Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाला किवीची ओळख करून देणे – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळाला किवीची ओळख करून देणे – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळाला किवीची ओळख करून देणे – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

किवी हे एक मऊ हिरवे फळ आहे. किवीला चायनीज गुसबेरी असेही म्हणतात. ह्या फळाला गोड आणि तिखट चव आहे. किवी तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण किवी हे फळ, विविध जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे. किवीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे अँटिऑक्सिडंट्स देखील आहेत.  किवीमध्ये कॅलरी देखील कमी आहेत! त्यामुळे बरेच पालक  लहान मुलांना किवी हे फळ देण्याचा विचार करतात. पण, हे फळ बाळांसाठी सुरक्षित आहे का? हे आपण ह्या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

किवी तुमच्या बाळासाठी सुरक्षित आहे का?

किवीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत. परंतु त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे किवी किंचित आम्लयुक्त असू शकते. ह्या फळांमुळे बाळाला पोटदुखी होऊ शकते किंवा जुलाब होऊ शकतात. लहान मुलांसाठी किवी खाणे सुरक्षित आहे कारण त्यामुळे ऍलर्जी होत नाही. परंतु, आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी बालरोगतज्ञांशी बोलणे आवश्यक आहे. ह्या लेखामध्ये आपण किवी ह्या फळाच्या ऍलर्जीबद्दल अधिक माहिती देणार आहोत.

तुमचे बाळ किवी खाऊ शकते अशी तुम्हाला एकदा खात्री झाली की, बाळाला किवीच्या गोड-आंबट चवीची सवय लावण्यासाठी थोडा वेळ लागेल. प्युरी बनवण्यासाठी पिकलेली किवी निवडा कारण किवी हे फळ गोड आहे आणि तुमच्या बाळाला नवीन चव कळण्यास सोपे जाईल.

बाळाला किवीची ओळख करून देण्याची योग्य वेळ केव्हा असते?

बाळाच्या आयुष्याच्या 8 व्या आणि 10 व्या महिन्याच्या दरम्यान बाळाला किवीची ओळख करून दिली पाहिजे. जर बाळाला डायपर रॅश किंवा पोटाचा त्रास होत असेल तर काही महिन्यांनंतर पुन्हा प्रयत्न करा.

तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या बाळाला नवीन अन्नाचा परिचय करून द्याल त्यानुसार बाळ त्याला कसा प्रतिसाद देते आहे हे तुमच्या लक्षात येईल. जेवणात कोणताही नवीन पदार्थ नसताना बाळाला किवीचे पदार्थ खाऊ घाला. थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि बाळ कसा प्रतिसाद देतो ते पहा. बाळाला किवी आवडल्यास बाळाच्या जेवणात त्याचा समावेश करा.

तर, किवीचा तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी कसा फायदा होतो? त्याचे पौष्टिक मूल्य आणि आरोग्य विषयक फायदे जाणून घेण्यासाठी वाचा.

किवीचे पौष्टिक मूल्य

हे सुपरफ्रूट जीवनसत्त्वे के, सी आणि ई, पोटॅशियम, फोलेट, आहारातील फायबर, तांबे, कोलीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी भरलेले आहे.

100 ग्रॅम किवी ह्या फळामध्ये खालीलप्रमाणे पोषक तत्वे असतात

कार्बोहायड्रेट 14.7 ग्रॅम
प्रथिने 1.1 ग्रॅम
चरबी 0.5 ग्रॅम
फायबर 3 ग्रॅम
पाणी 83.1 ग्रॅम
व्हिटॅमिन ए 0.26 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी 92.7 मिग्रॅ
व्हिटॅमिन ई 1.5 मिग्रॅ
व्हिटॅमिन के 40.3 ug
नियासिन 0.3मिग्रॅ
व्हिटॅमिन बी 6 0.1 मिग्रॅ
फोलेट 25 ug
कॅल्शियम 34 मिग्रॅ
लोह 0.3 मिग्रॅ
मॅग्नेशियम 17 मिग्रॅ
फॉस्फरस 34 मिग्रॅ
पोटॅशिअम 312 मिग्रॅ
सोडियम 3 मिग्रॅ

तुमच्या बाळासाठी किवी ह्या फळाचे फायदे

किवीचे लहान मुले आणि मोठ्या माणसांसाठी भरपूर फायदे आहेत. बाळाने किवी खाल्ल्यावर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. किवी ह्या फळाचे आणखी काही आरोग्यविषयक फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत होते.
  • किवीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
  • व्हिटॅमिन सी जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • किवी खाल्ल्यामुळे इतर पदार्थांमधून लोहाचे शोषण वाढते.
  • किवी हे फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध आहे. किवी डीएनए दुरुस्त करण्यात मदत करते आणि काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करते.
  • किवी खाल्ल्याने दमा, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन आणि लठ्ठपणा टाळता येतो. किवी रक्तातील चरबी कमी करू शकते आणि आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करू शकते.
  • हे फळ खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते.
  • यामुळे चांगली झोप येते, शरीराला चांगली विश्रांती मिळते आणि योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत होते.

तुमच्या बाळासाठी किवी ह्या फळाचे फायदे

आपल्या बाळाला काय खायला घातले पाहिजे ह्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या आहारात किवीचा समावेश करण्याचा विचार करता, तेव्हा बाळाला किवी देणे कधी टाळावे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

आपल्या बाळाला किवी देणे कधी टाळावे?

किवी खाल्ल्यामुळे ऍलर्जी होत नाही. परंतु किवी हे फळ अम्लीय आहे. फळांच्या आंबटपणामुळे तोंडावर पुरळ उठू शकते. जर तुमच्या बाळाला पोटाचा त्रास होत असेल, पुरळ उठत असतील किंवा मॅश केलेले फळ खाल्ल्यावर बाळ ते थुंकून देत असेल तर बाळाला किवी देणे थांबवा आणि काही महिन्यांनंतर पुन्हा प्रयत्न करा. तुमच्या बाळाला ऍसिड रिफ्लक्स येत असल्यास, त्याच्या आहारात किवीचा समावेश करण्यापूर्वी एक वर्ष वाट पहा.

किवीची ऍलर्जी होणे असामान्य आहे. तथापि, ‘हे फिव्हर’ (ॲलर्जीक नासिकाशोथ) असलेल्या बाळांनी त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे कारण त्यामुळे बाळाच्या तोंडाभोवती त्वचेची जळजळ होऊ शकते. हे सामान्य आहे परंतु हानिकारक नाही.

किवीच्या ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये, बाळाचे तोंड खवखवणे, घशात खाज येणे किंवा जीभ, तोंड, ओठ आणि चेहरा सुजणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. यामुळे काही वेळा उलट्या होऊ शकतात. गंभीर ऍलर्जीमध्ये घरघर किंवा श्वासोच्छवासाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी लगेच वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. कुठल्या अन्नपदार्थामुळे बाळाला ऍलर्जी होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.  म्हणून बाळाला एका वेळी एकच पदार्थ द्या. तो पदार्थ इतर पदार्थांसोबत मिसळू नका. थोड्या प्रमाणात अन्नपदार्थ देऊन सुरुवात करा. जर बाळाला कोणतीही ऍलर्जी होत नसेल तर प्रमाण वाढवा.

किवी फळावरील ऍलर्जीक प्रतिक्रिया बर्च परागकण ऍलर्जी, देवदार ऍलर्जी किंवा लेटेक्स ऍलर्जी यांच्याशी जोडल्या जातात. म्हणूनच, जर तुमच्या बाळाला पपई, अननस, तीळ, सेलेरी, मध, पीच, सफरचंद, केळी, एवोकॅडो, चेरी, मनुका किंवा नाशपातीची ॲलर्जी असेल तर त्याला किवीचीही ॲलर्जी असू शकते.

एकदा बाळाला किवीची ऍलर्जी नाही हे तुमच्या लक्षात आले की तुम्ही बाळाच्या आहारात खाली दिलेल्या पाककृती जोडू शकता.

लहान मुलांसाठी झटपट करता येतील अश्या किवीच्या पाककृती

किवी अनेक मार्गानी बाळाला दिली जाऊ शकते. तुम्ही फ्रूट कॉकटेल, स्मूदीज, सॅलड्स, डिप्स, डेझर्ट्स, पॉपसिकल्स, प्युरी बनवू शकता किंवा फक्त फळाचे तुकडे करून सर्व्ह करू शकता. तुमच्या बाळाच्या वयाला अनुसरून योग्य मार्ग निवडा किंवा तुमच्या लहान बाळासाठी रुचकर पाककृती बनवण्यासाठी त्यात बदल करा.

1. ताज्या उष्णकटिबंधीय फळांचे कॉकटेल

साहित्य

  • किवीफ्रूट – 1, पिकलेलेफळ
  • आंबा – 1/2, चिरलेला
  • अननसाचे तुकडे – 1/2कप
  • स्ट्रॉबेरी – 2ते 3
  • पाणी – 1/2कप

कृती

  • किवी धुवून आणि सोलून घ्या. त्यानंतर चिरून घ्या.
  • फूड प्रोसेसरमध्ये ब्लेंड करा.
  • लहान मुलांसाठी कॉकटेल पातळ करण्यासाठी थोडे पाणी घाला.

2. किवी स्मूदी

किवी स्मूदी

साहित्य

  • पालक पाने – 1/2कप
  • किवी – 1, पिकलेले किवीचे फळ
  • सफरचंद/पेअर – 1/2, बारीक चिरून
  • पाणी – पातळ करण्यासाठी (पर्यायी)

कृती

  • पालक पाण्यात उकळून घ्या.
  • फळे सोलून चिरून घ्या.
  • फूड प्रोसेसरमध्ये फळे आणि पालक एकत्र मिसळा.
  • तुम्ही ही रेसिपी थोड्या पाण्याने पातळ करू शकता.

3. फ्रूटी डिप्स

साहित्य

  • किवीफ्रूट – 1, लहान पिकलेले फळ
  • पीच – 1/2, पिकलेले
  • कॉटेज चीज – 2टेस्पून

कृती

  • किवी आणि पीच सोलून मॅश करा. कॉटेज चीज घालून मिश्रण गुळगुळीत करा.
  • पूर्ण-गव्हाच्या टोस्टसह डिप सर्व्ह करा किंवा ब्रेड किंवा सँडविच फिलिंगवर स्प्रेड म्हणून वापरा.

4. फ्रुट योगर्ट

साहित्य

  • किवीफ्रूट – 1, पिकलेले
  • केळी – 1, पिकलेले
  • पेअर  – 1/2
  • कुस्करलेली तृणधान्ये – 2टेस्पून
  • घरी तयार केलेले घट्ट  दही – 1कप

कृती

  • फळे सोलून चिरून घ्या.
  • त्यामध्ये बारीक केलेली तृणधान्ये घाला आणि दही मिसळा.
  • थंड झाल्यावर सर्व्ह करा.

5. किवी पॉप्सिकल

किवी सोलून घ्या आणि एग-स्लाइसरने त्याचे तुकडे करा. फ्रीझ करा. मध घालून मिष्टान्न म्हणून द्या किंवा त्याचे पोपसिकल्स करा. उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्याचा किंवा दात काढताना सूजलेल्या हिरड्या शांत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

किवी पॉप्सिकल

साहित्य

  • पिकलेले केळे – 1मोठे
  • पिकलेले किवीफ्रूट – 1
  • दही – 1कप

कृती

  • किवी आणि केळी सोलून बारीक चिरून घ्या.
  • फूड प्रोसेसरमध्ये दह्यासोबत ब्लेंड करा.
  • ते पॉप्सिकल मोल्डमध्ये घाला आणि गोठवा.
  • गोडी वाढवण्यासाठी थोड्या प्रमाणात मध टाका!

6. किवी सॅलड

ही रेसिपी अशा मुलांसाठी योग्य आहे ज्यांना खाली दिलेल्या सर्व घटकांची ओळख करून दिलेली आहे.  मोठ्या मुलांसाठी, आपण काही ड्रेसिंग देखील निवडू शकता.

साहित्य

  • किवीफ्रूट – 1, बारीक चिरून
  • सफरचंद – 1, बारीक चिरून
  • क्रॅनबेरी – 1/4कप (पर्यायी)
  • अक्रोड – 1ते 2 चमचे (पर्यायी)
  • फेटा चीज – 1ते 2 चमचे, बारीक चुरा करून
  • पालकाची पाने – 7ते 8

कृती

  • सर्व फळे एकत्र करा.
  • अक्रोड आणि फेटा चीज घाला.
  • पालकाच्या पानांवर सर्व्ह करा.
  • तुमच्या आवडीचे ड्रेसिंग वरून घाला (पर्यायी)

7. किवी प्युरी

साहित्य

  • किवी – 4, पिकलेले
  • सफरचंद किंवा द्राक्षाचा रस – 1/2कप

कृती

  • किवी सोलून चिरून घ्या.
  • मध्यम आकाराच्या भांड्यात रस घालून किवी मऊ होईपर्यंत उकळून घ्या.
  • गॅस बंद करा. नंतर किवी मॅश करा किंवा त्याची प्युरी करा.
  • चमच्याने बाळाला भरवा.

केळी, एवोकॅडो, पिकलेले आंबे, सफरचंद किंवा पेअर एकत्र करून तुम्ही किवीची आम्लता कमी करू शकता आणि मुलांच्या अन्नपदार्थांची चव वाढवा. हे फळ चव वाढण्यास देखील मदत करेल.

तुमच्या लहान बाळाला किवी खायला देण्याबाबत तुम्हाला अजून काही चिंता असल्यास, तुम्हाला नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

लहान मुलांना किवी खाऊ घालण्याबद्दल येथे काही सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न आहेत

1. मी माझ्या बाळासाठी किवीची निवड कशी करावी?

सेंद्रिय फळे निवडणे नेहमीच चांगले असते. मात्र, कीटकनाशकांमुळे किवी दूषित होत नाहीत. किवी गोड आणि पिकलेल्या आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही किवीचे फळ तुमचा अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये एक-एक करून धरा आणि हळूवारपणे दाबा. कडक फळांची निवड करा आणि पिकल्यावरच खायला द्या. किवीचे साल डागाळलेले असेल तर अशी किवी घेऊ नका. तसेच, वाळलेल्या, स्क्वॅशी, मऊ किंवा ओलसर ठिपके असलेल्या किवी टाळा. कच्च्या किवींना कागदी पिशवीत केळी, सफरचंद किंवा पेअर सोबत ठेवून दोन दिवसांत पिकवता येते. किवी तीन ते चार आठवडे रेफ्रिजरेटरमध्ये किंवा खोलीच्या तपमानावर एक आठवड्यापर्यंत साठवले जाऊ शकतात.

2. माझ्या बाळाला मी किवी सोलून द्यावी का?

होय, तुमच्या बाळाला देण्यापूर्वी तुम्ही किवी सोलून घ्यावी. नाहीतर बाळाला किवी चावून खाणे कठीण होईल. आणि त्यामुळे बाळ गुदमरू शकते. बाळ किवीचे साल खाऊ शकत असेल तर स्वच्छ टॉवेलने हलके स्क्रब करून केसाळ पृष्ठभाग काढून टाका.

फळाच्या दोन्ही बाजूचे तुकडे काढून टाकून तुम्ही किवी सोलून घेऊ शकता. धारदार चाकूने किवीचे साल काढून टाकू शकता. किंवा किवीची दोन्ही टोके काढून टाका आणि नंतर फक्त किवीच्या फळाचा मांसल भाग आणि त्वचेच्या मध्ये एक पातळ चमचा घाला.  किवीचे साल प्रभावीपणे काढून टाकण्यासाठी फळाच्या बाहेरील काठावर सर्व बाजूंनी चमचा फिरवा. किंवा, तुम्ही फळ अर्धे कापून आतील मऊ भाग चमच्याने बाळाला खायला देऊ शकता.

3. मी माझ्या बाळाला किवीच्या बिया देऊ शकतेका?

फळांमधून बिया काढून टाकण्याची गरज नाही. ह्या बिया खूप लहान आहेत आणि त्यामुळे गुदमरण्याचा धोका नसतो. परंतु, जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डायपरमध्ये किवीच्या बिया दिसल्यास घाबरू नका कारण त्या सहसा पचत नाहीत.

तुमच्या बाळाला हळू हळू घन पदार्थ देण्यास सुरुवात करा आणि तुमच्या बाळासाठी आरोग्यदायी असणारे बहुतेक पदार्थ आहारात समाविष्ट करा. योग्य वेळ आल्यावर बाळाला किवीची ओळख करून द्या. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात आणि किवीची चव सुद्धा चांगली असते. आपल्या बाळासाठी कोणतेही अन्न सुरू करण्यापूर्वी बालरोगतज्ञांशी बोलून घ्या आणि बाळाच्या आवडीनुसार किवी घालून तयार केलेले अन्नपदार्थ बाळाला सर्व्ह करा.

आणखी वाचा:

बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी
तुमच्या बाळाला ड्रॅगन फळ देणे सुरक्षित आहे का?
बाळांसाठी द्राक्षे: आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article