बाळासाठी केळ्याची प्युरी – ती करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग

स्तनपानाचा टप्पा ओलांडला की आईला आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्याची उत्सुकता असते. त्यांनी निवडलेल्या अन्नपदार्थांपैकी बरेचसे अन्नपदार्थ बाळ मोठे झाल्यावरच भरवता येऊ शकतातपरंतु ४ महिन्यांच्या बाळाला सुद्धा केळ्याची प्युरी भरवल्यावर बराच फायदा होतो.

केळी विकत आणताना कशी निवडून घ्यावीत?

केळी विकत आणताना कशी निवडून घ्यावीत?

केळी  निवडून घेताना, केळी ताजी आणि पिकलेली असणे महत्वाचे आहे. केळ्यांची साले मऊ आणि कुठलाही डाग नसलेली असतील अशी असावीत. हिरव्या रंगाची केळी अजून पिकायची असतात आणि ज्या केळ्यांच्या सालीवर काळे डाग असतात ती जास्त पिकलेली असतात.

केळ्याची प्युरी करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • पिकलेले केळ 
  • पाणी 
  • स्तनपान किंवा फॉर्मुला दूध 

बाळासाठी केळ्याची प्युरी कशी तयार कराल?

बाळासाठी केळ्याची प्युरी कशी तयार कराल? 

. ताजी केळी खरेदी करा 

बाळाला खाण्यासाठी प्युरीचा पोत मऊ असणे जरुरी आहे. चांगली आणि पिकलेली केळी त्यासाठी गरजेची आहेत. अशी केळी चांगली कुस्करता येतात आणि त्यांची नैसर्गिक चव सुद्धा चांगली  येते.

. केळी स्वच्छ धुवून, त्यांची साले काढून प्युरीसाठी तयार करा 

पाण्यामध्ये थोडे व्हिनेगर घालून केळी स्वच्छ धुवा. ह्यामुळे सगळे जिवाणू नष्ट होतील. थंड पाण्यात ते धुवून कोरडे करा आणि नंतर साल काढा. केळ्याचे छोटे तुकडे करा आणि शेवटचा तुकडा टाकून द्या.

. प्युरी करण्यासाठी केळी कुस्करा 

मिक्सर मध्ये केळ्याची प्युरी करणे हे सर्वात चांगले कारण प्युरीचा पोत एकसारखा असेल. थोडासा जांभळट रंग प्युरी मध्ये दिसू लागेल. तुम्ही थोडेसे पाणी घालू शकता. दुसरा पर्याय म्हणजे पाण्याऐवजी तुम्ही फॉर्मुला दूध किंवा स्तनपानाचे दूध घालून केळ्याच्या प्युरीमध्ये मिक्स करू शकता.

. प्युरीला चव आणि पोत आणा 

जरी प्युरीला तिची चव असते तरी सुद्धा दुसरा  अन्नपदार्थ घातल्यास अजून चव वाढते. पीच, प्लम, चेरी किंवा योगुर्ट हे प्युरी मध्ये घालण्याचे काही पर्याय आहेत.

. राहिलेली प्युरी फ्रिज मध्ये ठेवा 

राहिलेली प्युरी स्वच्छ भांड्यात काढून तुम्ही फ्रिज मध्ये ३ दिवस  ठेवू शकता आणि ती बाळाला भरवण्यायोग्य चांगली राहते.

लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी 

  • प्युरीचा पोत कसा असावा ह्याचा अंदाज घेऊन पहा, जितकी ती मऊ असते तितकी ती बाळाला भरवणे सोपे जाते.
  • बाळाला संपूर्ण वाटीभर प्युरी देऊ नका. बाळ आधी थोडे खाण्याने सुरुवात करते आणि नंतर हळूहळू त्यात वाढ होईल.
  • केळ्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही, त्यामुळे आठवड्यात तीनदा बाळाला प्युरी देणे सुरक्षित आहे.
  • प्युरी फ्रिज मध्ये ठेऊ शकता, परंतु बाळास ताजी प्युरी भरवणे हे चांगले आहे.
  • पिकलेली केळी प्युरी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत, त्यांची चव तर चांगली असतेच तसेच त्यांच्यामुळे ऍलर्जी सुद्धा होत नाहीत.

बाळाला नवीन पदार्थांची ओळख करून देणे हा खरंच खूप मजेदार काळ असतो. बाळाला भरवण्याच्या बऱ्याच अन्नपदार्थांपैकी केळ्याची प्युरी हा सर्वात सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण पर्याय आहे. स्तनपानाव्यतिरिक्त  कुठल्याही पदार्थाची बाळाला ओळख करून देण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे कारण बाळाला कुठल्या पदार्थांची ऍलर्जी होऊ शकते हे त्यांना माहिती असू शकते.