Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांना बिस्किटे देणे सुरक्षित आहे का?

बाळांना बिस्किटे देणे सुरक्षित आहे का?

बाळांना बिस्किटे देणे सुरक्षित आहे का?

बिस्किटे हे एक लोकप्रिय स्नॅक आहे आणि आपल्याला दररोज चहासोबत बिस्किटे खायला आवडतात. बिस्किटे, विशेषत: चॉकलेटची बिस्किटे खूप चविष्ट लागतात आणि मुलांना ती पटकन खायला देता येतात. आपल्या मुलाने नुकतीच घनपदार्थ खाण्यास सुरुवात केलेली असेल (किंवा त्याचे वय ९ महिन्यांपेक्षा जास्त असेल), तर कदाचित आपण त्याला बिस्किटे खायला देण्याच्या मोहात पडाल. बिस्किटे त्याच्यासाठी मस्त स्नॅक्स असू शकतात कारण ती मऊ असतात आणि सहजपणे दुधात विरघळतात. पण आपल्या बाळासाठी ती खरोखर चांगली आहेत का? तुम्ही तुमच्या मुलाला बिस्किटे देण्यापूर्वी पुन्हा विचार करा. आपल्या छोट्या प्रिय बाळासाठी बिस्किटे हा पौष्टिक पर्याय का नाही हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

आपण आपल्या बाळाला बिस्किटे देऊ शकता का?

बिस्किटांची चव स्वादिष्ट असते आणि आजकाल आपल्याला वेगवेगळे फ्लेवर्स, रंग आणि पोत असलेली बिस्किटे आढळतात. बिस्कीटे चहाच्या वेळेसाठी किंवा जेव्हा आपल्याला थोडा भूक लागलेली असेल तेव्हा उत्कृष्ट स्नॅक्स ठरतात. तथापि, हे केवळ मोठ्या माणसांना लागू होते. जेव्हा आपल्या बाळाला अन्न देण्याची वेळ येते तेव्हा बाळासाठी बिस्किटे देणे त्यांच्यासाठी पोषक आहार ठरत नाहीत. बिस्किटे खरोखरच मुलांसाठी चांगली नसतात. खरं तर, लहान मुलांसाठी सुद्धा ती चांगली नसतात.

तुम्ही दुकानात मिळणारी बिस्किटे बाळांना देणे का टाळले पाहिजे?

बिस्किटे चवदार असली तरी ती बाळांना आणि मुलांना पोषण देत नाहीत. पोषणाच्या दृष्टिकोनातून त्यांचे मूल्य शून्य आहे. बिस्किटे बनवताना वापरण्यात येणारे घटक अजिबात स्वस्थ नाहीत. म्हणूनच, आपल्या छोट्या मुलास आपण बिस्किटे देणे टाळले पाहिजे. आम्ही बिस्किटांचे आरोग्यासाठी चांगले नसलेले घटक आणि त्यामागील कारणे सूचीबद्ध केलेली आहेत. जर आपल्या मुलाने स्टोअरमध्ये खरेदी केलेले बिस्किटे खाल्ली तर उद्भवू शकणार्‍या संभाव्य समस्यांचा आम्ही उल्लेख देखील केला आहे.

. बिस्किटांमध्ये परिष्कृत गव्हाचे पीठ असते

सर्व बिस्किटांचा मुख्य घटक म्हणजे परिष्कृत गव्हाचे पीठ किंवा मैदा होय. परिष्कृत गव्हाचे पीठ कोणतेही पोषण देत नाही आणि खरं तर, ते पचन होण्यास बराच वेळ लागतो, प्रौढांमध्येही त्यामुळे पचन प्रणालीकडून जास्त काम केले जाते. बाळांची पचन प्रणाली आणि आतडे विकसित झालेले नसतात त्यामुळे मैदा पचायला त्यामुळे जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुमच्या बाळाला रिफाईंड पिठाची बिस्किटे देणे टाळा.

. त्यात ट्रान्स फॅट्स असतात

ट्रान्स फॅट्स हि एक विशिष्ट प्रकारचा चरबी आहे जी प्रक्रिया केलेल्या अन्नात त्यांचा आकार, चव आणि सातत्य राखण्यासाठी वापरली जाते. तथापि, हे ट्रान्स फॅट्स पौष्टिक पदार्थांची कमतरता नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्येस कारणीभूत ठरू शकतात . बिस्किटे शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलच्या पातळीत असंतुलन आणू शकतात. ट्रान्स फॅट दृष्टी समस्या, चिंताग्रस्ततेचा विकार,ऍलर्जी , मधुमेह आणि लठ्ठपणा ह्यास कारणीभूत म्हणून ओळखले जातात. बऱ्याच बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट नसल्याचे नमूद दिले जाते परंतु त्यामध्ये ट्रान्स फॅट थोड्या प्रमाणात असल्याने दिशाभूल होते. तुमच्या बाळासाठी ती समस्या होऊ शकते.

. बिस्किटे शून्य पोषण देतात

वर नमूद केल्याप्रमाणे, स्टोअरमध्ये खरेदी केलेली बिस्किटे बाळाला शून्य पोषण देतात. त्यामध्ये मुळात परिष्कृत गव्हाचे पीठ, अस्वास्थ्यकर चरबी, सोडियम, पोटॅशियम आणि हानीकारक सिंथेटिक पदार्थ असतात. बिस्किटे आपल्या बाळाची भूक भागवू शकतात परंतु ते आपल्या बाळाला शून्य पोषण देतात. हे मिठाई, चॉकलेट, केक, सॉफ्ट ड्रिंक्स इत्यादी इतर पदार्थांनाही लागू होते. हे सर्व पदार्थ शरीराच्या मूलभूत कार्यासाठी ऊर्जा प्रदान करतात परंतु इतर काही नाही. त्यामुळे तुमच्या बाळाला हे पदार्थ तुम्ही देत नाही ना ह्याची खात्री करा.

. त्यांच्यात मिश्रित पदार्थ (अ‍ॅडिटीव्ह्ज) असतात

प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अ‍ॅडिटीव्ह्ज असतात ते बाळांसाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. बिस्किटे खराब होऊ होऊ नयेत म्हणून म्हणून त्यांना बीएचए आणि बीएचटी सारख्या संरक्षकांची आवश्यकता असते. ह्या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका असतो. बेकिंग सोड्यासारख्या पदार्थांमुळे लहान बाळांना ऍसिड रिफ्लक्स सारखी पोटाची समस्या उद्भवू शकते. ग्लिसरॉल मोनोस्टेरेट सारख्या एजंट्सचा वापर चरबीयुक्त पदार्थ आणि पाणी खाद्यपदार्थात एकत्र ठेवण्यासाठी केला जातो. तथापि, ह्या एजंट्सचा आतड्यांसंबंधी जीवाणूंवर प्रभाव दर्शविला गेला आहे, त्यामुळे पाचन तंत्रात समस्या उद्भवू शकतात. बिस्किटांमध्ये फ्लेवरिंग एजंट देखील असतात बहुतेकदा बिस्किटांमध्ये हे एजंट्स वापरले जातात कारण त्यात नैसर्गिक फ्लेवर्स घालणे शक्य नसते. म्हणून आपल्या बाळाला दुकानांमधून आणलेली बिस्किटे देऊ नका.

. बद्धकोष्ठता निर्माण करू शकतात

बिस्किटांमध्ये फायबर किंवा तंतुमय पदार्थ नसतात. यामुळे आपल्या बाळामध्ये तीव्र बद्धकोष्ठता उद्भवू शकते आणि गुदद्वारासंबंधीचा त्रास, उलट्या होणे, मलमार्गातून रक्त येणे ह्यासारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

. त्यांच्यात खूप जास्त साखर आहे

बिस्किटे आणि सोडा यासारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये अत्यधिक प्रमाणात परिष्कृत साखर असते. साखरेने समृद्ध असलेले अन्न दिल्यास बाळाला त्याचे व्यसन निर्माण होऊ शकते आणि निरोगी पदार्थांऐवजी बाळाला बिस्किटे खावीशी वाटतील. बिस्किटांमध्ये वापरली जाणारी साखर फार गोड असते कारण ती ग्लुकोज पेक्षा गोडीला जास्त असते. ह्या साखरेचा आकार लहान असल्यामुळे त्यांची एकसमान रचना तयार होऊ शकते. ही साखर जास्त प्रमाणात ओलावा धरून ठेवू शकते त्यामुळे हवेच्या सानिध्यात आल्यानंतर ही बिस्किटे कोरडी होत नाही आणि त्यामुळे जास्त काळ टिकतात.

. ऍलर्जिक प्रतिक्रिया वाढू शकतात

बिस्किटांमध्ये ग्लूटेन आणि सोया लेसिथिन सारखे ऍलर्जिक पदार्थ असतात. यामुळे आपल्या बाळामध्ये एलर्जीची प्रतिक्रिया उद्भवू शकते. त्वचेवर पुरळ उठणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ह्यासारख्या धोकादायक प्रतिक्रिया सहज असू शकतात.

कोणती बिस्किटे मुलांसाठी चांगली आहेत?

कोणती बिस्किटे मुलांसाठी चांगली आहेत?

वर सांगितलेल्या सर्व कारणांमुळे आपण आपल्या मुलास स्टोअर मधून विकत आणलेली बिस्किटे देणे टाळले पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला बिस्किटांऐवजी फळ, शेंगदाणे वगैरे निरोगी स्नॅक्स देऊ शकता. बिस्किटे मुलांसाठी चांगली नसली तरीही, तुम्ही तुमच्या बाळासाठी एखादी वस्तू देऊ इच्छित असल्यास आम्ही आपणास इथे काही स्वस्थ पर्याय सुचवत आहोत. येथे आपण विचार करू शकता असे काही पर्याय आहेत.

  • घरी तयार केलेली बिस्किटे आपण निरोगी घटकांचा वापर करून घरी बिस्किटे बनवू शकता. आपण ओट्स, नाचणी, बाजरी, बदाम, मनुका इत्यादीसारख्या निरोगी घटकांचा वापर करू शकता. इंटरनेटवर काही घरगुती बिस्किटांची पाककृती पहा आणि त्या घरी बनवा. निरोगी घटक वापरा आणि बेक करा!
  • होल व्हीट बिस्किटे होल व्हीट बिस्कीटांमध्ये परिष्कृत गव्हाचे पीठ नसते. आपण ती कोणत्याही किराणा दुकानातून विकत घेऊ शकता किंवा घरी बनवू शकता.

जर आपल्या मुलाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली असेल तर, आपण त्याला देऊ शकता असे बरेचचवदार खाद्यपदार्थ आहेत. जर हे ठरविणे अवघड झाले तर आपण नेहमीच ताजी फळे आणि भाज्या यासारखे ताजे सेंद्रिय खाद्यपदार्थ निवडू शकता. या पदार्थांसह तुम्ही कोशिंबीरी, स्मूदी आणि भाज्या तयार करू शकता. आपण त्याला वरण, भात, पोळी इत्यादी पदार्थ देखील देऊ शकता. जर आपल्या मुलास या गोष्टीचा कंटाळा आला तर आपण व्यावसायिक किंवा प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ काटेकोरपणे टाळण्याऐवजी त्यास घरगुती बिस्किटे प्रसंगी नाश्ता म्हणून देऊ शकता.

आणखी वाचा:

बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का
बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article