Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी केळ्याची पूड: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळांसाठी केळ्याची पूड: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळांसाठी केळ्याची पूड: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

भारत, विविधता आणि परंपरांनी समृद्ध असा देश आहे, विशेषत: खाण्याच्या विविध पदार्थांच्या बाबतीत हे प्रामुख्याने म्हणावे लागेल. लोक विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खातात आणि आपल्या मुलांनाही देतात. केळ्याची पूड त्यापैकीच एक आहे. ही पूड देशाच्या दक्षिणेकडील भागात खूप लोकप्रिय आहे. केळ्याची पूड, तिचे आरोग्य विषयक फायदे, पाककृती आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

तुम्ही लहान मुलांना कच्च्या केळ्यांची पूड कधी देऊ शकता?

तुमच्या बाळाचे वय सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ते वय बाळाला घनपदार्थ देण्यासाठी आदर्श वय मानले जाते. म्हणूनच, ही पौष्टिक पूड बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर किंवा ते घन पदार्थांसाठी तयार असेल तेव्हा दिली जाऊ शकते.

लहान मुलांसाठी केळ्याची पूड देण्याचे फायदे

कच्च्या केळ्यांची पूड बाळाला का द्यावी हा विचार तुम्ही करत आहात का? ती का द्यावी ह्याची कारणे इथे दिलेली आहेत!

  • बाळामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते
  • पोटॅशियम आणि इतर महत्वाच्या पोषक घटकांनी युक्त आहे
  • पचनास सोपी आहे आणि सामान्य केळ्यांमुळे होतो तसा खोकला आणि सर्दी होऊ शकत नाही
  • बाळांच्या मेंदूच्या विकासास मदत करते

बाळासाठी घरी कच्च्या केळ्यांची पूड कशी तयार करायची?

आपल्या स्वत: च्या लहान मुलासाठी तुम्ही घरी केळीची पूड कशी बनवू शकता ते येथे दिलेले आहे:

. साहित्य

कच्ची केळी

. कृती

  • केळ्याची दोन्ही टोके कापून काढून टाका
  • केळी सोलून नंतर बारीक चिरून घ्या
  • हे काप एका कापडावर पसरवा आणि २ ते ३ दिवस उन्हात कुरकुरीत होईपर्यंत वाळवा
  • वाळलेल्या कापांची बारीक पूड तयार करा. नंतर ती पूड चाळून घ्या आणि मोठे कण बाजूला काढा.

. टीप

  • प्रत्येक वेळी तुम्ही बाळासाठी ताजे अन्न तयार करा
  • आपल्या बाळाची भांडी अन्न देण्यापूर्वी निर्जंतुक करा

कच्च्या केळीची पूड बनवण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्यायच्या गोष्टी

केळीची पूड बनवण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत:

  • तुम्ही चांगली कच्ची केळी निवडणे महत्वाचे आहे
  • केळी व्यवस्थित स्वच्छ केली पाहिजेत
  • केळी योग्य प्रकारे कापली आहेत ना ह्याकडे लक्ष द्या
  • कापलेले काप शीटवर योग्यरित्या ठेवणे महत्वाचे आहे, जेणेकरून ते चांगले वाळतील
  • केळीच्या बिया काढून टाकण्यासाठी तुम्ही पूड चाळून घेणे आवश्यक आहे. कारण केळीचे बियाणे बाळासाठी पचनास अवघड असतात
  • पूड एका हवाबंद डब्यामध्ये साठवा
  • लागेल तशी थोडी पूड तयार करा म्हणजे ताजी पूड मिळेल
  • ही पूड वापरल्यास बाळांमध्ये बद्धकोष्ठता होऊ शकत नाही

कच्च्या केळीची पूड बनवण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्यायच्या गोष्टी

बाळांसाठी कच्च्या केळ्यांची पूड वापरून तयार करता येतील अशा काही पाककृती

केळ्यांची पूड वापरून बाळांसाठी तयार करता येतील अशा काही सोप्या पाककृती इथे दिलेल्या आहेत.

. केळ्याच्या पूड वापरून करता येणारी लापशी

तुमच्या छोट्या बाळासाठी ही पाककृती आदर्श असू शकते. लहान मुलांसाठी केळीची पूड कशी बनवायची याचा विचार करत असाल तर इथे सगळे दिलेले आहे!

साहित्य

  • १ चमचा कच्च्या केळ्याची पूड
  • १ कप पाणी / दूध
  • साखर (फक्त एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी)

कृती

  • एक कढई घ्या, पूड आणि पाणी घाला आणि एकत्र चांगले मिक्स करा
  • गॅस चालू ठेवा आणि मिश्रण १० मिनिटे शिजवा
  • साखर घाला आणि गरम खायला द्या

. केळ्यांची पूड वापरून शिरा

तुमच्या बाळासाठी ही एक गोड रेसिपी आहे.

साहित्य

  • १ टेबलस्पून कच्च्या केळ्याची पूड
  • /२ चमचा लोणी किंवा तूप
  • /२ कप सेंद्रीय गूळ सरबत (फक्त एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी)

कृती

  • केळ्याची पूड गुळाच्या पाकात शिजवा. शिजवताना सतत हलवत रहा
  • मिश्रण घट्ट झाल्यावर तुम्ही ते गॅसवरून खाली उतरवू शकता
  • गरम सर्व्ह करा!
  • किंवा, तुम्ही मिश्रण आणखी काही काळ शिजवू शकता आणि नंतर ते प्लेटवर पसरवू शकता. एकदा ते थंड झाल्यावर तुम्ही त्याचे तुकडे करून ते लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना देऊ शकता

. केळ्याची पूड वापरून खिचडी

तुम्ही नेहमीच्या खिचडीमध्ये थोडी केळ्याची पूड घालू शकता. त्यामुळे खिचडीचा पोत अधिक मऊ होईल आणि खिचडीला गोड चव येईल.

साहित्य

  • १ टेबलस्पून कच्च्या केळ्याची पूड
  • /२ कप मूग डाळ
  • /२ कप तांदूळ
  • २ कप पाणी
  • चवीनुसार मीठ (फक्त एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी)

कृती

  • केळ्याची पूड पाण्यात मिसळा आणि बाजूला ठेवा
  • तांदूळ आणि डाळ चांगले धुवून प्रेशर कुकरमध्ये ठेवा
  • केळी पूडपाण्याचे मिश्रण आणि मीठ घाला
  • मध्यम आचेवर ७ ते १० मिनिटे शिजवा
  • गरम खायला द्या!

एक वर्षापेक्षा लहान असलेल्या मुलांना तुम्ही साखर, गूळ, मीठ आणि मध देणे टाळा. कारण हे घटक त्यांच्यासाठी हानिकारक असू शकतात. जर तुमचे बाळ एक वर्षापेक्षा मोठे असेल तर त्यांना ते देणे सुरक्षित आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बाळासाठीच्या केळीपूड संदर्भात वारंवार विचारले जाणारे काही प्रश्नः

. केळ्याची लापशी चांगली शिजवलेली आहे की नाही हे मला कसे कळेल?

लापशी शिजली आहे की नाही हे समजणे खूप सोपे आहे. लापशी शिजली की भांड्याला चिकटणार नाही.

. कच्ची केळी वापरुन मी आणखी काय बनवू शकते?

कच्च्या केळ्याची पूड अतिशय बहुगुणी आहे आणि आपल्या बाळासाठी विविध प्रकारच्या स्वादिष्ट पाककृती बनवण्यासाठी ती वापरली जाऊ शकते. तुम्ही शिरा, मिल्कशेक आणि अशा इतर पाककृती कच्च्या केळ्याची पूड वापरून तयार करू शकता.

. सामान्य पिवळ्या केळ्यांपेक्षा लहान मुलांसाठी कच्चे केळे अधिक फायदेशीर का आहे?

कच्ची केळी ही नेहमीच्या सामान्य केळ्यांपेक्षा जास्त चांगली मानली जातात कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जरी ही केळी खाल्ली तरी बाळांना खोकला आणि सर्दी होऊ शकत नाही.

कच्च्या केळ्याची पूड बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही तुमच्या मुलाच्या आहारात तिचा वापर अगदी सुरक्षितपणे करू शकता. परंतु, प्रत्येक बाळ वेगळे असते आणि कोणताही घन पदार्थ बाळाला देण्यापूर्वी तुम्ही बालरोगतज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. थोड्या प्रमाणात ही पूड बाळाला देण्यास सुरुवात करा. तुमच्या बाळाला ऍलर्जीची लक्षणे दिसली नाहीत तर हळू हळू तुम्ही प्रमाण वाढवू शकता.

आणखी वाचा:

बाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती
बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article