Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘स’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘स’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘स’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी सर्वात पहिले आणि महत्वपूर्ण काम म्हणजे बाळाचे नाव ठेवणे. कित्येक वेळेला पालक डिलिव्हरीच्या आधीच नावांची यादी तयार करू लागतात. बाळासाठी नाव शोधताना पालक काही मुद्धे लक्षात घेतात आणि ते म्हणजे बाळाचे नाव त्यांच्या स्वतःच्या नावाशी मिळते जुळते असावे, तसेच नाव युनिक, ट्रेंडी, आधुनिक आणि अर्थपूर्ण असावे असेही त्यांना वाटत असते. अर्थातच बाळाच्या नावाचे त्याच्या आयुष्यात खूप महत्व आहे परंतु बऱ्याच पालकांना हे माहिती नसते की बाळाच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप जास्त प्रभाव टाकू शकते. हो, अशी बरीच अक्षरे आहेत ज्यांच्या पासून नाव सुरु झाल्यास ते सौभाग्य आणि सफलतेशी संबंधित असते. असेच एक अक्षर आहे ‘. ह्या अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावांचा बाळाच्या व्यक्तिमत्वावर तर परिणाम होतोच परंतु भविष्यात त्याचे जीवन प्रभावित करण्यास सुद्धा मदत होते. असेही म्हणतात की अक्षरावरून नाव असलेल्या लोकांमध्ये लीडरशिप गुणधर्म असतात तसेच त्यांची निर्णयक्षमता सुद्धा चांगली असते. तसेच ह्या व्यक्ती खूप निष्ठावान असतात आणि सगळ्यांशी त्यांची मैत्री होते. ह्या लेखामध्ये आम्ही अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलांच्या निवडक आणि छान नावांची यादी केलेली आहे. ही सगळी नावे निश्चितच तुम्हाला आवडतील. जे लोक आपल्या मुलाच्या राशीनुसार त्याचे नाव ठेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी नावांचे हे संकलन मदत करेल.

अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

खाली मुलांसाठी अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी दिलेली आहे.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
सृजनरचनाकार, रचनात्मकहिंदू
स्वास्तिकशुभ, कल्याणकारीहिंदू
स्पंदनहृदयाची धडधड हिंदू
सक्षमयोग्य, कुशल, समर्थहिंदू
स्वानंदश्री गणेशाचे एक नाव हिंदू
स्वरांशसंगीतातील स्वराचा एक भाग हिंदू
सिद्धेशश्री गणेशाचे आणखी एक नाव हिंदू
समीहनउत्साही, उत्सुकहिंदू
सनिलभेट हिंदू
स्वाक्षसुंदर डोळ्यांचा हिंदू
सुकृतचांगले काम हिंदू
स्यामृतसमृद्धहिंदू
सृजितरचित, बनवलेला हिंदू
स्वपनस्वप्न हिंदू
सार्थकअर्थपूर्ण, योग्यहिंदू
सुयंशसूर्याचा अंश हिंदू
सुहृदमित्रहिंदू
सुतीर्थपाण्याजवळचे एक पवित्र स्थान, श्रद्धाळू व्यक्ती,चांगला शिक्षकहिंदू
सुतीक्षवीर, पराक्रमीहिंदू
सुकाममहत्वाकांक्षी, सुंदरहिंदू
सुजसत्याग, शानदारहिंदू
साहिलसमुद्रहिंदू
सम्राटदिग्विजयी राजाहिंदू
स्पर्शसाकार हिंदू
सानव सूर्य हिंदू
सामोदकृपा, अभिनंदन, सुंगधितहिंदू
सिद्धांतनियमहिंदू
स्वप्निलस्वप्नांशी निगडित, काल्पनिकहिंदू
सिद्धार्थसफल, भगवान गौतम बुद्धांचे मूळ नाव हिंदू
सव्यसाचीअर्जुनाचे एक नाव हिंदू
सुतेजचमक, आभाहिंदू
सव्याश्री विष्णूंच्या हजार नावांपैकी एक हिंदू
सुश्रुतअच्छी प्रतिष्ठा,एका ऋषींचे नाव हिंदू
साईश्री शंकर, ईश्वर, स्वामीहिंदू
सौगतप्रबुद्ध व्यक्ति, भेट हिंदू
सत्याखरेपणा, ईमानदारीहिंदू
सात्विकपवित्र, चांगला हिंदू
साकेतघर, स्वर्ग, श्री कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
सूर्यांशुसूर्याची किरणे हिंदू
सूर्यांकसूर्याचा भाग हिंदू
सौभद्रअभिमन्यूचे एक नाव हिंदू
सरविनविजय, प्रेमाची देवता हिंदू
सरवनयोग्य, स्नेही, उदारहिंदू
सर्वज्ञसगळे जाणणारा , श्री विष्णूचे एक नाव हिंदू
सुयशख्याति, प्रसिद्धिहिंदू
सरस हंस, चंद्रमाहिंदू
सारंगएक संगीत वाद्य, श्री शंकराचे एक नाव हिंदू
सजलमेघ, जलयुक्तहिंदू
सर्वदमनदुष्यंत पुत्र भरताचे एक नाव हिंदू
सप्तजितसात वीरांना जिंकणारा हिंदू
सप्तकसात वस्तूंचा संग्रह हिंदू
सप्तंशुआगहिंदू
संयमधैर्य, प्रयासहिंदू
संस्कारचांगली नैतिक मूल्ये हिंदू
संकेतइशारा, लक्षण, निशाणी हिंदू
सुरुषउदय, शानदारहिंदू
सुरंजनआनंददायक हिंदू
सुप्रतसुंदर सकाळ, आनंददायी सूर्योदयहिंदू
सौमित्रलक्ष्मणाचे एक नाव, सुमित्रेचा पुत्रहिंदू
संकीर्तनभजनहिंदू
संकल्पलक्ष्यहिंदू
संजीतनेहमी विजयी होनारा हिंदू
संजननिर्माता हिंदू
सनिशसूर्य, प्रतिभाशाली मुलगा हिंदू
स्तव्यभगवान विष्णु चे एक नामहिंदू
स्वयंखुदहिंदू
संदीपनएक ऋषि, प्रकाशहिंदू
स्यामन्तकभगवान विष्णु चे एक रत्नहिंदू
सुमुखसुंदर चेहऱ्याचा हिंदू
सुमेधबुद्धिमान, चतुर, समजूतदार हिंदू
संचितएकत्र, सांभाळून ठेवणारा हिंदू
सनतभगवान ब्रह्मा, अनंतहिंदू
सम्यकस्वर्ण, पर्याप्तहिंदू
संबितचेतनाहिंदू
संविदज्ञान, विद्याहिंदू
सोमचंद्राचे एक नाव हिंदू
संप्रीतसंतोष, आनंद,हिंदू
संपातिभाग्य, सफलता, कल्याणहिंदू
समीनकीमती, अमूल्यहिंदू
संरचितनिर्मितहिंदू
समार्चितपूजित, आराध्यहिंदू
समद अनंत, अमर, परमेश्वरहिंदू
सलिलसुंदर, जलहिंदू
सहर्षआनंदासहीत हिंदू
सानलऊर्जावान, शक्तिशालीहिंदू
सचिंतशुद्ध अस्तित्व आणि विचारहिंदू
सधिमनचांगुलपणा, पूर्णता, उत्कृष्टताहिंदू
सौरवचांगला वास, दिव्य, आकाशीयहिंदू
समक्षजवळ, प्रत्यक्षहिंदू
सौमिलप्रेम, मित्र, शांतिहिंदू
स्कंदसुंदर, शानदारहिंदू
सहजस्वाभाविक, प्राकृतिकहिंदू
सहस्कृतशक्ति, ताकद हिंदू
सहस्रजीतहजारोंना जिंकणारा हिंदू
समेशसमानतेचा ईश्वर हिंदू
समृद्धसंपन्नहिंदू
संविदज्ञानहिंदू
सनातनस्थायी, अनंत, श्री शंकर हिंदू
सानव्यवंशपरंपरागत हिंदू
सानुरागस्नेही, प्रेम करणारा हिंदू
सतचितचांगल्या विचारांचा हिंदू
संयुक्तएकत्रित, एकीकृतहिंदू
सारांशसार, संक्षेपहिंदू
सरनवरतृप्त, संतुष्ट, सर्वश्रेष्ठहिंदू
सदीपकशूरतेने खरेपणा कायम राखणारा हिंदू
सरोजिनश्री ब्रह्माहिंदू
सरूपसुंदर, शरीराचा हिंदू
सार्वभौमसम्राट, मोठा राजाहिंदू
सर्वदश्री शंकराचे एक नाव हिंदू
सर्वकसंपूर्ण हिंदू
सदयदयाळू हिंदू
सआदतआशीर्वाद, परम सुखमुस्लिम
सालिकप्रचलित, अबाधितमुस्लिम
सदीमदव मुस्लिम
सादसौभाग्यमुस्लिम
सदनाममित्र, खरा और श्रेष्ठमुस्लिम
समरस्वर्गातील फलमुस्लिम
साज़ संगीताची वाद्ये मुस्लिम
साजिद देवाची पूजा करणारा मुस्लिम
साबिरसहनशीलमुस्लिम
सुहायबलाल रंगाचे केस असलेला मुलगा मुस्लिम
सुहानखूप चांगला, सुखद, सुंदरमुस्लिम
सेलिमसकुशल, सुरक्षितमुस्लिम
साकिफकुशल, प्रवीणमुस्लिम
सचदीपसत्याचा दीपक शीख
सरजीतविजयीशीख
सरबलीनसगळ्यांमध्ये असलेला शीख
सतगुनचांगले गुण असलेला शीख
सिमरदीपदेवाच्या स्मरणाचा दिवा शीख
सुखशरनगुरुशरणातील शांती शीख
समरजीतयुद्धात जिंकलेला शीख
सुखिंदरआनंदाची देवता शीख
सुखरूपशांतीचा अवतार शीख
सनवीरमजबूत, शूर शीख
सरवरलीडर, सम्मानित शीख
स्काइलाहबुद्धिमान, विद्वानख्रिश्चन
सोरिशुयेशू ची आशाख्रिश्चन
सेबो सम्मानजनक ख्रिश्चन
सैमसनसूर्यासारखा, असाधारण शक्ति वालाख्रिश्चन
सैमुअलदेवाचे नाव ख्रिश्चन
सैंड्रोरक्षक, मानवाची मदत करणारा ख्रिश्चन
सार्डिसबायबलचे नाव, आनंदाचा राजकुमार ख्रिश्चन
साल्विओरक्षण केलेला ख्रिश्चन
सैविओबुद्धिमान, ज्ञानीख्रिश्चन
सैंटिनोपवित्र, शुद्धख्रिश्चन
सैमीदेवाने सांगितलेला ख्रिश्चन
साल्विनोउद्धारक, मुक्तिदाता, रक्षकख्रिश्चन
सेफ्रादेवाकडून मिळालेली शांती ख्रिश्चन
सीगनदयाळू, कृपापूर्णख्रिश्चन
सेबेस्टियनआदरणीय, श्रद्धेयख्रिश्चन

आम्हाला आशा आहे की वर दिलेली सगळी नावे तुम्हाला आवडली असतील. ह्या सगळ्या नावांचा अर्थ सुद्धा तितकाच सुंदर आहे, तर आपल्या लाडक्या मुलासाठी नाव निवडायला उशीर कशाला!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article