Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील कोरडा खोकला

गरोदरपणातील कोरडा खोकला

गरोदरपणातील कोरडा खोकला

गरोदरपणात कोरड्या खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आणि त्यामुळे ताप सुद्धा येऊ शकतो. कोरड्या खोकल्याची नीट काळजी घेतली गेली नाही तर झोपेमध्ये तसेच दैनंदिन कामात सुद्धा व्यत्यय येतो. गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असल्याने आणि बरे होण्यासाठी मदतीची गरज  असल्याने, आम्ही तुम्हाला ह्या आजाराची संपूर्ण माहिती ह्या लेखाद्वारे दिलेली आहे. आजार ओळखून त्यावर उपाय सुद्धा इथे दिलेले आहेत.

कोरडा खोकला म्हणजे काय?

कोरड्या खोकल्यामध्ये श्लेष्माचा स्त्राव होत नाही. ह्यामुळे स्त्रियांमध्ये निद्रानाश ते लघवीचा असंयम (UI) ह्यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात, कोरडा खोकला नियमित श्वासोच्छवासात अडथळा आणू शकतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. थकवा ही गरोदरपणामध्ये कोरड्या खोकल्याशी संबंधित आणखी एक समस्या आहे.

कोरड्या आणि ओल्या खोकल्यामध्ये काय फरक आहे?

कोरड्या आणि ओल्या खोकल्यातील फरक म्हणजे कोरड्या खोकल्यामध्ये श्लेष्माचा स्त्राव नसतो. कोरड्या खोकल्यामध्ये कोणताही श्लेष्मा नसला तरी सुद्धा, तो फुफ्फुसांच्या आणि अनुनासिक मार्गाच्या अस्तरांमधून हानिकारक क्ष्मजंतू आणि ऍलर्जी निर्माण करणारे जीवाणू बाहेर काढून टाकत असतो.

गरोदर स्त्रियांना खोकल्याचा धोका अधिक का असतो?

गरोदर स्त्रियांना खोकल्याचा धोका अधिक का असतो

गरोदर स्त्रिया विविध कारणांमुळे खोकल्याला बळी पडतात. त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढणे हे त्यामागील प्राथमिक कारण आहे. गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्तीची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे  शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कमकुवत होते आणि ऍलर्जी आणि खोकला होण्याची शक्यता असते.

गरोदरपणात कोरड्या खोकल्याची कारणे

गरोदरपणात कोरड्या खोकल्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • ऍलर्जी – कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती ऍलर्जीसाठी अधिक संवेदनशील असते. बाळांवर ह्याचा   परिणाम होत नसला तरी, गर्भवती आईवर ह्याचा परिणाम होऊ शकतो. विषाणू नाकातून किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊ शकते किंवा कोरडा खोकला होऊ शकतो.
  • दमा – जर दम्याचे निदान झाले असेल, तर तुम्हाला गरोदरपणात कोरडा खोकला येऊ शकतो.
  • ब्रोन्कोस्पाझम – ब्रॉन्किओल्सच्या अतिक्रियाशीलतेमुळे कोरडा खोकला होऊ शकतो. ब्रोन्कोस्पाझमची काही कारणे म्हणजे पाळीव प्राण्यांचा कोंडा, थंड हवामान, रासायनिक धूर आणि धूम्रपान.
  • ऱ्हीनिटीस – गर्भधारणेशी संबंधित स्थिती आहे. ह्यामुळे श्लेष्माच्या पडद्याला सूज येते. आणि  कोरडा खोकला होतो.
  • कमी प्रतिकारशक्ती – कमी प्रतिकारशक्तीमुळे गर्भवती स्त्रियांना विविध ऍलर्जी आणि संसर्ग होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कोरडा खोकला होऊ शकतो.
  • छातीत जळजळ – गरोदरपणात ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होणे सामान्य आहे. ह्यामुळे देखील कोरडा खोकला होऊ शकतो.

चिन्हे आणि लक्षणे

तुम्ही कोरड्या खोकल्याच्या समस्येतून जात असताना दिसून येणारी चिन्हे आणि लक्षणे येथे दिलेली  आहेत:

  • घरघर आणि एक अवरोधित नाक
  • मळमळ
  • निद्रानाश आणि त्रासदायक झोप

गरोदरपणात कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय

गरोदरपणात कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय

गरोदरपणात कोरड्या खोकल्यासाठीच्या घरगुती उपचारांमध्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहार ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. झिंकयुक्त पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कोरड्या खोकल्यापासून आराम देतात. दिवसभर हायड्रेटेड राहणे हा एक चांगला उपाय आहे. किवी, टोमॅटो, संत्री, द्राक्षे इत्यादीसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत. गरोदरपणात कफ सिरप घेणे हा खोकला आणि घसा खवखवण्यावर आणखी एक उपाय आहे. इतर काही सोपे उपाय खाली दिलेले आहेत.

  • तुमचे शरीर बरे होण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीस उत्तेजन देण्यासाठी पुरेशी झोप घ्या. चांगली विश्रांती इतर कोणत्याही औषधांपेक्षा संसर्ग आणि रोगांवर गुणकारी असते.
  • खोकल्याची तीव्रता कमी करण्यासाठी लिंबाच्या फोडीवर चिमूटभर काळी मिरी फवारून तो तुकडा चोखणे.
  • कोरड्या खोकल्याची लक्षणे दूर करण्यासाठी जेवणासोबत चिरलेल्या किंवा किसलेल्या कच्च्या लसणाचे 2ते 3 तुकडे खा.
  • तुळशीची पाने आणि मध घ्या आणि त्यांची गुळगुळीत पेस्ट करा. कोरड्या खोकल्याला शांत करण्यासाठी दररोज याचे सेवन करा.
  • कांद्याचा रस मधात मिसळून तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक कफ सिरप बनवू शकता.
  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी संत्र्याचा रस प्या.
  • धूळ, घाण आणि इतर विषारी प्रदूषक यासारखे ऍलर्जी वाढवणारे घटक टाळा.
  • तीव्र खोकल्यासाठी एक चांगला घरगुती उपाय म्हणजे कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळणे.
  • हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी आणि कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी रात्री कोमट पाण्याने शॉवर घ्या किंवा तुमच्या बेडरूममध्ये ह्युमिडिफायर वापरा.
  • कोमट सूप, चहा आणि मध मिसळलेले पाणी हे देखील चांगले उपाय आहेत.
  • कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हे सूजलेल्या भागांवर काम करते आणि अतिरिक्त द्रव काढून टाकते. ह्यामुळे श्लेष्मा पातळ करण्यासाठी तसेच घसा आणि अनुनासिक मार्गातील त्रासदायक पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत होते.
  • कोरड्या खोकल्याची लक्षणे रोखण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यायामासोबत प्रोबायोटिक्स आणि प्रसवपूर्व जीवनसत्त्वे देखील घ्या.
  • कोरड्या खोकल्यासाठी,कोणतेही दुष्परिणाम न होता,  चांगले काम करणारी काही औषधे आहेत ती.म्हणजे अॅसिटामिनोफेन (ताप, डोकेदुखी आणि वेदनांसाठी), लोझेंज (घसादुखी कमी करण्यासाठी) आणि कोडीन आणि डेक्स्ट्रोमेथोरफान (कोरडा खोकला दाबण्यासाठी) होय.
  • भरपूर पाणी प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेड राहू शकाल आणि तुमच्या शरीरातील हानिकारक विष, श्लेष्मा आणि इतर घटक बाहेर काढू शकाल.
  • अनुनासिक रक्तसंचय कमी करण्यासाठी एक ह्युमिडिफायर घ्या.
  • श्वास घेणे सोपे करण्यासाठी डोक्याखाली उशांचा सेट घ्या.
  • कोमट चहा प्या किंवा कोमट मिठाच्या पाण्याने गार्गल करा.
  • दिवसा कडक कँडी खा किंवा बर्फाचे तुकडे चोखा.
  • जर कोरडा खोकला ऍसिड रिफ्लक्समुळे होत असेल, तर तुम्ही तुमच्या जेवणाची वारंवारता आणि प्रमाण बदलू शकता आणि स्वस्थ बसणे, उभे राहणे आणि झोपण्याची स्थिती तुम्ही ठरवू शकता.
  • चिकन सूप तयार करा आणि छान चव येण्यासाठी त्यात कांदे घाला. हे मिश्रण पोषण देईल तसेच तुमची पौष्टिक गरज भगवेल.
  • फ्लूने त्रस्त असलेल्या लोकांपासून दूर रहा.
  • एक कप गरम कॅमोमाइल चहामध्ये मध घालून कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
  • कोरडा खोकला बरा करण्यासाठी कच्चा लसूण खाणे देखील फायदेशीर आहे.
  • अर्धा चमचा खसखस ​​आणि एक चमचा मध 3-4चमचे ताज्या नारळाच्या दुधात मिसळून झोपताना खोकला बरा होईपर्यंत प्या.
  • मेन्थॉल असलेले व्हिक्स छातीला लावल्यास नाकपुड्या उघडतात  आणि त्वरित आराम मिळू शकतो.

कोरड्या खोकल्यासाठी लसीकरण

विकार आणि आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी गरोदरपणात काही लशी सुरक्षितपणे घेतल्या जाऊ शकतात. यामध्ये हिपॅटायटीस बी आणि हंगामीची लस ह्या दोन लशींचा समावेश आहे. हिपॅटायटीस हा एक संक्रमणीय आजार आहे आणि तो आईद्वारे  गर्भापर्यंत पसरू शकतो. फ्लूची लस तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवते. जास्तीत जास्त परिणामकारकतेसाठी फ्लूची लस शॉटच्या स्वरूपात (निष्क्रिय स्वरूप असलेले) दिल्या गेल्या पाहिजेत. .

तुम्हाला डांग्या खोकल्याचा अनुभव येत असल्यास, तुम्हाला डॉक्टरांकडून Tdap लस लिहून दिली जाईल.

कोरड्या खोकल्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो का?

नाही, कोरडा खोकला फक्त आईची प्रतिकारशक्ती कमी करतो, बाळाची नाही. गर्भ निसर्गात: लवचिक असतो आणि प्लेसेंटाद्वारे संरक्षित असतो. परंतु, खोकला, सर्दी किंवा फ्लूवर दीर्घकाळ उपचार न केल्याने बाळाच्या संज्ञानात्मक विकासावर परिणाम होऊ शकतो आणि जन्मादरम्यान समस्या निर्माण होऊ शकते. सावधगिरीचा उपाय म्हणून, निरोगी खा आणि नियमित तपासणीसाठी जा.

कोरड्या खोकल्यामुळे कोणत्या प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते?

उपचार न केल्यास कोरडा खोकला, गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात गुंतागुंत निर्माण करू शकतो:

  • कोरडा खोकला असलेल्या लोकांना झोपेची कमतरता किंवा झोपेचा त्रास जाणवतो. खोकल्यामुळे शरीर नाजूक आणि कमकुवत होते आणि झोप नीट लागत नाही.
  • मूत्रमार्गात असंयम किंवा मूत्रमार्गाच्या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांना अस्वस्थता येते. गरोदरपणात मूत्राशयावर गर्भाशयाचा दबाव पडतो. त्यामुळे लघवी आत ठेवणे कठीण होते. कोरडा खोकला झाल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते आणि लघवी बाहेर पडू शकते.
  • कोरड्या खोकल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण येतो आणि त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो.
  • पौष्टिकतेची कमतरता बहुतेकदा कोरड्या खोकल्यानंतर होते. कोरड्या खोकल्यामुळे तुम्हाला असुरक्षित आणि अशक्त वाटू शकते आणि भूक कमीलागू शकते. यामुळे तुमच्या शरीराला पोषकतत्त्वांची कमतरता होऊ शकते.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

कोरडा खोकला योग्य आहार आणि औषधोपचाराने कमी केला जाऊ शकतो, परंतु गुंतागुंत झाल्यास  अनपेक्षितपणे डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासू शकते. तुम्हाला अनुभव आल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

  • वारंवार निद्रानाश होणे
  • दीर्घकाळ भूक न लागणे
  • 102 अंश फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक ताप
  • छातीत दुखणे आणि खोकला येणे
  • खोकल्याच्या वेळी रंगहीन श्लेष्मा बाहेर पडणे

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे. ही लक्षणे वाढून तुमचे शरीर कमकुवत होईपर्यंत वाट पाहू नका. विशेषत: वरील लक्षणे कायम राहिल्यास आणि घरगुती उपचार करूनही बरे होत नसल्यास डॉक्टरांकडे जा.

कोरड्या खोकल्यासाठी ओव्हर-द-काउंटर औषधे येतील का?

कोरड्या खोकल्याचा सामना करण्यासाठी तुम्ही ओव्हर-द-काउंटर औषधे घेऊ शकता. स्वतःच्या मनाने औषध घेण्यापूर्वी खालीलटिप्स लक्षात ठेवा:

  • गरोदरपणात सामान्य कोरड्या खोकल्याची जी औषधे सुरक्षित असतात, त्यात अॅसिटामिनोफेन (टायलेनॉल), डेक्सट्रोमेथोर्फन कफ सप्लिमेंट्स आणि मेन्थॉल असलेल्या खोकल्याच्या थेंबांचा समावेश होतो.
  • जेव्हा फायदे आणि परिणामकारकता त्याच्या जोखमीपेक्षा जास्त असते फक्त तेव्हाच ओव्हर-द-काउंटर औषध वापरली पाहिजेत  .
  • काही औषधांचा अतिवापर गर्भाला हानी पोहोचवू शकतो. म्हणून, तुम्ही सुरक्षितपणे कोणती औषधे आणि डोस घेऊ शकता याबद्दल तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोला.

गरोदरपणात कोरडा खोकला सामान्य असला तरी, त्याचे निरीक्षण करणे आणि तो कायम राहिल्यास डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे. निरोगी आहार आणि पुरेशी झोप घेऊन तुम्ही कोरडा खोकला टाळू शकता आणि बरा करू शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार
गरोदरपणातील खोकल्यासाठी परिणामकारक घरगुती उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article