Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

तुमचे बाळ ११ महिन्यांचे झाल्यावर ते स्वतःच्या हाताने खाऊ लागेल. तुम्ही तुमच्या बाळाला कुटुंबातील इतर सदस्य खात असलेलेच अन्नपदार्थ कुस्करून किंवा छोटे छोटे तुकडे करून द्या त्यामुळे बाळाला ते चावण्यास आणि पचनास सुद्धा सोपे जाईल. बाळ जेवताना आणि नाश्त्याच्या वेळी बाळाकडे लक्ष ठेवा आणि बाळाच्या घशात घास अडकणार नाही ह्याची खात्री करा.

ह्या टप्प्यावर बाळ किती अन्न खाऊ शकते?

११ महिन्यांचे झाल्यावर बरीच बाळे वेगवेगळे अन्नपदार्थ जसे की फळे, भाज्या आणि मांस इत्यादी खाऊ शकतात. दिवसातून तीन वेळा जेवण, नाश्ता तसेच फॉर्मुला किंवा स्तनपान हे ११ महिन्यांच्या बाळाला आवशयक असते. जेवणाची आणि नाश्त्याची वेळ हे बाळाच्या आणि तुमच्या रोजच्या दैनंदिनी वर अवलंबून असते.

दिवसभरात किती अन्न लागते?

तुमचे बाळाची भूक ही बाळाच्या वाढीवर आणि खेळकर वृत्तीवर अवलंबून असते. बाळाला दिवसाला किती अन्न लागेल ह्याचा अंदाज खाली दिला आहे:

  • अर्धा कप सीरिअल
  • अर्धा कप भाज्या
  • अर्धा कप फळे
  • ३ टेबल स्पून दुग्धजन्य पदार्थ
  • अर्धा काप मिश्र सीरिअल
  • ४ टेबलस्पून मांस किंवा इतर प्रथिने

तुमच्या बाळाला पुरेसे स्तनपान किंवा फॉर्मुला मिळत आहे हे कसे तपासून पाहावे?

तुमच्य बाळाला दूध पाजताना काही ना काही समस्या येतच राहणार. तुमच्या बाळाला योग्य प्रमाणात दूध किंवा फॉर्मुला दररोज मिळत आहे किंवा नाही ह्याची सुद्धा तुम्हाला काळजी वाटेल. खाली काही मार्ग दिले आहेत त्याद्वारे तुम्ही ते तपासून पाहू शकता.

स्तनपान घेणारे बाळ:

  • प्रत्येक वेळेला पाजल्यावर बाळ समाधानी असेल तर ते बाळाला पुरेसे दूध मिळत असल्याचे निर्देशक आहे.
  • जर बाळ स्तनपान घेत नसेल, तर ते स्तनपानाची निर्मिती होत असल्याचे संकेत आहेत.
  • तुमच्या बाळाची लघवी तपासून पहा. जर लघवीला वास नसेल आणि ती पारदर्शक असेल तर ते बाळाचे पोट भरले असल्याचे लक्षण आहे.
  • तुमच्या बाळाला नियमित शौचास होत असेल तर बाळाचे पोट भरत आहे असे समजावे.

फॉर्मुला घेणारे बाळ:

  • तुमच्या बाळाचे वजन पौंडामध्ये मोजा आणि त्यास २ व २.५ ने गुणा. तुम्हाला २ संख्या मिळतील, त्या दोन संख्या म्हणजे बाळाने दिवसातून किती दूध प्यायले पाहिजे त्याची वरची आणि खालची मर्यादा होय.
  • बाळाचा पहिला वाढदिवस जवळ येत आहे त्यामुळे बाळ दिवसातून फक्त एक वेळा फॉर्मुला घेईल.
  • तुमच्या बाळाची दिवसातून कमीत कमी ६ वेळा नॅपी बदलावी लागत असेल तर बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळत आहे असे समजावे.

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

लहान वयापासूनच तुमच्या बाळाला खाण्याच्या चांगल्या सवयी लावणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे ऍलर्जी च्या शक्यतेवर लक्ष ठेवा आणि तुमच्या बाळाला सर्व प्रकारचे पदार्थ द्या.

. फळे

फळे

व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्यांनी समृद्ध असलेली फळे, तुमच्या बाळाच्या आहाराचा भाग असला पाहिजे. सफरचंदापासून केळी, पेअर पर्यंत सगळ्या प्रकारची फळे तुमच्या बाळाला सगळं खाऊदेत.

. चीझ

कॉटेज, शेडर, रिकोटा अशा वेगवेगळ्या प्रकारचे चीझ मुळे तुमच्या बाळाच्या आहाराची चव वाढू शकते तसेच त्यांची दिवसभराची प्रथिनांची गरज सुद्धा भागते.

३. पोल्ट्री आणि फिश

प्रथिने असलेले, मासे आणि कोंबडी आपल्या मुलाच्या मेंदूत विकास आणि वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

. डाळी आणि कडधान्य

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाला तुम्ही सर्व डाळी आणि कडधान्ये देऊ शकता. कधी डाळी तर कधी कडधान्ये दिल्यास बाळाच्या जेवणात विविधता येईल.

. दुग्धजन्य पदार्थ

लहान बाळांसाठी योगर्ट आणि दही चांगले असते. तुमच्या बाळाला गाईचे दूध देऊ नका. बाळ १ वर्षाचे झाल्यावर तुम्ही बाळाला ते देऊ शकता.

. हिरव्या पालेभाज्या

सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या तुमच्या बाळासाठी चांगल्या असतात. विशेषकरून पालक आणि मेथी हे बाळासाठी जास्त फायद्याचे आहेत कारण त्यामध्ये लोह असते.

. भाज्या

तुमच्या बाळासाठी सगळ्या प्रकारच्या भाज्या चांगल्या असतात. तुम्ही दिवसातून जेवणाच्या वेगवेगळ्या वेळांसाठी वेगवेगळ्या पालेभाज्या दररोज खाल्ल्या पाहिजेत.

. अंडी

अंडी, आणि विशेषकरून त्याचा बलक हा ह्या वयातील बाळासाठी चांगला असतो. तो त्यांच्यासाठी खाण्यास आणि पचनास हलका असतो.

११ महिन्यांच्या बाळासाठी आहार आठवडा १ ला

जेवण

न्याहारी

नाश्ता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ ला आईचे दूध/ फॉर्मुला रताळे + पोह्याची पूड उकडलेले पीच किंवा सफरचंद मेथी ढेमसे पुलाव आईचे दूध/ फॉर्मुला पालक ढोकळा
दिवस २ रा आईचे दूध/फॉर्मुला नाचणी डोसा कुस्करलेला चिकू किंवा केळे पालक भोपळा प्युरी + ज्वारीच्या लाह्या आईचे दूध/फॉर्मुला ओट्स सफरचंद लापशी
दिवस ३ रा आईचे दूध /फॉर्मुला जव सफरचंद लापशी उकडलेले पेअर किंवा सफरचंद दलिया खिचडी आणि भोपळ्याचे सूप आईचे दूध / फॉर्मुला गाजरबिटकोथींबीर सूप मध्ये भिजवलेली पोळी
दिवस ४ था आईचे दूध/फॉर्मुला बेसनज्वारीकोथिंबीर धिरडे आणि दही कुस्करलेली पपई दही भात आईचे दूध/फॉर्मुला बाजरीमूग डाळ खिचडी
दिवस ५ वा आईचे दूध/फॉर्मुला राजगिरागव्हाचा शिरा, गोडीसाठी कुस्करलेले मनुके उकडलेले पेअर किंवा सफरचंद मसूर डाळ + दुधी भोपळ्याच्या भाजीत भिजवलेली पोळी आईचे दूध/ फॉम्युला किसलेली काकडीओट्स पॅनकेक
दिवस ६ वा आईचे दूध/फॉर्मुला १ टीस्पून बदामाची पूड

घातलेले

नाचणी सत्व

आंबा किंवा कुस्करलेले केळं भाज्या घालून केलेला ताकातला उपमा आईचे दूध/ फॉम्युला मेथीचे ठेपले आणि भोपळ्याची भाजी
दिवस ७ वा आईचे दूध / फॉर्मुला उकडलेले अंडे किंवा घरी केलेले पनीर संत्र्याच्या फोडी, वरचे पांढरे आवरण काढलेल्या उकडलेले सफरचंद + मुरमुरे पावडर आईचे दूध /फॉर्मुला शेवयांचा उपमा

११ महिन्यांच्या बाळासाठी आहार आठवडा २ रा

जेवण न्याहारी नाश्ता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ ला आईचे दूध/फॉर्मुला १ टीस्पून बदाम पावडर घातलेले नाचणी सत्व कुस्करलेला चिकू किंवा केळं वरणात भिजवलेली पोळी आईचे दूध/फॉर्मुला पराठा आणि बटर
दिवस २ रा आईचे दूध /फॉर्मुला १ टीस्पून बदाम पावडर घातलेले नाचणी सत्व कुस्करलेले पीच किंवा सफरचंद दलिया खिचडी आणि भोपळ्याचे सूप आईचे दूध /फॉर्मुला मटार आणि बटाटा भाजी व पराठा
दिवस ३ रा आईचे दूध/फॉर्मुला उकडलेल्या अंड्याचा बलक किंवा घरी केलेले पनीर संत्र्याच्या फोडी, पांढरे आवरण काढून टाकलेले असावे मसाला खिचडी आईचे दूध/फॉर्मुला नाचणी गहू भोपळ्याचे सूप
दिवस ४ था आईचे दूध/फॉर्मुला बेसनज्वारीकोथिंबीर धिरडे (दही घालून केलेले) कुस्करलेले केळे टोमॅटोभोपळा सूप आईचे दूध /फॉर्मुला भात

कढी

दिवस ५ वा आईचे दूध/फॉम्युला राजगिराज्वारी पॅनकेक केळ्याच्या फोडी ज्वारीची भाकरी आणि डाळ पालक आईचे दूध/फॉम्युला बाजरीची भाकरीपडवळ, मूग डाळ भाजी
दिवस ६ वा आईचे दूध./फॉर्मुला दूध भाज्या घालून केलेला ताकातील उपमा पपईचे तुकडे चिकन सूप किंवा तूरडाळ, मऊ केलेल्या भातासोबत आईचे दूध/फॉर्मुला अंडे किंवा पनीर पराठा
दिवस ७ वा आईचे दूध/ फॉर्मुला ओट्ससफरचंद लापशी फ्रेंच फ्राईज वरणात भिजवलेली पोळी आईचे दूध/ फॉम्युला मेथीतोंडली पुलाव

११ महिन्यांच्या बाळासाठी आहार आठवडा ३ रा

जेवण

न्याहारी

नाश्ता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ ला आईचे दूध/फॉर्मुला राजगिरागहू शिरा,गोडीसाठी कुस्करलेले बदाम घालून आंबा किंवा कुस्करलेले केळं व्हेज पुलाव आणि पकोडा कढी आईचे दूध/ फॉम्युला अंडे किंवा पनीर पराठा
दिवस २ रा आईचे दूध/फॉर्मुला बेसनज्वारीकोथिंबीर धिरडे आणि दही किसलेले सफरचंद गाजरमुगडाळ सूप मध्ये भिजवलेली पोळी आईचे दूध/फॉर्मुला भाज्यामसूर डाळ पुलाव
दिवस ३ रा आईचे दूध/फॉर्मुला ओट्ससफरचंद लापशी साल काढून फोडी केलेले पीच किंवा उकडलेले सफरचंद पालकभोपळा प्युरी + ज्वारीच्या लाह्या आईचे दूध/फॉर्मुला भोपळ्याचा पराठा आणि दही
दिवस ४था आईचे दूध/फॉर्मुला केळ्याचे पॅनकेक किंवा अंड्याचा पांढरा बलक घालून केलेले मऊ पॅनकेक चिकूचे काप किंवा कुस्करलेले केळं डाळ पराठा आणि पालक पनीर आईचे दूध/फॉर्मुला बेसनपालक ढोकळा
दिवस ५वा आईचे दूध/फॉर्मुला नाचणी डोसा आणि कमी तिखट सांबर उकडलेले पेअर फोडी केलेले किंवा उकडलेले सफरचंद टोमॅटोमसूर सूप मध्ये भिजवलेली पोळी आईचे दूध/फॉर्मुला टोमॅटो आणि भोपळा सूप + रोटी किंवा पराठा
दिवस ६वा आईचे दूध/फॉर्म्युला शेवयांचा उपमा केळ्याचे काप गव्हाचा केळं घालून केलेला शिरा आईचे दूध/फॉर्मुला पोळी आणि डाळ पालक
दिवस ७वा आईचे दूध/ फॉर्मुला गव्हाची लापशी उकडलेला बटाटा चाट आणि लोणी उकडलेले सफरचंद आणि मुरमुरे पावडर आईचे दूध/फॉर्मुला बाजरीची रोटी आणि पडवळमूग डाळ भाजी

११ महिन्यांच्या बाळासाठी आहार आठवडा ४ था

जेवण

न्याहारी

नाश्ता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ला आईचे दूध/फॉर्मुला छोटी इडली + कमी तिखट सांबार enlignepharmacie.com १ छोटे केळं भाज्या घालून केलेला मसूर डाळ पुलाव sito web dell’azienda आईचे दूध/ फॉर्मुला माश्यांचा रस्सा भात किंवा डाळ भात
दिवस २ रा आईचे दूध/फॉर्मुला ब्रोकोलीची भाजी घालून केलेला मऊ उपमा कुस्करून मऊ केलेली पपई गाजरमूग डाळ सूप आणि पोळी आईचे दूध/ फॉर्मुला मेथी मुठिया
दिवस ३ रा आईचे दूध /फॉर्मुला उकडलेल्या अंड्याचा बलक किंवा घरी केलेले पनीर मिक्स फ्रुट चाट आलू पराठा आणि घरी केलेले लोणी आईचे दूध/ फॉर्मुला पालक खिचडी + दही
दिवस ४ था आईचे दूध/फॉर्मुला मिश्र पिठांचे धिरडे मिश्र पिठांचे धिरडे

दही

जिरा राईस आणि डाळ फ्राय आईचे दूध/फॉर्मुला पराठा + पनीर भुर्जी
दिवस ५ वा आईचे दूध/फॉर्मुला जवाची लापशी पनीर खजूर लाडू मेथीचे ठेपले + दुधी भोपळ्याचे कोफ्ते आईचे दूध/फॉर्मुला कोबी पराठा आणि घरी केलेले लोणी
दिवस ६ वा आईचे दूध / फॉर्मुला ओट्स सफरचंद लापशी कापलेली स्ट्रॉबेरी/साल आणि बिया काढलेले ताजे टोमॅटो बेसनपालक ढोकळा आईचे दूध/फॉर्मुला गाजरमूग डाळ सूप आणि पोळी
दिवस ७ वा आईचे दूध/फॉर्मुला कुस्करलेला बटाटा + बारीक केलेले मुरमुरे नाचणीचे लाडू ताकातली भगर आईचे दूध/फॉर्मुला ज्वारीची भाकरी,डाळ + कुठलीही भा वरणात भिजवलेली ज्वारीची भाकरी आणि कुठलीही भाजी

बाळासाठी घरी करता येणारे अन्नपदार्थ

. रव्याचा शिरा

रव्याचा शिरा

घटक:

  • /२ कप रवा
  • १ कप पाणी
  • /२ टीस्पून काजू/बदाम पावडर
  • /२ टीस्पून तूप
  • १ खजूर, प्युरी करून

कृती:

तूप गरम करून एका पॅनमध्ये घ्या आणि त्यामध्ये रवा भाजून घ्या. रवा करपून जाऊ नये म्हणून सतत हलवत रहा. जेव्हा रव्याचा खमंग वास येऊ लागतो तेव्हा त्यामध्ये पाणी आणि खजूर प्युरी घाला. गाठी होऊ नयेत म्हणून हलवत रहा. जर तुम्ही सुक्यामेव्याची पूड घालणार असाल तर ती आता तुम्ही घालू शकता. रवा चांगला शिजल्यावर गॅस बंद करा. शिरा थोडा पातळ ठेवा कारण थंड झाल्यावर तो घट्ट होणार आहे.

. पालक आणि कॉटेज चीझ पास्ता

पालक आणि कॉटेज चीझ पास्ता

घटक

  • १ कप पास्ता ( पेनी किंवा मॅकरोनी )
  • १ पालकाची जुडी
  • १ कप किसलेले पनीर
  • १ पाणी जसे लागेल तसे
  • चवीपुरते मीठ

कृती:

पास्ता शिजवून घ्या आणि बाळाला खाता येईल इतका तो मऊ आहे ना ह्याची खात्री करा. जर तुम्हाला हवे असेल तर तो थोडा कुस्करून घ्या. पालक चांगला धुवून घ्या आणि थोड्या वेळासाठी गरम पाण्यात उकळून घ्या. त्यामध्ये कॉटेज चीझ घाला आणि काही मिनिटांसाठी म्हणजेच जो पर्यंत त्याचा वास आणि चव जात नाही तोपर्यंत तो शिजू द्या. मिश्रण थंड होऊ द्या आणि मऊ पेस्ट होईपर्यंत थोडे पाणी घालून वाटून घ्या. तुम्ही चवीपुरते थोडे मीठ घालू शकता. हे पास्त्यासोबत मिक्स करा आणि तुमच्या बाळाला वाढा.

. मलईयुक्त गाजर आणि मक्याचा भात

मलईयुक्त गाजर आणि मक्याचा भात

घटक

  • /४ कप चिरलेला कांदा
  • /२ काप उकडलेले मक्याचे दाणे
  • /४ कप गाजर साल काढून बारीक तुकडे केलेले
  • /२ कप भात
  • १ टीस्पून बटर
  • १ तमाल पत्र
  • १ चिमूटभर मिरपूड
  • पाणी जसे लागेल तसे

कृती

प्रेशर कुकर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये बटर घालून ते वितळू द्या. लसणाचे छोटे तुकडे करून एक मिनिट चांगले परतून घ्या. त्यात कांदा घालून कांदा मऊसर होईपर्यंत चांगला परतून घ्या. मग त्यात टोमॅटोचे तुकडे घालून ते परतून घ्या. भिजवलेला राजमा त्यामध्ये घालून काही मिनिटे चांगले परतून घ्या. २ कप पाणी घाला आणि राजमा चांगला कुस्करता येऊ शकेल इतका मऊ होईपर्यंत कुकरमध्ये चांगला शिजवून घ्या. मिक्सरमध्ये फिरवून सूप सारखे करून घ्या आणि उकळा. जर तुम्हाला हवे असेल तर त्यामध्ये लिंबाचा रस आणि मिरे व मीठ घाला. आणि वाटीमध्ये वाढा.

. ऍपलचिकन नगेट्स

ऍपल-चिकन नगेट्स

घटक

  • १ अंड्याचा बलक
  • १ सफरचंद साल काढून किसलेले
  • १ लसूण पाकळी
  • १ कप चिकन बारीक करून घेतलेले
  • १ चिमूट मिरपूड
  • १ चिमूट बारीक केलेल्या ओव्याची पूड
  • भाजण्यासाठी/तळण्यासाठी थोडे तेल

कृती

अंड्याचा बलक सोडून बाकीचे घटक चांगले मिक्स करा. त्याचे छोटे छोटे नगेट्स बनवा. अंड्याचा बलक चांगला फेटून घ्या आणि नगेट्सवर ब्रशने लावा. तुम्ही फेटलेल्या अंड्याच्या बालकामध्ये ते बुडवूसुद्धा शकता. हे नगेट्स आता चांगले शिजेपर्यंत तेलात किंवा नुसते भाजून घ्या. ऑलिव्ह ऑइल वापरल्यास ते चांगले खुसखुशीत आणि चविष्ट होतील.

. राजमा सूप

राजमा सूप

घटक

  • १ छोटा कांदा, बारीक चिरलेला
  • /२ कप रात्रभर भिजवलेला राजमा
  • २ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  • १ छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
  • २ टीस्पून लिंबाचा रस
  • १ टीस्पून बटर
  • १ चिमूट काळे मिरे पावडर
  • मीठ जरुरीप्रमाणे
  • पाणी लागेल तसे

कृती

प्रेशर कुकर गॅसवर ठेवा आणि बटर वितळू द्या. त्यामध्ये बारीक केलेला लसूण घालून १ मिनिट चांगला परतून घ्या. मग त्यामध्ये कांदा घालून मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्या. आता चिरलेला टोमॅटो घाला आणि चांगला परतून घ्या. त्यामध्ये भिजवलेला राजमा घालून काही मिनिटांसाठी चांगला परतून घ्या. त्यामध्ये २ कप पाणी घालून कुकर मध्ये राजमा मऊ, कुस्करता येण्याजोगा होईपर्यंत चांगला शिजवून घ्या. मिश्रण मिक्सर मधून काढून घ्या आणि उकळा. त्यामध्ये लिंबाचा रस आणि जर हवे असेल तर थोडे मीठ घाला.

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांची यादी तयार ठेवणे आणि ती संदर्भ म्हणून वापरल्याने तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात.

  • चमचे, प्लेट्स, वाट्या, ग्लास निर्जंतुक करून घ्या कारण तुम्ही बाळाला भरवण्यासाठी ते वापरणार आहात. तुम्ही काही मिनिटांसाठी ही भांडी गरम पाण्यात बुडवून ठेवू शकता, आणि जेव्हा बाळाला भरावयाचे असेल तेव्हा गरम पाण्यातून काढू शकता.
  • जेव्हा तुम्ही बाळाला नवीन अन्नपदार्थाची ओळख करून देता तेव्हा ऍलर्जीच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. तसेच नवीन पदार्थाची ओळख करून देण्याआधी ३५ दिवसांचा कालावधी जाऊद्या. तसेच फक्त एक पदार्थ एका वेळेला द्या.
  • तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाच्या जेवणात साखर आणि मीठ टाळा. बाळ एक वर्षांचे होईपर्यंत गाईचे दूध आणि मध देणे सुद्धा टाळा.
  • बाळाला घनपदार्थांसोबत मागणीनुसार स्तनपान आणि फॉर्मुला दूध सुद्धा द्या.
  • बाळाला भरवण्याच्या पद्धतीमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही तुमच्या बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधू शकता.

तुमच्या बाळाची खूप वेगाने वाढ होत आहे आणि स्वतःभोवतीच्या जगाची ओळख करून घेत आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला नवीन अन्नपदार्थांची ओळख करून देण्यास ही योग्य वेळ आहे आणि हळू हळू बाळाला कुटुंबातील इतर सदस्य जे खातात ते खाण्याची सवय होईल. फक्त तुम्ही बाळाला जे अन्नपदार्थ देत आहेत ते पोषक आणि घरी तयार केलेले आहेत ह्याची खात्री करा.

अस्वीकारण:

  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article