Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता स्त्रियांसाठी प्रजनन औषधे – फायदे आणि दुष्परिणाम

स्त्रियांसाठी प्रजनन औषधे – फायदे आणि दुष्परिणाम

स्त्रियांसाठी प्रजनन औषधे – फायदे आणि दुष्परिणाम

स्त्रियांमधील वंध्यत्वावर उपचार करत असताना बाळ व्हावे म्हणून डॉक्टर औषधे लिहून देतात. तथापि ह्या औषधांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तर त्यांचा फायदा कसा होतो आणि ही औषधे वापरल्याने कुठला धोका निर्माण होतो? स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी कुठली वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत, त्यांचे फायदे, दुष्परिणाम आणि बरेच काही ह्याविषयी जाणून घेऊयात.

प्रजनन औषध म्हणजे काय?

ज्या औषधांनी स्त्रीची प्रजननक्षमता वाढते त्या औषधांना प्रजनन औषधे असे म्हणतात. ह्या औषधांमुळे अंडाशयातून स्त्रीबीज सोडण्यास लागणारी संप्रेरकांची निर्मिती प्रक्रिया सुरु होते. ह्या प्रक्रियेला ओव्युलेशन असे म्हणतात.

आरोग्याच्या कुठल्या समस्यांसाठी ही प्रजनन औषधे वापरतात?

स्त्रियांच्या प्रजननाच्या प्रश्नांवर सामान्यातः ही प्रजननासाठीची औषधे लिहून दिली जातात. तथापि, ही औषधे आरोग्याच्या इतर समस्यांसाठी  सुद्धा दिली जातात.

  • पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम
  • ओव्युलेशनची समस्या
  • वजन कमी असणे, जास्त असणे किंवा खूप जास्त व्यायाम करत असलेल्या व्यक्तींसाठी
  • थायरॉईडचे प्रश्न
  • खाण्याच्या अयोग्य सवयी

प्रजननाच्या औषधांचे स्त्रियांना फायदे

प्रजनन औषधांचा फायदा वेगवेगळ्या प्रकारे होतो, तो खालीलप्रमाणे

  •  प्रजनन प्रणालीसाठी लागणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती वाढते
  • ओव्युलेशनचे चक्र प्रजनन औषधांनी नियमित होते
  •  ह्या प्रजनन औषधांमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये असतात व ती भ्रूणाच्या विकासासाठी आवश्यक असतात आणि त्यामुळे गर्भपाताची शक्यता कमी होते.
  • अंडाशयाला फॉलिकल असलेली स्त्रीबीजे निर्माण करण्यास चालना मिळते. ही फॉलिकल जेव्हा वाढतात तेव्हा ओव्युलेशनला मदत होते.

प्रजनन औषधे वापरण्याचे स्त्रियांवर होणारे दुष्परिणाम

दुर्दैवाने, स्त्रियांना प्रजनन औषधांचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि ते खालीलप्रमाणे:

१. मन:स्थितीत बदल

औषधे घेत असताना स्त्रियांच्या मन:स्थिती मध्ये खूप बदल होतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ‘मूड स्वीन्ग्स’ असे म्हणतो. ह्याचे कारण म्हणजे ही औषधे शरीरातील संप्रेरकांची, विशेषकरून इस्ट्रोजेनची पातळी बदलतात. इस्ट्रोजेनच्या बदलत्या पातळीमुळे मन:स्थितीत बदल होतात आणि औदासिन्य येते.

२. एका पेक्षा जास्त बाळांचा गर्भ राहणे

एकापेक्षा जास्त गर्भ राहिल्यामुळे त्याचा बाळांना तसेच आईला धोका असतो. ह्या बाळांचे वजन खूप कमी असते आणि त्यामुळे पुढे त्यांना तब्येतीचे त्रास होतात आणि काही प्रकरणांमध्ये बाळांना मृत्यू सुद्धा येऊ शकतो.

३. बाळांचा अकाली जन्म होणे

प्रजनन औषधे वापरल्याने एकापेक्षा जास्त गर्भ राहणे खूप सामान्य आहे आणि त्यामुळे बाळाचा जन्म अकाली होतो म्हणून जेव्हा बाळ जन्म घेते तेव्हा बाळामध्ये खूप गुंतागुंत निर्माण होते.

४. ओवॅरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम (ओएचएसएस)

जर संप्रेरकांच्या इंजेकशन्समुळे अंडाशयाला सूज आली तर ते ओ. एच. एस. एस. मुळे होऊ शकते. ह्या स्थितीमध्ये वेदना, खूप वेगाने वजन वाढणे, लघवीला कमी होणे, मळमळ आणि श्वसनास त्रास होऊ शकतो. गंभीर परिस्थितीत काही स्त्रियांना मृत्यू सुद्धा येऊ शकतो.

५. गर्भाशयाच्या बाहेर गर्भाची वाढ होणे

प्रजनन औषधांमुळे गर्भाशयाच्या बाहेर गर्भ वाढण्याचा चार पट धोका असतो त्यास इंग्रजीमध्ये ‘एक्टॉपिक प्रेग्नन्सी’ असे म्हणतात. हे इस्ट्रोजेनच्या जास्त पातळीमुळे आणि एकापेक्षा जास्त स्त्रीबीजांमुळे होते.

प्रजनन औषधांचे प्रकार

एक वर्षाच्यावर प्रयत्न करून झाल्यावर सुद्धा गर्भधारणा झाली नसेल तर प्रजनन औषधे घेतली पाहिजेत. तथापि, एक वर्ष झाल्यावर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला खालील औषधे लिहून देऊ शकतात.

१. क्लोमीड

हे बाजारात आढळणारे सर्वसामान्य औषध आहे आणि कदाचित पहिले प्रजनन औषध आहे जे डॉक्टर तुम्हाला लिहून देऊ शकतील. हे औषध स्वस्त आहे आणि हे औषध घेणाऱ्या महिलांना ६ महिन्यांच्या आत गर्भधारणा राहते. हे औषध गोळ्यांच्या स्वरूपात असते.

२. ब्रोमोक्रिप्टीन

हे प्रजनन औषध सुद्धा सर्रास स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी लिहून दिले जाते. प्रोलॅक्टिन ह्या संप्रेरकाची जास्त निर्मिती थांबवण्यासाठी हे औषध वापरतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या प्रश्नावर उपचारांसाठी सुद्धा हे औषध वापरतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा प्रोलॅक्टिनच्या जास्त पातळीमुळे टेस्टेस्टेरॉन कमी असेल तर ह्या औषधाची मदत होते.

ह्या व्यतिरिक्त पार्किनसन्सवर उपचारांसाठी सुद्धा ह्या औषधाचा उपयोग होतो, पिट्युटरी ट्यूमर्सची वाढ मंदावते आणि काही वेळा मधुमेह-प्रकार २ साठी सुद्धा हे औषध वापरले जाते.

स्त्रियांसाठी सामान्यपणे उपलब्ध असलेली प्रजनन औषधे

बाजारात खूप प्रजनन औषधे उपलब्ध आहेत.तथापि सामान्यपणे आढळणारी औषधे खालीलप्रमाणे.

१. क्लोमीफिन सिट्रेट

ज्या स्त्रिया ओव्युलेशनच्या प्रश्नाला सामोऱ्या जात आहेत त्यांच्यासाठी हे औषध लिहून दिले जाते. हे पीसीओएस असणाऱ्या महिलांसाठी सुद्धा लिहून दिले जाते तसेच ज्या स्त्रियांमध्ये अनियमित ओव्युलेशन आहे ते सुधारण्यासाठी हे औषध वापरतात.

२. लेट्रोझोल

प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होण्यासाठी तोंडातून घेण्यासाठी ह्या गोळ्या वापरतात, त्यामुळे मेंदूला फॉलिकल स्टिम्युलेटिंग होर्मोन (एफ.एस.एच.) निर्मितीसाठी  चालना मिळते. ह्यामुळे पीसीओएस असलेल्या स्त्रियांना चालना मिळते आणि सामान्य ओव्युलेशन  होणाऱ्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाची गुणवत्ता वाढते.

३. ह्यूमन मेनॉपॉसल गोनॅडोट्रोपिन

ह्या औषधामध्ये २ संप्रेरके असतात, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफ. एस. एच.) आणि ल्युटिनाइझिंग हॉर्मोन (एल. एच.) ही दोन्ही संप्रेरके चांगल्या गुणवत्तेच्या  स्त्रीबीजांच्या निर्मितीत आणि विकासास मदत करतात.

४. ह्यूमन कोरीओनिक गोनॅडोट्रोपिन

हे औषध इंजेक्शनच्या स्वरूपात असते आणि स्त्रीबीजास परिपक्व करण्यास मदत करते. हे ज्या स्त्रियांना पीसीओएसचा त्रास आहे त्यांच्यासाठी लिहून दिले जाते किंवा क्लोमिफेन हे औषध काम करत नसलेल्या तसेच वंध्यत्त्वाचा सामना करीत असलेल्या आणि आय. व्ही. एफ. चे उपचार घेत असलेल्या स्त्रियांसाठी हे लिहून दिले जाते.

५. गोनॅडोट्रोपिन रिलिझिंग हॉर्मोन अँटॅगॉनिस्ट

हे औषध ज्या स्त्रिया आय. व्ही. एफ. सोबतच ‘कंट्रोल्ड ओवॅरियन स्टिम्युलेशन टेक्निक’ ही उपचारपद्धती घेत असतील तर ते लिहून दिले जाते. एल. एच. आणि एफ. एस. एच. ह्या संप्रेरकांची निर्मिती थांबवून ओव्युलेशनची प्रक्रिया सुद्धा थांबवली जाते आणि आय. व्ही. एफ. च्या वेळीच स्त्रीबीज विकसित होते.

६. मेटफोर्मीन हायड्रोक्लोराइड

प्रोलॅक्टिन ह्या संप्रेरकाच्या जास्त निर्मितीमुळे ओव्युलेशनमध्ये प्रश्न निर्माण होतात आणि ह्या औषधाच्या साह्याने त्यावर उपचार केले जातात. ह्या औषधामुळे इस्ट्रोजेन आणि टेस्टेरॉनची पातळी समान ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळे ओव्युलेशन प्रक्रिया नियमित होण्यास मदत होते.

७. ब्रोमोक्रिप्टीन

प्रोलॅक्टिन ह्या संप्रेरकाची जास्त निर्मिती होत असेल तर  ओव्युलेशनची प्रक्रिया नीट होत नाही आणि हा प्रश्न ह्या औषधाने हाताळता येतो. हे औषध तोंडाद्वारे घेता येईल अशा स्वरूपात असते किंवा योनीमार्गात ठेवता येईल अशा घनगोळीच्या स्वरूपात  असते.

प्रजनन औषधे ही एकमेकांपेक्षा वेगळी कशी असतात?

प्रजनन औषधाचे स्वरूप एकमेकांपेक्षा वेगवेगळे असू शकते. काही गोळ्यांच्या स्वरूपात तर काही इंजेकशन्सच्या स्वरूपात असू शकतात.

काही प्रजनन औषधे जसे की क्लोमोफीन हे पीसीओएस असलेल्या स्त्रियांना ओव्युलेशनसाठी मदत करते, तर काही स्त्रिया मेटफोर्मीनला चांगला प्रतिसाद देतात. काहींसाठी, ह्या दोन्ही औषधांचे संयोजन उत्कृष्ट कार्य करते.

ज्या स्त्रियांमध्ये प्रोलॅक्टिन ह्या संप्रेरकाची पातळी जास्त असते त्या स्त्रियांना ब्रोमोक्रिप्टीन किंवा सबारगोलीन ही औषधे ओव्युलेशन च्या प्रश्नांसाठी लिहून दिली जातात.

प्रजनन औषधाचा योग्य डोस कसा शोधावा?

प्रजनन औषधांचा योग्य प्रमाणात डोस हा स्त्रियांमधील वंध्यत्वावरील यशस्वीरीत्या उपचारांसाठी महत्वाचे आहे. डोस आणि प्रजनन औषधांचा प्रकार हा प्रश्नाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. जर औषधांचा डोस कमी असेल तर सकारात्मक आणि यशस्वी निकाल मिळण्याची शक्यता कमी असते आणि जर डोस वाढला तर आरोग्यविषयक गंभीर प्रश्न जसे की ओएचएसएस निर्माण होऊ शकतात.

स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या प्रश्नावर प्रजनन औषधे वापरणे ही पहिली उपचार पद्धती आहे. गर्भधारणेसाठी काही फायदेशीर औषधे आहेत ज्यामुळे गर्भधारणेस फायदा होऊ शकतो. तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलण्यास संकोच करू नका आणि डॉक्टर जी औषधे लिहून देतील ती घ्या. योग्य औषधाचा योग्य डोस घेतल्यास तुम्हाला गर्भधारणेसाठी मदत होईल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article