमारे ११ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुमच्या त्वचेला खाज सुटू शकते आणि तुमच्या छातीत जळजळ होऊ शकते. तुम्हाला ह्या कालावधीत सराव कळा सुद्धा येऊ शकतात. जेणेकरून तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होऊ शकते.

बाळाचा आकार: २३ आठवडे

251867473-H.jpg (1024×700)

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ द्राक्षफळाइतके मोठे आहे आणि ह्या टप्प्यावर बाळाची अस्थिमज्जा स्वतःची स्वतः तांबड्या पेशी तयार करण्यास सुरुवात करते.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ४९८ ग्रॅम (.१ पौंड) असेल.

बाळाची लांबी:

आपल्या बाळाच्या शरीराची लांबी डोक्यापासून टाचेपर्यंत ११.४ इंच इतकी असते.

आपल्याला कसे वाटेल:

पाठीत होणाऱ्या वेदना, सुजलेल्या हिरड्या आणि पायाचे घोटे ह्या सर्व सामान्य समस्या आहेत गर्भवती महिलांना ह्या टप्प्यावर ह्या लक्षणांचा अनुभव येतो.

बाळाचा आकार: २४ आठवडे

61575577-H.jpg (1024×700)

आपल्या बाळाचा आकार आता मक्याच्या कणसाइतका झाला आहे. फुफ्फुसांचा आता इतका विकास झाला आहे की अकाली प्रसूती झाली तरी ते टिकू शकतात.

बाळाचे वजन

आपल्या बाळाचे वजन अंदाजे ५८९ ग्रॅम (.३ पौंड) आहे.

बाळाची लांबी:

आपल्या बाळाची लांबी एक फूट आहे आणि आता ते तयार झाले होते त्यापेक्षा खूप मोठे आहे.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्या पोटावर गडद रेषा उमटेल आणि या टप्प्यावर ती दिसू लागेल. बाळाच्या वाढत्या आकारामुळे पोटाची त्वचा ताणली गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.

बाळाचा आकार: २५ आठवडे

222694693-H.jpg (1024×700)

ह्या टप्प्यावर आपल्या बाळाची तुलना अकोर्न स्क्वॉशशी करता येते आणि अधूनमधून अप्रिय आवाजांना प्रतिसाद देण्यासाठी एकदा किंवा दोनदा पाय मारते.

बाळ वजन:

तुमच्या बाळाचे वजन अंदाजे ६८० ग्रॅम (पौंड) आहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १३.६ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्याला झोपायला त्रास होऊ शकतो आणि जास्त वेळा लघवी करण्याची इच्छा होऊ शकते.

बाळाचा आकार: २६ आठवडे

725803432-H.jpg (1024×700)

आपल्या बाळाचा आकार साधारपणे केल (Kale) एवढा आहे आणि पाठीचा कणा आता बऱ्यापैकी विकसित आहे.

बाळाचे वजन:

तब्बल १. ७पौंड! तुमच्या पहिल्या स्कॅनपेक्षा बाळाचे वजन आता खूपच जास्त आहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १४ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आपला रक्तदाब या टप्प्यावर वाढू शकतो त्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला आधी कधीही झाले नसेल परंतु आता गोष्टी लक्षात ठेवणे अवघड होईल. आपले पोट बरेच मोठे होईल आणि आता आरामदायक मॅटर्निटी कपडे घालण्याची वेळ आहे.

बाळाचा आकार: आठवडा २७ वा

393867856-H-768x525.jpg (768×525)

तुमचे बाळआता फुलकोबीएवढे मोठे आहे. त्याचे कान विकसित झाले आहेत आणि ह्या टप्प्यावर बाळ तुमचा आवाज ओळखू शकतो.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन ८६१ ग्रॅम (. ९ पौंड) आहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १४. ४ इंचापेक्षा जास्त आहे.

आपल्याला कसे वाटेल:

दुसऱ्या तिमाहीची नियमित अस्वस्थता कायम राहील, परंतु तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करताच, पोट वाढल्यामुळे तुम्हाला गर्भाच्या तीव्र हालचाली देखील होतील.

बाळाचा आकार: आठवडा २८ वा

360375350-H.jpg (1024×700)

तुमच्या बाळाचा आकार आता मोठ्या वांग्याइतका झाला आहे आणि तुम्हाला आता वरचेवर उचक्या ऐकू येतील आणि ते खूप सामान्य आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन सुमारे ९९७ ग्रॅम (. २ पाउंड) असेल.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ सुमारे १५ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

जसे जसे आपले बाळ आणि पोटाचा आकार वाढतो तेव्हा आपल्याला अनेक अडचणी येतील. आपल्या गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे मूत्राशयवर दाब पडेल आणि तुम्हाला वारंवार बाथरूमला जावेसे वाटेल. तुमच्या बाळाच्या हालचाली देखील अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला रात्रीची झोप नीट लागणार नाही.

बाळाचा आकार: आठवडा २९ वा

75364009-H.jpg (1024×700)

तुमचे बाळ बटरनट स्क्वॅशइतके मोठे आहे आणि त्यातील बराचसा भाग मेंदूमध्ये वेगाने विकसित होतो.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन सहजपणे १. १ किलो (. ५ पौंड) भरेल.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ १५.२ इंच इतके असेल.

आपल्याला कसे वाटेल:

ह्या टप्प्यावर बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि खाज सुटणारी त्वचा इत्यादी समस्या येऊ शकतात. चांगली रात्रीची झोपे घेणे कठिण होईल आणि तुमच्या वाढत्या पोटाच्या आकारामुळे पाठीवर ताण न येण्यासाठी तुम्हाला कुशीवर झोपण्याची शिफारस केली जाईल.

बाळाचा आकार: आठवडा ३० वा

439175974-H.jpg (1024×700)

या टप्प्यावर आपले बाळ मोठ्या कोबी इतके मोठे आहे आणि आकाराच्या बाबतीत बाळाची वाढ कमी होण्याची शक्यता आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन १. ३ किलो (. ९१ पौंड) आहे.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर तुमच्या बाळाची लांबी १५. ७ इंच आहे.

आपल्याला कसे वाटेल:

तुमच्या बाळाचा आकार बरगडीच्या पिंजऱ्यापर्यंत पोहोचला आहे आणि आपल्या गर्भावस्थेच्या या टप्प्यावर तुम्हाला दम लागेल आणि थकवा जाणवेल.

बाळाचा आकार: ३१ आठवडे

270096533-H.jpg (1024×700)

या टप्प्यावर आपल्या बाळाच्या आकाराची मोठ्या नारळाशी तुलना करता येऊ शकते आणि बाळाची चवीची भावना विकसित होते आणि त्यामुळे गर्भजलाची चव बाळाला कळू लागते.

बाळाचे वजन:

या टप्प्यात तुमच्या बाळाचे वजन १. ४ किलोग्रॅम (३ पौंड) असेल.

बाळाची लांबी:

बाळाची लांबी १६. २ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

पायदुखी, छातीत जळजळ, पायांवर सूज येणे ही या अवस्थेत सामान्य गर्भधारणेची लक्षणे आहेत.

बाळाचा आकार: ३२ आठवडे

247366147-H.jpg (1024×700)

तुमचे बाळ आता चिनी कोबीच्या आकाराचे झाले आहे आणि बाळाची बोटे आणि नखे पूर्णपणे विकसित झाली असतील.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन १.७ किलो (. ८ पौंड ) असेल.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १६. ७ इंचांपेक्षा पेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

या काळात, गर्भवती महिलेस योनीतून स्त्राव होणे , गडद स्तनाग्रे, आणि गळणाऱ्या स्तनांचा अनुभव होण्याची शक्यता असते.

बाळाचा आकार: आठवडा ३३ वा

400863775-H.jpg (1024×700)

तुमचे बाळ आता अननसाच्या आकाराचे आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याच्या मार्गावर आहे.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन सुमारे १. ९ किलो (. २ पौंड) आहे.

बाळाची लांबी:

तुमचे बाळ आता १७.२ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

थकल्यासारखे होऊन डोकेदुखी होऊ शकते. नेहमी हायड्रेटेड रहा आणि बाहेर गेल्यास काळजी घ्या.

बाळाचा आकार: आठवडा ३४ वा

424096543-H-768x525.jpg (768×525)

तुमचे बाळ आता खरबूजाच्या आकाराचे झाले आहे आणि उष्णतेचा ऱ्हास रोखण्यासाठी बहुदा स्वतःभोवती चरबीचा थर विकसित केला आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन २. १ किलो (. ७ पाउंड) आहे.

बाळाची लांबी:

तुमच्या बाळाची लांबी १७. ७ इंचांपेक्षा जास्त असेल.

आपल्याला कसे वाटेल:

आधीपेक्षा आपले पोट खाली सरकल्यासारखे वाटे . कारण बाळ प्रसूतीसाठी श्रोणिच्या भागाकडे खाली सरकते.

बाळाचा आकार: आठवडा ३५ वा

665170432-H.jpg (1024×700)

बाळ आता हनीड्यू मेलन इतके मोठे आहे आणि आपल्याला या वेळी बरीच हालचाल जाणवेल.

बाळाचे वजन:

तुमचे बाळ २. ४ किलो (. ३ पौंड) वजनदार आहे.

बाळाची लांबी

तुमच्या बाळाची लांबी १८ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

वारंवार बाथरूमला जाण्याची आवश्यकता भासू शकते कारण वाढत्या बाळामुळे मूत्राशयावर दाब पडेल कारण बाळ आता श्रोणीच्या भागात सरकले असेल.

बाळाचा आकार: आठवडा ३६ वा

710024095-H.jpg (1024×700)

या टप्प्यावर तुमचे बाळ कॅनरी मेलन इतके मोठे आहे आणि बाळाचे डोके श्रोणिपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

बाळाचे वजन:

बाळाची वजनवाढ कमी होते आणि ह्या टप्प्यावर बाळाचे वजन २. ६ किलोग्रॅम (. ७८ पौंड) होईल.

बाळाची लांबी:

या टप्प्यावर आपल्या बाळाची लांबी १८. ६ इंच असेल.

आपल्याला कसे वाटेल:

बाळ खाली सरकल्यामुळे ओटीपोटावर दाब येईल. फुफ्फुसांच्या विस्तारासाठी अधिक जागा असल्याने तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारली आहे.

बाळाचा आकार: ३७ आठवडे

172231115-H.jpg (1024×700)

तुमचे बाळ आता स्विस चार्ड च्या जुडीच्या आकाराएवढे झाले आहे. ह्या काळात बाळाचा मेंदू आणि फुप्फुसे परिपक्व होतील.

बाळाचे वजन:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे सरासरी वजन २. ८ किलो (. ३ पौंड) असेल.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ अंदाजे १९ इंच लांबीचे आहे.

आपल्याला कसे वाटेल:

आपल्याला सराव कळा येतील आणि त्या प्रसूती कळा तर नाहीत ना ह्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. योनीमार्गातून येणारा स्त्राव वाढेल आणि हलके डाग पडतील.

बाळाचा आकार: आठवडा ३८ वा

3107225-H.jpg (1024×700)

३८ व्या आठवड्यात तुमचे बाळ रेवाचीनी च्या देठाच्या आकराइतके आहे.

बाळाचे वजन

तुमच्या बाळाचे वजन सरासरी ३ किलो (. ८ पौंड) असू शकते.

बाळाची लांबी

या टप्प्यात आपले बाळ अंदाजे १९. ५ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

प्रसूतीकळा जवळ येऊ लागतात. प्रसूतीकळा आणि सरावकळा ह्यामध्ये गोंधळ करू नका. एखाद्याने प्रसूतीची अपेक्षा केल्यामुळे चिंता वाटू शकते.

बाळाचा आकार: आठवडा ३९ वा

665274991-H-768x525.jpg (768×525)

तुमचे बाळ आता एका लहान टरबूजच्या आकारासारखे आहे आणि बाळाच्या त्वचेवर एक नवीन थर विकसित होतो आहे जो त्याच्या जुन्या त्वचेपेक्षा अधिक कठोर आहे.

बाळाचे वजन:

तुमच्या बाळाचे वजन सुमारे ३.१ किलो (७ पौंड) असेल.

बाळाची लांबी

तुमच्या बाळाची लांबी सहजपणे २० इंच होईल.

आपल्याला कसे वाटेल:

सराव कळांसोबत रक्तमिश्रित योनीमार्गातील स्त्रावाचा अनुभव बऱ्याच जणींना येईल.

बाळाचा आकार: आठवडा ४० वा

113750014-H.jpg (1024×700)

तुम्ही तुमच्या गर्भधारणेच्या शेवटी अधिकृतपणे आला आहात. तुमचे बाळ टरबूजाइतकेच मोठे असेल आणि लवकरच बाळाचा जन्म होईल.

बाळाचे वजन:

पूर्णमुदतीच्या बाळाचे वजन सरासरी ३. ४ किलो (. ६ पौंड ) असते.

बाळाची लांबी:

ह्या टप्प्यावर तुमचे बाळ डोके ते पायापर्यंत २०.२ इंच लांब असेल.

आपल्याला कसे वाटेल:

तुम्ही यशस्वीपणे हा गर्भारपणाचा काळ पार पाडला आहे! आता, फक्त जास्तीत जास्त विश्रांती घ्या . कारण तुम्हाला बाळाच्या जन्माच्या वेळी उर्जा आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे.

एका विशिष्ट टप्प्यानंतर, प्रत्येक बाळ त्याच्या वाढीची वेगवान गती घेते. ह्या टप्प्यावर आनुवंशिक घटक, मातृ पोषण आणि आरोग्य कामास येतात आणि म्हणूनच जन्माच्या वेळी प्रत्येक मुलाचा आकार, वजन आणि डोके वेगवेगळे असते. योग्य आणि निरोगी खाणे ही यशस्वी गर्भारपणाच्या गुरुकिल्ली आहे. हे घटक तुमच्या शरीरातील या नैसर्गिक बदलांचा आनंद घेण्यास देखील मदत करतील! तुम्हाला तुमच्या आनंदी गर्भारपणासाठी शुभेच्छ

आणखी वाचा: निरोगी गरोदरपणासाठी २० टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article