Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी आरारूट: बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी एक उत्तम पदार्थ

बाळांसाठी आरारूट: बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी एक उत्तम पदार्थ

बाळांसाठी आरारूट: बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी एक उत्तम पदार्थ

बाळाच्या जन्मानंतर, बाळासाठी आईचे दूध हे एकमेव अन्न असते. सुरुवातीच्या काळात पोषण आणि खनिजद्रव्यांचा तो प्राथमिक स्त्रोत असतो. काही काळानंतर बाळाचे स्तनपान सोडवावे लागते आणि स्तनपानाऐवजी योग्य पोषण पुरवू शकेल अश्या योग्य पर्यायाची बाळाला आवश्यकता असते.

आरारूट काय आहे?

आरारूटला वैज्ञानिक भाषेत मॅरांटा अरुंडिनेसी असेही म्हणतात. आरारूट हे, टॅपिओका, कुडझू आणि कसावा यांसारख्या उष्णकटिबंधीय वनस्पतींच्या मुळांपासून स्टार्चच्या स्वरूपात काढले जाते. आरारूट सहज पचण्याजोगे अन्न आहे. आरारूट मध्ये कॅलरी कमी आणि आवश्यक पोषक तत्वे जास्त असतात. म्हणूनच आरारूट हे लहान मुलांसाठी उत्कृष्ट आहे. विशेषतः बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी आरारूटची मदत होऊ शकते.

आरारूट काय आहे?

आरारूटचे पौष्टिक मूल्य

आरारूट हा पौष्टीक मूल्यांनी समृद्ध आहे, ह्यामध्ये थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि पायरिडॉक्सिन सारख्या बी जीवनसत्त्वे असतात. आरारूट शरीराला पोषक तत्वांपासून उर्जेचे रूपांतरण करण्यास मदत करते. ह्या सुपरफूडमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि लोहासारखी इतर खनिजे देखील समृद्ध प्रमाणात असतात. ही पोषणमूल्ये बाळाच्या शरीराचे सामान्य कार्य सुरळीत सुरु राहण्यास आणि शरीराची चांगली वाढ होण्यास मदत करतात.

लहान बाळांसाठी आरारूट चांगले आहे का?

ग्लूटेनमुक्त असल्याने आरारूट मुळे बाळाला कोणतीही ऍलर्जी होण्याची शक्यता नसते. आरारूट सहज पचण्याजोगे आहे आणि आतड्याची हालचाल सुरळीत होण्यास मदत करते. आरारूट सहजपणे उपलब्ध होते आणि बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

बाळांसाठी आरारूटचे फायदे

आरारूटचे बाळासाठी बरेच फायदे आहेत:

  • आरारूट पोट चांगले ठेवण्यास मदत करते कारण ते पचनास सोपे आहे आणि अतिसार बरा करण्यास देखील मदत करते. डिस्पेप्सिया, ब्राँकायटिस, खोकला आणि अशक्तपणा इत्यादी समस्यांवर औषध म्हणूनही आरारोटचा वापर केला जातो.
  • तोंडातील फोड, काप, पुरळ किंवा हिरड्यांमधील वेदनांसाठी आरारोटचा वापर केल्यास बाळाला वेदना आणि जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल.

दात येताना आरारूटचा उपयोग कसा होतो?

बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर दात येण्यास सुरुवात होते. हिरड्यांमधून दात बाहेर येत असताना बाळाला वेदना होऊन बाळाची चिडचिड होऊ शकते. ह्या काळात एखादी गोष्ट चघळल्याने किंवा चावल्याने बाळाचा चिडचिडेपणा कमी होतो. लहान मुलांना चघळण्यासाठी दिल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या खेळण्यांऐवजी बाळाला आरारूट भाकरी किंवा खाकरा देणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

लहान बाळांसाठी आरारूट पावडर तयार करणे

आरारूट बाळाला अनेक प्रकारे दिले जाऊ शकते. लहान बाळांसाठी आरारूट पावडरच्या पाककृती खालीलप्रमाणे आहेत:

लहान बाळांसाठी आरारूट पावडर तयार करणे

  1. आरारूट पावडर आईच्या दुधात मिसळून पेस्ट करून बाळाला देता येते.
  2. आरारूट लापशी किंवा जेलीच्या स्वरूपात बाळाला दिली जाऊ शकते.
  3. बीटरूट पावडर, रताळे किंवा गाजर यांसारख्या भाज्यांच्या प्युरीमध्ये मिसळता येते. तुमच्या बाळासाठी मिश्रण चवदार बनवण्यासाठी तुम्ही थोडे मीठ आणि बटर घालू शकता.

कॉर्न स्टार्च प्रमाणे आरारूट हा पदार्थ घट्ट करणारा घटक आहे आणि बाळाला घनरूप अन्नाची ओळख करून देण्याच्या दिशेने बाळाला आरारूट देणे हे पहिले पाऊल आहे.

आरारूटचे पदार्थ तयार करण्याचे आणि ते बाळाला भरवण्याचे इतर मार्ग

बाळाला देण्याआधी मिश्रणाची चव सुधारण्यासाठी आरारूट मध्ये दूध, गूळ किंवा खजूर अथवा साखर घातली जाऊ शकते.

आरारूटचे पदार्थ तयार करण्याचे आणि ते बाळाला भरवण्याचे इतर मार्ग

आरारूट लापशी बाळाला भरवणे

आरारूट लापशी हा आणखी एक चविष्ट पर्याय आहे. लहान मुलांसाठी आरारूट लापशी करण्यासाठी १ कप आरारूट पावडर मध्ये ३/४ कप गुळाचा पाक आणि २ कप दूध एकत्र मिसळा. ते मध्यम आचेवर सुमारे तीन मिनिटे गरम करा. द्रावण तयार झाल्यावर ते थंड झाल्यावर बाळाला देता येईल. चवीसाठी खोवलेला नारळ लापशीमध्ये घातला जाऊ शकतो.

बाळासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न आहे. परंतु जेव्हा बाळाला आईचे दूध सोडावे लागते तेव्हा आरारूट हा एक आदर्श पर्याय आहे. बाळाच्या पोटासाठी आरारूटचे अनेक फायदे आहेत. तसेच आरारूट मध्ये उच्च पौष्टिक सामग्री असल्यामुळे ते बाळासाठी योग्य आहे. आरारूट हा फॉलिक ऍसिड, कॅल्शियम आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे आणि बाळाचे दूध सोडवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

आणखी वाचा:

बाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती
ओवा आणि ओव्याच्या पाण्याचे बाळांसाठी फायदे आणि उपयोग

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article