Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांना बदामाचे दूध देणे सुरक्षित आहे का?

बाळांना बदामाचे दूध देणे सुरक्षित आहे का?

बाळांना बदामाचे दूध देणे सुरक्षित आहे का?

बदामाच्या दुधाचे पौष्टिक मूल्यदूध हा तुमच्या बाळाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे आईचे दूध असू शकते किंवा फॉर्मुला मिल्क असू शकते. जसजशी तुमच्या बाळाची वाढ होते तसे तुम्ही गाईचे दूध, सोया दूध किंवा बदामाचे दूध असे इतर पर्याय देखील वापरून पाहू शकता. उदा: जर तुम्ही तुमच्या बाळाला बदामाचे दूध देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. ह्या लेखात, तुम्ही तुमच्या बाळाला बदामाचे दूध द्यावे का ह्याविषयी माहिती सांगितली आहे. तसेच बदामाच्या दुधाचे पौष्टिक मूल्य, फायदे आणि काही अधिक माहिती सुद्धा ह्या लेखात दिलेली आहे. ह्या लेखाच्या शेवटी, आम्ही काही पाककृती सांगितल्या आहेत.  तुमच्या बाळासाठी तुम्ही बदामाचे दूध वापरून ह्या पाककृती घरी बनवण्याचा प्रयत्न करू शकता.

बदामाचे दूध म्हणजे काय?

नावाप्रमाणेच बदामाचे दूध हे बदामापासून तयार करतात. बदाम बारीक करून त्यामध्ये पाणी, साखर आणि इतर घटक टाकून हे दूध तयार केले जाते. अलीकडच्या काळात, बदामाच्या दुधाची लोकप्रियता वाढली आहे आणि त्यामुळे, बरेच पालक त्यांच्या बाळांसाठी बदामाच्या दुधाची निवड करतात.

तुम्ही बाळांना बदामाचे दूध देऊ शकता का?

बदामाचे दूध बाळांसाठी चांगले आहे का? तर ह्याचे उत्तर होय असे आहे. हे दूध बाळांसाठी चांगले आहे. काही कारणांमुळे तुम्ही स्तनपान करू शकत नसाल, तर एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी फॉर्म्युला मिल्क हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु, जर तुमचे बाळ एक वर्षापेक्षा जास्त वयाचे असेल, तर तुम्ही तुमच्या बाळाला सुरक्षितपणे बदामाचे दूध देऊ शकता. तुमच्या बालरोगतज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच ते बाळाला दिले पाहिजे.

बदामाच्या दुधाचे पौष्टिक मूल्य

बदामाच्या दुधाचे पौष्टिक मूल्य

बदामामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात. 100 ग्रॅम बदामामधून अंदाजे 570 कॅलरीज मिळू शकतात. 100 ग्रॅम बदामात तुम्हाला खालीलप्रमाणे पोषण मिळू शकते.

 • कार्बोहायड्रेट – 3ग्रॅम
 • प्रथिने – 19ग्रॅम
 • चरबी – 50ग्रॅम
 • आहारातील फायबर – 12ग्रॅम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आणि इतर विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात.

तुम्ही बाळाला कोणत्या वयात बदामाचे दूध देऊ शकता?

बाळांना बदामाचे दूध कधी मिळू शकते ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटते आहे का? तुम्ही तुमच्या बाळाला एक वर्षाचे झाल्यावर बदामाचे दूध द्यायला सुरुवात करू शकता. त्याआधी तुम्ही त्याला बदामाचे दूध देऊ नका. बदामाचे दूध हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा एक उत्तम स्रोत आहे आणि त्यामुळे ते तुमच्या वाढत्या बाळाच्या हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु, बदामाच्या दुधात प्रोटीनची कमतरता असते. म्हणूनच, जर तुमच्या बाळाला इतर अन्नपदार्थांमधून पुरेसे पोषण आणि प्रथिने मिळत असतील तर तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात बदामाच्या दुधाचा समावेश करू शकता.

लहान बाळांसाठी बदामाच्या दुधाचे आरोग्यविषयक फायदे

लहान बाळांसाठी बदामाच्या दुधाचे काही आरोग्यविषयक फायदे इथे दिलेले आहेत:

 • ज्या बाळांना दुधाच्या पदार्थाची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी बदामाचे दूध हा उत्तम पर्याय आहे.
 • योग्य प्रमाणात सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी बदाम उपयुक्त ठरतात.
 • बदामामध्ये रिबोफ्लेविन आणि एल-कार्निटाईन असते, आणि ते बाळाच्या मेंदूच्या चांगल्या विकासासाठी उपयुक्त आहे.
 • बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि मधुमेहापासून दूर राहण्यासाठी ते उपयुक्तठरते. साखरेच्या सेवनाने मधुमेह होत नसला तरी, बदाम खाल्ल्याने मधुमेह टाळला जातो.

तुम्ही तुमच्या बाळाला बदामाचे दूध कसे देऊ शकता?

बाळ वर्षाचे झाल्यावर तुम्ही बाळाला काजू देण्यास सुरुवात करू शकता. बाळाला बदाम देणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. दुधाच्या स्वरूपात देखील तुम्ही बाळाला बदाम देऊ शकता. तुम्ही तुमच्या लहान बाळाला बदामाचा थोडासा भाग देऊन किंवा स्नॅक म्हणून बदाम देण्यास सुरुवात करू शकता. तुम्ही फुलकोबी सारख्या भाज्या बदामाच्या दुधात प्युरी करून बाळाला देऊ शकता. बदामाचे दूध भाज्या, लापशी किंवा स्मूदीमध्ये घालून बाळाला दिले जाऊ शकते. पण तुमच्या बाळाच्या आहारात बदामाचा समावेश करण्यापूर्वी बाळाला त्याची ॲलर्जी नाही ना ह्याची खात्री करा.

लहान बाळांसाठी बदामाच्या दुधाचे दररोज सेवन

बदामाचे दूध किंवा कोणत्याही प्रकारचे दूध एका वर्षाच्या बाळाच्या मुख्य जेवणाची जागा घेऊ शकत नाही आणि म्हणूनच बाळाला बदामाचे दूध एक पूरक अन्न म्हणून दिले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी बदामाचे दुधाची किंवा इतर कोणत्याही दुधाची निवड करीत असाल तर तुम्ही बाळाला एका दिवसात दोन ते तीन सर्व्हिंग किंवा 16 ते 24 औंस दूध पेक्षा जास्त दूध देऊ नये. ह्याचे कारण म्हणजे बाळाला जास्त प्रमाणात दूध दिल्यास बाळाची भूक कमी होईल आणि बाळ घनपदार्थ कमी प्रमाणात खाईल. याचा अर्थ तुमच्या बाळाला त्याच्या आहारातून पुरेसे लोह मिळणार नाही.

बदामाच्या दुधाची आईच्या दुधाशी तुलना

आईचे दूध हे तुमच्या बाळासाठी सर्वोत्कृष्ट दूध आहे कारण त्यात बाळाला सहा महिन्यांच्या वयापर्यंत आवश्यक असलेले सर्व आवश्यक पोषक घटक असतात. बाळ एक वर्षांचे होईपर्यंत बाळाला त्याचे पौष्टिक फायदे देखील मिळतात. बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला फक्त आईचे दूध द्यावे. नंतर हळू हळू तुम्ही बाळाला घनपदार्थ देऊ शकता. परंतु, तुमचे बाळ एक वर्षापर्यंत बाहेरचे कोणत्याही प्रकारचे दूध बाळाला पाजू नये.

बदामाच्या दुधाची गाईच्या दुधाशी तुलना

बदामाचे दूध हे व्हिटॅमिन ए आणि डी चा एक उत्तम स्त्रोत आहे आणि अशा प्रकारे लैक्टोज असहिष्णु असलेल्या बाळांसाठी तो एक चांगला पर्याय आहे. परंतु, गाईच्या दुधाच्या तुलनेत बदामाच्या दुधात कॅल्शियम आणि प्रथिने कमी असतात. म्हणून, जर तुमच्या बाळाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला बदामाचे दूध देण्याचा विचार करू शकता.

1 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या बाळांसाठी बदामाच्या दुधाच्या पाककृती

1 वर्षाच्या बाळासाठी बदामाचे दूध वापरून पाककृती कशी बनवायची याचा विचार तुम्ही करत आहात का? आम्ही तुमच्यासाठी पाककृती पाठवलेली आहे:

तुम्हाला काय लागेल?

 • बदाम
 • दूध
 • वेलची पावडर/केशर
 • साखर

तयारी कशी करावी?

 1. काही बदाम रात्रभर भिजत ठेवा. बदामाचे साल काढून टाका आणि थोडे दूध घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
 2. पॅनमध्ये थोडे दूध घालून उकळवा आणि नंतर त्यात बदामाची पेस्ट घाला.
 3. थोडा वेळ शिजवा आणि चवीसाठी केशर किंवा वेलची पावडरतसेच चवीनुसार साखर घाला.
 4. तुम्ही हे बदामाचे दूध तुमच्या बाळाला देऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1 वर्षाच्या मुलांसाठी बदामाच्या दुधाबद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न येथे आहेत:

1. लहान बाळे फॉर्म्युल्याऐवजी बदामाचे दूध पिऊ शकतात का?

बदामाचे दूध बाळांना पूरक म्हणून दिले जाऊ शकते परंतु ते आईचे दूध किंवा फॉर्म्युला दुधाची जागा घेऊ शकत नाही. याचे कारण असे की फॉर्म्युला मिल्कमध्ये तुमच्या बाळाच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेले पोषक घटक असतात आणि बदामाच्या दुधात या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो.

2. नट ऍलर्जी असलेल्या मुलासाठी बदामाचे दूध हानिकारक आहे का?

काही बाळांना नट ऍलर्जी असते आणि बदामाचे दूध बदामापासून बनवले जाते. म्हणूनच, जर तुमच्या बाळाला नट ऍलर्जी असेल तर बदामाचे दूध देऊ नका.

3. बदामाचे दूध हा चरबीचा चांगला स्रोत आहे का?

तुमच्या बाळासाठी बदामाचे दूध हा एक चांगला पर्याय आहे आणि ते व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. परंतु, जर तुम्ही तुमच्या बाळासाठी चरबीचा चांगला स्रोत शोधत असाल तर बदामाचे दूध हा योग्य पर्याय नाही कारण बदामाच्या दुधामध्ये कॅलरी आणि प्रथिने कमी असतातच पण त्यामध्ये चांगल्या फॅट्सचीही कमतरता असते. हे फॅट्स तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

4. दुधाची ऍलर्जी किंवा लैक्टोज असहिष्णुता असलेल्या मुलांसाठी बदामाचे दूधहा पर्याय असू शकतो का?

जर तुमचे बाळ लैक्टोज असहिष्णु असेल किंवा त्याला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर तुम्ही त्याला बदामाचे दूध देण्याचा विचार करू शकता. परंतु, तुम्ही तुमच्या बाळासाठी शुगर-फ्री आणि कॅल्शियम-फोर्टिफाइड पर्यायाची निवड करावी.

5. मी माझ्या बाळासाठी बदामाच्या दुधात अन्नपदार्थ शिजवू शकतो का?

होय, तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी बदामाच्या दुधात पदार्थ शिजवू शकता.

बदामाचे दूध हे लहान बाळांसाठी चांगले असते. परंतु बाळाला बदामाचे दूध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते. बाळ एक वर्षाचे झाल्यानंतरच त्याला बदामाचे दूध द्या.

आणखी वाचा:

बाळांसाठी गाईचे दूध
बाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी
बाळांसाठी सोया दूध: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article