Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील रक्ताची सीबीसी (संपूर्ण रक्ताची गणना) चाचणी

गरोदरपणातील रक्ताची सीबीसी (संपूर्ण रक्ताची गणना) चाचणी

गरोदरपणातील रक्ताची सीबीसी (संपूर्ण रक्ताची गणना) चाचणी

गरोदरपणात, गर्भाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. ह्या लेखात, आम्ही तुम्हाला संपूर्ण रक्त गणना (सीबीसी) चाचणी आणि त्याचे महत्त्व याबद्दल सांगू.

सीबीसी चाचणी म्हणजे काय?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भवती स्त्रीला उद्भवलेल्या कोणत्याही आरोग्य समस्यांचे निर्धारण करण्यासाठी संपूर्ण रक्त गणना चाचणी (सीबीसी) चाचणी केली जाते. ही चाचणी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींचे मूल्यमापन करते. तुमच्या रक्तातील लोहाची पातळी कमी असल्यास, तुम्हाला लोह पूरक आहार/औषधे लिहून दिली जाऊ शकतात. सीबीसी चाचणी रक्तातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्सची संख्या देखील निर्धारित करते

संपूर्ण रक्त मोजणी चाचणी आवश्यक आहे का?

सीबीसी चाचणी खरोखरच आवश्यक आहे, कारण ही चाचणी गर्भवती आईमध्ये आजार किंवा संसर्गाचे निदान करण्यास मदत करते. चाचणी तीन प्रकारच्या रक्त पेशींच्या संख्येची गणना करते म्हणून,गर्भवती स्त्रीच्या आरोग्याची कल्पना येते.

ही रक्त चाचणी काय मोजते?

. लाल रक्तपेशी (आरबीसी)

लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनची पातळी गर्भाला रक्ताद्वारे ऑक्सिजन वाहून नेण्याची तिची क्षमता दर्शवू शकते. कमी हिमोग्लोबिन पातळी असलेल्या गर्भवती स्त्रियांना थकवा आणि आजार होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी लोह सप्लिमेंट्स लिहून दिली आहेत.

. पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी)

पांढऱ्या रक्त पेशी मानवी शरीरात, विशेषतः गरोदरपणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. डब्ल्यूबीसीचे पाच प्रकार आहेतबेसोफिल्स, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. हे सर्व घटक रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्वाचे आहेत. हे घटक आई आणि बाळाला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून मुक्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. यावरून आईला सिकलसेल अॅनिमिया किंवा ल्युकेमियासारखे रक्ताशी संबंधित काही आजार आहेत का हे देखील कळते.

. प्लेटलेट्स

प्लेटलेट्समुळे रक्तपेशींचे त्रिकूट बनते. प्लेटलेट्स सर्वात लहान असतात. परंतु, त्यांचे महत्त्व मोठे आहे. रक्त गोठण्यासाठी प्लेटलेट्स जबाबदार असतात. जर प्लेटलेट्सची संख्या खूप कमी असेल तर रक्त गोठत नाही, तर संख्या जास्त असणे म्हणजे आईला अचानक अंतर्गत रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

. हिमोग्लोबिन (Hb/Hgb)

हिमोग्लोबिन हे तुमच्या रक्तातील प्रथिने आहे आणि ते ऑक्सिजन धरून ठेवते.

. हेमॅटोक्रिट (एचसीटी)

हे तुमच्या रक्तातील लाल रक्तपेशींची टक्केवारी मोजते.

. मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम (एमसीव्ही)

एमसीव्ही तुमच्या लाल रक्तपेशींचा सरासरी आकार मोजते.

सीबीसी चाचणीची तयारी कशी करावी?

रक्ताची सीबीसी चाचणी करण्यापूर्वी तुम्ही सामान्यपणे खाऊपिऊ शकता. इतर चाचण्या करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जात असल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला ठराविक तासांसाठी उपवास करण्यास सांगू शकतात.

सीबीसी चाचणी कशी केली जाते?

सीबीसी चाचणी पूर्ण करण्यासाठी फक्त काही मिनिटे लागतात. एक परिचारिका तुमच्या हातामध्ये सुई घालेल आणि रक्ताचा नमुना घेईल. हा नमुना पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जाईल. तुमच्या रक्ताचा नमुना दिल्यानंतर तुम्ही क्लिनिक मधून बाहेर पडू शकता.

सीबीसी चाचणी निकालांचा खरोखर अर्थ काय आहे?

चाचणीचे परिणाम गर्भवती स्त्रीमध्ये आजाराची सुरुवात शोधण्यात मदत करतात.

  • जर डब्ल्यूबीसी संख्या कमी असेल, तर तुम्हाला संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. सामान्य श्रेणी 4,500 ते 10,000 पेशी प्रति मायक्रोलिटर (सेल्स/एमसीएल) इतकी असते.
  • तुमचे आरबीसी कमी असल्यास, तुम्हाला अॅनिमिया होऊ शकतो. पुरुषांसाठी सामान्य श्रेणी 4.5 दशलक्ष ते 5.9 दशलक्ष पेशी/ एमसीएल आहे. महिलांसाठी, ते 4.1 दशलक्ष ते 5.1 दशलक्ष पेशी/ एमसीएल आहे.
  • पुरुषांसाठी हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी 14 ते 17.5 ग्रॅम प्रति डेसीलिटर (ग्रॅम/डीएल) असते; महिलांसाठी, ती 12.3 ते 15.3 ग्रॅम/डीएल आहे.
  • एचसीटी रेंज स्केलवर कमी स्कोर असणे हे लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. उच्च स्कोअर आल्यास त्याचा अर्थ तुम्ही निर्जलित आहात असा असू शकतो. पुरुषांसाठी सामान्य श्रेणी 41.5% आणि 50.4% दरम्यान आहे. महिलांसाठी, ही श्रेणी 36.9% आणि 44.6% दरम्यान असते.
  • तुमचे आरबीसी सामान्य पातळीपेक्षा जास्त असल्यास, तुमचा एमसीव्ही वाढतो. तुमची व्हिटॅमिन बी 12 किंवा फोलेटची पातळी कमी असल्यास असे होऊ शकते. जर तुमच्या लाल रक्तपेशी कमी असतील तर तुम्हाला ऍनिमिया असू शकतो. सामान्य श्रेणीतील एमसीव्ही स्कोअर 80 ते 96 आहे.
  • प्लेटलेट्सची सामान्य श्रेणी 150,000 ते 450,000 प्लेटलेट्स/ एमसीएल आहे.

सीबीसी चाचणी निकालांचा खरोखर अर्थ काय आहे?

गर्भधारणेच्या पहिल्या ते तिसर्‍या तिमाहीतील सामान्य सीबीसी मूल्ये येथे दिलेली आहेत.

पहिली तिमाही

एकक मूल्य
एचबी g/dl 11.0-14.3
आरबीसी 10^6/ul 3.52-4.52
एचसीटी % 31-41
एमसीव्ही fl 81-96
एमसीएच pg 27-32
एमसीएचसी g/dl 33-37
आरइटीआयसीएस आरबीसी चे % 0.2-2.0
पीएलटी 10^3/u 150-400
डब्लूबीसी *10^3/ul 5000-13000
वेगवेगळ्या ल्युकोसाइटिक संख्या परिपूर्ण मूल्ये/युएल टक्केवारी %
बेसोफील्स 110 पेक्षा कमी 0-1
इओसिनोफील्स 500 पेक्षा कमी 1-6
नुट्रोफिल्स 1800-7500 40-70
स्टाफ 0-5
एसइजिएम 40-70
लिम्फ 1000-3500 20-45
मोनो 80-880 2-8

दुसरी तिमाही

एकक मूल्य
एचबी g/dl 10.0-13.7
आरबीसी 10^6/ul 3.2-4.41
एचसीटी % 30-38
एमसीव्ही fl 82-97
एमसीएच pg 27-32
एमसीएचसी g/dl 33-37
आरइटीआयसीएस % of RBCs 0.2-2.0
पीएलटी 10^3/ul 150-400
डब्लूबीसी 10^3/ul 6200-14800
वेगवेगळ्या ल्युकोसाइटिक संख्या परिपूर्ण मूल्य/युएल टक्केवारी %
बेसोफील्स 110 पेक्षा कमी 0-1
इओसिनोफील्स 600 पेक्षा कमी 1-6
नुट्रोफिल्स 2000-8000 40-70
स्टाफ 0-5
एसइजिएम 40-70
लिम्फ 1500-4000 20–45
मोनो 80-880 2-8

तिसरी तिमाही

एकक मूल्य
एचबी g/dl 9.8-13.7
आरबीसी 10^6/ul 3.1-4.44
एचसीटी % 28-39
एमसीव्ही fl 91-99
एमसीएच pg 27-32
एमसीएचसी g/dl 33-37
आरइटीआयसीएस % 0.2-2.0
पीएलटी *10^3/ul 150-450
डब्लूबीसी *10^3/u l 5000-13000
वेगवेगळ्या ल्युकोसाइटिक संख्या परिपूर्ण मूल्ये/युएल टक्केवारी %
बेसोफील्स 110पेक्षा कमी 0-1
इओसिनोफील्स 600 पेक्षा कमी 1-6
नुट्रोफिल्स 2000-8000 40-70
स्टाफ 0.5
एसइजिएम 40-70
लिम्फ 1500-4000 20-45
मोनो 80-880 2-8

आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, आईच्या एकूण आरोग्याचे मोजमाप करण्यासाठी आणि तिच्या शरीरात विषाणूंची उपस्थिती शोधण्यासाठी सीबीसी चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारे, आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याचे रक्षण करणे शक्य होते.

आणखी वाचा:

गरोदरपणातील क्वाड्रपल मार्कर चाचणी
गर्भधारणा झाली आहे हे निश्चित करण्यासाठी रक्ताची चाचणी – चाचणी दरम्यान नक्की काय होते?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article