Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय

गरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय

गरोदरपणात भूक न लागणे: कारणे आणि उपाय

लोकप्रिय माध्यमांमध्ये दाखवलेले गरोदरपणाचे चित्रण, कधीकधी वास्तविक जीवनातील मातृत्वाशी संबंधित अनेक गुंतागुंत कमी करते. असेच एक उदाहरण म्हणजे इतर सामान्य माणसांपेक्षा गरोदर स्त्रीला खूप भूक लागते असे चित्रण बरेचदा केले जाते. पिझ्झापासून कच्च्या लोणच्यापर्यंत सर्वकाही अगदी अधाशीपणे खाणाऱ्या ह्या गर्भवती स्त्रियांना बघितल्यावर खऱ्या जगातील गरोदर स्त्रियांना धक्का बसू शकतो.

संपूर्ण आयुष्यात गरोदरपणाचा काळ म्हणजे हवे ते, हवे तेवढे खाता येते असा विचार बरेच लोक करतात. परंतु ह्याच काळात स्त्रियांना त्यांचे आवडते पदार्थ नुसते बघून किंवा त्याच्या वासाने मळमळ होऊ शकते.

पहिल्या तिमाहीत भूक कमी होणे

पहिल्या तिमाहीत तुमच्या शरीरात बाह्य स्वरुपात कोणतेही बदल होऊ शकत नसले तरी, बाळाच्या वाढीची सुरुवात तुमच्या पोटात होत असते. हार्मोनल बदल होत असतात आणि ते थेट आईच्या मॉर्निंग सिकनेसला कारणीभूत ठरतात. पहिल्या तिमाहीत, दर आठवड्याला सुमारे एक पौंड इतकी वजनवाढ अपेक्षित असते आणि गर्भाच्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसे असते.

भूक कमी होण्याचे कारण काय आहे?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात, मॉर्निंग सिकनेसची सुरुवात झाल्यावर भूक लागत नाही. सिनेमा आणि नाटकात दाखवतात त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती प्रत्यक्षात आढळते. ७० ते ८५% गर्भवती स्त्रियांना भूक लागत नाही.

आईने खाल्लेल्या कोणत्याही हानिकारक अन्नपदार्थांपासून गर्भाचे संरक्षण करण्याची मॉर्निंग सिकनेसम्हणजे एक सहज पद्धत आहे. पहिल्या तिमाहीमध्ये गर्भवती आईची भूक कमी होण्याचे हे कारण आहे. इस्ट्रोजेन आणि एचसीजी ह्या संप्रेरकांची पातळी गर्भवती स्त्रीच्या शरीरात वाढते आणि त्यामुळे सुद्धा भूक मंदावते. ह्या सर्व बदलांमुळे गर्भवती स्त्री तिच्या सभोवतालच्या वासांबद्दल अधिक संवेदनशील होते आणि तिला मळमळते. काही स्त्रियांमध्ये ह्या बदलांमुळे चव जाते तसेच जिभेला धातूची चव येते आणि त्यामुळे तिला तिच्या आवडत्या अन्नपदार्थांबद्दल तिटकारा वाटू लागतो.

भूक कमी होण्याचे कारण काय आहे?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात भूक मंदावल्याने गरोदरपणात तुमच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्याचे उपाय

भूक न लागणे, काही बाबतीत फायदेशीर असताना, आई तिच्या पोषण गरजांकडे दुर्लक्ष करू शकते. यावर उपाय करणे आवश्यक आहे, आणि त्यावरील उपाय पुढीलप्रमाणे

  • घनपदार्थांपेक्षा द्रवपदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करा. फळे आणि भाज्यांसारख्या स्त्रोतांपासून गर्भवती स्त्रियांना दररोज सुमारे ८० औंस द्रवपदार्थ आवश्यक असतात
  • आणखी एक उत्कृष्ट पर्याय म्हणजे कोमट पाणी लिंबू पिणे, चहामध्ये आले घालणे इत्यादी. हे उपाय केवळ मळमळ कमी करत नाहीत तर गरोदरपणात आवश्यक पोषण देखील प्रदान करतात.
  • दररोज तीन वेळा खूप जेवण्याऐवजी, तुम्ही ते सहा छोट्या छोट्या भागात विभागून खाऊ शकता. ह्यामुळे उलटीची लक्षणे कमी होतात आणि आपण काय खात आहोत ह्यावर लक्ष ठेवले जाते
  • जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा साठा करा. या वस्तू तुम्हाला जास्त काळ तृप्त ठेवतात आणि तुमच्या रक्तातील साखरेला स्थिर ठेवतात
  • गर्भवती स्त्रियांची वासाची संवेदना वाढलेली असते, म्हणून तीव्र वास असलेले पदार्थ खाणे टाळणे चांगले. उदाहरणार्थ, फास्ट फूड चिकन घेण्याऐवजी आपण चिकन सॅलड ची निवड करू शकता
  • पदार्थ कितीही पौष्टिक असले आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल तर ते खाणे टाळा
  • त्या वेळेला तुमच्या आवडीनुसार तुम्ही अन्नपदार्थांचे तापमान बदलू शकता. ह्यामुळे पोटाला आराम पडतो
  • तसेच, न चुकता व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्या. सकाळी दात घासण्यासारखे हे गोळ्या घेण्याचे रुटीन असावे. गरोदरपणात, आहारात कुठल्या त्रुटी असतील तर व्हिटॅमिन्स मुळे त्या भरून निघण्यास मदत होऊ शकते

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात भूक मंदावल्याने गरोदरपणात तुमच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्याचे उपाय

दुसऱ्या तिमाहीत भूक न लागणे

दुसरी तिमाही, पहिल्या तिमाही इतकी वाईट नसते कारण बहुतेक स्त्रियांना ह्या काळात पुन्हा भूक लागण्यास सुरुवात होते. हा काळ गरोदरपणातील सर्वोत्तम असा काळ मानला जातो कारण पुन्हा भूक लागायला सुरुवात होते, त्वचा चमकदार दिसू लागते तसेच पोटसुद्धा अद्याप दिसायला सुरुवात झालेली नसते. परंतु काही वेळा हे इतके सुरळीत असत नाही कारण अपचनाचा त्रास होऊन अनेक वेळा शौचास जावे लागू शकते.

भूक न लागण्याचे कारण काय?

गरोदरपणातील दुसरी तिमाही महत्वाची मानली जाते कारण ह्या कालावधीत गर्भाचा खूप विकास होतो, म्हणूनच गर्भाच्या आरोग्यासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. ह्याच काळात मुलाच्या आरोग्याचा विचार करून तुम्हाला दोन वेळा खावे लागते. गर्भवती आईला भूक न लागणे चांगले नाही कारण त्याचा बाळाच्या विकासावर थेट परिणाम होऊ शकतो.

पचनाची प्रक्रिया मंद झाल्यामुळे ह्या कालावधीत भूक कमी लागते. गर्भाशयाचा आकार वाढत असल्यामुळे त्याचा दाब पोट आणि पचनसंस्थेवर पडतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता वाढून भूक मंदावते. आईच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी सुद्धा ह्या काळात मंदावते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि भूक लागत नाही.

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत भूक मंदावणे उपाय

  • पहिल्या तिमाहीतील सवयी तशाच सुरु ठेवणे कठीण वाटू शकते, परंतु ते कितीही कठीण असले तरीही आपण त्या सवयी तशाच ठेवल्या पाहिजेत
  • भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे तसेच एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा थोडे थोडे खाणे चांगले
  • गर्भाच्या विकासासाठी कॅल्शियम पुरेसे असणे आवश्यक आहे. प्रथिने आणि फोलेट्ससह, दररोज सर्वात महत्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजांचे सेवन करणे आईने लक्षात ठेवले पाहिजे
  • पालेभाज्या बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि आपले पोट व्यवस्थित राहण्यास मदत करतात
  • ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स गर्भाच्या मेंदूच्या विकासास मदत करू शकतात, म्हणून आपल्या आहारात त्यांचा समावेश केला पाहिजे

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत भूक मंदावणे - उपाय

तिसऱ्या तिमाहीत भूक कमी होणे

तिसऱ्या तिमाहीपर्यंत, तुमच्या पोटाचा आकार वाढलेला असतो आणि भूकही लागते . अशा तऱ्हेने तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही एक परिपूर्ण गर्भवती स्त्री असता . परंतु ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही वाटेल ते खाऊ शकता. कारण तुमची भूक लक्षणीयरीत्या कमी झालेली असते. तिसऱ्या तिमाहीतील एक चांगली गोष्ट म्हणजे ह्या काळात मळमळ पूर्णपणे थांबलेली असते आणि पोटाचा आकार वाढलेला असतो.

भूक न लागण्याचे कारण काय?

गरोदरपणाच्या ह्या कालावधीत तुमच्या पोटाचा आकार वाढलेला असतो त्यामुळे भूक कमी होते. ह्या काळात गर्भाशय मोठे झालेले असते आणि जवळच्या अवयवांना कार्य करण्यासाठी खूप कमी जागा असते. पोट आणि लहान आतडे यांसारखे अवयव त्यांच्या नेहमीच्या जागेच्या बाहेर ढकलले जातात आणि त्यामुळे ते सामान्यपणे कार्य करत नाहीत.

छातीत जळजळ होणे हा ह्याचा आणखी एक दुष्परिणाम आहे. त्यामुळे मसालेदार किंवा लिंबूवर्गीय पदार्थांविषयी तिरस्कार वाटू लागतो. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढलेली असल्यामुळे आईला बध्दकोष्ठता होते आणि भूक कमी होते. ह्या सर्व कारणांमुळे आईला तिच्या आवडीचे पदार्थ तिसऱ्या तिमाही मध्ये खाता येत नाहीत.

तिसऱ्या तिमाहीमध्ये भूक मंदावणे उपाय

  • थोडे थोडे खाणे सुरु ठेवावे कारण त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते तसेच शरीराला आवश्यक पोषक तत्वांची भरपाई करण्यास मदत होते
  • लक्षात ठेवण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेड, एवोकॅडो आणि पालेभाज्या सारख्या तंतुमय पदार्थानी समृध्द अन्नपदार्थांचा साठा करणे. ह्यामुळे तुमचे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेची भावना कमी करण्यास मदत होते

तिसऱ्या तिमाहीमध्ये भूक मंदावणे - उपाय

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

  • वर सांगितलेले सर्व उपाय गर्भवती स्त्रीने केले आणि तरीसुद्धा तिला भूक लागत नसेल, तर ते निर्जलीकरण, शरीरात पोषण मूल्यांची कमतरता आणि बाळाची वाढ व विकास ह्यावर नकारात्मक परिणाम होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञांना भेट द्या
  • डॉक्टरांचे मत घेण्यास काहीच हरकत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. डोके हलके वाटणे किंवा पोटात अन्न टिकून न राहणे हे कुठल्या तरी मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. म्हणूनच तुम्हाला थोडी जरी शंका वाटली तरी डॉक्टरांची भेट घ्या!

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात भूक न लागणे हे खूप सामान्य आहे. ही भावना गरोदरपणात कोणत्याही वेळी उद्भवू शकते आणि सहसा गर्भधारणा झाल्यावर चार आठवड्यांनंतर भूक मंदावते. पूर्वी आवडणाऱ्या पदार्थांचा आता तिटकारा वाटू लागतो. स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या बऱ्याच संप्रेरकांमधील बदलांमुळे असे होते. तुमच्या शरीराचे ऐका आणि भुकेच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तुमच्या गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आवश्यक असलेले सर्व पोषण नक्कीच मिळेल.

आणखी वाचा:

गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ

निरोगी बाळासाठी गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजेत असे १५ अन्नपदार्थ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article