In this Article
मुलाचे संगोपन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यांची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी त्यांना योग्य आहार देणे देखील महत्वाचे आहे. टोमॅटोचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत आणि ते एक अष्टपैलू फळ आहे. तुम्ही तुमच्या मुलांना वेगवेगळ्या स्वरूपात टोमॅटो खायला देऊ शकता. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात टोमॅटो कसा समाविष्ट करावा आणि त्याचा बाळावर कसा परिणाम होतो ह्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते.
एकदा तुम्हाला टोमॅटोचे आरोग्यविषयक फायदे लक्षात आले आणि तुमच्या मुलासाठी त्याच्या वेगवेगळ्या पाककृती कशा करता येतील हे समजले की तुम्ही मुलांना टोमॅटो देऊ शकता.
तुम्ही तुमच्या बाळाला टोमॅटो देण्यास कधी सुरुवात करू शकता?
तुम्ही लहान बाळाला टोमॅटो देऊ शकता कारण त्याचे आरोग्यविषयक भरपूर फायदे आहेत. बाळ साधारणपणे ८ ते १० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला टोमॅटोची ओळख करून देऊ शकता. टोमॅटोमुळे साधारणपणे ऍलर्जी होत नाही परंतु बाळाला टोमॅटो दिल्यानंतर लक्ष ठेवा. टोमॅटो खाल्ल्यानंतर काहीवेळा बाळाच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
टोमॅटोचे पौष्टिक मूल्य
टोमॅटोमध्ये भरपूर पोषण असते. १०० ग्रॅम टोमॅटोमध्ये किती पोषण आहे ते येथे दिलेले आहे
पोषक घटक | १०० ग्रॅम मध्ये पोषण मूल्य |
पाणी | ९४. ७८ ग्रॅम्स |
ऊर्जा | १६ किकॅलरी |
प्रथिने | १.१६ ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | ३.१८ ग्रॅम |
कॅल्शियम | ५ मिग्रॅ |
तंतुमय पदार्थ | ०.९ ग्रॅम |
स्रोत: https://parentinghealthybabies.com/health-benefits-of-tomato-for-babies/
लहान मुलांसाठी टोमॅटोचे आरोग्य विषयक फायदे
लहान मुलांसाठी टोमॅटोचे बरेचसे आरोग्यविषयक फायदे आहेत.
१. व्हिटॅमिन ए
टोमॅटो व्हिटॅमिन ए चा एक समृद्ध स्त्रोत आहे आणि टोमॅटो मध्ये असलेल्या कॅरोटीन आणि बीटा–कॅरोटीनमुळे टोमॅटोला लाल किंवा केशरी रंग येतो. बाळाच्या डोळ्यांच्या विकासासाठी अ जीवनसत्व आवश्यक आहे.
२. अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत
टोमॅटो म्हणजे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि तो बाळाच्या आहारासाठी आवश्यक आहे. बाळाचा चयापचय दर प्रौढांपेक्षा खूप जास्त असतो आणि यामुळे त्यांच्या शरीरात मुक्त रॅडिकल्सची संख्या वाढते. जर मुक्त रॅडिकल्सची संख्या वाढली तर पेशी आणि डीएनए खराब होण्याची शक्यता देखील वाढते. अँटिऑक्सिडंट्स याचा प्रतिकार करतात आणि त्यास तटस्थ करण्यात मदत करतात.
३. मजबूत हाडे तयार होतात
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते आणि ते कालांतराने अर्भकाची हाडे तयार होण्यासाठी आवश्यक असतात
४. मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली
टोमॅटोमध्ये भरपूर जैवरासायनिक घटक आढळतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे बाळाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
५. असिडोसिसवर उपचार
टोमॅटोमध्ये भरपूर आम्ल असते असे जरी असले तरी ते प्रत्यक्षात बाळाच्या शरीरात त्याचा प्रतिकार करण्यास मदत करतात. आपल्या मुलाच्या आहारात टोमॅटोचा समावेश करून, आपण अल्केनेटचे प्रमाण वाढवू शकता आणि अॅसिडोसिसचा उपचार करू शकता.
६. शिसे विषबाधा कमी करते
शिश्याची विषबाधा ही आणखी एक समस्या आहे. ह्या समस्येचा प्रतिकार टोमॅटोमधील घटकांमुळे केला जाऊ शकतो. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. शिश्यामुळे निर्माण झालेले हानिकारक परिणाम कमी करण्यास टोमॅटोमुळे मदत होते
लहान मुलांना टोमॅटो देताना घ्यायची खबरदारी
लहान मुलांसाठी टोमॅटो उत्तम असले तरी, आपण त्यांना ते देण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे:
१. रंग आणि पोत
तुम्ही तुमच्या बाळाला टोमॅटो देण्यापूर्वी त्याचा रंग आणि पोत तपासून खात्री करा. टोमॅटोचा रंग लाल किंवा नारिंगी असावा. ते मऊ नसावेत व त्यांना भेगा नसाव्यात.
२. सेंद्रिय की कृत्रिम
पारंपारिक पद्धतीचा वापर करून तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले टोमॅटो विकत घ्या. त्यामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि हानिकारक कीटकनाशके नसतात.
३. ऍलर्जिक प्रतिक्रिया तपासा
काही बाळांना टोमॅटोमुळे ऍलर्जी होऊ शकते, म्हणून आपण कोणत्याही ऍलर्जीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या बाळाला टोमॅटोची ओळख करून देताना, टोमॅटोमध्ये इतर काहीही न घालता खायला द्या.
४. योग्य स्वरूपात देणे आवश्यक
काही बाळांचे दात अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नसल्यामुळे, तुम्ही बाळाला टोमॅटो देताना द्रव किंवा अर्ध द्रव स्वरूपात खायला द्या. नाहीतर बाळाच्या घशात टोमॅटो अडकण्याची शक्यता असते.
टोमॅटो कसे खरेदी करावे आणि साठवावे?
टोमॅटो खरेदी केल्यावर तुम्ही ते फ्रिजमध्ये न ठेवणे चांगले. तुम्ही ते खोलीच्या तापमानाला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवू शकता. टोमॅटो आणल्यावर लगेच त्याचा वापर करणे आवश्यक आहे. तुम्ही जरी कच्चे टोमॅटो खरेदी केलेत तरी ते काही दिवसात पिकतात.
लहान मुलांसाठी टोमॅटो सूप कसे करायचे?
लहान मुलांसाठी टोमॅटो सूप तयार करण्यासाठी एक सोपी पाककृती खाली दिलेली आहे
साहित्य
- टोमॅटो– ४
- मीठ – १ चिमूटभर (जर तुमच्या बाळाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर मीठ घालू नका)
- लोणी – १/२ टीस्पून (मीठ नसलेले होममेड बटर निवडा)
- पाणी – १/२ कप
सूचना
- टोमॅटो धुवून स्वच्छ करा. टोमॅटो धुतल्यानंतर कापा म्हणजे त्यांचे पौष्टिक मूल्य अबाधित राहील
- टोमॅटोच्या बिया काढून टाका आणि त्याचे मोठे तुकडे करा
- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे टोमॅटोचे तुकडे घाला आणि झाकणाने झाकून ठेवा. ते मऊ होईपर्यंत काही मिनिटे उकळवा
- टोमॅटोचे साल काढून घ्या
- थोडेसे पाणी घालून टोमॅटोची प्युरी करून घ्या
- पॅनमध्ये थोडे लोणी घाला नंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला आणि ते सुमारे एक मिनिट उकळू द्या
- चवीनुसार थोडे मीठ घाला. जर तुम्ही मीठयुक्त लोणी वापरत असाल तर सूपमध्ये आणखी मीठ घालू नका.
टोमॅटो हे लहान मुलांच्या पोषणासाठी एक उत्तम स्त्रोत आहेत आणि बाळांना ते नियमितपणे दिले तर ते त्यांच्यासाठी उत्कृष्ट असतात. टोमॅटो खाल्ल्यानंतर बाळांना किरकोळ पुरळ येणे किंवा ऍलर्जिक प्रतिक्रिया आल्या तरी सुद्धा शारीरिक आणि मानसिक विकासाचा दृष्टिकोनातून बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी ते उत्तम आहेत. तथापि, बाळांना ताजे टोमॅटो, अर्ध–द्रव किंवा द्रव स्वरूपात दिले पाहिजेत, कारण त्यांचे दात पूर्णपणे विकसित झालेले नसतात.
टोमॅटो खोलीच्या तपमानाला ठेवले पाहिजेत जेणेकरून ते खराब होणार नाहीत. टोमॅटोचा आहारामध्ये समावेश आवश्यक आहे आणि खायला त्रास देणाऱ्या मुलांसाठी ते योग्य आहेत.
आणखी वाचा:
बाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का?
बाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का?