Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का?

बाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का?

बाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का?

तुमचे बाळ जेव्हा घन पदार्थ खाण्यास सुरुवात करेल तेव्हा बाळाला नवीन चव आणि पोत ह्यांची उत्सुकता असेल. तुम्हाला बाळाच्या आहारात फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश करावासा वाटेल परंतु मोठ्या माणसांसाठी ज्या गोष्टी पौष्टिक असू शकतात त्या बाळांसाठी पौष्टिक नसतात. ह्या लेखात आपण एका विशिष्ट फळाबद्दल बोलू आणि ते म्हणजे लिंबू.

बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर बाळाला लिंबाची ओळख करून दिली जाऊ शकते. बाळाला वयाच्या १० व्या महिन्यापासूनसुद्धा लिंबू देण्यास तुम्ही सुरुवात करू शकता परंतु बाळ नवीन चव आणि पोत ह्यांना संवेदनशील आहे का हे आधी तपासून पहिले पाहिजे. लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड असते आणि बाळाला पचनास ते जड जाऊ शकते.

लिंबाचे पौष्टिक मूल्य

लिंबू हे लिंबूवर्गीय गटातील एक महत्वाचे फळ आहे कारण त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत

लिंबामध्ये आढळणारे पौष्टिक घटक मूल्य (प्रति १००ग्रॅम) लिंबामध्ये आढळणारे पौष्टिक घटक मूल्य (प्रति १००ग्रॅम)
एकूण लिपिड .३० ग्रॅम नियासिन .१०० मिग्रॅ
तंतुमय पदार्थ .८ ग्रॅम साखर .५० ग्रॅम
कॅल्शियम २६ मिग्रॅ व्हिटॅमिन ई .१५ मिग्रॅ
पाणी ८८.९८ ग्रॅम लोह . ६० मिग्रॅ
प्रथिने .१० ग्रॅम व्हिटॅमिन ए २२ आययू
मॅग्नेशियम ८ मिग्रॅ सोडियम २ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी .०८० मिग्रॅ झिंक .०६ मिग्रॅ
फोलेट ११ ug फॉस्फरस १६ मिग्रॅ
कर्बोदके .३२ ग्रॅम पोटॅशियम १३८ मिग्रॅ
रिबोफ्लेविन .०२० मिग्रॅ व्हिटॅमिन सी ५३ मिग्रॅ
थायमिन .०४० मिग्रॅ ऊर्जा २९ किलो कॅलऱी

स्त्रोत: आयएफसीटी २०१७, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

लहान मुलांसाठी लिंबाचे आरोग्यविषयक फायदे काय आहेत?

लहान मुलांना लिंबू (रस स्वरूपात) देण्याचे काही फायदे आहेत:

. बाळ सजलीत होते

उन्हाळ्यात आपल्या बाळाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी लिंबू एक उत्कृष्ट पर्याय आहे. याचे कारण म्हणजे लिंबाचा रस शरीराला हायड्रेट करतो आणि आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतो.

. स्कर्वी प्रतिबंधित करते

आहारातील एस्कॉर्बिक ऍसिडच्या तीव्र कमतरतेमुळे होणारा हा त्वचेचा आणि तोंडाचा रोग आहे. ग्लासभर पाण्यात साखर आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास स्कर्वी पूर्णपणे टाळता येते.

. पचनाच्या समस्या दूर करते

लिंबाचा रस पचनाशी संबंधित अनेक समस्या कमी करू शकतो कारण रसाच्या आंबटपणामध्ये अनेक कृमिनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे आतड्यांमधील कृमींचा नाश होतो. जर तुमच्या मुलाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पित्त असेल तर तुम्ही बाळाला ते देऊ शकता.

. बाळाला उलट्या होत असतील तर त्या नियंत्रित होतात

उलट्या सहसा तीव्र अपचन, गॅस्ट्रिक रिफ्लक्स आणि मज्जातंतूच्या विकारांमुळे होतात. थोडी साखर मिसळून अर्धा चमचा लिंबाचा रस घेऊन हे कमी केले जाऊ शकते.

बाळाला उलट्या होत असतील तर त्या नियंत्रित होतात

. अतिसार नियंत्रित करते

लहान मुलांना जुलाब होणे सामान्य असू शकते आणि आपल्या मुलाला अतिसार झाल्यास त्याकडे लक्ष देण्याची पहिली पायरी म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी पुनर्संचयित करणे ही होय. आपण बाळाला एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस, थोडे मीठ आणि साखर घालून खाऊ शकता.

. रोग प्रतिकारशक्ती वाढवते

मुलांची रोगप्रतिकारशक्ती विकसित झालेली नाही त्यामुळे त्यांना आजार होण्याची अधिक शक्यता असते. लिंबाचा रस नियमितपणे घेतल्याने हे टाळता येऊ शकते कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होऊ शकते.

लहान मुलांसाठी लिंबाच्या रसाची कृती

ताज्या लिंबाचा रस उन्हाळ्यात चांगला असतो आणि तो ८ महिने आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना अधूनमधून दिला जाऊ शकतो.

ही पाककृती लहान मुलांसाठी योग्य आहे. पण लहान मुलांना फक्त १००१५० मिली लिंबूपाणी द्यावे.

साहित्य:

 • एक लहान आकाराचे लिंबू
 • पाणी .५ कप
 • एक चमचा साखर
 • एक चिमूटभर मीठ (पर्यायी)

सूचना:

 • लिंबू नीट धुवून अर्धे कापून घ्या
 • एका ग्लासमध्ये अर्धे लिंबू पिळून घ्या. पाणी, साखर आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा

टीप

 • तुम्ही स्वीटनर घालू शकता
 • लिंबू खोलीच्या तापमानाला आणणे चांगले आहे जेणेकरून ते पिळणे सोपे होईल. जर लिंबू बराच काळ फ्रिजमध्ये असेल तर ते सुमारे १५ ते २० सेकंद मायक्रोवेव्ह करा.
 • तुमच्या बाळाला नवीन अन्न देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना विचारा
 • तुम्ही तुमच्या मुलाला सुरुवातीला थोड्या प्रमाणात हा रस देऊ शकता. सुरुवातीला लिंबाच्या रसात पाणी घालून तो पातळ करणे चांगले
 • जर तुमच्या बाळाचे वय एक वर्षांपेक्षा कमी असेल तर हा रस फक्त अधूनमधून दिला पाहिजे. आईचे दूध आपल्या मुलाच्या पोषणाचा मुख्य स्त्रोत असला पाहिजे

लहान मुलांसाठी लिंबाच्या रसाची कृती

लहान मुलांना लिंबू देण्यापूर्वी काय उपाय केले पाहिजेत?

आपल्या बाळाला लिंबू देण्यापूर्वी येथे दिलेले काही उपाय करा:

. कोणत्या वयात बाळाला तुम्ही लिंबू देऊ शकता?

जेव्हा बाळ १० महिन्यांचे असेल तेव्हा बाळाला पातळ केलेला लिंबाचा रस देणे सुरू करू शकता. आपण सुरुवातीला एक चमचा साखर घालू शकता जेणेकरून बाळाला तो रस आंबट लागणार नाही. तुमचे बाळ एक वर्षापेक्षा मोठे असले तरीसुद्धा त्याला लिंबाची फोड देऊ नये. कारण ऍस्कॉर्बिक ऍसिड मुळे दातांचा मुलामा खराब होऊ शकतो आणि दातांची संवेदनशीलता वाढू शकते.

. लिंबूवर्गीय फळांची ऍलर्जी

जर तुमच्या कुटुंबाला लिंबूवर्गीय फळांच्या ऍलर्जीचा इतिहास असेल तर बाळाला किमान १ वर्षाचे होईपर्यंत लिंबू देणे टाळा. बाळाला ओठ आणि तोंडाभोवती पुरळ येत असल्यास किंवा लिंबाचा रस घेतल्यानंतर डायपर पुरळ आल्यास डॉक्टरकडे घेऊन जा. जेव्हा आपण व्यावसायिक बेबी फूड तयारी खरेदी करता तेव्हा नेहमी लिंबूवर्गीय घटकांसाठी लेबल तपासून पहा. तुमचे बाळ मोठे झाल्यावर लिंबूवर्गीय फळांना सहन करू शकते. बाळ मोठे होईपर्यंत लिंबूवर्गीय फळे टाळा. खरं तर, बाळाला पहिल्यांदा लिंबाचा रस देण्यापूर्वीच, बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे चांगले.

बाळाला लिंबाचा रस दिल्यावर सुरुवातीला बाळ नकार देऊ शकते. बाळाला प्रत्येक नवीन अन्न एका वेळी एक चमचा द्या जेणेकरून तुम्ही सहजपणे ऍलर्जी ओळखू शकाल. दात येणाऱ्या बाळांसाठी सुरुवातीला थोड्या प्रमाणात पातळ केलेला रस द्या.

आणखी वाचा:

बाळांसाठी केळ्याची पूड: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती
बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article