Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण लहान बाळांसाठी मनुके

लहान बाळांसाठी मनुके

लहान बाळांसाठी मनुके

आपल्यापैकी अनेकांना मनुके आवडतात. हे मनुके म्हणजे वाळलेली गोड द्राक्षे असतात. सुरकुत्या असलेली ऊर्जेची ही छोटी पॅकेट्स मध्यमयुगीन काळापासून प्रसिद्ध आहेत. खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदकांच्या हा एक नैसर्गिक स्रोत आहे आणि तो खूप लोकप्रिय आहे.

२०१८१९ मध्ये मनुक्यांचा उत्पादनाचा दर १.२ दशलक्ष मेट्रिक टन इतका होता. सुक्यामेव्याच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी मनुका हा एक प्रकार आहे. मनुके तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीची गोड द्राक्षे निवडली जातात आणि नंतर नैसर्गिकरित्या ही द्राक्षे दोन ते चार आठवडे उन्हात वाळवण्याची सोपी प्रक्रिया केली जाते. व्यावसायिकदृष्ट्या, उच्च दर्जाचे मनुके तयार करण्यासाठी द्राक्षे डिहायड्रेटर वापरून सुकवली जातात.

लहान बाळांना विचार करता, त्यांच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करणे हा त्यांना आवश्यक पोषक तत्वे पुरवण्याचा एक चांगला मार्ग आहे. हि पोषक तत्वे बाळांना इतर पदार्थांमधून मिळत नाहीत. अशाप्रकारे, बाळांच्या वाढीच्या दिवसांमध्ये बाळाला मनुका देण्याची शिफारस केली जाते. परंतु, जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला घन पदार्थांची ओळख करून देता तेव्हा तुम्ही बाळाला फक्त मनुका खायला देऊ शकत नाही. तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊन योग्य वेळेला बाळाला मनुके खायला दिले पाहिजेत. ह्या लेखामध्ये आपण ह्या सर्व बाबींची चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: लहान बाळांसाठी मनुके फायदे आणि बाळाला देताना ते कधी आणि कसे द्यावेत?

लहान बाळांना मनुके देणे सुरक्षित आहे का?

लहान बाळांसाठी मनुका/सुकी द्राक्षे खाणे बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तथापि, हे मनुके आकाराने लहान असल्याने, बाळांना नेहमीच गुदमरण्याचा धोका थोडा जास्त असतो. मनुके बाळाच्या आहारात वेगळ्या प्रकारे समाविष्ट केल्यास बाळासाठी ते चांगले असते. थोड्या सावधगिरीने, मनुके बाळांना देणे केवळ सुरक्षितच नाही तर त्यांच्या वाढीसाठी फायदेशीर सुद्धा आहे.

चला मनुक्यांच्या पौष्टिक मूल्यावर एक नजर टाकूया.

मनुक्याचे पौष्टिक मूल्य

मनुका हा सुकामेव्यातील घटक वेगवेगळे पदार्थ तसेच बेकरी उत्पादनांमध्ये वापरला जातो. मद्य तयार करण्यासाठी सुद्धा मनुक्यांचा वापर केला जातो किंवा नेहमीचे स्नॅक म्हणून मनुका खाल्ला जातो. ह्या लहान मनुक्याचे आरोग्यविषयक फायदे असंख्य आहेत. बर्‍याचदा निसर्गाची कँडीम्हणून मनुके ओळखले जातात. मनुक्यांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि मध्यम प्रमाणात सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

  • मनुक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ते बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करतात कारण ते एकदा खाल्ल्यानंतर फुगतात आणि पचनमार्ग साफ करण्यास मदत करतात.
  • मनुक्यांमध्ये कॅलरीज, ग्लुकोज आणि फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ते वजन वाढविण्यात मदत करतात.

येथे प्रति १०० ग्रॅम मनुक्यांचे पौष्टिक मूल्य असलेले टेबल दिलेले आहे.

पोषक मूल्य प्रति १०० ग्रॅम पोषक मूल्य प्रति १०० ग्रॅम
पाणी १५.४३ ग्रॅम ऊर्जा
३००-३५० किलोकॅलरी
प्रथिने ३.०७ ग्रॅम एकूण लिपिड ०.४६ ग्रॅम
कर्बोदके ७९.८ ग्रॅम आहारातील फायबर ३.७ ग्रॅम
साखर ५९.९ ग्रॅम कॅल्शियम ५० मिग्रॅ
लोह ०.३ मिग्रॅ मॅग्नेशियम ३२ मिग्रॅ
फॉस्फरस १०१ मिग्रॅ पोटॅशियम ७४९ मिग्रॅ
तांबे ०.४ मिग्रॅ व्हिटॅमिन बी१ आणि बी२ ०.२ मिग्रॅ
सोडियम ११ मिग्रॅ झिंक ०.२२ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी २.३ मिग्रॅ थायमिन ०.१०६ मिग्रॅ
रिबोफ्लेविन ०.१२५ मिग्रॅ नियासिन ०.७६६ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी-६ ०.७४ मिग्रॅ फोलेट ५ यूजी
चरबी ०.५ मिग्रॅ मॅंगनीज ०.३ मिग्रॅ
व्हिटॅमिन ई ०.१२ मिग्रॅ व्हिटॅमिन के ३.५ मिग्रॅ

आता तुम्हाला मनुक्याचे पौष्टिक मूल्य माहित आहे, ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे ते देखील पाहू या.

लहान बाळांसाठी मनुक्याचे आरोग्यविषयक फायदे

लहान बाळांसाठी मनुक्याचे आरोग्यविषयक फायदे

तुमच्या बाळाच्या वाढीसाठी मनुका खूप ऊर्जा प्रदान करते. आता तुम्हाला मनुकाच्या पौष्टिक मूल्ये समजलेली आहेत, चला काही आरोग्य विषयक फायद्यांवर नजर टाकूया.

  • मनुके तुमच्या बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत फायदेशीर असू शकतात कारण मनुक्यांमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात.
  • मनुके खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते कारण त्यामुळे मेंदूचे पोषण होते.
  • मनुक्यामध्ये तंतुमय पदार्थ खूप असल्याने ते एक उत्तम रेचक आहे आणि त्यामुळे पचन योग्य होण्यास मदत होते.
  • मनुका बाळाच्या शरीरात ऍसिडअल्कलाइन ह्यांचे संतुलन राखण्यास देखील मदत करतो.
  • ताप असताना, बाळांना बेदाण्याचे पाणी देणास सांगितले जाते कारण ते जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करते.

तुम्ही कदाचित विचार करत असाल की तुमच्या बाळाला स्वादिष्ट पण पौष्टिक अन्नपदार्थ तुम्ही कधी आणि कसे देण्यास सुरुवात करू शकता. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

तुम्ही तुमच्या बाळाला मनुके कधी खायला देऊ शकता?

मातांना सामान्यपणे एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे बाळे कोणत्या वयात मनुके खाऊ शकतात? बाळ ८ महिन्यांनंतर मनुके खाण्यास सुरुवात करू शकतात. ह्या वयात बाळे अन्न चघळण्यास सक्षम असतात. तसेच, बाळ स्वत: ताठ बसण्यास आणि अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये लहान वस्तू धरू शकतात. लहान बाळांना, मनुक्याचा रस करून, किंवा प्युरी अथवा मॅश स्वरूपात दिला जाऊ शकतो. नंतर, त्यांना मनुक्याचे कापलेले लहान तुकडे देखील तुम्ही देऊ शकता. तसेच, बाळाला कायम मोठ्या माणसांचे लक्ष असते तेव्हाच मनुका खायला द्या. अन्नपदार्थ चावून खाणाऱ्या बाळांसाठी सुद्धा, गुदमरण्याचा धोका टाळण्यासाठी, एकावेळी एक मनुका खाऊ घालणे चांगले असते.

तुम्ही तुमच्या बाळाला किती मनुके द्यावेत?

मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते आणि दररोज थोड्या प्रमाणात मनुके देणे चांगले असते. सुरुवातीला, बाळाला दररोज १२ चमचे मनुक्याचा रस द्यावा . नंतर हळूहळू दररोज २३ चमचे रस देता येऊ शकतो. बाळाचे वय १ वर्षापेक्षा जास्त झाल्यावर, बाळाला २३ चमचे मॅश केलेले किंवा चिरलेले मनुके तुम्ही देऊ शकता.

तुमच्या बाळाच्या आहारात मनुक्यांचा समावेश कसा करावा?

तुमच्या बाळाला मनुक्याचे सर्व फायदे मिळण्यासाठी, बाळांना मनुका कसे द्यावे हे समजून घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला, बाळाला संपूर्ण मनुका किंवा अगदी मॅश केलेले मनुके देखील देऊ नका. तुम्ही मनुक्यांच्या पाण्याने सुरुवात करू शकता, नंतर हळूहळू मनुक्यांचा रस करून, प्युरी किंवा मॅश करून इतर अन्न पदार्थांसह तुम्ही बाळाला मनुके देऊ शकता. मनुके इतर पदार्थांसोबत मिसळल्यास चव वाढवते आणि पचनासही मदत करते.

निरोगी असले तरी, मनुके तुमच्या बाळावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अश्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत.

बाळांना मनुका खायला दिल्याने काही विपरीत परिणाम होतात का?

मनुका खाल्ल्यानंतर बाळाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असते. तथापि, एखाद्याला मनुक्यांची ऍलर्जी होऊ शकते किंवा मनुके खाताना गुदमरण्याचा धोका देखील असतो. मनुक्याचा पोत चिकट आणि चवदार आहे. कँडीजप्रमाणे, मनुके हिरड्या आणि दातांना चिकटून राहण्याची प्रवृत्ती असते आणि त्यामुळे जिवाणू वाढतात आणि दातांच्या समस्या निर्माण होतात. तुमच्या बाळाच्या हिरड्यांना चिकटू नये म्हणून तुम्ही मनुके इतर अन्नपदार्थांसोबत बाळाला देऊ शकता. तुम्ही झोपायच्या आधी बाळाला मनुका खायला देणे टाळले पाहिजे, कारण बाळ लगेच झोपू शकते आणि दातांमध्ये मनुका अडकून राहू शकतो.

मनुक्याचे काही तोटे देखील पाहू या.

मनुक्याचे तोटे

मनुका हा उर्जेचा समृद्ध स्त्रोत आहेत; तथापि, त्यांचे काही तोटे देखील आहेत.

  • मनुक्यांमध्ये तंतुमय पदार्थ आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असले तरी, त्यामध्ये पुरेशी प्रथिने नसतात. ही प्रथिने मुलांच्या वाढीच्या काळात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि स्नायूंचे वजन वाढवण्यासाठी देखील आवश्यक असतात. १०० ग्रॅम बेदाण्यामध्ये फक्त ३ ग्रॅम प्रोटीन असते. पोषण संतुलित करण्यासाठी तुम्ही प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये मनुका घालू शकता.
  • मनुक्यांमध्ये फ्रक्टोज आणि ग्लुकोज असल्यामुळे त्यामध्ये ग्लायसेमिक पातळी जास्त असते. जेव्हा ते बाळाला जास्त प्रमाणात दिले जाते तेव्हा साखरेचे प्रमाण वाढू शकते तसेच, रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढून वजन वाढू शकते. तुमच्या बाळासाठी ह्या सुकामेव्याचे प्रमाण नेहमी मर्यादित ठेवा.

बाळाला ऍलर्जी झाली नाही तर, तुम्ही बाळाला काही मनुके खायला देऊ शकता. नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे ते खाली दिलेले आहे.

तुमच्या बाळाला मनुका खायला देताना घ्यावयाची काळजी

तुमच्या बाळाच्या वाढीच्या काळात हे पॉवर फूड देण्याची शिफारस केली जाते. पण, तुमच्या लहान बाळाला मनुका खायला देताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

  • सर्वात आधी, मनुके स्वच्छ धुवून घ्यावेत. धुतल्याने त्यांच्यावरील कोणतीही रसायने किंवा अशुद्धता निघून जाईल आणि बाळाला हानी पोहोचणार नाही.
  • मनुके एकतर चिरून किंवा मॅश करून बाळाला दिले जाऊ शकतात. चिरलेले तुकडे देताना, एकावेळी एकच तुकडा खायला द्या आणि बाळ गुदमरण्याची लक्षणे दिसत असतील तर त्यावर लक्ष ठेवा. तुम्ही चिरलेले किंवा मॅश केलेले मनुके इतर पदार्थांमध्ये घालून देखील बाळाला देऊ शकता.
  • खाल्ल्यानंतर दात घासण्याची सवय लावल्यास कोणत्याही जिवाणूंची वाढ होणार नाही आणि दातांच्या समस्या टाळता येतील.

चवदार, सहज उपलब्ध होणारे आणि पौष्टिक असे मनुके म्हणजे लहान बाळांसाठी योग्य नाश्ता आहे. परंतु, बाळाला दिल्या जाणार्‍या इतर अन्नपदार्थांप्रमाणेच, लहान बाळाचे वय आणि पौष्टिक गरजा लक्षात घेऊन त्यांना मनुके खायला दिले पाहिजेत.

आणखी वाचा:

बाळांसाठी दालचिनी चांगली आहे का?
बाळांसाठी बडीशेप – फायदे, खबरदारी आणि रेसिपी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article