Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी जव (बार्ली): निवड कशी करावी, फायदे, पाककृती आणि बरेच काही

बाळांसाठी जव (बार्ली): निवड कशी करावी, फायदे, पाककृती आणि बरेच काही

बाळांसाठी जव (बार्ली): निवड कशी करावी, फायदे, पाककृती आणि बरेच काही

जव (बार्ली) हा धान्याचा एक प्रकार आहे. ह्या धान्याची लागवड अनेक शतकांपासून जगाच्या विविध भागात केली जाते. जवाच्या अनेक जाती आज उपलब्ध आहेत. जवाच्या ह्या विविध जाती रशिया, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आढळतात. जव हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे जव बाळाच्या आहारात जोडले जाऊ शकते.

जवाचे पौष्टिक मूल्य

जव हे व्हिटॅमिन ए, फोलेट आणि प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे आणि त्यापासून खालील पोषक घटक मिळू शकतात.

पोषण घटक मूल्य प्रति १०० ग्रॅम पोषण घटक मूल्य प्रति १००ग्रॅम
पाणी . ४४ ग्रॅम ऊर्जा ३५४ किलो कॅलोरी
प्रथिने १२.५ ग्रॅम एकूण लिपिड .३ ग्रॅम
कार्बोहायड्रेट ७३.५ ग्रॅम कॅल्शियम ३३ मिग्रॅ
लोह .६ ग्रॅम मॅग्नेशियम १३३ मिग्रॅ
फॉस्फरस २६४ मिग्रॅ पोटॅशियम ४५३ मिग्रॅ
जस्त .७७ मिग्रॅ कॉपर .४९ मिग्रॅ
थायमिन .६४६ मिग्रॅ रिबोफ्लेविन . २८५ मिग्रॅ
नियासिन .६ मिग्रॅ व्हिटॅमिन बी ६ .३१८ मिग्रॅ
फोलेट १९ ug व्हिटॅमिन ए २२ आययू
व्हिटॅमिन ई . ५७ मिग्रॅ व्हिटॅमिन के .२ मिग्रॅ

आपल्या बाळाला जव (बार्ली) देणे सुरक्षित आहे का?

जव हे लहान मुलांसाठी चांगले अन्न मानले जाते, कारण बाळासाठी ते पोटभरीचे अन्न आहे आणि त्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म आहेत. तथापि, ग्लूटेन (एक प्रकारची प्रथिने) मुळे, आपल्या बाळासाठी जव हे प्राथमिक अन्न बनवणे योग्य नाही. जवामुळे बाळाच्या पचन संस्थेला समस्या येऊ शकतात असे पुरावे आहेत, कारण यामुळे सीलिएक रोगाचा धोका वाढतो (ग्लूटेनमुळे उद्भवणारा स्वयंप्रतिकार रोग). गव्हाची ऍलर्जी असलेल्या बाळांसाठी देखील याची शिफारस केली जात नाही. कारण गव्हाची ऍलर्जी आणि जवाची ऍलर्जी एकमेकांशी संबंधित असू शेतात.

तुमचे बाळ जव खाण्यास कधी सुरुवात करू शकते?

बाळ किमान सात ते आठ महिन्यांचे झाल्यावर जवाचे अन्नपदार्थ खाण्यास सुरुवात करू शकते. बाळाला जवाची ओळख करून देताना सुद्धा तुम्ही तीन दिवसांचा नियम पाळू शकता. म्हणजेच बाळाला एखादा नवीन पदार्थ दिल्यानंतर त्याची बाळाला ऍलर्जी तर येत नाही ना हे बघण्यासाठी तीन दिवस वाट पाहणे. जर बाळाला कुठलीही ऍलर्जीची लक्षणे दिसली तर बाळाला ह्या तीन दिवसात कुठलाही नवीन पदार्थ देऊ नका.

जव एक अष्टपैलू खाद्यपदार्थ आहे आणि बाळाच्या आवडीनुसार तुम्ही तो मऊ किंवा सरसरीत बनवू शकता. तथापि, थोड्या प्रमाणात, जवाच्या मऊ पदार्थानी तुम्ही सुरुवात करू शकता.

जवाचे (बार्ली) फायदे

लहान मुलांचे पोट लहान असते आणि ते एका वेळी फक्त थोड्या प्रमाणात अन्न खाऊ शकतात. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या बाळाचा आहार पौष्टिक बनविणे आवश्यक आहे! जव एक सुपरफूड आहे आणि त्यातून बाळाला भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळू शकतात. ह्याच कारणामुळे बाळाला जवाची पेज आवडते.

बाळांसाठी जवाचे काही महत्वाचे फायदे येथे दिलेले आहेत:

  • हाडे मजबूत होतात

जवामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस असल्यामुळे आपल्या बाळाची हाडे मजबूत करण्यास मदत होऊ शकते. कॅल्शियम नंतर, आपल्या हाडांसाठी फॉस्फरस आवश्यक असते.

  • पचन सुधारते

आहारातील तंतुमय पदार्थांचा हा एक समृद्ध स्त्रोत आहे. जव पचन सुलभ करण्यास आणि आपल्या मुलाच्या आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करू शकते. निरोगी पोट म्हणजे निरोगी बाळ!

  • लोहाचे शोषण वाढवते

जवामध्ये लक्षणीय प्रमाणात तांबे असते, आणि ते रक्तातील लोह शोषण्यास मदत करते. जर आपल्या बाळाच्या शरीरात लोहयुक्त अन्न योग्यरित्या शोषले जात नसेल तर ते खायला काही हरकत नाही.

  • यकृत मजबूत करते

अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की नियमितपणे जवाचा आहारात समावेश केल्यास यकृताचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. जवामुळे बाईल ऍसिडचे जास्त प्रमाणात होणारे उत्पादन कमी होते.

  • बुरशीविरोधी गुणधर्म आहेत

जवामध्ये विविध प्रकारचे जैवरासायनिक घटक असतात आणि ते त्यांच्या बुरशीविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात.

लहान मुलांसाठी जवाची निवड कशी करावी आणि ते कसे साठवावे?

साठवलेल्या आणि स्वयंपाक करण्याच्या हेतूसाठी हल्ल्ड आणि पर्ल बार्ली सर्वोत्तम पर्याय आहेत. हल्ल्ड बार्लीमध्ये अधिक पोषक घटक असतात, परंतु पर्ल बार्ली शिजवणे सोपे असते. दोन्ही जाती सूप, स्ट्यूज आणि रस्सा करण्यासाठी आदर्श आहेत, आणि शिजवल्यावर ते आकाराने फुलतात. मिल्ड किंवा ग्राउंड बार्ली हा देखील दुसरा पर्याय आहे.

थंड आणि कोरड्या जागी ठेवलेली पर्ल बार्ली अनेक महिने साठवली जाऊ शकते. जर बार्ली पॅक केली गेली असेल, तर संदर्भासाठी वापरायची तारीख असेल. मिल्ड बार्ली रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद कंटेनरमध्ये उत्तम प्रकारे साठवली जाते. कुठल्याही प्रकारची बार्ली तुम्ही वापरत असाल तरी ती खराब होऊ नये तसेच तिचा अपव्यय टाळण्यासाठी ती कमी प्रमाणात खरेदी करणे चांगले.

लहान मुलांसाठी जवाची निवड कशी करावी आणि ते कसे साठवावे?

जव (बार्ली) सीरिअल कसे शिजवावे?

जर तुम्ही प्रीपॅक केलेले जव विकत घेत असाल तर त्यावर ते कसे शिजवावे ह्याबाबत सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. सुमारे एक कप न शिजवलेला जव शिजवून ३४ कप होतो.

सुमारे दोन चमचे जव घ्या आणि एका वाडग्यात पुरेसे पाणी घ्या. सर्व गुठळ्या निघेपर्यंत दोन्ही मिक्स करा. हे मिश्रण चांगले एकत्र होईपर्यंत सुमारे १५ ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवा. बाळाला दूध पाजण्यापूर्वी तुम्ही त्यामध्ये पातळ पेस्ट बनवण्यासाठी फॉर्मुला किंवा आईचे दूध घालू शकता. चव आणि नैसर्गिक गोडपणासाठी तुम्ही शुद्ध फळे देखील जोडू शकता.

लहान मुलांसाठी जवाच्या काही पाककृती

आपल्या बाळासाठी घरी करता येण्याजोग्या जवाच्या काही छान छान पाककृती येथे दिलेल्या आहेत. जेवणामध्ये वैविध्य आणण्यासाठी तसेच आपल्या लहान मुलामध्ये ह्या सुपरफूड असलेल्या धान्याची आवड अधिक सहजपणे विकसित करण्यासाठी ह्या पाककृती मदत करतील.

) बार्ली आणि रताळ्याचे गोळे

साहित्य:

१ कप मऊ शिजवलेली पर्ल बार्ली

१ कप शिजवलेले रताळे

/२ कप सफरचंद सॉस किंवा फळांची प्युरी

चिमूटभर दालचिनी, आले, जायफळ (आठ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी)

कृती: एका भांड्यात ह्या सर्व वस्तू एकत्र करा आणि लहान गोळे करा. बाळासाठी हे एक मजेदार फिंगर फूड आहे

) जव सॅलड

साहित्य:

/४ कप मऊ शिजवलेले जव

/४ कप मऊ शिजवलेले गाजर

/४ कप मऊ शिजवलेले आणि फोडलेले मटार

/४ कप मऊ शिजवलेले आणि चौकोनी रताळे

कृती: एका बाऊलमध्ये सर्व वस्तू एकत्र टाका. बाळाला फिंगर फूड किंवा स्नॅक म्हणून सर्व्ह करा.

) जवाची पेज

साहित्य:

१ कप बार्ली

/२ कप पाणी

चवीसाठी गूळ (आवश्यक असल्यास, आणि एक वर्षावरील मुलांसाठी)

कृती: जव आणि पाणी प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि सुमारे तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. कुकर थोडा थंड झाल्यावर झाकण उघडा, हवे असल्यास गूळ घाला आणि मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत मिक्सर मध्ये ब्लेंड करा. हे मिश्रण गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर बाळाला द्या.

) जव सफरचंद लापशी

साहित्य:

/४ कप संपूर्ण जव

/४ कप सोललेले आणि चौकोनी सफरचंद

३१/२ कप पाणी

कृती: जव चांगले धुवून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये तीन कप पाणी घालून शिजवा. जव शिजल्यावर, ते काही मिनिटे उकळत ठेवा आणि नंतर सफरचंद उरलेल्या पाण्यासह घाला. मिश्रणाची प्युरी करण्यापूर्वी सुमारे १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. नंतर, ते थंड करा आणि बाळाला द्या.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

जव खरेदी करताना आणि शिजवताना लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी येथे आहेत:

  • लहान मुले संपूर्ण जव पचवू शकत नाहीत, म्हणून ती खरेदी करणे टाळा
  • मोतीयुक्त जव एका हवाबंद डब्यात साठवा. तुम्ही ते रेफ्रिजरेट करू शकता
  • खाण्यापूर्वी, साठवलेले जव चांगले आहेत ना ते तपासून पहा
  • थोड्या प्रमाणात खरेदी करून सुरुवात करा

जव चांगले शिजवून घ्या, जेणेकरून बाळाचे पोट खराब होणार नाही. आपल्या बाळाला सुरुवातीला थोड्या प्रमाणात जव द्या. जास्त प्रमाणात दिल्याने बाळाचे पोट फुगल्यासारखे होऊ शकते कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात.

अस्वीकरण: ही माहिती फक्त एक मार्गदर्शक आहे आणि योग्य व्यावसायिकांकडून वैद्यकीय सल्ल्यासाठी तो पर्याय नाही.

आणखी वाचा:

बाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का?
बाळांसाठी टोमॅटो – आरोग्यविषयक फायदे आणि सूप रेसिपी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article