Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?

धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?

धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?

धनुर्वात हा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग क्लोस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे जिवाणू जखमेतून शरीरात प्रवेश करतात. हे जिवाणू त्वचेवरील ओरखडा किंवा खोल जखमेद्वारे शरीरात प्रवेश करतात. ह्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर टिटानोस्पाझमीन नावाचे एक विष तयार होते. हे विष मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच टीटी लसीकरण महत्वाचे आहे आणि गरोदरपणात ते अधिक महत्वाचे आहे. गरोदरपणात टिटॅनस टॉक्सॉइड लस घेतल्यास आई आणि बाळ दोघांचाही धनुर्वाताच्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो.

टिटॅनस टॉक्सॉइड म्हणजे काय?

टिटॅनस टॉक्सॉइड (टीटी) ही एक लस आहे. ही लस दिल्यास एखाद्या व्यक्तीला धनुर्वाताचा संसर्ग होण्यापासून रोखता येते. टीटीची लस गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळालाही धनुर्वाताचा संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते. तुम्ही गर्भवती असल्यास, तुमचे डॉक्टर देखील तुम्हाला या लसीची शिफारस करतील. ही लस दिल्यानंतर, तुमच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. ही प्रतिपिंडे नंतर आपल्या मुलाकडे जातील आणि काही काळ त्याचे संरक्षण करतील.

नवजात बाळाला होणारा धनुर्वात म्हणजे काय?

नवजात धनुर्वात ही अत्यंत घातक आणि नवजात बाळांसाठी हानिकारक स्थिती आहे. ही स्थिती बहुतेक वेळा बाळाची नाळ कापण्याची उपकरणे आणि नाभीला लावायचा दोरा निर्जंतुक न केल्यामुळे उद्भवते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे नवजात बाळांवर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच, गरोदरपणात स्त्रीला धनुर्वाताची लस घेणे आवश्यक आहे. प्रसुतिनंतर ही लस काही काळ बाळाला रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते.

गरोदरपणात धनुर्वाताची (टिटानस टॉक्सॉइड (टीटी)) लस देणे आवश्यक आहे काय?

भारतामध्ये गरोदरपणात धनुर्वाताचे इंजेक्शन घेणे बंधनकारक आहे. ज्या महिलांच्या शरीरावर जखमा आहेत त्यांनी धनुर्वाताचा धोका टाळण्यासाठी टिटॅनस टॉक्सॉइडची लस घ्यावी. अविकसित प्रदेशात देखील टिटॅनस टॉक्सॉइड लस घेण्यास सांगितले जाते कारण तेथे प्रसूती अस्वच्छ स्थितीत होते. बरेच देश गर्भवती महिलांसाठी टिटॅनस टॉक्सॉइड (टीटी) लसीकरणाच्या सार्वत्रिक मानकांचे अनुसरण करतात.

गरोदरपणातील टिटॅनस टॉक्सॉइड लसीकरण

गरोदरपणात टिटॅनस इंजेक्शन घेतल्यानंतर उद्भवणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी लस घेण्यापूर्वी प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. गरोदरपणात धनुर्वाताची लस देण्यासाठी सुद्धा एक वेळापत्रक आहे.

लस देण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

लस देण्यापूर्वी डॉक्टरांनी लसीची कुपी जोरात हलवून घेतली आहे किंवा नाही ह्यावर लक्ष ठेवा. असे केल्याने सगळे मिश्रण एकसारखे होते. गोठवणे आणि वितळवणे ह्या प्रक्रियेमध्ये लसीची कुपी खराब तर झालेली नाही ना हे सुद्धा हलवून पाहिल्यावर लक्षात येते. यापूर्वी गोठविलेल्या लसी इंजेक्शनसाठी वापरु नयेत.

गर्भवती महिलांसाठी टीटी लसीकरण वेळापत्रक

गर्भवती महिलांसाठी टीटी लसीकरण वेळापत्रक

अमेरिकन कॉंग्रेस ऑफ प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (एसीओजी) यांनी गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक तयार केलेले आहे. तुमच्या सगळ्या रिपोर्टची संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच तुमचे डॉक्टर तुम्हाला लस देतील.

टीटीचा डोस कधी द्यावा अपेक्षित संरक्षणाचा कालावधी
पहिल्या संबंधांनंतर किंवा गरोदरपणात शक्य तितक्या लवकर काहीही नाही काहीही नाही
टीटी १ नंतर कमीतकमी ४ आठवड्यांनंतर एक ते तीन वर्षांनंतर
टीटी २ नंतर किमान ६ महिने किंवा पुढच्या गरोदरपणात कमीतकमी पाच वर्षे
टीटी ३ नंतर किमान १ वर्ष किंवा पुढच्या गरोदरपणात किमान दहा वर्षे
टीटी ४ नंतर किमान १ वर्ष किंवा पुढच्या गरोदरपणात प्रसूती होऊ शकेल अशा सर्व वयोगटासाठी किंवा शक्यतो जास्त काळ

जर गर्भवती महिलेस यापूर्वी कधीही लसी दिली गेली नासेल किंवा तिच्या लसीकरणाविषयी माहिती नसेल तर टीटी / टीडीचे २ डोस बाळाच्या जन्माच्या १ महिना आधी दिले जातात आणि वरील तक्त्यानुसार पुढील डोस दिले जातात.

जर गर्भवती महिलेस ह्या आधी १ ४ टिटॅनस टॉक्सॉइड डोस दिले गेले असतील तर टीटी / टीडीचे उर्वरित डोस बाळाच्या जन्मापूर्वी दिले जाऊ शकतात. गर्भवती महिलेने तिचे टीटी, डीटीपी, डीटी किंवा टीडी लसींचे, तारुण्य, बालपण आणि बाळ असतानाच्या लसीकरणाचा पुरावा दाखविल्यास, खालील तक्त्यानुसार डोस दिला जाईल.

मागील लसीकरणाच्या वेळचे वय आधी दिलेल्या लसी (लिखित अभिलेखांवर आधारित) शिफारस केलेले लसीकरण
आता

गर्भधारणेनंतर

नंतर (कमीतकमी एका वर्षाच्या अंतराने)
अर्भकावस्था ३ डीटीपी टीटी / टीडी चे २ डोस (डोस दरम्यान किमान ४ आठवड्यांचे अंतर ) १ डोस टीटी / टीडी
बालपण ४ डीटीपी १ डोस टीटी / टीडी १ डोस टीटी / टीडी
शालेय वय ३ डीटीपी + १ डीटी / टीडी १ डोस टीटी / टीडी १ डोस टीटी / टीडी
शालेय वय ४ डीटीपी + १ डीटी १ डोस टीटी / टीडी कुठलाही नाही
पौगंडावस्था ४ डीटीपी + १ डीटी ४६ वर्षे + १ टीटी / टीडी, १४१६ व्या वर्षी कुठलाही नाही कुठलाही नाही

तुम्हाला पहिली गर्भधारणा झाल्यास डॉक्टर तुम्हाला गरोदरपणात टिटॅनस टॉक्सॉइडचे २ डोस लिहून देतात.

पहिल्या गरोदरपणातील टीटी लस

प्रथम डोस तिसऱ्या तिमाहीत दिला जाईल आणि तो गरोदरपणाच्या सातव्या महिन्याच्या आसपास असेल.

  • अंतिम टीटी इंजेक्शन बाळाच्या जन्माच्या २ आठवडे आधी द्यावे. लस दिल्यांनतर वैयक्तिक लसीकरण कार्ड वर त्याची नोंद ठेवून कार्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
  • दुसरा डोस पहिल्या डोस नंतर चार आठवड्यांनंतर दिला जाईल.
  • जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या डोसची शिफारस केली आहे. तिसरा डोस दुसऱ्या डोस नंतर ६ महिन्यांनी दिला जातो. ही लस घेतल्यानंतर धनुर्वाताच्या जिवाणूंपासून विरूद्ध कमीतकमी ५ वर्षे सुरक्षा प्रदान केली जाते.

पहिल्या गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यात लस देण्यापेक्षा काही डॉकटर ३ डोस देणे पसंत करतात. इतर सर्व चाचण्या झाल्यावर काहीजण पहिल्या तिमाहीत लस घेण्यास प्राधान्य देतात.

दुसया गरोदरपणात टीटी लस

तुमचे डॉक्टर तुमचा लसीकरणाचा संपूर्ण इतिहास आधी तपासून बघतील आणि त्यानंतर त्यानुसार ते गरोदरपणातील टीटी इंजेक्शन लिहून देईल.

  • जर तुमची दुसरी गर्भधारणा तुमच्या पहिल्या गरोदरपणानंतर २ वर्षांच्या आत झालेली असेल आणि पहिल्या गर्भारपणात तुम्हाला लसीचे दोन्ही डोस दिले गेले असतील तर तुम्हाला फक्त १ बूस्टर लस दिली जाईल.
  • जर तुमची दुसरी गर्भधारणा दीर्घ कालावधीनंतर झालेली असेल तर लसीकरणाचे वेळापत्रक वेगळे असेल.

आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहण्यासाठी गरोदरपणात टिटॅनस टॉक्सॉइड (टीटी) लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. म्हणून जर तुम्ही गर्भवती असाल तर ही लस घ्या आणि स्वत: ला व बाळास सुरक्षित ठेवा.

आणखी वाचा:

गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)
गरोदरपणात ताप येणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article