Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ६वा आठवडा

गर्भधारणा: ६वा आठवडा

गर्भधारणा: ६वा आठवडा

गर्भारपणाच्या ६व्या आठवड्यात तुम्ही संमिश्र भावनांमधून जात आहात. तुम्ही गर्भारपणाच्या ह्या नवीन पर्वात प्रवेश करीत आहात त्यामुळे बदलांशी जुळवून घेताना थोडा वेळ जाणार आहे. परंतु ह्या स्थितीत सुद्धा परिस्थिती नीट समजून घेऊन योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही गर्भारपणाच्या ज्या स्थितीत आहात ती परिस्थिती सोपी आणि सहज कशी करता येईल ते ह्या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गर्भारपणाच्या ६व्या आठवड्यात बाळाची वाढ

ह्या आठवड्यात बाळाचा महत्वपूर्ण विकास होतो. तुमच्या बाळाचे नाक, तोंड, कान हे अवयव आकार घेऊ लागतात. तुमच्या बाळाचे डोके विकसित होते आणि अल्ट्रासाऊंड मध्ये अगदी स्पष्ट दिसते. बाळाच्या हृदयाची स्पंदने १००-१६०/ मिनिट अशी पडतात, आणि बाळाच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत सुरु होतो. ह्या आठवड्यात बाळाचे आतडे तसेच फुप्फुसांची पेशींपासून निर्मिती होते. बाळाचा मेंदू,स्नायू, हाडे आणि पिट्युटरी ग्रंथी ह्यांचा विकास होतो.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळाचा आकार केवढा असतो?

तुमचे बाळ विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर असते. बाळाचे सगळे अवयव आकार घेऊ लागतात. बाळाचे हृदय आणि रक्ताभिसरण संस्था कार्यरत असतेच. गर्भारपणाच्या ६व्या आठवड्यात बाळाचा आकार डाळीच्या दाण्याएवढा असतो आणि लांबी १/४ इंच इतकी असते.

शरीरातील महत्वाचे बदल

गर्भारपणाच्या ६ व्या आठवड्यात शरीरात होणारे बदल हे वेगाने होत असतात, संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. तुम्ही ह्या आठवड्यात खूप वेळा लघवीला जात असाल कारण तुमची मूत्रपिंडे ह्या आठवड्यात खूप प्रभावीपणे कार्यरत असतात आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकत असतात. तसेच वाढणाऱ्या गर्भाशयामुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि त्यामुळे लघवीला जावेसे वाटते. तुम्हाला छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो कारण पाचक द्रव्ये योग्य तऱ्हेने स्त्रवत नाहीत.

६व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

६व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

ह्या आठवड्यात गर्भारपणाच्या लक्षणे ठळक दिसू लागतात. बऱ्याच जणांसाठी ते सोपे नसते. परंतु अशा बऱ्याच स्त्रिया असतात ज्यांच्यामध्ये ही लक्षणे आढळत नाहीत आणि त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. जर तुम्हाला हे लक्षणे आढळत नसतील तरी काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

 • वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे तुमच्या स्तनांमध्ये वेदना जाणवतील. ६व्या आठवड्यात तुमचे स्तन तुमच्या बाळाला स्तनपान करण्यासाठी तयार झालेले असतात आणि हे फारच आश्चर्यकारक आहे.
 • तुम्हाला लक्षात येईल की मॉर्निंग सिकनेस फक्त सकाळीच जाणवत नाही तर दिवसातून तो केव्हाही होऊ शकतो. बऱ्याच बायकांना पहिल्या तिमाहीत दिवसभर मळमळ होते. तसेच काही अन्नपदार्थांविषयी तिटकारा जाणवू शकतो उदा: मांस, दूध आणि काही हिरव्या भाज्या.
 • तुम्हाला काही वेळा थकवा जाणवेल आणि तेव्हा तुम्ही थोडा जास्त वेळ आराम करण्याची गरज आहे.
 • तुमची दोन्ही मूत्रपिंडे वेगाने कार्यरत असतात. त्यामुळे तुम्ही खूप वेळा लघवीला जाता.
 • प्रोजेस्टेरॉनमुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटेल. खूप पाणी प्या आणि तंतुमय अन्नपदार्थ खा त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही.
 • तुमच्या मनःस्थितीत बदल होतील आणि तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटेल. स्वतःसाठी खूप वेळ द्या आणि तुमचे मन मोकळे करा.
 • ६ व्या आठवड्यात जर तुम्हाला पोटात आणि पायात पेटके जाणवत असतील तर तुमच्या गर्भाशयाची वाढ होत असते परंतु ते खूप दुखत असतील तर तुमच्या डॉक्टरची लागलीच मदत घ्या.
 • हलके डाग आढळतील, जर खूप रक्तप्रवाह होत असेल तर मात्र तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

गर्भधारणेच्या ६व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमचे बाळ वाटाण्याच्या दाण्याएवढे असते आणि तुमच्या पोटातील खूप जागा त्याने व्यापलेली नसते त्यामुळे तुम्ही गरोदर आहात हे अजूनही कळत नाही परंतु तुमच्या पोटाचा आकार लवकरच वाढणार आहे.

गर्भधारणेच्या ६व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या ६व्या आठवड्यातील सोनोग्राफी

तुमचे डॉक्टर तुम्हाला ६व्या आठवड्यात सोनोग्राफी करायला सांगणार नाहीत. पण तुम्ही केलीत तर तुमच्या लक्षात येईल की भ्रूण आता बाळासारखे दिसत आहे. तुम्हाला बाळाचे  मोठे डोके आणि बाळाच्या डोळ्यांच्या आणि नाकाच्या जागी गडद बिंदू दिसतील. जिथे कान विकसित होणार आहेत ती जागा सुद्धा तुम्हाला दिसेल. बाळाचे हात आणि पाय विकसित होताना दिसतील आणि जर तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला बाळाच्या हृदयाची स्पंदने ऐकू येतील.

आहार कसा असावा?

आहार कसा असावा?

गर्भारपणात आरोग्यपूर्ण आहार घेतल्याने बाळाच्या जन्माच्या वेळी त्रास होत नाही. परंतु ह्या आठवड्यात तुम्हाला अंडी, मांस आणि प्रथिने युक्त आहाराने तुम्हाला उलटीची भावना होऊ शकते. ६व्या आठवड्यात आरोग्यपूर्ण आहार कसा घ्या ह्याविषयी च्या काही टिप्स इथे देत आहोत.

 • स्वादिष्ट अन्न खा. नव्या अन्नपदार्थांचा खूप शोध घेत बसू नका. जर तुम्ही फळे खाऊ शकत असाल तर खा किंवा इतर आरोग्यपूर्ण आणि तरीही स्वादिष्ट पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
 • सकाळी लवकर आणि थोडे खाण्याने सुरुवात करा. रिकामे पोट ठेवल्यास तुम्हाला मळमळ होऊ शकते. तुमच्या बिछान्याजवळ सकाळी उठल्यावर तोंडात टाकण्यासाठी सीरिअल सारखे काहीतरी ठेवा.
 • रात्री झोपण्याआधी कर्बोदके आणि प्रथिनांची समृद्ध असा नाश्ता ठेवा उदा: चीझ,संपूर्णधान्य टोस्ट किंवा जर तुम्हाला ते आवडत असेल तर पीनट बटर इत्यादी.
 • वारंवार आणि आरोग्यपूर्ण खा, त्यामुळे जळजळ होणार नाही.

पहिल्या तिमाहीच्या शेवटी तुम्हाला जे आवडते ते खा, जबरदस्तीने काहीही खाण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास ते लगेच बाहेर पडेल!

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

थोड्या थोड्या वेळाने खा. खूप आराम करा, मूत्रमार्गाचा संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. केसांना रंग वापरू नका. तुम्ही टच अप आणि स्ट्रिक्स करू शकता पण केसांना रंग लावू नका कारण शरीरात ती रसायने शोषली जातात, ६ व्या आठवड्यासाठी काही महत्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे,

हे करा

हे करा

 • पाश्चराइझ न केलेले, कमी शिजवलेले मांस आणि अंडी तुमच्या आहारातून काढून टाका.
 • आरोग्यपूर्ण, चविष्ट अन्नपदार्थांद्वारे योग्य प्रकारे तुम्हाला आवश्यक असलेली पोषणमूल्ये मिळतील असे पहा.
 • वारंवार थोडे थोडे खा.
 • व्हिटॅमिन बी ६, आल्याच्या गोळ्या, मळमळ कमी व्हावी म्हणूनचे लॉलीपॉप किंवा ऍक्युपंक्चर बँड्स वापरून तुमच्या तोंडाची चव नीट ठेवा.
 • साधे आणि सोपे व्यायाम करा.
 •  व्हिटॅमिन्स घ्या.त्यामुळे जन्मतः व्यंग असलेलं बाळ होण्याची शक्यता कमी होते.
 • स्वतःला सजलीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

हे करू नका

हे करू नका

 • जंक फूड टाळा.
 • धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन बंद करा.
 • कॅफेन घेऊ नका, खूप कॅफेन घेतल्यास गर्भपात होऊ शकतो.
 • तुम्हाला होईल तेवढेच काम करा, जबरदस्तीने काहीही करू नका. उलट्या आणि मळमळ ह्यामुळे तुम्ही थकून गेलेले असता.
 • खूप जास्त कष्ट करू नका त्यामुळे गुंतागुंत वाढू शकते.
 • पोटात खूप जास्त दुखू लागले तर लगेच डॉक्टरांची मदत घ्या.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमचे जुने कपडे अजूनही तुम्हाला होतील. गर्भारपणाविषयीचे पुस्तक तसेच त्यविषयी नोंदी ठेवण्यासाठी वही, आरामदायक ब्रा आणि ताणल्या जाऊ शकतील अशा पँट्स तुम्ही विकत घेऊ शकता.

गर्भारपणाच्या काळ हा रोमांचक असतो, तुमच्या जवळ त्याविषयी माहिती असेल तर तुमच्या सर्व काळज्या दूर होतील आणि त्यामधून तुम्ही सहजगत्या पार होऊ शकाल.

मागील आठवडा: गर्भधारणा: ५वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ७वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article