Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी अंतर्गर्भीय साधनांसाठी मार्गदर्शिका (आय.यु.डी.)

अंतर्गर्भीय साधनांसाठी मार्गदर्शिका (आय.यु.डी.)

अंतर्गर्भीय साधनांसाठी मार्गदर्शिका (आय.यु.डी.)

In this Article

काळानुरूप संतती नियमनाच्या साधनांमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. आय.यु.डी.(अंतर्गर्भीय गर्भनिरोधक साधन) म्हणजे  संततिनियमनाची एक परिणामकारक पद्धती आहे आणि ती स्त्रियांसाठी वापरली जाते.

आय.यु.डी. म्हणजे काय?

आय.यु.डी. किंवा इन्ट्रायुटेरिन डिवाइस म्हणजेच गर्भनिरोधक साधने ही स्त्रियांमधील संततिनियमनाची एक पद्धती आहे.T ह्या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे हे साधन असून ते स्त्रीच्या गर्भाशयात बसवले जाते त्यामुळे गर्भधारणेस प्रतिबंध होतो. ज्या स्त्रिया संततिनियमनासाठी गर्भनिरोधक गोळ्यांसारखी दुसरी साधने वापरू शकत नाहीत त्यांच्यासाठी आय.यु.डी. ही योग्य निवड आहे. संततिनियमनासाठी ही पद्धती वापरण्याआधी, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आय.यु.डी. ची निवड तुमच्यासाठी योग्य आहे का ह्याविषयी चर्चा करणे चांगले. तसेच त्याचे फायदे व तोटे सुद्धा तुम्ही जाणून घेतले पाहिजेत. आय. यु. डी. बसवल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचे दैनंदिन आयुष्य तुम्ही हवे तसे जगू शकता (म्हणजेच शारीरिक संबंध ठेवणे, व्यायाम आणि टॅम्पून्सचा वापर करणे इत्यादी गोष्टी नेहमीप्रमाणे करू शकता)

गर्भनिरोधक साधनांचे (इन्ट्रायुटेराइन डिवाइस) प्रकार कोणते?

आय.यु.डी. दोन प्रकारचे असतात:

१) कॉपर आय.यु.डी. (प्यारागार्ड)

हे सर्वात सर्रास वापरण्यात येणारे आय.यु.डी.आहे. इंग्रजी T अक्षराच्या आकाराचे हे साधन असते आणि त्या T च्या दांड्याला कॉपरची वायर गुंडाळलेली असते. १० वर्षांसाठी ही कॉपर टी चांगली राहते आणि ही संतती नियमनाची परिणामकारक पद्धती आहे.

२. हॉर्मोनल किंवा लेवोनॉर्गेस्ट्रेल आय.यु.डी.  (मिरेना, कायलिना, लीलेटा, स्कायला)

कॉपर टी पेक्षा तसे हे साधन जास्त परिणामकारक आहे. ह्यामुळे गर्भारपण ५ वर्षांपर्यंत थांबवता येते पण हा कालावधी तुम्ही ह्यातील कुठला प्रकार वापरता ह्यावर अवलंबून असतो.

आय.यु.डी. चा वापर कोण करू शकतं ?

बऱ्याच स्त्रिया आय.यु.डी.चा वापर करू शकतात – तरुण स्त्रिया आणि ज्या स्त्रियांना कधीच मुले झाली नाहीत अशा सुद्धा ह्याचा वापर करू शकतात.  तथापि, हे आय.यु.डी. बाहेर टाकले जाण्याची शक्यता ज्या स्त्रियांनी बाळाला अद्याप जन्म दिलेला नाही अशा स्त्रियांमध्ये जास्त असते कारण प्रसूती झालेल्या स्त्रियांच्या तुलनेत त्यांचे गर्भाशय छोटे असते. ज्या स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान खूप जास्त स्त्राव होतो त्यांच्यासाठी सुद्धा आय.यु.डी. खूप योग्य आहे.

खालील परिस्थितीत तुम्ही आय.यु.डी. वापरू शकता

 • जर तुम्हाला मुले असतील किंवा कधीच मुले झाली नसतील.
 • जर तुमचे अजूनही लग्न झालेले नसेल.
 • आय.यु.डी. तुम्ही कुठल्याही वयात वापरू शकता ( पौंगडावस्थेतील  आणि ४० वर्षे वयाच्या वरील स्त्रिया)
 • नुकताच गर्भपात झाला आहे, पण संसर्ग झालेला नाही.
 • जर तुम्ही स्तनपान करत असाल.
 • जर तुम्ही खूप जास्त व्यायाम करीत असाल.

आय.यु.डी. कुणी वापरू नये?

 • जर तुम्हाला योनीमार्गातून असामान्य स्त्राव होत असेल तर तुम्ही आय.यु.डी.वापरू नये.
 • जर तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झाला असेल तर तुम्ही आय.यु.डी.वापरू नका.
 • गरोदर स्त्रियांनी आय.यु.डी. वापरू नये. तुम्ही मुलाच्या जन्मानंतर ते वापरू शकता. किंबहुना, प्रसूतीनंतर आय.यु.डी. वापरण्याचा सर्वात चांगला काळ आहे.

जर तुम्हाला नुकतेच पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज (पी. आय. डी.) झाला असेल किंवा कॉपरची ऍलर्जी झाली असेल तर तुम्ही आय.यु.डी.वापरू शकत नाही. तुमचे डॉक्टर्स तुमच्यासाठी संततिनियमनाची ही पद्धत योग्य आहे का हे पहातील.

आय.यु.डी. कशाप्रकारे काम करते?

आय.यु.डी. हे संततिनियमनाचे साधन आहे, ते प्लॅस्टिकचे बनलेले असते आणि ते गर्भाशयात बसवलेले  असते. हे खूप परिणामकारक दीर्घकाळासाठी टिकणारे गर्भनिरोधक आहे आणि नंतर तुम्ही ते कधीही पुन्हा बाहेर काढू शकता.

कॉपर आय.यु.डी – कॉपर हे शुक्रजंतूनाशक म्हणून काम करते आणि त्यामुळे शुक्रजंतूंचे गर्भाशयाच्या मुखाकडे वहन होत नाही तसेच गर्भाशयाच्या आतील आवारणामध्ये त्यामुळे बदल होतो आणि म्हणून गर्भधारणेस अडथळा येतो.

हॉर्मोनल आय.यु.डी. – ह्या साधनामुळे प्रोजेस्टिन नावाचे संप्रेरक सोडले जाते, त्यामुळे गर्भाशयातील मुखाचा स्त्राव घट्ट होतो. ह्यामुळे अंडाशयातून स्त्रीबीज सोडले जात नाही आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

इन्ट्रायुटेराइन डिवाइस (आय.यु.डी.) हे किती परिणामकारक असते?

आय.यु.डी.चा वापर ही संततिनियमनासाठी सर्वात उत्तम पद्धती समजली जाते आणि ९९% परिणामकारक आहे. तुम्हाला ते (गोळीसारखे) घेतले आहे की नाही किंवा (कॉन्डोम सारखे) बरोबर वापरत आहोत की नाही हे लक्षात ठेवायला लागत नाही

आय.यु.डी. बसवण्याची पद्धत

हे साधन तुमच्या गर्भाशयाच्या आत घालण्याआधी तुमचे डॉक्टर जंतुनाशक द्रव्याने योनीमार्ग पुसून घेतील. स्पेक्युलम च्या साहाय्याने ते योनीमार्गातून आत घातले जाते. त्यामुळे गर्भाशय थोडे योनिमार्गाकडे खेचले जाते, त्यानंतर आय.यु.डी. अँप्लिकेटर च्या साह्याने आत घातले जाते. तुम्हाला थोडे दुखू शकते किंवा थोड्या काळासाठी पेटके येऊ शकतात. ह्या प्रक्रियेला साधारणपणे ५ मिनिटे लागतात.

अँप्लिकेटर मग काढला जातो आणि आय.यु.डी. स्प्रिंग च्या दोन्ही बाजू T च्या आकारात उघडतात. जेव्हा कॉपर टी  पूर्णपणे आत जाते तेव्हा तुम्हाला काहीच जाणवणार नाही. आय.यु.डी. च्या टोकाला संलग्न असलेले दोरे गर्भाशयाच्या मुखातून बाहेर येतील आणि योनिमार्गापर्यंत पुढे येतील. तुम्ही त्या दोऱ्याला हिसका बसणार नाही ह्याची दक्षता घ्या नाहीतर आय.यु.डी.विस्थापित होईल.

आय.यु.डी. गर्भाशयात जिथे बसवलेले असतात तिथे राहतात. काही वेळा, नीट बसवले न गेल्यामुळे ते बाहेर येऊ शकतात. परंतु तसे होणे खूप दुर्मिळ आहे.

आय.यु.डी. कार्यरत होण्यास लवकरात लवकर केव्हा सुरुवात होते?

तुमची पाळी सुरु झाल्यानंतर ७ दिवसांनी आय.यु.डी. तुम्ही बसवलेत तर लगेच ते परिणामकारक होते. जर तुम्ही इतर वेळेला मासिक चक्र कालावधीत कॉपर टी बसवलीत तर संतती नियमनासाठी दुसरे साधन वापरणे जरुरीचे आहे, जर बसवल्यानंतर पहिल्या आठवड्यात तुमचा संभोग करण्याचा विचार असेल तर गर्भधारणेपासून संरक्षणाची सुरुवात ७ दिवसांनंतर होते.

उपचारांनंतर कशाची अपेक्षा आहे?

ह्या प्रक्रियेनंतर काही दिवसांसाठी तुम्हाला थोडे पेटके येतील, तुमचे डॉक्टर तुम्हाला पेटक्यांच्या वेदना कमी होण्यासाठी वेदनाशामक औषधे घेण्यास सांगतील.

तुमच्या पुढच्या पाळीनंतर तुम्हाला पुन्हा तपासणीसाठी यावे लागेल. आय.यु.डी. अजूनही आत आहे का हे डॉक्टर तपासून पाहतील आणि काही संसर्ग तर नाही ना हे सुद्धा तपासून पाहतील.

आय.यु.डी. नंतर काही हलके डाग दिसतील आणि हा त्रास ६ महिन्यांनी कमी होईल. हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे मासिक पाळी च्या वेळेला अंगावरून कमी जाईल आणि तुम्हाला पाळी येणे सुद्धा बंद होऊ शकते. कॉपर टी मुळे मासिक पाळी दरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होतो. जर तुम्हाला आय.यु.डी. मुळे काही अस्वस्थता जाणवली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

जरी आय.यु.डी. बाहेर येण्याची शक्यता खूप कमी असली तरी, पहिल्या ३ महिन्यात असे होऊ शकते. मासिक पाळी दरम्यान ते बाहेर येऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमचे पॅड किंवा टॅम्पून तपासून पाहू शकता. जर तुम्ही टॅम्पून वापरत असाल तर तो बाहेर ओढण्याआधी तपासून पहा म्हणजे आय.यु.डी. चे धागे तर ओढले जात नाहीत ना हे कळेल.

आय.यु.डी. बसवल्यानंतर  बऱ्याच स्त्रियांना त्यांचे दैनंदिन आयुष्य सुरु करता येते. कुठलेही दुखणे कमी करण्यासाठी औषधांची गरज आहे.

जर आय.यु.डी. बाहेर पडले तर तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरची भेट घेतली पाहिजे किंवा गर्भनिरोधक म्हणून दुसऱ्या काही पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.

आय.यु.डी. किती काळापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकते?

कॉपर आय.यु.डी. १२ वर्षांपर्यंत चांगली राहू शकते आणि हॉर्मोनल आय.यु.डी. ३-६ वर्षांपर्यंत चांगली राहते.

तथापि, आय.यु.डी. आत राहण्यासाठी विशिष्ट असा काही कालावधी नाही. तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा ते काढून घेऊ शकता.

तुम्ही आय.यु.डी. केव्हा बदलले आहे ह्याची नोंद ठेऊ शकता. आय.यु.डी. बसवणे सुरुवातीला किमतीच्या दृष्टीने महाग वाटू शकते. तथापि, पुढे जाऊन ते परवडण्याजोगे ठरते कारण आय.यु.डी. चे संरक्षण ५-१० वर्षांपर्यंत राहते.

आय.यु.डी. तुम्ही केव्हाही बसवून घेऊ शकता का?

मासिक पाळीचक्रादरम्यान तुम्ही हे साधन बसवणे सुरक्षित आहे. ह्या कालावधीत स्त्री गर्भवती नसते आणि स्त्राव होत असल्याने गर्भाशयाचे मुख सुद्धा उघडे असते. त्यामुळे आय.यु.डी. बसवणे सोपे जाते.

आय.यु.डी. मध्ये कुठले धोके आणि गुंतागुंत असते?

आय.यु.डी. हे सुप्रसिद्ध गर्भनिरोधक साधनांपैकी एक आहे. एकदा बसवल्यावर देखभाल करण्याची गरज नसते आणि ते खूप परिणामकारक असते.

आय.यु.डी. वापरण्याचे धोके

 • कॉपर टी मुळे मासिक पाळी दरम्यान खूप रक्तस्त्राव होतो आणि पेटके येतात तसेच हलके डाग पडतात. हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे रक्तस्त्राव कमी होतो आणि पेटके येतात.
 • काही प्रकरणांमध्ये, आय.यु.डी. गर्भाशयाला चिकटते आणि गर्भाशयाला छिद्रे पडू शकतात. छिद्रे पडणे हे खूप दुर्मिळ आहे परंतु आय.यु.डी. बसवताना तसे होऊ शकते. जर गर्भाशयाला छिद्रे पडली तर आय.यु.डी. काढून टाकणे गरजेचे असते.
 • काही वेळा, आय.यु.डी. गर्भाशयातून बाहेर पडून योनीमार्गात येते. पहिले काही महिने असे होऊ शकते. जर बाळाच्या जन्मानंतर आय.यु.डी. बसवली असेल किंवा ज्या स्त्रिया कधीच गर्भवती झाल्या नसतील अशा स्त्रियांच्या बाबतीत आय.यु.डी. बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते.
 • हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे कॅन्सर विरहित सिस्ट तयार होऊ शकतात आणि त्या स्वतःच्या स्वतः नाहीश्या होतात.
 • हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे संप्रेरकांचे दुष्परिणाम होतात जसे की स्तनांना सूज येणे, मनःस्थितीत बदल, डोकेदुखी आणि मुरमे येणे इत्यादी. गर्भनिरोधक गोळ्यांचे सुद्धा असेच दुष्परिणाम दिसतात, तथापि पहिल्या काही महिन्यांमध्येच ते नाहीसे होतात.
 • फक्त डॉक्टर्स किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती हे साधन काढू शकतात, त्यामुळे ते स्वतःचे स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका.
 • आय.यु.डी. मुळे संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे बसवल्यानंतर पहिले काही महिने पेल्व्हिक इन्फ्लमेटोरी डिसीज होऊ शकतो.
 • योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येऊ शकतो.
 • काहीवेळा तुम्हाला कारणाशिवाय ताप सुद्धा येऊ शकतो.

आय.यु.डी. चे फायदे कुठले आहेत?

 • आय.यु.डी. म्हणजे संततिनियमनासाठी परिणामकारक साधन आहे.
 • संततिनियमनाची ही एक स्वस्त पद्धती आहे.
 • वापरण्यास अगदी सोपी आहे.
 • संभोग किंवा संभोगपूर्व कुठल्याही क्रियांमध्ये आय.यु.डी. चा अडथळा होत नाही.
 • तुमच्या लैंगिक साथीदाराची किंवा जोडीदाराची कुठलीही मदत लागत नाही.
 • तुम्ही स्तनपान करत असताना आय.यु.डी. वापरणे सुरक्षित असते.
 • तुम्हाला काहीही समस्या आल्यास आय.यु.डी. काढू शकता किंवा वापरणे थांबवू शकता. आय.यु.डी. काढल्यानंतर पहिल्या ओव्यूलेशनच्या चक्रानंतर प्रजननक्षमता पूर्ववत होते.
 • हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे तुम्हाला मासिक पाळी चक्रादरम्यान खूप रक्तस्त्राव होऊ शकतो.
 • असुरक्षित संभोगानंतर तुम्ही कॉपर टी ५ दिवसांमध्ये गर्भनिरोधक म्हणून वापरू शकता.
 • नॉर्मल प्रसूतीनंतर, सिझेरिअन, किंवा गर्भधारणेनंतरच्या पहिल्या ३ महिन्यात झालेल्या गर्भपातानंतर आय.यु.डी. बसवले जाऊ शकतात.

आय.यु.डी. योग्य जागी आहे ह्याची खात्री कशी कराल?

आय.यु.डी.मुळे काही गंभीर त्रास होत नाहीत, तथापि, काहीवेळा आय.यु.डी. चे दोरे दिसत नाहीत कारण ते गर्भाशयाच्या मुखाच्या मार्गात असतात. काही दुर्मिळ वेळेला आय.यु.डी. नक्की कुठे आहे ते कळत नाही त्याची कारणे गर्भारपण, गर्भाशयाला छिद्रे पडणे किंवा ते बाहेर टाकले जाणे अशीही असू शकतात. त्यामुळे आय.यु.डी.जागेवर आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

 • जर तुम्हाला आय.यु.डी. बसवली असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमचे दोरे तपासून पहिले पाहिजेत. जर तुम्हाला दोरे जाणवले तर आय.यु.डी. व्यवस्थित आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि जर आय.यु.डी. खाली घसरले असेल तर तुम्हाला ते योनिमार्गाच्या जवळ जाणवेल.
 • जर तुम्हाला ते जाणवले नाही तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

आय.यु.डी. कसे काढले जाते?

जर तुम्हाला आय.यु.डी. काढायचे असेल तर तुम्ही डॉक्टरांची भेट घेणे जरुरीचे आहे. तुम्ही स्वतःचे स्वतः ते काढण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा ह्या आय.यु.डी. ची अंतिम तारीख जवळ आली असेल तेव्हा डॉक्टर ते काढून टाकतील किंवा जर तुम्हाला काही वैद्यकीय प्रश्न आला तरी सुद्धा हे साधन काढले जाते:

 • आय.यु.डी. काढण्यासाठी फक्त काही मिनिटे लागतात. आय.यु.डी. बसवतानापेक्षा, काढताना स्त्रियांना कमी वेदना किंवा अस्वस्थता होते. जर दुखले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून औषध घेऊ शकता. जर संसर्ग झाल्यामुळे आय.यु.डी. काढून टाकले असेल तर तुम्ही गोळ्यांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणार आहात ह्याची खात्री करा.
 • तुमचे डॉक्टर योनीमार्गात स्पेक्युलम घालतील आणि दोरे शोधतील. जर ते तिथे नसतील तर तुमचे डॉक्टर एक पातळ साधन गर्भाशयाच्या मुखात घालून दोरे शोधतील आणि आय.यु.डी. चे धागे हळूच ओढून काढतील. गर्भाशयाच्या मुखातून आणि पुढे योनीमार्गातून आय.यु.डी. बाहेर निघेल. नंतर डॉक्टर स्पेक्युलम बाहेर काढतील.

आय.यु.डी. मुळे माझ्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होईल का?

जेव्हा तुम्ही आय.यु.डी. काढून टाकता तेव्हा तुमची प्रजनन क्षमता पुन्हा सामान्य होते. आय.यु.डी. मुळे वंध्यत्व येत नाही आणि एकदा ते काढून टाकल्यावर तुम्हाला नक्कीच गर्भधारणा होऊ शकते. आय.यु.डी. मुळे वंध्यत्वाचा कुठलाही धोका नसतो.

https://lh6.googleusercontent.com/6Qn4y48BgLAZJ_ACOJufgCMiZmtv76y9M9E5DPHSwxOIcVuwE9QIQqZfjhM_SrLh9TbNXMg1rbAI0vQnOKM9YIf8-AyH0mNlxwZ0mofYWYsoacRloTOz0mydPphSHbqzqyyiC4Nl

 • जर आय.यु.डी. हॉर्मोनल नसेल तर तुमच्या प्रजननक्षमतेवर कुठलाच परिणाम होत नाही. संतती नियमनासाठी काँडोम्स वापरतो तशीच ही पद्धती आहे. ह्यामुळे कुठलीही संप्रेरके तुमच्या शरीरात स्त्रवत नाहीत त्यामुळे एकदा आय.यु.डी. काढून टाकल्यावर तुम्ही गरोदर राहू शकता.
 • जर तुम्ही हॉर्मोनल आय.यु.डी. वापरत असाल, तर ती काढून टाकल्यानंतरच्या पहिल्याच मासिक पाळी चक्रादरम्यान तुम्ही गरोदर राहू शकता.

आय.यु.डी. काढून टाकल्यावर सुद्धा तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

माझ्या मासिक पाळी चक्रावर आय.यु.डी. चा कसा परिणाम होतो?

हॉर्मोनल आय.यु.डी. आणि कॉपर आय.यु.डी. चा मासिकपाळी चक्रावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतो.

हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे मासिक पाळी दरम्यान हलका रक्तस्त्राव होतो. आय.यु.डी. बसवल्यानंतर तुमची मासिक पाळी सुद्धा चुकू शकते. किंवा मासिक पाळी बंद पडू शकते. काही वेळेला, हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे पहिले ३ किंवा ६ महिने अनियमित रक्तस्त्राव होतो. जेव्हा तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या वापरता किंवा नंतर आय.यु.डी. बसवून घेता तेव्हा तुमच्या मासिक पाळीचक्राचा पॅटर्न बदलतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, हॉर्मोनल आय.यु.डी. मुळे भविष्यात मासिक पाळीचा त्रास वाढू शकतो.

कॉपर आय.यु.डी. मुळे तुम्हाला दीर्घ काळासाठी खुप रक्तस्त्राव होतो आणि पेटके सुद्धा येऊ शकतात. कारण जेव्हा बाहेरची वस्तू गर्भाशयात बसवली जाते तेव्हा गर्भाशयाच्या आवरणाला समायोजित होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे थोडी सूज येते आणि टिश्यू ला हानी पोहोचते.

काही समस्या असल्यास कुठली लक्षणे आढळतात?

तुम्ही आय.यु.डी. शी संबंधित असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे. खालील लक्षणांचा त्यामध्ये समावेश होतो:

 • जर आय.यु.डी. बसवल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ पोटात दुखत असेल तर.
 • मासिक पाळी उशिरा येणे किंवा दोन मासिक पाळी चक्रदरम्यान रक्तस्त्राव होणे.
 • मासिक पाळी उशिरा येऊन पोटदुखी होणे.
 • योनीमार्गातून स्त्राव गळणे, जो संसर्गामुळे होऊ शकतो.
 • आय.यु.डी. चे धागे नेहमीपेक्षा कधी छोटे किंवा मोठे जाणवणे.
 • आय.यु.डी. चा खालचा प्लास्टिक चा कडक भाग गर्भाशयाच्या मुखातून बाहेर येत असल्याचे जाणवणे
 • श्वसनास त्रास होणे.

आय.यु.डी. बसवलेली असताना सुद्धा स्त्रीला गर्भधारणा राहिली तर काय होते?

संततिनियमनाच्या इतर साधनांपेक्षा आय.यु.डी. चे वेगळेपण म्हणजे आय.यु.डी. बसवलेली असताना सुद्धा तुम्हाला ओव्यूलेशन होत असते.

काही वेळा आय.यु.डी. संपूर्णतः किंवा त्याचा काही भाग गर्भाशयाच्या बाहेर येतो. आय.यु.डी. बसवल्यानंतर पहिल्या वर्षात असे होऊ शकते आणि जास्त करून पहिल्या काही महिन्यातच असे होते.

तसेच काहीवेळा आय.यु.डी. गर्भाशयात रुतून बसू शकते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये गर्भाशयाला छिद्र पडू शकते आणि हे साधन परिणामाकरित्या काम करू शकत नाही आणि ते बदलायची गरज भासते.

अजून एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे कॉपर आय.यु.डी. बसवल्यानंतर लगेच तिचे कार्य सुरु होते, परंतु हॉर्मोनल आय.यु.डी. जर तुमच्या मासिक पाळी चक्राच्या पहिल्या ७ दिवस बसवल्यास तिचे कार्य लगेच सुरु होते. जर तुमच्या मासिक पाळी चक्रादरम्यान हॉर्मोनल आय.यु.डी. बसवली तर ती कार्यरत होण्यास ७ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही त्या कालावधीसाठी दुसरे संतती नियमनाचे साधन वापरले पाहिजे. असे केले नाही तर गर्भधारणा होऊ शकते.

 • आय.यु.डी. बसवलेली असताना ज्या महिला गर्भवती होतात त्यांना एक्टोपिक प्रेग्नन्सी चा धोका असतो. ह्या स्थितीमध्ये गर्भाशयाच्या बाहेर भ्रूणाचे रोपण होते.
 • जर गर्भधारणा झाली आणि आय.यु.डी. गर्भाशयातच असेल तर तुम्हाला गंभीर संसर्गाचा, गर्भपाताचा किंवा अकाली प्रसूतीचा खूप जास्त धोका असतो. म्हणून जर स्त्रीला गर्भधारणा झाली तर डॉक्टर्स आय.यु.डी. काढून टाकतात.

तुम्ही डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधला पाहिजे?

आय.यु.डी. बसवताना डॉक्टर्स अचूक पद्धतीचा अवलंब करतात. तथापि, काहीवेळा. गर्भाशयाच्या संकुचनामुळे ती बाहेर फेकली जाते किंवा विस्थापित होते. जर तुम्हाला खूप जास्त रक्तस्त्राव झाला किंवा अस्वस्थता वाढली तर तम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा आणि संतती नियमनासाठी दुसरी पद्धत वापरण्यास सुरुवात करा.

खालील लक्षणे समस्या असल्याचे निर्देशित करतील:

 • पोटात खूप जास्त दुखणे.
 • संभोगाच्या वेळेला दुखणे.
 • जर तुमची पाळी चुकली किंवा तुम्हाला गर्भधारणेची लक्षणे जाणवत असतील तर
 • योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.
 • आय.यु.डी. च्या धाग्यांच्या स्थितीत किंवा लांबीमध्ये बदल होणे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. बाळाला स्तनपान करताना आय.यु.डी. वापरू शकते का?

हॉर्मोनल आय.यु.डी. (मिरेना) मुळे स्तनपानास समस्या येऊ शकते. मिरेना आय.यु.डी. मुळे शरीरात प्रोजेस्टेरॉन स्रवते आणि त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातेमध्ये दुधाचा पुरवठा कमी होऊ शकतो.

२. आय.यु.डी. बसवल्यानंतर जन्म नियंत्रणासाठी दुसऱ्या साधनांची गरज भासू शकते का?

आय.यु.डी. चा यशस्वितेचा दर ९९% आहे. तथापि, आय.यु.डी.च्या प्रकारावर हे अवलंबून आहे की ते लगेच कार्यरत होईल किंवा नाही आणि तुम्हाला पर्यायी गर्भनिरोधक साधनाची गरज भासेल. आधी चर्चा केल्याप्रमाणे, जर तुम्ही कॉपर आय.यु.डी. वापरत असाल तर ते लगेच कार्यरत होण्यास सुरुवात होते. कॉपर आय.यु.डी. तात्काळ संततिनियमनाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते. जर तुम्ही हॉर्मोनल आय.यु.डी. वापरत असाल आणि ते तुमच्या मासिक पाळी चक्राच्या पहिल्या ७ दिवसात  बसवले गेले असेल, तर ते लगेच कार्यरत होते. नाहीतर, ते कार्यरत होईपर्यंतच्या मधल्या काळात तुम्हाला सुरक्षितता म्हणून संतती नियमनाचे दुसरे साधन वापरले पाहिजे.

३. तुमच्या साथीदाराला तुम्हाला आय.यु.डी. बसवली आहे हे जाणवेल का?

नाही, संभोगाच्या वेळेला आय.यु.डी. जाणवणार नाही. जर तुम्हाला ते जाणवले तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. आय.यु.डी. बसवल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला शारीरिक संबंधांच्या वेळेला दुखण्याची शक्यता आहे.

आय.यु.डी. हे खूप सोयीचे आणि स्वस्त असे संतती नियमनाचे साधन आहे. आय.यु.डी. मुळे लैंगिक संबंधातून पसरणारे आजार प्रतिबंधित होत नाहीत. १% पेक्षा कमी महिलांमध्ये आय.यु.डी. चे दुष्परिणाम जाणवतात. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून संतती नियमनासाठी हे साधन तुम्हाला वापरायचे आहे का ह्याविषयी चर्चा करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article