Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का?

जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला तुमच्या अन्नपदार्थांच्या निवडीविषयी खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुम्ही जे काही खाता ते तुमच्या आरोग्यावर तसेच बाळाच्या आरोग्यावरही परिणाम करते. तुम्ही जे काही खाता (अगदी कमी प्रमाणात असले तरी ) त्याचा आपल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल. म्हणून आपण निरोगी पदार्थांची निवड करणे महत्वाचे आहे.

गरोदरपणाततुम्हाला तुमच्या खाण्याच्या निवडीच्या संदर्भात सल्ले मिळतील आणि बऱ्याच माहितीमुळे तुम्ही भारावून जाल. तुम्हाला कोणती फळे किंवा भाज्या खाव्यात हे कदाचित माहिती असेल, परंतु औषधी वनस्पती आणि बियाण्यांचे काय? उदाहरणार्ध तीळ घ्या, आपण त्यास आपल्या गर्भावस्थेच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता? ते हानिकारक आहेत किंवा ते आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी चांगले आहेत का ? जाणून घेण्यासाठी वाचा.

गरोदरपणात पांढरे तीळ खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात पांढरे तीळ खाणे सुरक्षित नसते हा समज केवळ एक मिथक आहे. भारतात बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की तीळ हे एक उष्णता निर्माण करणारे अन्न आहे आणि ते शरीराची उष्णता वाढवते आणि शरीराचे नैसर्गिक संतुलन अस्वस्थ करते. काही लोक असा विश्वासही ठेवतात की गरोदरपणात तिळासारखे उष्णता तयार करणारे पदार्थ खाल्ल्यास गर्भपात किंवा अकाली प्रसव होतो. तथापि, याचा आधार घेण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. उलट, तीळ बियाण्यामध्ये लोह, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे अत्यावश्यक पोषक घटक असतात जे आई आणि बाळासाठी चांगले असतात. परंतु बहुतेक डॉक्टर असे सूचित करतात की गर्भवती महिलेने पहिल्या तिमाहीत त्यांचे सेवन करणे टाळावे कारण यामुळे तिला मळमळ होऊ शकते.

तिळाचे पौष्टिक मूल्य

तीळ बियाणे विविध अत्यावश्यक पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतात आणि गरोदरपणात त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्याचा फायदा होऊ शकतो. हे बियाणे लोह, कॅल्शियम आणि फायबरचा उत्तम स्रोत म्हणून काम करतात. हे सर्व पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी आपल्याला फक्त काही तिळाच्या बिया खाण्याची आवश्यकता आहे

तिळाच्या बियाणांपासून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा ब्रेकडाउन येथे दिला आहे. १० ग्रॅम तिळामध्ये पौष्टिकतेचे अंदाज खालीलप्रमाणे आहेत.

  • प्रथिने २ ग्रॅम
  • फायबर १ ग्रॅम
  • कार्बोहायड्रेट २ ग्रॅम
  • चरबी ४ ग्रॅम
  • कॅल्शियम ८९ मिलीग्रॅम
  • लोह . ३ मिलीग्रॅम
  • कॅलरी ५१

इतर खनिजे जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि बी जीवनसत्त्वे अगदी थोड्या प्रमाणात असतात

तीळ खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

तीळ जगातील बर्‍याच भागात सुपरफूड मानले जाते. ते गर्भवती स्त्री आणि तिच्या बाळासाठी आवश्यक असलेली पुष्कळ पोषक तत्वे देऊ शकतात. गरोदरपणात तीळ खाण्याचे काही फायदे खाली दिले आहेत

  • तीळ बियाणे हे लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे देणार्‍या पौष्टिक पदार्थांचे संपूर्ण पॅकेज म्हणून काम करते, ह्या सर्व गोष्टी गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. तीळ बियामध्ये जीवनससत्वे भरपूर प्रमाणात असतात, जसे की राइबोफ्लेविन, नियासिन, थायमिन आणि पायराइडॉक्साईन, या सर्वांमुळे गर्भाचा योग्य विकास होतो.
  • तीळ हे प्रथिने आणि अमिनो ऍसिड्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत जे गर्भाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असतात.
  • तीळ, फायबरचा समृद्ध स्रोत असल्याने, गरोदरपणात पचनास मदत करते. गरोदरपणात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. आपल्यालाही बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या असल्यास त्या टाळण्यासाठी तुम्ही तीळ खाऊ शकता.
  • तीळ बियामध्ये ओलेइक ऍसिड असते जे आपली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी किंवा एलडीएलची पातळी कमी ठेवू शकते आणि चांगले कोलेस्ट्रॉल किंवा एचडीएल पातळी सुधारू शकते. तीळ बियाणे एक चांगले लिपिड प्रोफाइल सुनिश्चित करेल.
  • तिळामध्ये व्हिटॅमिन सी असते जे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करते आणि आपण रोग व जंतूंचा नाश करू शकतो. गरोदरपणात, आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असते म्हणून आपण कदाचित संक्रमण आणि आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. परंतु तीळ खाल्ल्याने हे संक्रमण तुम्ही टाळू शकता. तिळाचे सेवन केल्यास सर्दी व फ्लूचा प्रतिबंध होतो.
  • गरोदरपणात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम हे महत्त्वपूर्ण पोषणमूल्य असते. आणि तीळ, कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत असल्याने आपल्या दातांची काळजी त्यामुळे घेतली जाते. तीळ खाऊन गरोदरपणात दात आणि हाडांची काळजी घेऊ शकता. ते आपल्या बाळाच्या निरोगी वाढीस मदत करू शकतात.
  • तिळामध्ये फॉलिक ऍसिड असल्याने गरोदरपणात ते खाल्ल्यास बाळांमधील न्यूरल ट्यूबशी संबंधित दोष टाळण्यास मदत होते.
  • तीळ खाल्ल्याने उर्जा वाढते तसेच मानसिक तणाव आणि अशक्तपणा कमी होतो.
  • तीळ लोहाचा समृद्ध स्त्रोत आहे त्यामुळे पोटातील बाळास ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो.

तुमच्या आहारामध्ये तिळाचा समावेश कसा करावा?

आता तुम्हाला तिळापासून मिळणाऱ्या अफाट फायद्यांबद्दल माहिती आहेच पण तुम्ही आता असा विचार करत असाल की गरोदरपणात आहारामध्ये त्याचा कसा समावेश करावा. आवश्यक पोषक मूल्यांनी समृद्ध असल्याने तिळाचा आपल्या नियमित आहारामध्ये कसा समावेश करू शकाल ते पाहुयात.

  1. आपल्या न्याहारीच्या नियमित वाटीत तीळ घाला. तसेच गरम सीरिअलच्या वाटीत घाला
  2. थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्ही कोशिंबीरीमध्ये तीळ घाला आणि नीट ढवळून घ्या
  3. तुमच्या दुपारच्या भुकेच्या वेळी व्हेजिटेबल स्टिक्स तिळाच्या डीप सोबत खाऊ शकता
  4. तुम्ही कोथिंबीर आणि पुदीना चटणीत तीळ घाला
  5. तुम्ही तीळ भाजून वेगवेगळ्या पदार्थांना सजवण्यासाठी त्यांचा वापर करू शकता
  6. तुम्ही तिळाचे लाडू बनवू शकता आणि गरोदरपणात ते खाऊ शकता
  7. तुम्ही सूप किंवा रायत्यामध्ये तीळ घालू शकता

तुमच्या आहारामध्ये तिळाचा समावेश कसा करावा?

गरोदरपणात तीळ खाण्याचे धोके

तीळ खाणे गर्भवती स्त्री आणि तिच्या बाळासाठी हानिकारक नाही. तथापि, प्रत्येक स्त्रीचे शरीर समान आहारास योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. गरोदरपणात तिळाचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला मळमळ होत असल्यास, तुमची मळमळ कमी होईपर्यंत प्रतीक्षा करा. आणि जर तीळ खाल्ल्यास पोट दुखत असेल तर आपण ते खाणे थांबवावे. आपल्या आहारात तिळाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले

सामान्य प्रश्न

. मी गरोदरपणात तिळाच्या तेलात शिजवलेले अन्न खाऊ शकतो का?

गरोदरपणात तीळ तेलात तयार केलेले अन्न खाणे सुरक्षित आहे. हे तेल गरोदरपणात तुमची निरोगी चरबीची आवश्यकता पूर्ण करू शकते आणि तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास करण्यास मदत करू शकते. तथापि, तीळ तेलात शिजवलेले काहीही खाण्यापूर्वी तुम्ही पौष्टिक तज्ञ आणि डॉक्टरांशी बोलण्याची शिफारस केली जाते.

. काळे तीळ किंवा पांढरे तीळ बियाणे खाणे आरोग्यासाठी कोणती निवड योग्य आहे?

काळ्या तीळ बियाण्यामध्ये पौष्टिकतेचे प्रमाण जास्त असते, म्हणून ते पांढऱ्या तीळापेक्षा अधिक आरोग्यदायी असतात. काळ्या तीळात पांढर्‍या तीळापेक्षा जास्त कॅल्शियम असते आणि जर तुम्हाला तुमची कॅल्शियमची गरज भागवायची असेल तर गरोदरपणात तो चांगला पर्याय असेल. तथापि, पांढरे तीळ खाण्यामध्ये काहीही चूक नाही. ते देखील चांगले आहेत!

तीळ खाणे आई आणि बाळासाठी हानिकारक नाही. परंतु तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत आपल्या आहारात त्यांचा समावेश करणे टाळले पाहिजे कारण ते खाण्याने तुम्हाला मळमळ होऊ शकते. जर आपण आपल्या आहारात तीळ समाविष्ट करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी आधी बोलून घ्या. निरोगी गर्भारपणासाठी तुम्हाला शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article