Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण आरोग्य बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?

बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?

बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?

अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठ आणि साखर वापरले जाते. परंतु मीठ आणि साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रौढ आणि मुलांमध्ये गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, प्रौढांनी दररोज मीठाचे सेवन १/ ते १ चमचा इतके मर्यादित ठेवले पाहिजे. दिवसाकाठी साखरेचा वापर ६ चमच्यांपर्यत मर्यादित असावा. बाळांसाठी मीठ आणि साखर टाळावी कारण जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक आहे आणि त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य दुर्बळ होणे, दात किडणे, प्रतिकारशक्ती कमी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

बाळाच्या आहारात मीठ आणि साखरेची रोजची गरज किती आहे?

विविध आरोग्य संघटनांच्या मते, बाळांना ते सहा महिन्यांचे होईपर्यंत मीठ देऊ नये. दुधातील असलेल्या मीठाद्वारे त्यांची सोडियमची आवश्यकता पूर्ण केली जाते. ६ महिने ते १ वर्षाच्या बाळांना दररोज १ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ दिले जाऊ नये, ज्यामध्ये ०.४ ग्रॅम सोडियम असते. १ ते ३ वर्षे वयोगटातील लहान बाळांचे मीठाचे सेवन दररोज २ ग्रॅम पर्यंत मर्यादित असावे आणि ४ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज ३ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

बाळांना त्यांच्या आहारात अतिरिक्त साखर किंवा परिष्कृत साखरेची आवश्यकता नसते. बाळाची साखरेची आवश्यकता कार्बोहायड्रेट आणि फळांसारख्या नैसर्गिकरित्या गोड पदार्थांनी पूर्ण केली जाऊ शकते.

तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात साखर आणि मीठ का टाळावे?

तुमच्या बाळाच्या आहारात मीठ आणि परिष्कृत साखर समाविष्ट करणे टाळण्याची कारणे इथे आहेत.

. मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो: जास्त प्रमाणात मीठ घेण्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. कारण अर्भकाचे मूत्रपिंड रक्तातील उच्च प्रमाणात असलेल्या मीठावर प्रक्रिया करू शकत नाही आणि ते नष्टसुद्धा करू शकत नाही. ह्यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो आणि नंतरच्या काळात मूत्रपिंडाशी संबंधित आजार होऊ शकतात.

. मुतखडा होऊ शकतो: मीठातील अतिरिक्त सोडियममुळे मूत्राद्वारे शरीरातून जास्त कॅल्शियम बाहेर पडते. हे कॅल्शियम मुतखडा तयार करू शकतो. मुतखड्यामुळे शरीरात तीव्र वेदना, ताप आणि थंडी वाजणे, मळमळ आणि उलट्या होणे, लघवी करताना जळजळ होणे आणि लघवीतून रक्त येणे ह्यासारखी लक्षणे उद्भवतात.

. उच्च रक्तदाब: जी बाळे जास्त प्रमाणात मीठ घेतात. त्यांना प्रौढावस्थेत उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

. डिहायड्रेशनचा धोका: ज्या मुलांच्या शरीरात जास्त प्रमाणात मीठ असते त्यांना डिहायड्रेशनचा धोका असतो, कारण मीठामुळे मूत्र आणि घामाच्या स्वरूपात शरीरातील पाणी कमी होते. बाळांना तहान लागल्याचे समजत नाही आणि गंभीर लक्षणे दिसून येईपर्यंत त्यांना डिहायड्रेशन झाल्याचे मोठ्यांना समजणार नाही. डिहायड्रेशन मुळे मुतखडा, स्नायूंचे नुकसान, बद्धकोष्ठता आणि यकृत खराब होऊ शकते.

. ठिसूळ हाडे: जास्त प्रमाणात मीठ खाण्यामुळे शरीरात सोडियमची पातळी वाढते. यामुळे, जास्त प्रमाणात कॅल्शियम विसर्जन होते. अशा प्रकारे, शरीरातून कॅल्शियमचा ऱ्हास होतो. कॅल्शियमची मजबूत हाडांच्या विकासासाठी आवश्यकता असते. कॅल्शियम कमी होण्यामुळे ऑस्टिओपोरोसिसची स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे हाडे पातळ आणि ठिसूळ होतात.

. दात किडणे: अतिरिक्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने दातांमध्ये वेदनादायक कॅव्हिटीज होतात. आणि दातांना कीड लागू शकते. तोंडातील बॅक्टेरिया दात खराब करणारे ऍसिड तयार करण्यासाठी पदार्थांमधून मिळणारी साखर वापरतात.

. लठ्ठपणा: आहारात जास्त साखर म्हणजे जास्त कॅलरी. सक्रिय बाळामध्ये सुद्धा, जास्त साखर खाल्ल्यामुळे बर्‍याच न वापरलेल्या कॅलरी तयार होऊ शकतात ज्या नंतर चरबीमध्ये रूपांतरित होतात आणि शरीरात साठवल्या जातात. लठ्ठपणा किंवा शरीरात जास्तीत जास्त चरबी असणे हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.

. मधुमेह: जास्त साखर खाल्ल्यास आयुष्यात टाईप २ मधुमेह होतो. मधुमेह हा एक आजार आहे जो शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.

. आळस/सुस्ती: रक्तातील साखरेच्या वाढलेल्या पातळीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियमित करणार्‍या इंसुलिन नावाच्या संप्रेरकाचे जास्त उत्पादन होऊ शकते. जास्त प्रमाणात इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते, ज्यामुळे बाळामध्ये सुस्तपणा, निष्क्रियता आणि थकवा येऊ शकतो

१०. हायपरएक्टीव्हिटी: साखर रक्तामध्ये त्वरीत शोषली जात असल्याने, जास्त साखरेच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे अ‍ॅड्रेनालाईनची पातळी वाढते आणि मुले हायपरऍक्टिव्ह होतात.

११. आहाराच्या चुकीच्या सवयी: जास्त प्रमाणात मीठ आणि साखर सेवन केल्याने नंतरच्या आयुष्यात देखील तशीच सवय लागण्याची शक्यता असते. ह्यामुळे, लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या जीवनशैली रोगास ते कारणीभूत ठरते.

१२. आईचे दूध नाकारणे: जर मुलांना मीठ आणि साखरेची चव आवडण्यास सुरुवात झाली तर ते आईचे दूध टाळू किंवा नाकारू शकतात. हे वाढत्या बाळासाठी हानिकारक आहे, कारण आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक अनेक पौष्टिक घटक असतात.

१३. भाज्यांची खरी चव कळत नाही: जर बाळाच्या अन्नात जास्त मीठ किंवा साखर असेल तर त्यामुळे भाज्यांची मूळ चव झाकली जाते. जर भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात मीठ किंवा साखर घातली नाहीत तर बाळांना अशा भाज्यांची चव आवडत नाही.

तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात साखर आणि मीठ का टाळावे?

तुमच्या बाळाला घन पदार्थांचा परिचय देण्यासाठी काही टिप्स

  • एका वेळी एकाच अन्नपदार्थाची ओळख करुन द्या जेणेकरून बाळाला कुठल्या अन्नपदार्थाची ऍलर्जी आहे हे तुम्हाला समजेल. वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बाळाला देण्याच्या आधी दोनतीन दिवस प्रतीक्षा करा.
  • सगळ्या अन्नपदार्थांची प्युरी करा जेणेकरुन बाळाला ते सहजपणे खाता येईल. तो जसजसा मोठा होईल तसतसे आपण त्यास अन्नाचे लहान लहान तुकडे करून तुम्ही देऊ शकता परंतु न शिजवलेले मटार, फळभाज्या आणि भाज्या, शेंगदाणे इत्यादी पदार्थांवर लक्ष ठेवा कारण ते बाळाच्या घशात अडकून बाळ गुदमरू शकते.
  • चांदीची भांडी वापरणे टाळा. प्लास्टिक किंवा सिलिकॉनपासून बनविलेले चमचे वापरा कारण ते बाळाच्या नाजूक हिरड्यासाठी चांगले असतात.
  • बाळाला जास्त प्रमाणात खायला घालण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा बाळ अन्नाचा आनंद घेणे थांबवते किंवा खाणे टाळते, तेव्हा तुम्ही त्याला भरवणे बंद केले पाहिजे.

सामान्य प्रश्न

बाळांच्या मीठ आणि साखरेच्या सेवानाविषयी काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अशीः

. जर पूर्णपणे मीठ टाळले तर आपल्या बाळाला सोडियम कसे मिळेल?

बाळाच्या सोडियम गरजा पहिल्या सहा महिन्यांपर्यंत आईच्या दुधाद्वारे पूर्ण केल्या जातात. याशिवाय बहुतेक पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम असते. म्हणून पहिल्या वर्षासाठी बाळाच्या मीठाचे सेवन प्रतिदिन १ ग्रॅमपेक्षा कमी असावे.

. मीठ न घालता आपण बाळाचे अन्न चवदार कसे करू शकता?

मीठ न घालता खाद्यपदार्थ चवदार बनवता येतात. जिरेपूड, हिंग, दालचिनी आणि कोथिंबीर आणि पुदीना ह्या औषधी वनस्पतींमुळे चव वाढू शकते. चव वाढवण्यासाठी तुम्ही अन्नपदार्थांमध्ये कांदा आणि लसूण वापरू शकता. तथापि, अगदी अल्प प्रमाणात मसाले घालणे आवश्यक आहे आणि ऍलर्जिक प्रतिक्रिया नसल्याची खात्री करण्यासाठी नवीन पदार्थांची हळूहळू (पहिल्या दिवशी १ चमचा, दुसऱ्या दिवशी दोन आणि असेच) ओळख करून दिली पाहिजे. औषधी वनस्पती पूर्णपणे धुऊन बारीक चिरलेली किंवा किसलेली असणे आवश्यक आहे. वयाच्या सात महिन्यांनंतरच बाळाच्या आहारात त्यांचा समावेश केला पाहिजे.

. बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये साखरेसाठी काय पर्याय काय आहेत?

साखरेचे पदार्थ म्हणून वापरले जाऊ शकतात असे नैसर्गिकरित्या गोड पदार्थ भरपूर आहेत. यामध्ये कोणत्याही फळांची प्यूरी, खजूर सिरप आणि मध यांचा समावेश आहे. तथापि, वयाच्या १ वर्षाखालील बाळासखजूर सिरप आणि मध देऊ नये.

. माझे बाळ मिठाशिवाय बेचव अन्न खाईल काय? जर त्याला ते आवडत नसेल तर?

मोठ्या माणसांना मीठ नसलेले बेचव अन्न खाणे शक्य नसते कारण त्यांना वेगवेगळ्या चवीचे अन्नपदार्थ खाण्याची सवय असते. बाळाने मीठ कधीच चाखले नसते अन्नाला चव नसल्याचे त्यांना जाणवत नाही. जर बाळाला त्याचे अन्न आवडत नसेल तर आपण जिरे, दालचिनी किंवा हिंग, पुदीना किंवा कोथिंबीर, आणि लसूण किंवा कांदा यासारखे चव वाढविणारे पदार्थ घालून चव वाढविण्याचा प्रयत्न करू शकता

. मी बाळाच्या जेवणात मीठ आणि साखर घालणे कधी सुरू करू?

वयाच्या एका वर्षापर्यंत आपल्याला बाळाला मीठ देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला बाळाला मीठ द्यायचेच असेल तर ते सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांना दररोज १ ग्रॅमपेक्षा कमी इतके मर्यादित ठेवा. तथापि, एक वर्षाखालील मुलांसाठी मीठ टाळणे चांगले. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना साखर देण्याची शिफारस केली जात नाही. बाळांच्या पदार्थांमध्ये साखरेची आवश्यकता नसते. तुम्ही फळांची प्युरी, खजूर सिरप किंवा मध ह्यासारख्या नैसर्गिक साखरेचा वापर करू शकता. साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी बाळांना देताना फळांचा रसदेखील पातळ करणे आवश्यक आहे.

मीठ आणि साखर बाळांसाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच, बाळ किमान एक वर्षाचे होईपर्यंत मीठ आणि साखर टाळणे चांगले. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मुलांना दिले जाऊ नयेत कारण त्यात जास्त प्रमाणात मीठ असते. बाळांच्या बऱ्याचश्या व्यावसायिक पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर देखील असू शकते. तुम्ही बाळासाठी बाजारात मिळणारा आहार वापरत असल्यास मीठ आणि साखरेचे प्रमाण निर्धारित करण्यासाठी त्यामधील घटक काळजीपूर्वक तपासा. मीठ किंवा साखर नसलेले घरातील जेवण देऊन आपल्या बाळाला निरोगी ठेवा.

स्रोत अणि सन्दर्भ:

आणखी वाचा:

केळं बाळांसाठी चांगले आहे का?
बाळांसाठी अद्रक – आरोग्यविषयक फायदे आणि सुरक्षिततेचे उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article