Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांमधील व्हिटॅमिन डी ची कमतरता

बाळांमधील व्हिटॅमिन डी ची कमतरता

बाळांमधील व्हिटॅमिन डी ची कमतरता

जीवनसत्वे म्हणजे सूक्ष्म पोषक घटक असतात आणि ते मानवी शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन डी हे एक अद्वितीय जीवनसत्व आहे आणि ते आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते. जेव्हा सूर्यप्रकाशातून चांगले अतिनील किरण (यूव्हीबी) आपल्या त्वचेवर पडतात, तेव्हा त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होते आणि नंतर ते रक्तात शोषले जाते.

व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे काय?

शरीरात व्हिटॅमिन डी ची पातळी कमी आल्यास त्यास व्हिटॅमिन डीची कमतरता म्हणतात. व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे नक्की काय? व्हिटॅमिन डी चे रक्तातील प्रमाण सीरम २५हायड्रॉक्सीव्हिटॅमिन डी (कॅल्सिडिओल) च्या स्वरूपात मोजले जाते आणि ते निर्धारित केले जाते. जर व्हिटॅमिन डी ची पातळी २५ एनएमओएल/लि च्या खाली असेल तर ती व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे आणि पातळी २५५० एनएम ओएल/लिटरच्या दरम्यान असल्यास ती व्हिटॅमिन डी ची अपुरी पातळी आहे. जेव्हा पातळी ५० एनएमओएल/एल पेक्षा जास्त असते, तेव्हा हाडे, स्नायू, रोगप्रतिकारक शक्ती आणि इन्सुलिन स्राव ह्यांना फायदा होतो.

लहान मुलांसाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे का आहे?

शरीराच्या फायद्यासाठी परिपूर्ण पोषक घटकांचे संतुलन अतिशय आवश्यक आहे. शरीर किरकोळ कमतरतेची भरपाई करू शकते आणि काही वेळा, विशेषतः वाढत्या बाळांमध्ये, अतिरीक्त कमतरतेपर्यंत शरीर भरपाई करत असते. व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असल्यास तुमच्या मुलाला कुठल्याही अडचणीशिवाय चांगली शक्ती आणि उर्जेसह खेळता येईल. हाडांना ताकद येण्यासाठी आणि त्यांची झीज कमी करण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी चे प्रमाण चांगले असल्यास हाडे ह्या कोणत्याही घटकांपासून वंचित राहत नाहीत हे सुनिश्चित होते. व्हिटॅमिन डी आतड्यांच्या आतील स्तरांमधून कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते, रक्तामध्ये प्रक्रिया करते आणि हाडांमध्ये जमा करते. शरीरातील प्रत्येक पेशीच्या कार्यासाठी कॅल्शियम महत्वाचे आहे. ऊर्जा निर्माण करणारे रेणू आत घेण्यासाठी पेशींच्या झडपा उघडण्यासाठी आणि प्रत्येक स्नायूचे आकुंचन सुरू करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची मदत होते तसेच आपल्या स्नायूंना शक्ती देण्यासाठी व्हिटॅमिन डी जबाबदार आहे. ही सगळी माहिती मिळाल्यावर आपल्याला व्हिटॅमिन डी बाळांसाठी कसे महत्वाचे आहे हे लक्षात आले असेल आणि त्या अनुषंगाने व्हिटॅमिन डी कमतरतेचा बाळांवर कसा परिणाम होतो हे समजते.

तुम्ही तुमच्या मुलाला कुठल्या प्रकारचे व्हिटॅमिन डी द्यावे?

व्हिटॅमिन डी २ (एर्गोकॅल्सीफेरोल) आणि डी ३ (कोलेक्लसिफेरोल) असे व्हिटॅमिन डी चे दोन्ही प्रकार आढळतात. जरी डी २ आणि डी ३ दोन्ही तितकेच शक्तिशाली मानले जातात, तरी अभ्यासातून असे दिसून आले आहे की डी ३ हे डी २ च्या तुलनेत कमीतकमी ३ पट अधिक शक्तिशाली असू शकते. म्हणून डी ३ ला प्राधान्य दिले जाते. खरं तर, आता बहुतेक देशांमध्ये, व्हिटॅमिन डी चा हा एकमेव उपलब्ध असलेला व्यावसायिक प्रकार आहे.

चाचण्या:

लक्षणे दिसत असलेल्या किंवा नसलेल्या कमी व्हिटॅमिन डी पातळी असलेल्या मुलांसाठी खालील चाचण्या केल्याने फायदा होऊ शकतो

  1. सीरम व्हिटॅमिन डी (कॅल्सिडिओल) ची पातळी
  2. सीरम कॅल्शियम, फॉस्फरस आणि अल्कलाईन फॉस्फेट
  3. कमतरतेची लक्षणे/चिन्हे असणाऱ्यांमध्ये खालील गोष्टी करणे आवश्यक आहे
  4. पॅराथायरॉईड संप्रेरक (PTH)
  5. युरीन क्रिएटिनिन
  6. मनगट, घोटा ह्यांचा एक्स रे

लहान मुलांसाठी व्हिटॅमिन डीचे डोस

डोस पुढीलप्रमाणे असू शकतो दररोज कमी डोस किंवा आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असे १६ महिन्यांच्या कालावधीसाठी. हा डोस मुलाचे वय, तसेच कमतरता सौम्य, मध्यम किंवा गंभीर आहे की नाही यावर अवलंबून असतो.

प्रमाणित डोस पुढीलप्रमाणे

१ वर्षापर्यंतचे वय: दररोज १०००५००० आय यु

१ वर्षापेक्षा जास्त वय: दररोज १०,००० आय यु पर्यंत

साप्ताहिक डोस सहसा ५०,००० आय यू असतो आणि त्याचे अधिक चांगले पालन होते

६ मासिक किंवा वार्षिक ६ एल आय यू इंजेक्शन्स (सहसा मुलांसाठी ह्याची शिफारस केलेली नाही)

बाळांमध्ये १ महिन्यानंतर आणि मध्यम ते गंभीर कमतरता असलेल्या मोठ्या मुलांमध्ये ३ महिन्यांनंतर रक्तातील व्हिटॅमिन डी ची पातळी तपासली जाते. सौम्य प्रकरणांमध्ये, पुन्हा तपासणी आवश्यक नाही.

पातळी सामान्य श्रेणीमध्ये आल्यानंतर, प्रतिदिन ४०० आय यू चा देखभाल डोस बऱ्याच काळासाठी चालू ठेवला जातो.

चालू असलेल्या जोखीम घटकासह, वर्षातून एकदा किंवा नंतर, पातळी तपासत रहा आणि दररोज किंवा वार्षिक देखभाल डोस चालू ठेवा.

लहान मुलांसाठी व्हिटॅमिन डीचे डोस

भारतीय बाजारात व्हिटॅमिन डी सप्लीमेंटचे प्रकार उपलब्ध आहेत:

  • व्हिटॅमिन डी ३ ओरल ड्रॉप्स म्हणून ४०० आययू/एमएल
  • सिरप ४०० आय यू / ५ मिली
  • गोळ्या, १००० आणि २००० आय यु
  • पाऊच मधील पावडर स्वरूपातील व्हिटॅमिन डी ज्यामध्ये प्रत्येक पाऊच मध्ये ६०००० आययू व्हिटॅमिन डी ३ असते.

मूलभूत कॅल्शियमचे पूरक डोस :

थेरपीच्या सुरुवातीच्या काळात कॅल्शियमचे जास्त डोस महत्वाचे असतात. नंतर पुढील १ ते २ आठवड्यांसाठी डोस अर्ध्यावर कमी केले जातात. व्हिटॅमिन डी पूरक डोस सामान्य रक्ताच्या पातळीसह ४०० आययू /दिवसापर्यंत कमी केला जातो, बहुतेक प्रकरणांमध्ये कॅल्शियम पूरक औषधे आवश्यक नसतात.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कारणे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मर्यादित किंवा सूर्यप्रकाशाचा संपर्क नसणे. तथापि, भारताप्रमाणे पुरेसा सूर्यप्रकाश असला तरीसुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते, असे का? त्यामागची इतर कारणे समजून घेण्यासाठी, आधी व्हिटॅमिन डी कसे तयार केले जाते, त्यावर कशी प्रक्रिया केली जाते तसेच त्याचा वापर कसा केला जातो हे समजून घेणे आवश्यक आहे.

सूर्यकिरणांमधील युव्हीबी च्या संपर्कात आल्यावर, एपिडर्मिस (त्वचेचा वरचा थर) प्रोविटामिन डी ३ नावाच्या कोलेस्टेरॉलचे रूपांतर व्हिटॅमिन डी 3 मध्ये करते आणि ते रक्तात मिसळून यकृताकडे जाते. अन्नामधून किंवा पूरक औषधांमधून येणारे व्हिटॅमिन डी देखील पोटातून शोषले जाते आणि यकृताकडे पाठवले जाते. यकृत त्यास अधिक शक्तिशाली अश्या कॅल्सिडिओलच्या स्वरूपात रूपांतरित करते नंतर ते मूत्रपिंडात नेले जाते जेथे ते कॅल्सीट्रियलमध्ये रूपांतरित केले जाते. त्यामुळे आता हे समजणे सोपे आहे की जरी सूर्यप्रकाश चांगला असला तरी सुद्धा, व्हिटॅमिन डीची कमतरता खालील परिस्थितींमध्ये होऊ शकते.

कमी झालेले व्हिटॅमिन डी संश्लेषण: गडद त्वचा, अतिनील किरण अवरोधक एजंट जसे सनस्क्रीन लोशन आणि कपडे, अक्षांश (उदा. यूके मध्ये सूर्यप्रकाशात यूव्हीबी फार प्रभावी नाही), ऋतू, वायू प्रदूषण, अपंग मुले आणि किशोरवयीन मुले, जी बाहेर कमी प्रमाणात वेळ घालावात, घरात खेळायचे खेळ खेळण्याची जीवनशैली, वातानुकूलित घर, रंगीत चष्मा, प्रकाशसंवेदनशील त्वचा इत्यादीमुळे व्हिटॅमिन डीचे संश्लेषण कमी होते.

अन्नामध्ये व्हिटॅमिन डीचे सेवन कमी होणे: कठोर शाकाहारी आहार, आहाराच्या सवयी (व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचे कमी सेवन), बहिष्कृत आहार (उदा. दुधाची ऍलर्जी ) .

आईचा व्हिटॅमिन डी साठा कमी असलेने: आईच्या शरीरात मुलाच्या पोषणासाठी पुरेसे व्हिटॅमिन डी नसते असे स्तनपान

शोषण नीट न होणे: स्वादुपिंडाचा अपुरेपणा, सिलियाक रोग, पित्तविषयक अडथळा हे जीवनसत्त्वाचे योग्य शोषण रोखते

दोषपूर्ण संश्लेषण: दीर्घकालीन यकृत रोग, मूत्रपिंड रोग इत्यादी व्हिटॅमिन डीच्या उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असलेल्या अवयवांच्या योग्य कार्यामध्ये अडथळा आणू शकतात.

वाढलेले डिग्रेडेशन: अँटीकॉनव्हल्संट्स, क्षयरोग विरोधी, स्टेरॉईड्स सारखी औषधे व्हिटॅमिन डी उत्पादन किंवा शोषण प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात

लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे

चिन्हे आणि लक्षणे वयानुसार बदलतात:

लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता:

. खुंटलेली वाढ आणि विकासात्मक विलंब: कोणतीही ज्ञात आरोग्य समस्या नसतानाही आणि चांगल्या अन्नाचे सेवन असूनही, तुमच्या मुलाची उंची, वजन आणि इतर विकासात्मक टप्पे लक्षात घेण्यासारखे विकसित होत नाहीत.

. चिडचिडेपणा, सुस्ती: बाळ खेळकर नसून सारखे लक्ष वेधून घेत असेल तर आणि असामान्यपणे विक्षिप्त आणि कुठल्याही ज्ञात कारणाशिवाय सारखी चिडचिड करत असेल तर

लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे

. फिट: बाळाला फिट येण्याचे एक कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता आणि त्याकडे त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे.

. टेटनी: ही हायपोक्लेसेमियाची स्थिती आहे म्हणजेच रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होते. कॅल्शियमच्या कमतरतेची अनेक कारणे आहेत जसे की कमी आहार घेणे, खराब शोषण, व्हिटॅमिन डीची कमतरता, असामान्य पॅराथायरॉईड संप्रेरक स्राव, मूत्रपिंडाचे असामान्य कार्य इत्यादी.
. कार्डिओमायोपॅथी: व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे शरीरातील सर्व स्नायूंवर परिणाम होतो, हृदयातील स्नायू देखील कमकुवत होतात.

मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता:

. वेदना: हात, पाय, शरीरात वारंवार वेदना होत असल्याची तक्रार जी मुले करत असतात त्यांची शारीरिक वाढ नीट होत नाही.

. स्नायू कमकुवत होणे: स्नायू कमकुवत होत असल्याने चालण्यास उशीर होतो तसेच पायऱ्या चढण्यास अवघड जाते

. मुडदूस: गुडघे टेकणे, पाय नीट वाकवता न येणे, , गुडघ्याच्या असामान्य विकृती, मनगटांवर सूज येणे आणि कोस्टोकॉन्ड्रल जंक्शन, हाडे दीर्घकाळ दुखणे (> ३ महिन्यांचा कालावधी)

. वाढ नीट न होणे: निरोगी आहार, सक्रिय जीवनशैली आणि आधीची कोणतीही वैद्यकीय समस्या नसतानाही कमी वाढ होणे ही व्हिटॅमिन डी ची कमतरता दर्शवते

. फ्रॅक्चर: किरकोळ अपघातामुळे फ्रॅक्चर होणे हे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण आहे. त्यामुळे कॅल्शियम योग्यरित्या शोषले जात नाही.

मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता

. खालच्या श्वसनमार्गाचे संक्रमण: व्हिटॅमिन डी पल्मोनरी फंक्शन्स आणि रोग प्रतिकारशक्तीच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि वारंवार होणारे संक्रमण देखील त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

. टाळू भरून यायला वेळ लागणे: टाळू ला इंग्रजीमध्ये अँटेरिअर फ्रॉन्टनेल असे म्हणतात.बाळाच्या १८२४ महिन्यांच्या वयापर्यंत टाळू भरून येते. हाडांचे कार्य नीट न झाल्यामुळे त्यास विलंब लागू शकतो

. दात उशिरा येणे.: पुरेसे कॅल्शियम नसल्याने दात येण्यास विलंब होतो

. हाडांचे असामान्यप्रोफाइल किंवा क्षकिरण: मनगटाचा किंवा घोट्याचा किंवा छातीचा एक्स रे हाडांची सूज दर्शवतो आणि कॅल्शियमच्या कमी पातळीमुळे लांब हाडांचे असामान्यपणे वाकणे देखील दर्शवतो.

१०. असामान्य रक्त चाचण्या: प्लाझ्मा मधील कॅल्शियम किंवा फॉस्फेटची कमी पातळी, वाढलेले अल्कलाईन फॉस्फेटज

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी उपचार

शरीरातील व्हिटॅमिन डी चा साठा कमी होण्यास किंवा संपण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे स्वाभाविकच, तो पुन्हा भरून निघण्यासाठी बराच वेळ लागतो. व्हिटॅमिन डी ची पातळी ५० एनएमओएल/एल इतकी पुनर्संचयित राखणे हे उपचारांचे उद्दीष्ट आहे.

विविध पर्याय आहेत:

. पूरक डोस:

दररोज कमी डोस पूरक

मधून मधून उच्च डोस थेरपी

. कॅल्शियमचे पुरेसे सेवन सुनिश्चित करा

ज्या मुलांना गायीचे दूध आवडत नाही त्यांच्यासाठी दही, चीज आणि फोर्टिफाइड सोया डेअरी उत्पादने हे कॅल्शियमचे उपयुक्त स्रोत आहेत. सेवन कमी असल्यास पूरक औषधांचा विचार करा

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी उपचार

. सूर्यप्रकाश

काळी त्वचा असलेली मुले आणि तरुण लोक अधूनमधून सूर्यप्रकाश सहन करू शकतात आणि त्यांना सनस्क्रीनची आवश्यकता नसते. टोपी आणि सनग्लासेस वापरता येतात. बाह्य क्रियाकलापांना प्रोत्साहन द्या

पूरक औषधे कोणी घ्यावी?

. कोणतीही चिन्हे किंवा लक्षणांशिवाय केवळ स्तनपान करणारी अर्भके

. व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या मातांचे स्तनपान घेणारे अर्भक ज्याच्यामध्ये कमीत कमी एक किंवा अधिक जोखमीचे घटक असतात.

. फॉर्मुला घेणारी बाळे ज्यांना फॉर्म्युलामधून पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नाही. व्हिटॅमिन डीची पातळी तपासणे किंवा जोखीम घटकांसह बाळांमध्ये दररोज पूरक आहार जोडण्याची शिफारस केली जाते

बाळाला व्हिटॅमिन डी कसे द्यावे:

व्हिटॅमिन डी गोळ्यांच्या आणि द्रव स्वरूपात उपलब्ध आहे आणि कॅल्शियमच्या संयोजनात देखील उपलब्ध आहे. तुम्ही गोळीची पावडर करून आणि कॅप्सूल असेल तर ती उघडून अन्नामध्ये मिसळू शकता.

मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता कशी टाळावी?

सर्वसाधारणपणे,फक्त पूरक औषधे घेण्याऐवजी पुरेसा सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी समृध्द अन्न घेणे चांगले. गोऱ्या मुलांसाठी अंदाजे ५१५ मिनिटे सूर्यप्रकाश आणि गडद त्वचेच्या मुलांसाठी ३०४५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे चांगले आहे. शक्यतो पहाटेचा सूर्यप्रकाश चांगला असतो कारण त्यात हानिकारक अतिनील किरणांची पातळी कमी असते.

  • आईचे डी जीवनसत्व

लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी ठरवणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आईची व्हिटॅमिन डी स्थिती. गर्भवती महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत व्हिटॅमिन डीची पातळी तपासावी. कमी असल्याचे आढळल्यास जोपर्यंत २० एन जी / डी एल इतकी पातळी होत नाही तोपर्यंत ३०००५००० आय यु चा डोस घेणे चांगले आहे. त्यानंतर दररोज ४०० आय यू डोस घेणे चांगले आहे.

व्हिटॅमिन डी चा उच्च डोस (४००६४०० आय यू) घेतल्यास स्तनपान करवणाऱ्या मातांना दररोज व्हिटॅमिन डीच्या कमतरतेपासून वाचवू शकतो. तसेच हा डोस घेतल्यास व्हिटॅमीन डी ची पातळी वाढून टॉक्सिसिटी सुद्धा वाढत नाही.

  • अकाली जन्मलेली बाळे:

जन्मापासून ४००८०० आय यू चे व्हिटॅमिन डी घेणे महत्वाचे आहे कारण आईकडून पुरेसे व्हिटॅमिन डी न मिळण्याची शक्यता आहे.

स्तनपान घेण्याची क्षमता कमी असणे, अपरिपक्व पचन प्रणाली त्यामुळे शोषणावर परिणाम होत नाही आणि काही प्रकरणांमध्ये यकृत आणि मूत्रपिंडाची कमतरता यासारख्या अकाली समस्याशी संबंधित इतर समस्या योग्यप्रकारे हाताळता आल्या पाहिजेत.

  • लहान बाळे:

मुलांच्या आहारात पुरेसे व्हिटॅमिन डी असल्याची खात्री करा. कमीत कमी एक जोखीम घटक असलेल्या स्तनपान घेणाऱ्या बाळांसाठी पूरक औषधे घेणे चांगले. लहान बाळांच्या बऱ्याच फॉर्मुल्यामध्ये ४०० आय यु/ लिटर इतके व्हिटॅमिन डी असते. म्हणून दररोज किमान १ लिटर पेक्षा कमी फॉर्म्युला घेणाऱ्या बाळांना पूरक औषधांची गरज असते.

  • लहान मुले आणि किशोरवयीन मुले:

गडद त्वचा असलेली मुले, सूर्यप्रकाशापासून वंचित मुले, कमी किंवा अजिबात सूर्यप्रकाश न मिळणारी मुले किंवा ज्यांना वैद्यकीय समस्या आहेत त्यांना कमतरता रोखण्यासाठी दररोज ४०० आय यू व्हिटॅमिन डी दिले पाहिजे.

लहान मुलांसाठी व्हिटॅमिन डी चे सर्वोत्तम पदार्थ

जरी झाडे व्हिटॅमिन डी तयार करीत असली तरीसुद्धा व्हिटॅमिनचे ते स्वरूप मानवी शरीर वापरू शकत नाही. म्हणून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी एकमेव पदार्थ म्हणजे प्राण्यांचे अन्न. दुर्दैवाने, बाळांसाठी असे एकमेव अन्न आहे आणि ते म्हणजे दूध (गाईचे दूध: ४० आय यू/ लिटर ) हा खरोखर व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्रोत नाही.

व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले फोर्टिफाइड पदार्थ

  • फोर्टिफाइड दूध ४००/लिटर
  • फोर्टिफाइड बाळांसाठीचा फॉर्मुला ४००/लिटर
  • संत्र्याचा रस ४००/लिटर
  • फोर्टिफाइड सोया दूध ५००/लिटर
  • फोर्टिफाइड तांदळाचे दूध ४००/लिटर
  • फोर्टिफाइड मार्गारीन ६०/टेबल स्पून
  • फोर्टिफाइड सीरिअल ४० आय यू /सर्व्हिंग
  • टोफू फोर्टिफाइड (⅕ ब्लॉक) १२०
  • फोर्टिफाईड तेल

मोठ्या बाळांना खाता येतील असे सर्वोत्तम पदार्थ:

. सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन यासारखे मासे . मासे टाळल्याने सक्रिय व्हिटॅमिन डी सामग्री ५०% ने कमी होते, तर बेकिंगमुळे माशांच्या व्हिटॅमिन डी सामग्रीवर परिणाम होत नाही

. अवयवयुक्त मांस

. अंड्यातील पिवळा बलक (२०२५ आय यु/ योक )

मी माझ्या बाळाला खूप व्हिटॅमिन डी दिल्यास काही धोका आहे का?

होय. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी दिल्यास विषबाधा होऊ शकते.

जीवनसत्त्वे बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे असतात (जास्तीचे शरीरातून बाहेर टाकले जातात). जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के चरबीविद्रव्य असल्याने शरीरात साठवले जातात आणि जास्त असल्यास समस्या निर्माण होतात.

निष्कर्ष: भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशातही प्रौढ आणि बाळांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे वाढते पुरावे आहेत. बालरोगतज्ञांचा सल्ला घेतल्यास, मुलाच्या आहारात व्हिटॅमिन डी चा समावेश करून, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतील.

आणखी वाचा:

बाळांसाठी भोपळा – फायदे आणि पाककृती
बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article