Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) पॉटी ट्रेनिंग मुलींसाठी शौचालय प्रशिक्षण

मुलींसाठी शौचालय प्रशिक्षण

मुलींसाठी शौचालय प्रशिक्षण

बाळाचा डायपर बदलणे हा पालकत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु, बहुतेक पालक आपल्या चिमुकल्यांना शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षित करण्यास उत्सुक असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या लहान बाळाला योग्य वेळ असताना, आधी किंवा नंतरही प्रशिक्षण देणे सुरू करा. तुमचे बाळ मुलगी असल्यास तुमच्यासाठी  एक चांगली बातमी आहे – मुली मुलांपेक्षा लवकर पॉटी ट्रेन होतात! तज्ञांच्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की मुलींच्या तुलनेत मुलांना पॉटी ट्रेन करण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून, जर तुम्ही तुमच्या  लहान मुलीला पॉटी ट्रेनिंग देण्याबद्दल खूप काळजी करत असाल, तर काळजी सोडून द्या आणि आनंदी रहा कारण तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत!

व्हिडिओ: मुलींसाठी पॉटी ट्रेनिंग

पॉटी ट्रेनिंग म्हणजे काय?

डायपर न लावता मुलींना लघवी व मलविसर्जनासाठी शौचालय वापरण्याचे प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेला पॉटी ट्रेनिंग म्हणतात. बाळांना डायपरची सवय असते परंतु जशी बाळांची वाढ होते तसे त्यांना शौचालय वापरण्याचे प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. हे योग्य वयातच केले पाहिजे कारण मुलांना लगेच शौचालय वापरता येत नाही, ते हळूहळू शिकतात.

मुलींसाठी पॉटी प्रशिक्षण कधी सुरू करावे?

मुलांच्या तुलनेत, लहान मुलींना  शौचालय प्रशिक्षण देणे सोपे असते आणि ते लवकर पूर्ण केले जाऊ शकते. तुमची मुलगी पॉटी ट्रेनिंग साठी तयार होण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल.   तसेच योग्य लक्षणांवर लक्ष ठेवावे लागेल. तसेच, जर तुमची मुलगी सभोवतालच्या वातावरणाच्या अनुषंगाने काही बदलांमधून जात असेल तर ती स्थिर होईपर्यंत वाट पाहावी. मुलींसाठी पॉटी प्रशिक्षण वय  अंदाजे 18 महिने ते 3 वर्षांच्या दरम्यान आहे.

मुलींसाठी शौचालय प्रशिक्षण कसे सुरू करावे?

तुमच्या मनात एक अतिशय समर्पक प्रश्न असेल आणि तो म्हणजे , ‘मी माझ्या मुलीला शौचालय वापरण्याचे प्रशिक्षण कसे देऊ?’ ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खाली काही मुद्दे दिलेले आहेत ते तुम्हाला मदत करू शकतील.

1. योग्य वेळेची वाट पहा

सर्व मुले पॉटी ट्रेनिंग साठी तयार असल्याची काही शारीरिक, वर्तणूक आणि संज्ञानात्मक चिन्हे दर्शवतात. तुम्हाला ती चिन्हे दिसेपर्यंत वाट पहा कारण तुम्ही जरी लवकर सुरुवात केली तरी एकूण पॉटी प्रशिक्षणाची वेळ सारखीच राहते.

2. योजना तयार करा

तुम्ही चाचण्या सुरू करण्याआधीच हे सर्व नियोजन करणे महत्त्वाचे आहे. योजना सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे आणि आवश्यक साहित्य, चुका कशा हाताळायच्या आणि कधी थांबायचे यासारख्या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे. मुलाच्या डॉक्टरांशी किंवा डेकेअर प्रदात्याशी सल्लामसलत केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील कारण तुम्हाला त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून तुम्हाला अनेक मौल्यवान टिप्स मिळू शकतात. तसेच, त्यांना पळवून लावणे महत्त्वाचे आहे कारण प्रशिक्षण योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांचे योगदान आवश्यक असेल.

योजना तयार करा

3. वेळ लागू द्या

आपल्या मुलीला नवीन कौशल्यही जुळवून घ्यायला जबरदस्ती करू नका. लक्षात ठेवा की काहींना काही दिवसात प्रशिक्षण मिळू शकते, तर काहींना काही महिने लागू शकतात.

4. तुमच्या मुलीला प्रोत्साहित करा

तिने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी आपल्या मुलीची स्तुती करा. प्रत्येक वेळी तिचे कौतुक केल्याने ती ह्या नवीन कौशल्यही जुळवून घेण्यास आणखी जास्त प्रयत्न करेल.

5. अपघातांसाठी तयार रहा

शौचालय प्रशिक्षण प्रक्रियेदरम्यान त्रास होणार आहे परंतु मुलगी लवकर शिकत नाही म्हणून तुम्ही मुलीला रागावू नका आणि शांततेत घ्या. तुमच्याकडून कोणतीही नकारात्मक टिप्पणी झाल्यास ही प्रक्रिया मंद होऊ शकते किंवा तुमचे बाळ मागे पडू शकते.

मुलींसाठी पॉटी ट्रेनिंगच्या तयारीची चिन्हे

नवीन पालकांसाठी हे सोपे करण्यासाठी, तज्ञांनी पॉटी प्रशिक्षण तयारीची काही निश्चित चिन्हे एकत्रित केली आहेत. ही चिन्हे शारीरिक, वर्तणूक आणि संज्ञानात्मक चिन्हे म्हणून वर्गीकृत केली गेली आहेत. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी शौचालय प्रशिक्षण योजना बनवण्यापूर्वी त्यांच्याकडे लक्ष द्या.

1. शारीरिक चिन्हे

सर्वात आधी तुमचे बाळ चालण्यासाठी तयार आहे का हे तपासून पहा. तुमच्या बाळाला योग्य प्रमाणात लघवी होईपर्यंत आणि शौचास व्यवस्थित होईपर्यंत तुम्ही थांबावे. तसेच, तुमच्या मुलीसाठी शौचालय प्रशिक्षण योजना तयार करताना, झोपेच्या वेळी कमीतकमी 2 ते 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ खूप उपयुक्त ठरेल.

2. वागणुकीची चिन्हे

जोपर्यंत तुमची लहान मुलगी एका जागी किमान पाच मिनिटे शांतपणे बसू शकत नाही तोपर्यंत तुमच्या लहान मुलीला प्रशिक्षित करण्यासाठी तुम्हाला थांबावे लागेल. तज्ञांच्या मते मुलांपेक्षा मुली लवकर शौचालय प्रशिक्षित होतात. तिला तिची पँट काही प्रमाणात वर-खाली करता आली पाहिजे.

जेव्हा एखाद्या लहान मुलीला डायपर ओला झालेला आवडत नाही किंवा शौचास झाल्यास ती शारीरिक अथवा मौखिक लक्षणे दाखवू लागते, तेव्हा पॉटी प्रशिक्षण सुरू करणे हा एक चांगला संकेत आहे. तसेच, जर तुमचे बाळ इतरांना बाथरूम मध्ये शौचास जात असताना बघत असेल तर तिला शौचालय प्रशिक्षित करण्याची योजना तयार करण्याची ही वेळ आहे. स्वतः स्वतंत्र असण्याची इच्छा व्यक्त करणे, स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तिला शौचालय प्रशिक्षित करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असे समजावे.

वागणुकीची चिन्हे

3. संज्ञानात्मक चिन्हे

पॉटी ट्रेनिंग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संज्ञानात्मक विकास देखील महत्त्वपूर्ण आहे. मुलांनी  शारीरिक लक्षणे समजण्यास सक्षम असले पाहिजे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते स्वतः तसे सांगण्यास सक्षम असले पाहिजेत.

साध्या आणि सरळ सूचनांचे पालन करण्यास सक्षम असणे हा आणखी एक संज्ञानात्मक विकास आहे.  कोणतेही प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी ते गरजेचे आहे. जी  मुले स्वतःची खेळणी नीटनेटकी ठेवू लागतात अशी मुले प्रशिक्षण घेण्यास तयार असतात. शी आणि शू साठी त्यांच्याकडे काही कोड शब्द देखील असले पाहिजेत असे तज्ञ सांगतात, ह्या शब्दांचा वापर संवांदासाठी करू शकतात.

वर नमूद केलेली सर्व चिन्हे पालकांना त्यांच्या लहान मुलांना शौचालय प्रशिक्षण सुरू करण्यासाठी योग्य वेळ निश्चित करण्यात मदत करतील.

मुलींसाठी सर्वोत्तम पॉटी प्रशिक्षण टिप्स

तुमच्या लहान मुलीसाठी तुम्ही अवलंबलेल्या पॉटी ट्रेनिंग पद्धती देखील मजेदार असू शकतात. या टिप्स प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करतील.

1. अनुकरण करा

बहुतेक लहान मुलींना त्या मोठ्या झाल्यावर आईसारखे बनायचे असते. तुम्ही बघितले असेल की बहुतेक वेळा त्यांच्या आईच्या ड्रेसिंग स्टाईलची आणि मेकअपची कॉपी करतात. लहान मुलींना त्यांच्या आईचे अनुकरण करायला आवडते म्हणून, त्यांना त्यांच्या आईला शौचालय वापरताना पाहू देणे आणि त्यांच्याकडून शिकणे ही चांगली कल्पना आहे. आणि जर घरी मोठी बहीण असेल तर ती तिच्या बहिणीचे अनुकरण करू शकते आणि शौचालय वापरण्याच्या युक्त्या निवडू शकते.

अनुकरण करा

2. जे आवश्यक आहे ते खरेदी करा

सुरुवातीला, तुमच्या लहान मुलीला लहान आकाराची पॉटी विकत घ्या जी तिला स्वतःची म्हणता येईल. शौचालय वापरण्यापूर्वी लहान आकाराच्या पॉटीने सुरुवात करून प्रशिक्षण सुरू करणे नेहमीच चांगले असते कारण शौचालयात सतत देखरेखीची गरज असते.

जर तुम्हाला तुमच्या मुलीने लगेचच शौचालय प्रशिक्षित व्हावे असे वाटत असेल, तर आरामदायी आणि घट्ट जोडणारी अडॅप्टर सीट खरेदी करा. तसेच, तिचे पाय ठेवण्यासाठी तिला स्टूल द्या. ती स्वतंत्रपणे वर आणि खाली जाण्यासाठी ह्या स्टूलचा वापर करू शकते.

तुम्ही शौचालय प्रशिक्षणासाठी काही चित्र पुस्तके आणि व्हिडिओ देखील खरेदी करू शकता. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, आणि आपण त्यापैकी योग्य पर्याय निवडू शकता.

3. तिला आरामदायक वाटू द्या

शौचालय प्रशिक्षण सुरळीत होण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. सर्वात आधी तिच्यासाठी पॉटी सीट खरेदी करा. त्यावर तिचे नाव लिहा आणि तिच्या आवडत्या कार्टून स्टिकर्सने सजवा. तिला एक आठवडा फक्त त्याच्याशी खेळू द्या. मग तिला पॉटी सीट कशी वापरायची ह्यासाठी तिची आवडती बाहुली वापरून काही प्रात्यक्षिके दाखवा. ती आता खरोखरच एन्जॉय करणार आहे. त्यानंतर तुम्ही तिला पॉटी सीटचा वापर  करण्यासाठी सांगू शकता.

4. डायपरऐवजी थंड अंडरवेअर

तुमच्या लहान मुलीला तिचे आवडीचे पॅटर्न आणि रंग वापरून नवीन अंडरवेअर खरेदी करण्याचे वचन द्या. लहान मुली नेहमी त्यांच्या वॉर्डरोबमध्ये नवीन गोष्टी जोडण्यासाठी आणि त्यांचा वापर करू  पाहण्यास उत्सुक असतात.

5. शौचालय प्रशिक्षणाचे वेळापत्रक ठरवून घ्या

तुमच्या लहान मुलीच्या प्रीस्कूल आणि डेकेअरच्या वेळा लक्षात घेऊन, तुम्हाला वेळापत्रक तयार करावे लागेल आणि हे वेळापत्रक  शाळेच्या आणि पाळणाघराच्या शिक्षकांसोबत शेअर करावे लागेल. बाळाला कधी कधी डायपर आणि कधी कधी अंडरवेअर घालायचे की नेहमी फक्त अंडरवेअर घालायची हे तुम्ही ठरवून घेऊ शकता.  दिवसा फक्त सूती अंडरवेअरवर घालणे हा एक चांगला पर्याय आहे. परंतु रात्री डायपर घालणे हा एक चांगला पर्याय आहे.

6. स्वतःला स्वच्छ करण्यासाठी प्रशिक्षण

मुलीला टॉयलेटचे प्रशिक्षण देताना, तिला पॉटी सीटवर आरामात बसण्यासाठी प्रशिक्षण देणे खूप महत्वाचे आहे. एकदा ते साध्य झाल्यानंतर, पुढची पायरी म्हणजे तिला स्वतःला स्वच्छ करण्यासाठी प्रशिक्षित करणे होय. आता, हे सगळे अवघड होणार आहे, आणि तिला हे शिकण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. विशेषतः शौचास केल्यानंतर तिला स्वतःला स्वच्छ करण्यास वेळ लागू शकतो. म्हणून, सुरुवात करण्यासाठी, तिला लघवी केल्यानंतर तो भाग पुसून घेण्यास सांगा.

7. डायपर कमी वेळा घाला

जेव्हा मुलांना डायपरशिवाय काही वेळ घालवण्याची परवानगी दिली जाते तेव्हा ते शौचालय वापरण्यासाठी लक्षणे दाखवू लागतात. डायपर लावलेला असताना, मुले कधी लघवी करतात आणि कधी शौचास करतात हे लक्षात येत नाही. त्यांना डायपर काढणे आणि त्यांना दिवसा मुक्तपणे फिरू देणे हा शौचालय प्रशिक्षणातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

8. यश साजरे करा आणि हार मानू नका

तिला स्टार स्टिकर किंवा एखादे खेळणे बक्षीस देऊन प्रत्येक मैलाचा दगड साजरा करा. ह्या टप्प्यावर काही वेळा ती चुकेल हे लक्षात ठेवा. तिला मिठी मारा आणि ती चुकल्यास रागावू नका. महत्वाचे  म्हणजे हार मानू नका आणि प्रयत्न करत राहा.

9. मजेदार घटक जोडा

भांड्यातील पाण्यात काही विरघळणारे रंग टाकून तुमच्या लहान मुलीसाठी टॉयलेट ट्रेनिंगचा अनुभव मजेदार बनवा. तिची आवडती पुस्तके आणि मासिकांसह टॉयलेटमध्ये रॅक देखील ठेवू शकता. तिला व्यस्त ठेवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी तिला खेळणी देऊ शकता.

मजेदार घटक जोडा

10. रात्रीसाठी प्रशिक्षण सुरू करा

एकदा तुमची लहान मुलगी दिवसा शौचालय प्रशिक्षित झाल्यावर, ती रात्रभर कोरडी राहते का हे पहाण्यासाठी सकाळी तिचे डायपर तपासणे सुरू करा. रात्रीच्या प्रशिक्षणाला दिवसाच्या प्रशिक्षणापेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो, परंतु ती रात्री सुद्धा शौचालय प्रशिक्षित होऊ शकते. रात्री तिचे डायपर काढण्यापूर्वी तिला मूत्राशय 2 तासांपर्यंत धरून ठेवता येईल याची तुम्ही प्रतीक्षा करावी. संध्याकाळी उशिरा द्रवपदार्थ कमी करणे ह्यासारखे  थोडे बदल करून तुम्ही रात्रीच्या पॉटी प्रशिक्षणाला गती देऊ शकता. झोपण्याच्या वेळेपूर्वी तुमच्या मुलीला शौचालयाचा वापर करायला लावणे हा देखील चांगला उपाय आहे.

मुलींना पॉटी प्रशिक्षण देताना काय करावे आणि काय करू नये

हे करा

  • योग्य वेळेची वाट पहा.
  • योग्य लक्षणांवर लक्ष ठेवा.
  • शौचालय प्रशिक्षण योजना सुलभ ठेवा.
  • टिप्ससाठी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
  • विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बक्षीस देऊन तुमच्या प्रेरित करा.
  • प्रशिक्षणात एक मजेदार घटक जोडा.

हे करू नका

  • घाई करू नका.
  • लवकर निकालाची अपेक्षा करू नका.
  • चूक झाल्यास तिला रागावू नका
  • तिची इतर मुलांशी तुलना करून तिला निराश करू नका.

पॉटी ट्रेनिंग – मुली विरुद्ध मुले – वास्तविक फरक

तज्ज्ञांच्या मते, मुलींना पॉटी ट्रेनिंग देणे मुलांपेक्षा खूप सोपे आहे कारण त्या सामान्यतः समान वयाच्या मुलांपेक्षा कमी सक्रिय आणि अस्वस्थ असतात. पॉटी ट्रेनिंग – मुली विरुद्ध मुले यांच्यातील काही महत्त्वाचे फरक येथे आहेत:

  • पुसणे :एक महत्त्वाचा फरक म्हणजे शौचास झाल्यावर तुम्ही तुमच्या लहान मुलीला पुढून मागे पुसायला शिकवले पाहिजे. असे केल्याने तिला मूत्राशय किंवा मूत्रमार्गाच्या संसर्गापासून दूर ठेवता येईल. लघवी केल्यानंतर तिला स्वतःला कोरडे करणे  देखील आवश्यक आहे. हे  मुलांना करावे लागत नाही

पॉटी ट्रेनिंग - मुली विरुद्ध मुले

  • खालच्या दिशेने निर्देश करणे: तुम्हाला तुमच्या लहान मुलीला लघवी करताना खालच्या दिशेने निर्देश करायला शिकवावे लागेल जेणेकरून चेहऱ्यावर फवारणी होऊ नये.
  • उभे असताना लघवी करणे: तुमची लहान मुलगी देखील उभ्या स्थितीत लघवी करण्याचा प्रयत्न करू शकते. तिने तिच्या भावाला किंवा शाळेतल्या मुलाला असे करताना पाहिले असेल. तिला स्वतःहून प्रयत्न करू द्या आणि मुलांप्रमाणे उभे राहून लघवी करणे अवघड आहे हे तिला कळेल. ती अखेरीस खाली बसेल.

नवीन पालकांच्या मनात पॉटी ट्रेनिंग विषयी अनेक चिंता आणि प्रश्न निर्माण होतील. परंतु, पालक ज्ञानाने ते व्यवस्थापित करू शकतात आणि त्यांच्या लहान मुलांना शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षित करण्यात मदत करू शकतात. तुमच्या लहान मुलीला या टप्प्यातून जाण्यास मदत करण्यासाठी बालरोगतज्ञ किंवा डेकेअर शिक्षकांची मदत घेण्यास घाबरू नका.

आणखी वाचा: 

मुलांचे शौचालय प्रशिक्षण (पॉटी ट्रेनिंग)

छोट्या मुलांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर ९ सर्वोत्तम घरगुती उपाय

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article