Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात स्त्री तिच्या गरोदरपणाच्या कालावधीचा अर्धा टप्पा पूर्ण करते. ह्या टप्प्यावर गरोदर स्त्रियांना, अल्ट्रासाऊंड स्कॅन करून न जन्मलेल्या बाळाची वाढ निश्चित करावी लागते. १९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये निरोगी बाळ साधारणतः ६ इंच लांब असते, त्याचे वजन जवळपास २४० ग्रॅम असते. गरोदरपणाच्या १९ आठवड्यांनंतर, प्रत्येक आठवड्याला गर्भाशयाची एक सेंटीमीटर वाढ होण्याची शक्यता असते.

जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात असता तेव्हा डॉक्टर तुम्हाला रक्तातील साखरेची आणि हिमोग्लोबिन ची पातळी तपासायला सांगतात. शिवाय, बाळामध्ये काही समस्या असतील तर त्यांचे निदान करण्यासाठी आणि बाळाच्या हृदयाचे ठोके, गर्भाची मोटर क्रियाकलाप, गर्भजलाची स्थिती तसेच बाळाचा आणि गर्भाशयाचा आकार यांचे मूल्यांकन करण्यासाठी अल्ट्रासाऊंड करून घेण्याचे डॉक्टर सुचवतील.

तुम्हाला गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे?

गरदोरपणाचा १९ वा आठवडा सुरु झाल्यावर गर्भाचा विकास वेगाने सुरु होते. गर्भधारणा सुरळीतपणे होत आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर यावेळी अल्ट्रासाऊंड करतील. १९आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन मॉर्फोलॉजी स्कॅनकिंवा स्ट्रक्चरल स्कॅनम्हणून देखील ओळखले जाते कारण सोनोग्राफी तंत्रज्ञ गर्भाची रचना आणि आकाराचे मूल्यांकन करतील. ह्या तपशीलवार अल्ट्रासाऊंडला काहीवेळा अँनोमॅली स्कॅनसुद्धा म्हणतात, कारण ह्या स्कॅन दरम्यान कोणत्याही मोठ्या शारीरिक विकृती तपासण्यासाठी गर्भाचे बारकाईने परीक्षण केले जाते. डॉक्टर खालील गोष्टींची नोंद घेऊ शकतात.

  • गर्भाच्या हृदयाचे ठोके तपासतील
  • गर्भाच्या आकाराचे मूल्यांकन करतील
  • नाळेची स्थिती तपासतील
  • एकापेक्षा जास्त बाळे असतील तर त्याची तपासणी करतील
  • बाळाभोवतीच्या गर्भजल पातळीची तपासणी
  • बाळामध्ये काही विकृती किंवा समस्या असतील तर तपासतील
  • प्रसूतीची अपेक्षित तारीख काढतील

१९ आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनची तयारी कशी करावी?

१९आठवड्याच्या स्कॅनसाठी जवळजवळ कोणतीही विशेष तयारी आवश्यक नसते. परंतु स्कॅन करण्याआधी तुमचे संपूर्ण मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे. तुम्हाला अस्वस्थ वाटेल इतकेही पाणी पिऊ नये. स्कॅन करण्यापूर्वी तुम्ही किती पाणी प्यावे हे तुमच्या डॉक्टरांना विचारणे चांगले.

संपूर्ण मूत्राशय भरलेले असणे चांगले काही कारण त्यामुळे बाळाची प्रतिमा स्पष्ट दिसण्यास मदत होते. तसेच श्रोणी, गर्भाशय आणि अंडाशय सुद्धा सुस्पष्ट दिसण्यास मदत होते.

स्कॅनसाठी, तुम्ही सैल आणि आरामदायी कपडे घालावेत जेणेकरून सोनोग्राफी तंत्रज्ञाना स्कॅनिंग करणे सोपे जाईल.

१९ आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?

१९आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी ३० ते ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.

स्कॅन कसे केले जाते?

अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये बाळाच्या प्रतिमा पाहण्यासाठी उच्चफ्रिक्वेंसी ध्वनी लहरी वापरल्या जातात. स्कॅन करणारे सोनोग्राफर तुमच्या ओटीपोटाच्या भागावर अल्ट्रासाऊंड जेल लावतात आणि स्कॅन पूर्ण झाल्यावर तो पुसून टाकू शकतात. त्यानंतर ते तुमच्या पोटावर एक लहान प्रोब किंवा ट्रान्सड्यूसर ठेवतील. हा प्रोब तुमच्या शरीरावर लावलेल्या जेलद्वारे ध्वनी लहरी प्रसारित करेल. ट्रान्सड्यूसर परत परावर्तित होणारे ध्वनी एकत्र करतो आणि या ध्वनी लहरी संगणकावरील प्रतिमांमध्ये रूपांतरित होतात.

स्कॅन कसे केले जाते?

स्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते?

१९आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पालकांसाठी रोमांचक असू शकते. गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात पोटातील बाळाला पाहणे हा खूप रोमांचकारी अनुभव असू शकतो. जर तुम्ही फोर डी स्कॅन करत असाल तर, डॉक्टरांच्या मदतीने,पांढऱ्या रंगात दिसणारी बाळाची हाडे आणि हातपाय तुम्ही पाहू शकता. तसेच मऊ उती म्हणजे राखाडी रंगांचे ठिपके दिसतील. बाळाची त्वचा पारदर्शक आणि लाल दिसते. रक्तवाहिन्यांमुळे हा त्वचेचा लाल रंग दिसतो. बाळाची त्वचा एका पांढऱ्या थराने झाकलेली दिसते त्यास व्हर्निक्स असे म्हणतात. परंतु हे फक्त आधुनिक मशिन्स मध्येच दिसते. गर्भाच्या भोवतालचे गर्भजल काळ्या रंगाचे दिसेल. डॉक्टर बाळाच्या हृदयासह बाळाचे प्रमुख अवयव तुम्हाला दाखवू शकतात.

या स्कॅनद्वारे कोणत्या प्रकारच्या विकृती शोधल्या जाऊ शकतात?

या स्कॅनद्वारे शोधल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या विकृती खाली दिलेल्या आहेत:

  • जन्मजात हृदय समस्या
  • हायड्रोसेफलस मेंदूमध्ये पाणी होणे
  • स्पायना बिफिडा पाठीचा कणा अविकसित राहणे
  • डायाफ्रामॅटिक हर्निया डायाफ्राममध्ये अनियमित उघडणे ज्यामुळे पोटाचे अवयव छातीकडे वर सरकतात.
  • ऍनेसेफली अपूर्ण कवटी आणि अविकसित मेंदू
  • गॅस्ट्रोशिसिस बाळाच्या ओटीपोटात भित्तिका उघडणे
  • लहान हातपाय किंवा हाडे नसणे ह्यासारख्या मोठ्या अवयवांच्या समस्या
  • असामान्य मूत्रपिंड किंवा मूत्रपिंडच नसणे अश्या मूत्रपिंडाच्या समस्या
  • डाउन सिंड्रोम एक गुणसूत्र विकार ज्यामुळे बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व येते

जर अल्ट्रासाऊंड असामान्यता दिसत असेल तर काय?

अल्ट्रासाऊंडमध्ये काही विकृती दिसून आल्यास, डॉक्टर विसंगतीचे स्पष्टीकरण देतील आणि सर्वात योग्य उपचारांसाठी पर्याय मांडतील. तसेच, ह्या समस्यांविषयी इतर तज्ञांशी तपशीलवार चर्चा करून निर्णय घेण्याविषयी सुद्धा डॉक्टर सुचवू शकतात.

जेव्हा बाळ वेगळ्या स्थितीत असण्याची शक्यता असते तेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टर पुन्हा बाळाची तपासणी करू शकतात. त्यानुसार, डॉक्टर तुम्हाला अतिरिक्त स्कॅनसाठी काही दिवसांनी पुन्हा येण्यास सांगू शकतात. एकाच स्कॅनमध्ये समस्या पूर्णपणे समजत नाही आणि असामान्यतेविषयी स्पष्ट माहिती समजण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त स्कॅन करावे लागतील.

१९आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन किती सुरक्षित आहे?

१९आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन सहसा सुरक्षित मानले जाते. ह्या स्कॅनचा काही त्रास होत नाही आणि हा स्कॅन वेदनारहित आहे. त्यामध्ये आयनीकरण रेडिएशनचा समावेश नाही. अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानातील सुधारणांसह, १९ आठवड्यांच्या थ्री डी अल्ट्रासाऊंडचा पर्याय देखील उपलब्ध आहे . ह्या स्कॅनमुळे पोटातील बाळाची थ्री डी प्रतिमा मिळू शकते.

१९ आठवड्यांच्या स्कॅनमुळे तुमच्या न जन्मलेल्या बाळाची प्रतिमा मिळू शकते. ह्या प्रतिमेद्वारे वाढ आणि विकास समजतो . ह्या कालावधीत बाळाची ऐकण्याची क्षमता देखील विकसित होऊ शकते. म्हणून, बाळाशी बोलायला सुरुवात करणे चांगले. आनंददायी गरोदरपणासाठी सकारात्मक आणि निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article