Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य महाशिवरात्री २०२२ – केव्हा आणि कशी साजरी केली जाते आणि ह्या दिवशी कुठले अन्नपदार्थ खावेत?

महाशिवरात्री २०२२ – केव्हा आणि कशी साजरी केली जाते आणि ह्या दिवशी कुठले अन्नपदार्थ खावेत?

महाशिवरात्री २०२२ – केव्हा आणि कशी साजरी केली जाते आणि ह्या दिवशी कुठले अन्नपदार्थ खावेत?

हिंदू पौराणिक कथांनुसार, अशी एक दैवी शक्ती आहे जी अवघ्या विश्वावर राज्य करीत असते आणि ही ऊर्जा किंवा दैवी अस्तित्व शिवम्हणून ओळखले जाते. महाशिवरात्री हा सर्वात महत्त्वाचा हिंदू उत्सव आहे. हा उत्सव शिवभक्त उत्साहाने साजरा करतात. तुम्हाला ह्या पवित्र हिंदू उत्सवाचे महत्व आणि त्याच्याशी संबंधित विधी जाणून घ्यायचे असतील तर पुढील लेख वाचा.

शिवरात्री कधी आणि का साजरी केली जाते?

भगवान शिव असलेल्या परम शक्तीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी महाशिवरात्र साजरी केली जाते. हा उत्सव दरवर्षी हिंदू पंचनाग किंवा दिनदर्शिकेनुसार फाल्गुनमहिन्याच्या कृष्णपक्षाच्या १३ व्या रात्री किंवा कृष्णपक्षच्या १४व्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी महाशिवरात्री गुरुवार दिनांक १ मार्च २०२२ रोजी आहे.

तुम्ही महा शिवरात्रीची सविस्तर माहिती शोधत असाल किंवा हा सण का साजरा केला जातो ह्यामागची कारणे शोधत असाल तर, ह्या सणासंबंधी काही कथा किंवा समजुती येथे दिलेल्या आहेत.

. देवी पार्वतीशी भगवान शंकर यांचे लग्न साजरे करणे

या उत्सवाविषयी एक समज असा आहे की ह्या दिवशी भगवान शंकर ह्यांनी देवी पार्वतीशी लग्न केले. हे दैवी प्रेम साजरे करण्यासाठी विवाहित महिला आपल्या पतींसोबतच्या शाश्वत बंधनासाठी उपवास करतात आणि अविवाहित मुली शंकरासारखे आदर्श पती मिळावे या आशेने उपवास करतात.

. भाविकतेचा सन्मान करणे

एका प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की निराकार देव या शुभ दिवसाच्या मध्यरात्री लिंगम किंवा ‘लिंगोडभव मूरती’ या दिव्य स्वरुपात प्रकट झाले. दैवी शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आपण हा सण का साजरा केला जातो याची तपशीलवार माहिती किंवा कारण शोधत असाल तर, या सणाच्या संदर्भातील काही कथा किंवा श्रद्धा येथे दिलेल्या आहेत.

भाविकतेचा सन्मान करणे

. हा दिवस साजरा करण्यासाठी भगवान शिव यांनी विनाशातून जगाचे जतन केले

पवित्र शास्त्रानुसार, जेव्हा समुद्र आणि देवदानवांनी मंथन केले तेव्हा प्राणघातक विषाचे भांडे सापडले. हे विष इतके प्राणघातक होते की ते सहजपणे संपूर्ण जगाचा नाश करू शकत होते. जगाला विनाशापासून वाचवण्यासाठी भगवान शिवाने विष पिऊन आपल्या कंठात ठेवले. यामुळे त्याला नीलकंठम्हणजेच निळ्या रंगाचा कंठ असलेला संबोधले जाते. म्हणूनच, हा दिवस सर्वशक्तिमान देवाच्या त्यांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल आभार मानण्यासाठी साजरा केला जातो.

महाशिवरात्रीच्या दिवशी करावयाचे उपक्रम

लोक विविध प्रकारे महाशिवरात्रि उत्सव किंवा महाशिवरात्रि पर्वाचा सन्मान करतात आणि उत्सव साजरा करतात. हा दिवस साजरा करण्यासाठी लोक काही क्रियाकलाप करतात ते येथे देत आहेतः

  • लोक व्रत करतात कारण हिंदू पौराणिक कथांमध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. असा विश्वास आहे की उपवास केवळ ध्यान स्थितीत जाण्याचा आणि दैवी अस्तित्वाचा थेट संबंध अनुभवण्याचा एक उत्तम मार्ग नाही तर आपल्या मनाने आणि शरीराने शांती मिळवण्यास मदत देखील करतो.
  • लोक शिव लिंग किंवा भगवान शिव यांच्या दिव्य प्रतीकाची पूजा करतात.
  • लोक मंदिरात जाऊन त्यांची प्रार्थना करतात आणि मंत्रांचा जप करतात.
  • या प्रसंगी ग्रहांची स्थिती देखील खूप शुभ मानली जाते, कारण ह्या काळात आपल्या शरीरात उर्जेची तीव्रता वाढते. बरेच लोक ग्रहांच्या ह्या स्थितीचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ध्यान करण्यास प्राधान्य देतात. हे देखील मानले जाते की या दिवशी ध्यानाला खूप महत्त्व आहे कारण तो भगवान शंकराची उपासना करण्याचा एक आदर्श मार्ग आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी करावयाचे उपक्रम

घरी महाशिवरात्री पूजा कशी करावी?

तुम्ही मंदिरात किंवा घरात प्रार्थना करू शकता. तथापि, तुम्हाला घरी पूजा करायची असल्यास आणि योग्य प्रक्रिया व मंत्र ह्यांची माहिती हवी असल्यास किंवा घरी महाशिवरात्र कशी साजरी करावी हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही काय केले पाहिजे हे इथे दिलेले आहे.

प्रक्रिया

लोक किंवा भक्त आपल्या प्रिय देवतांना विविध प्रकारचे नैवेद्य दाखवतात आणि प्रार्थना करतात. आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. भक्त सहसा काळे तीळ घातलेले उकळलेले पाणी वापरतात. नवीन कपडे घालावेत. काही लोक या दिवसासाठी नवीन कपडे विकत घेतात. दिवसभर उपवास केला जातो आणि शिवपूजनही केले जाते. देशातील विविध भागातील लोक वेगवेगळ्या प्रकारे देवतांची पूजा करतात किंवा प्रार्थना करतात. तथापि, प्रार्थना करण्यापेक्षा आपली खरी भावना आणि आपल्या भक्तीची शुद्धता महत्वाची आहे ज्याला प्रमुख महत्त्व आहे. लोक खालील प्रकारे शंकराची प्रार्थना करतात.

  • शिवलिंगाला पाणी, दही, दूध आणि मध यांनी स्नान घालतात. काही लोक हा विधी दिवसभर चार भागांत करतात.
  • आंघोळीच्या विधी नंतर शिवलिंग कुंकवाने सुशोभित केले जाते. चंदनही वापरता येते.
  • निरनिराळ्या प्रकारच्या फळांचा प्रसाद पवित्र व शुद्ध मानला जातो. फळे हि इच्छा आणि दीर्घायुष्य पूर्ण करण्याचे प्रतीक आहे.
  • फळांव्यतिरिक्त बेल पत्रआणि धोत्राअर्पण करणे अनेक परंपरा आणि संस्कृतीत आवश्यक मानले जाते. शंकराच्या पिंडीला बेलाची पाने वाहिल्याने समाधान प्राप्त होते.
  • धूप पेटवले जाते. हे संपत्ती आणि कीर्तीचे प्रतीक आहे.
  • तूप दिवेही लावले जातात. दिवे शाश्वत ज्ञान आणि परमानंद यांचे प्रतीक आहेत.

शिवलिंगाला पाणी, दही, दूध आणि मध यांनी स्नान घालतात
शिवभक्तांचा असा विश्वास आहे की भगवान शिव अत्यंत निर्दोष आहेत आणि प्रेम व भक्तीने सहज आनंदित होतात
. या कारणास्तव, भगवान शिव देखील प्रेमळपणे भोलेनाथम्हणून ओळखले जातात. जर तुमचे हृदय शुद्ध असेल आणि तुमचे हेतू स्पष्ट असतील तर सर्वशक्तिमान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त प्रार्थना करा.

मंत्र

महाशिवरात्री मंत्राचे महत्त्व असे काहीतरी आहे जे चुकवता येत नाही. हे मंत्र केवळ दैवी भावनांना जागृत करतात असे नाही तर त्यामुळे अफाट सकारात्मक कंपने तयार होतात आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भावना दूर करण्यास मदत होते. ‘ओम नमः शिवायऊर्जेची पातळी वाढविण्यात मदत करणारा एक सर्वात प्रभावी मंत्र आहे. प्रेम आणि शांती दर्शविणारा, संपूर्ण विश्वाचा आवाज ओमप्रतिध्वनी करतो. मंत्रातील इतर अक्षरे पाच घटक दर्शवितात. म्हणूनच, जेव्हा आपण या मंत्राचा जप करता तेव्हा आपल्या शरीराद्वारे उर्जा संपूर्ण विश्वाच्या अनुरुप होते. लोक भगवान शिवाच्या सर्व १०८ नावांचा जप करतात, शिव चालीसाचे पठण करतात आणि शिव आरती करतात. लोक मंत्रोच्चार करतात आणि दिवसा व रात्रीही प्रार्थना करतात. येथे दिलेल्या काही प्रसिद्ध मंत्रांचे पठण केले जाऊ शकते.

शिव वंदना:

ओम वंदे देव उमापती सुरगुरु वंदे जगत्कर्णम्
वंदे पन्नाग्भोशन मृगधर वंदे पाशोना पथिम
वंदे सूर्य शशांक वाहनी नयन वंदे मुकुंदप्रियाम
वंदे भक्त जनआश्रया च वरदाम वंदे शिवशंकरम

शिव मूल मंत्र:

ओम नमः शिवाय

महामृत्युंजय मंत्र:

ओम त्र्यंबकं याजामहे सुगंधिम पुष्टीवर्धनम्
ऊर्वरूकमीया बंधनन मृत्युमुर्क्षिया ममृतात्

शिवरात्रीचा उपवास करताना आपण काय खाऊ शकता?

काही लोक ह्या धार्मिक दिवशी उपवास करतात. जर तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासाला चालणाऱ्या पदार्थांचे सेवन तुम्ही केले पाहिजे. ह्यामध्ये फळ, दूध आणि कोरडे फळ इत्यादींचा समावेश आहे. काही लोक साबुदाण्याची खीर बनवतात आणि रामदान्याने तयार केलेले पदार्थ सुद्धा खातात. उपवास संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी नियमित अन्न खावे.

ह्या भारतीय सणाचे महत्व सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. तथापि, या सर्व कथांमध्ये भगवान शंकरांचे दैवी अस्तित्व आणि महत्व सांगितलेले आहे.

श्रद्धा आणि भक्ती साजरी करण्यासाठी आणि अध्यात्माच्या मार्गावर राहण्यासाठी आपण महा शिवरात्रीसारखे सण साजरे करतो. आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

आणखी वाचा: महाशिवरात्री – तुमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी मेसेजेस, शुभेच्छासंदेश आणि कोट्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article