Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी

बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी

बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी

खजूर ऊर्जेचे समृद्ध स्रोत आहेत आणि जेव्हा तुमचे बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा त्याच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी हा चांगला पदार्थ आहे. खजूर लोह, कॅल्शियम, सोडियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त ह्या सारख्या खनिज पदार्थांचा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन ए, बी ६ आणि व्हिटॅमिन के देखील असतात.

खजूर साखर आणि तंतुमय पदार्थांचा चांगला स्रोत आहेत. पिकलेल्या खजुरामध्ये फ्रुक्टोज आणि डेक्सट्रोज त्वरित ऊर्जा प्रदान करतात.

ही पोषणमूल्ये वाढत्या बाळाच्या आहारास संतुलित करतात आणि आईच्या दुधापासून मिळणाऱ्या पोषणास पूरक असतात. तुमच्या छोट्या बाळाला खजूर खायला देताना तुम्हाला माहित असल्या पाहिजेत अशा गोष्टींची इथे मार्गदर्शिका दिलेली आहे.

पोषण तथ्य आणि खजुरांविषयीचा अभ्यास

अत्यावश्यक पोषक द्रव्यांसह समृद्ध असण्याव्यतिरिक्त, खजुरांमध्ये उपचारात्मक गुणधर्म देखील आहेत. अभ्यासातून असे दिसून येते की खजुरांमध्ये कमीतकमी १५ खनिजे अस्तित्वात असतात, ज्यामध्ये सेलेनियमसारख्या कर्करोगापासून बचाव करणाऱ्या खनिजाचा देखील समावेश होतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते. याव्यतिरिक्त, खजुरामध्ये २३ प्रकारचे अमीनो ऍसिड्स आणि असंतृप्त फॅटी ऍसिड्स असतात, तसेच कोलेस्ट्रॉल आणि संतृप्त चरबी कमी प्रमाणात असते, त्यांच्यामध्ये विरोधी दाहक गुणधर्म असतात आणि अँटीऑक्सिडंट्स देखील समृद्ध प्रमाणात असतात.

पौष्टिक मूल्याच्या बाबतीत, १०० ग्रॅम खजुरांमध्ये खालील प्रमाणात पोषणमूल्ये, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात:

फोलेट २४.५ म्युग्रॅम
नियासिन नियासिन ०.५१ मिलिग्रॅम
पॅन्टोथेनिक ऍसिड . ५२ मिलिग्रॅम
पायरीडोक्सिन .२४ मिलिग्रॅम
रिबॉफ्लेविन .०२ मिलिग्रॅम
थायमिन .०५ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन ए १४९ आययू
व्हिटॅमिन के .९३ म्यूग्रॅम
लोह .९० मिग्रॅ
मॅग्नेशियम १४.३४ मिग्रॅ
फॉस्फरस ३३.८८ मिग्रॅ
जस्त .४४ मिग्रॅ
बीटा कॅरोटीन ८९ युजीम्युग्रॅम
ल्युटिन २३ युजी
झेक्सॅन्थीन ८६.३४ म्युग्रॅम

पॅक केलेल्या खजुरामध्ये किंवा इतर सुकामेव्याच्या पदार्थांमध्ये ते जास्त टिकावेत म्हणून सल्फेट घातले जाते. दमा किंवा सल्फेट ऍलर्जी असलेल्या मुलांनी या सल्फेटने कव्हर केलेल्या खजुरांपासून पूर्णपणे दूर रहावे. जर आपल्या बाळास दम्याचा त्रास असेल तर आपल्या बाळाला खजूर देणे हे किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या.

खजूर बाळांसाठी चांगले असतात का?

बाळाला खजूर दिले तर चालतात का हा प्रश्न बऱ्याच माता विचारतात. खजूर हे हार्ट हेल्दीअसतात आणि खूप पौष्टिक असतात त्यामुळे बाळांच्या आहारात त्यांचा समावेश केला जाऊ शकतो, कारण त्यामधील पोषणमूल्ये बाळाच्या वाढीस मदत करतात. खजुरामध्ये बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषकद्रव्ये असतात जी एकट्या दुधातून मिळत नाहीत.

आपल्या बाळाच्या आहारामध्ये खजुराचा समावेश केव्हा करावा?

आपल्या बाळाच्या स्थिर वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य प्रमाणात पोषक मूल्ये असणे आणि आहारात संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच एकदा, आपल्या बाळाचे वय वाढल्यानंतर, तुम्ही त्याच्या आहारात खजुराचा समावेश केला पाहिजे त्यामुळे बाळाच्या पोषणाची गरज भागवली जाईल. लहान मुले जेव्हा साधारण ६ महिन्यांची होतात किंवा घन अथवा अर्धघन पदार्थ खाण्यास सुरुवात करतात तेव्हा ते खजूर खाऊ शकतात.

आपल्या बाळाच्या आहारामध्ये खजुराचा समावेश केव्हा करावा?

जेव्हा तुमच्या बाळाने घनपदार्थ खाण्यास नुकतीच सुरुवात केलेली असते तेव्हा बाळाला खजूर देऊ नका. बाळ खजुराला कशी प्रतिक्रिया देते याची तपासणी करण्यासाठी लहान भागांमध्ये बाळाला सुरुवातीला थोड्या प्रमाणात खजूर दिले पाहिजे. त्यांची ओळख एकावेळी इतर फळांसह करून दिली जाऊ शकते.

डिहायड्रेटेड खजुरांऐवजी बाळाला वाफवलेले खजूर देणे चांगले त्यामुळे बाळाला ते नीट चावता येतील. खायला सोपे जावे म्हणून तुम्ही ते मॅश करून किंवा त्याची प्युरी करून सुद्धा देऊ शकता.

बाळांसाठी खजुराचे फायदे

खजूर पौष्टिक असतात आणि आपल्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी खनिजे व जीवनसत्त्वे त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. खजूर खालील प्रकारे आपल्या मुलाच्या वाढीस मदत करतात.

. मेंदूचा विकास

पोटॅशियम मेंदूच्या वाढीस आणि विकासास मदत करते आणि हा पौष्टिक पदार्थ खजुरांमध्ये योग्य प्रमाणात उपलब्ध असतो, यामुळे बाळाचा सर्वांगीण संज्ञानात्मक विकास होतो.

. अपचन रोखणे

खजुरांमुळे परजीवी जीवाणू काढून टाकण्यास आणि आतड्यांमध्ये अनुकूल जिवाणू वाढण्यास मदत होते. ह्यामुळे आतड्यांसंबंधी समस्या टाळण्यास मदत होते. ही बाळांमधील सामान्य समस्या आहे.

. यकृत संरक्षण

नवजात शिशु विषाणू आणि जिवाणूंच्या संसर्गास बळी पडण्यास संवेदनशील असतात, ज्याचा यकृतावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कावीळ, टायफॉइड आणि हिपॅटायटीस सारख्या यकृताच्या समस्येशी लहान बाळे बळी पडतात. तथापि, असे आढळून येते की खजुरांमध्ये यकृतसंरक्षित गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपल्या बाळाच्या मेनूमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रतिबंधात्मक आहारातील खजूर हा एक उत्तम घटक आहे.

. जठरासंबंधी अल्सरवरील उपाय

काही मुलांना ऍसिडिटी आणि अल्सरचा त्रास होऊ शकतो. खजुरामध्ये काही लक्षणे दूर करण्यात मदत करण्यासाठी गुणधर्म असतात आणि आपल्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या नियमित वैद्यकीय उपचारात त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. तथापि, आपण गॅस्ट्रिक अल्सरच्या उपचारांसाठी खजूर वापरण्यापूर्वी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

. मजबूत दात

दातांचा योग्य विकास होण्यासाठी दात येत असलेल्या बाळाला खजूर देणे चांगले. खजूर हिरड्या मजबूत करण्यात आणि दात मजबूत आणि वेगवान वाढण्यास दत करतात. खजूर चावून खाल्ल्याने दातांचा चांगला व्यायाम होतो आणि दात येत असलेल्या बाळाला त्याचा फायदा होऊ शकतो.

. ताप आणि गोवर झालेला असताना दिल्यास पौष्टिक असते

आपल्या बाळाला ताप किंवा गोवर झालेला असल्यास खजुरामुळे त्यातून लवकर बरे होण्यास मदत होते. खजुरामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक मूल्ये असल्यामुळे ते शक्य होते. तुम्ही दुधात खजूर मिसळून सुद्धा बाळाला देऊ शकता.

. अतिसारावर उपाय

मोठ्या आतड्यात बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे बाळांना अतिसार झाल्यास बाळांना गोड खजूर कुस्करून दिल्यास ते नियंत्रित केले जाऊ शकते.

. बद्धकोष्ठतेपासून आराम

खजुरामध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे ते पाणी शोषण्यास प्रोत्साहित करतात. त्यामुळे बाळाला शौचास सुलभ होते.

. ताप

मुलांना ताप येणे ही एक सामान्य घटना आहे. खजुरामुळे ऍसिडिटी आणि अतिसार ह्यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. ह्या समस्यांमुळे काही वेळा बाळाच्या शरीराचे तापमान सुद्धा वाढते. दुधात मिसळलेले खजूर अत्यंत पौष्टिक असतात आणि तापातून लवकर बरे होण्यासाठी त्यांची मदत होते.

१०. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते

खजुरांमध्ये लोह सामग्री जास्त असते. त्यामुळे आपल्या बाळाच्या लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते. हे निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहित करते आणि त्वचेला पोषण देते.

दररोज मुलांना किती खजूर द्यावेत?

खजुराची ओळख करून देण्यासाठी आणि बाळाला त्याची चव समजण्यासाठी इतर फळांसोबत सुरुवातीला एक खजूर देण्यास सुरुवात करा. खजूर इतर फळांसह वाफवले जाऊ शकते. नंतर हळू हळू दिवसाला २ किंवा ३ खजूर बाळाला देऊ शकता.

बाळाला खजूर देताना घ्यायची खबरदारी

बाळाला खजूर देताना घ्यायची खबरदारी

बाळांची पाचक प्रणाली नाजूक असते त्यामुळे नवीन पदार्थांचा अचानक परिचय टाळला पाहिजे. लहानबाळांनी सुरुवातीच्या काळात खजूर चावून खाणे अपेक्षित नाही. कुठल्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी वाफवलेले खजूर द्या किंवा छोटे छोटे तुकडे करा.

 • गुदमरण्याचा धोका टाळण्यासाठी बाळाला खजुराचे छोटे छोटे तुकडे द्या
 • गोड पिकलेले खजूर मॅश करून द्या. कच्च्या खजुराची शिफारस केली जात नाही कारण त्यात टॅनिन असते त्यामुळे बाळाचे पोट बिघडू शकते
 • बाळाला घनपदार्थांची ओळख करून देत असताना लगेच बाळाला खजुराची ओळख करून देऊ नका. आधी खजुराचे छोटे छोटे तुकडे द्या आणि प्रमाण वाढवण्यापूर्वी बाळाला त्याचा कसा आनंद होतो हे पहा
 • सुरवातीपासूनच बिया नसलेल्या खजुराची निवड करा
 • आपल्या छोट्या बाळाला खजूर दिल्यानंतर पहिल्या २४ तासांत कोणत्याही प्रकारची ऍलर्जी बाळाला होत नाही ना ते पहा
 • बाळाला खजूर देण्यापूर्वी बालरोग तज्ञाचा सल्ला घ्या
 • खजुराची गुणवत्ता तपासा. त्यांना जंतू आणि धूळमुक्त ठेवण्यासाठी त्वचा किंवा बाह्य कवच नसल्यामुळे त्यांना पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा
 • बाळाला चांगले चावता येऊ लागल्यानंतर त्यास कच्चे खजूर देण्यास सुरुवात करा
 • खजुराचा पोत चिकट असल्याने ते बाळाच्या दात चिकटतात. त्यामुळे दात किडण्यास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. आपल्या बाळाला खजूर खायला दिल्यानंतर पाणी पाजावे कारण त्यामुळे त्यांचे दात स्वच्छ होतात आणि तोंडात राहिलेल्या गोष्टींपासून सुटका होते

बाळांना खजूर कसे द्यावेत?

सुरुवातीला मॅश केलेले किंवा उकडलेले खजूर बाळाला द्या. ते उकळू नका कारण त्यामुळे खजुरामधील सगळी पोषणमूल्ये नष्ट होतील. बाळ चावायला शिकल्यावर बाळाला कच्चे खजूर देण्यास सुरुवात करा.

आपण प्युरीच्या स्वरूपात देखील बाळाला खजूर देऊ शकता. खाली प्युरी बनविण्याची एक कृती खाली दिली आहे:

बाळांना खजूर कसे द्यावेत?

 • खजूर रात्री पाण्यात भिजवा
 • त्यांना पाण्यातून काढा आणि बाजूला ठेवा
 • ब्लेंडर किंवा मिक्सरमध्ये बाळांसाठी खजुराची प्युरी बनवा
 • प्युरीमध्ये खजूर ज्या पाण्यात भिजवले होते ते पाणी घाला आणि घट्ट पेस्ट बनवा

बाळांसाठी खजुराचा ज्यूस बनविणे

बाळांसाठी खजुराचा ज्यूस बनविणे

 • छोट्या वाटीत खजूर घाला आणि त्यात कोमट पाणी घाला, ३० मिनिटे तसेच राहूद्या
 • खजूर भिजल्यानंतर पाणी काढून टाका
 • फिल्टर केलेल्या पाण्यात थोडा लिंबाचा रस घालून हायस्पीड ब्लेंडरमध्ये मिक्स करा
 • ४५६० सेकंदांसाठी ब्लेंड करा. आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला

तुम्ही खजुराची पेस्ट देखील बनवू शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवू शकता.

तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात खजुराचा समावेश खालील प्रकारे करू शकता:

 • दुधात खजूर घाला आणि मिल्कशेक करा
 • दह्यासाठी टॉपिंग म्हणून वापरा किंवा एक स्मूदी बनवा
 • खजूर मफिन मध्ये घालून बेक केले जाऊ शकतात

खजूर पोषक असतात, त्यामुळे बाळांच्या वाढीस मदत होते. ताप येत असल्यास खजूरामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. तुम्ही प्युरी, शेक किंवा ज्यूसच्या स्वरूपात देखील बाळाला खजूर देऊ शकता. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या बाळास ह्या पौष्टिक आणि चवदार अन्नाची ओळख करुन द्या.

आणखी वाचा:

बाळांसाठी नाचणी – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती
बाळांसाठी जायफळ – फायदे आणि कसे वापरावे?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article