Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात चिकू (सपोटा) खाणे हानिकारक आहे का?

गरोदरपणात चिकू (सपोटा) खाणे हानिकारक आहे का?

गरोदरपणात चिकू (सपोटा) खाणे हानिकारक आहे का?

तुम्ही गरोदरपणात चिकू (सपोटा) खाण्याविषयी विचार करत आहात का?  तुम्ही गरोदर असताना, तुम्ही काय खात आहात ह्यावर लक्ष ठेवणे हा तुमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. गरोदर असताना तुम्‍ही तुमच्‍या आहारात समावेश केला पाहिजे आणि वगळले पाहिजेत अश्या खाद्यपदार्थांची यादी डॉक्टर तुम्हाला देतात. काही खाद्यपदार्थ गरोदरपणात पूर्णपणे टाळले पाहिजेत, तर काही खाद्यपदार्थ तुमच्यासाठी आणि बाळासाठी खूप फायदेशीर असतात. जरी गरोदरपणात बहुतेक फळे खाण्याची शिफारस केली जात असली तरी काही फळे खाणे काटेकोरपणे टाळली पाहिजेत. अनेक स्त्रियांना गरोदरपणात चिकू खाणे सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न पडतो. तुम्ही गरोदर असताना चिकू खाऊ शकता का ते जाणून घेऊया.

गरोदरपणात चिकू खाणे सुरक्षित आहे का?

मी गरोदरपणात चिकू खाऊ शकते का?  गरोदरपणात चिकू खाणे चांगले आहे का? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर, होय तुम्ही गरोदर असताना चिकू खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. चिकू खाणे खरे तर तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी खूप चांगले आहे. चिकू विविध पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे ते गर्भवती स्त्रियांसाठी एक प्रकारचे सुपरफूड बनते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या कॅलरी असतात, तसेच चिकू हे अँटिऑक्सिडंट्सने देखील समृद्ध असतात.

चिकूचे पौष्टिक मूल्य

100 ग्रॅम चिकू मधील पौष्टिक घटक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

पौष्टिक घटक मूल्य
ऊर्जा 83 किकॅलरी
चरबी 1.1 ग्रॅम
कर्बोदके 19.9 ग्रॅम
प्रथिने 0.44 ग्रॅम
फायबर 5.3 ग्रॅम
फोलेट्स 14 मिग्रॅ
व्हिटॅमिन ए 18 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी 14.7 मिग्रॅ
नियासिन 0.2 मिग्रॅ
रिबोफ्लेविन 0.02 मिग्रॅ
थायामिन 0.058 मिग्रॅ
सोडियम 12 मिग्रॅ
पोटॅशियम 193 मिग्रॅ
कॅल्शियम 21 मिग्रॅ
तांबे 0.086 मिग्रॅ
लोह 0.8 मिग्रॅ
मॅग्नेशियम 12 मिग्रॅ
फॉस्फरस 12 मिग्रॅ
जस्त 0.1 मिग्रॅ

स्रोत: https://nutritiondata.self.com/facts/fruits-and-fruit-juices/2061/2

गर्भवती स्त्री एका दिवसात किती चिकू खाऊ शकते?

कुठलाही पदार्थ प्रमाणात खाणे ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, केवळ तुम्ही गरोदर असतानाच नाही तर इतर वेळी सुद्धा हा नियम लागू होतो. चिकूचे तुम्ही किती प्रमाणात सेवन करू शकता हे तुमचे वजन आणि वय यावर अवलंबून असते. परंतु, तुम्ही तुमच्या आहार तक्त्याच्या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषत: जेव्हा तुम्ही गर्भवती असता तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. चिकूचे फायदे मिळण्यासाठी, दररोज तुम्ही 100-120 ग्रॅम चिकूचे सेवन केले पाहिजे.

गरोदरपणात चिकू खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

आता तुम्हाला गरोदरपणात चिकू खाणे सुरक्षित आहे ह्याबाबत खात्री झालेली आहे, आता आपण गरोदरपणात चिकू खाण्यावर चर्चा करूया का?

1. उर्जेचे पॉवरहाऊस

गरोदरपणात चिकूचा हा सर्वात मोठा फायदा आहे. चिकूमध्ये फ्रक्टोज आणि सुक्रोज मुबलक प्रमाणात असते. चिकूमुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते. म्हणूनच चिकू नाश्त्यासाठी खाणे उत्तम आहे.

2. पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते

जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे दररोज चिकू खाणे. कारण चिकू खाल्ल्याने आतड्यांच्या समस्यांचा सामना करता येतो.

3. हाडे मजबूत होतात

चिकूचे पौष्टिक घटक पाहिले असता चिकू हा कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. हाडांचे आरोग्य राखण्यासाठी ही खनिजे महत्त्वाची आहेत.

4. जिवाणू संक्रमण प्रतिबंधित करते

तुमच्या गरोदरपणात संसर्ग रोखण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चिकू खाणे. चिकूमध्ये पॉलीफेनॉलिक अँटिऑक्सिडंट्स असतात. आणि ते जिवाणूंच्या संसर्गास प्रतिबंध करतात.

5. तणाव कमी होतो

बहुतेक गर्भवती महिला तणावाची तक्रार करतात. चिकू हे नैसर्गिक शामक आहे आणि मज्जातंतूंना शांत करते हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. चिकूमुळे तणाव देखील कमी होतो.

6. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

चिकू हा एक नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. चिकूमुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी चिकूमुळे मदत होते.

7. रक्तदाब नियंत्रित करते

गरोदर स्त्रियांना रक्तदाबाच्या चढ उताराला सामोरे जावे लागते. चिकूमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. हे घटक रक्तदाबाच्या योग्य नियमनासाठी खूप महत्वाचे असतात.

8. मळमळ कमी करते

जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर चिकू खाणे योग्य ठरू शकते. चिकू खाल्ल्याने  तुम्हाला मळमळ आणि चक्कर येणे कमी होते.

9. अशक्तपणाशी सामना

गरोदरपणात चिकूच्या रसाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला खूप फायदा होतो. हे फळ ऊर्जा देणारे आहे तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. चिकू खाल्ल्याने तुम्हाला थकवा आणि सामान्य अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल.

चिकूंची निवड आणि साठवणूक कशी करावी?

सर्व फळांसाठी एकच नियम आहे, तुम्हाला फळांमधून पोषणातून सर्वोत्तम मिळवायचे असेल, तर फळे ताजी खाल्ली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त तीन ते चार दिवस चिकू साठवून ठेवू शकता. जर तुमच्यासाठी हे कठीण असेल, तर तुम्ही किंचित न पिकलेले चिकू खरेदी करू शकता आणि ते पिकल्यावर खाऊ शकता. फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा. फळ हलकेच दाबून ते मऊ असल्याची खात्री करा. फळ जितके मऊ तितके ते खाण्यासाठी तयार होते. सुरकुत्या पडलेल्या किंवा तुटक्या सालाची फळे घेऊ नका.

तुम्ही चिकू सामान्य तापमानावर काही दिवस ठेवू शकता, परंतु तुम्ही ते एका आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. फळे थेट सूर्यप्रकाशापासून दूर अश्या थंड आणि कोरड्या जागी ठेवल्याची खात्री करा

चिकूंची निवड आणि साठवणूक कशी करावी

गरोदरपणात चिकू खाण्याचे दुष्परिणाम

जास्त प्रमाणात काहीही खाल्ले कि ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. चिकूचे अति प्रमाणात सेवन केल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. गरोदरपणात चिकूखाण्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे:

 1. चिकूमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यावर तुमचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकते.
 2. चिकूमध्ये सुक्रोज आणि फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असते. चिकूचे जास्त सेवन केल्याने आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि गर्भावस्थेतील मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
 3. जास्त प्रमाणात सेवन केल्याने गर्भवती स्त्रियांना अतिसार देखील होऊ शकतो.

हेल्दी चिकू मिल्कशेक रेसिपी

ही मिल्कशेक रेसिपी पौष्टिक, चविष्ट आणि तुमची रोजची पोषकतत्त्वे मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. शिवाय, गरम हवामानात हा मिल्कशेक थंड आणि ताजातवाना करणारा आहे. हा चिकू मिल्कशेक ताजा असताना त्याचे सेवन करणे चांगले आहे, पण गरज भासल्यास तुम्ही हा मिल्कशेक 24 तासांपर्यंत फ्रीजमध्येही ठेवू शकता.

साहित्य:

 • चिकू (पिकलेले)- २
 • दूध – १/२ कप
 • बर्फ – 3/4चौकोनी तुकडे
 • मध/मॅपल सिरप- आवश्यकतेनुसार

सूचना:

 1. चिकू पूर्णपणे चांगले स्वच्छ धुवा आणि साल काढून टाका.
 2. चिकूचे लहान चौकोनी तुकडे करा आणि सर्व बिया काढून टाका.
 3. चिकूचे चौकोनी तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवा आणि त्यात अर्धे दूध घाला.
 4. एक ते दोन मिनिटे ब्लेंडरमध्ये घालून मिक्स करून घ्या.
 5. उरलेले दूध घालून पुन्हा मिक्स करा.
 6. ते पुरेसे गोड आहे का ते तपासा. नसल्यास आवश्यकतेनुसार मध घाला.
 7. बर्फाचे तुकडे घाला.
 8. मिल्कशेक तयार होईपर्यंत मिक्सरमध्ये मिक्स करा
 9. एका काचेच्या ग्लास मध्ये काढून घ्या  आणि आनंद घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. मला गरोदरपणात चिकूची ऍलर्जी होऊ शकते का?

होय, एक शक्यता आहे. ऍलर्जी एकतर आनुवंशिक किंवा गर्भारपणामुळे तात्पुरती असू शकते.

2. गरोदरपणात चिकू खाल्ल्याने गरोदरपणातील मधुमेह होतो का?

चिकूमध्ये फ्रक्टोज आणि सुक्रोज असते. तसेच इतर पौष्टिक घटक सुद्धा असतात. जास्त प्रमाणात चिकूचे सेवन केल्यास किंवा तुमच्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यास, तुम्ही गरोदरपणात चिकू खाताना काळजी घ्यावी कारण त्यामुळे गरोदरपणातील मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तुमच्या डॉक्टरांकडून चिकूचे सेवन किती प्रमाणात केले पाहिजे ते जाणून घ्या.

3. मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी मी चिकू खाऊ शकते का?

गरोदरपणात चिकू हे फळ खनिजे आणि इलेक्ट्रोलाइटचा समृद्ध स्रोत आहे. मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी आणि सकाळी तुमच्या जिभेची चव चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

4. स्तनपानादरम्यान चिकू खाणे योग्य आहे का?

होय अगदीच! बाळाला स्तनपान करीत असतानाच्या कालावधीत चिकू खाल्ल्यास, तो तम्हाला दिवसभर मिळवून देणारा उर्जेचा एक अद्भुत स्त्रोत आहे कारण स्तनपान केल्याने काहीवेळा आईची ऊर्जा कमी होऊ शकते. पोषक घटक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे फळ आईने खाल्ल्यास ते बाळासाठी सुद्धा चांगले असते.

गरोदरपणात चिकू हे फळ खाण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमचे आरोग्य, वजन आणि वय इत्यादी घटकांनुसार, तुमचे डॉक्टर तुम्हाला हे फळ कमी प्रमाणात खावे कि पूर्णपणे टाळावे हे सांगतील.

आणखी वाचा:

गरोदरपणात पेरू खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात डाळिंब खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article