Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी

बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी

बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी

बाळाला घनपदार्थ भरवणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. तुमचं बाळ आता घन पदार्थांच्या विश्वात पाऊल टाकत आहे, त्यामुळे आरोग्यपूर्ण पर्यायांनी सुरुवात करणे चांगले. बालरोगतज्ञ भाज्यांपासून सुरुवात करण्याचा सल्ला देतात. योग्य भाज्या निवडण्याचा आनंद, बाळाला भरवता यावे म्ह्णून प्रेमाने ते कुस्करण्याचा आनंद आणि एकुणातच बाळाला भरवण्याची प्रक्रिया  हे सगळं खूप समाधानकारक आहे.

बाळाला घनपदार्थ भरवणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे, कारण तुमचे बाळ घनपदार्थांच्या एका नव्या विश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे पोषक पर्याय निवडून सुरुवात करणे चांगले. भाज्यांपासून सुरुवात करण्याचा सल्ला बालरोगतज्ञदेतात. योग्य भाज्या निवडण्याचा आनंद, त्याचा हवा तसा पोत करून बाळाला भरवण्याचे समाधान निराळेच apothekefurmanner.de!

बाळासाठी भाज्यांची प्युरी कशी कराल?

जरी बाजारात बाळांसाठी वेगवेगळे अन्नपदार्थ उपलब्ध असले तरी, बाळासाठी ताज्या भाज्या वापरून  जेवण तयार करणे हे आरोग्यपूर्ण असते.  त्यामुळे, घरी तयार केलेली  व्हेजिटेबल प्युरी हा त्यांना भाज्यांशी ओळख करून देण्याचा उत्तम मार्ग आहे.

तुम्ही भाज्या उकडू शकता किंवा शिजवू शकता. काही भाज्या शिजवण्यासाठी काही सूचना खाली दिल्या आहेत:

 • तुम्ही रताळे ४०० डिग्री फॅरेनहाईट ला ४०-४५ मिनिटांसाठी भाजू  शकता. बेकिंग ट्रे मध्ये ठेवण्याआधी तुम्ही रताळ्याला छिद्रे पाडू शकता. ४५ मिनिटांसाठी भाज्या भाजून घ्या  आणि थंड झाल्यावर साल काढा.
 • तुम्ही ओव्हन आधी ४२५ डिग्री फॅरेनहाईटला ठेवून बटाटे भाजून घेऊ शकता. बेकिंग ट्रे मध्ये ठेवण्याआधी तुम्ही बटाटयांना छिद्रे पाडून घेऊ शकता. ४५ मिनिटांसाठी भाजून घेऊन नंतर थंड झाल्यावर साल काढा.

तुम्ही इडली स्टीमर किंवा कुठलाही चांगला स्टीमर भाज्या उकडण्यासाठी वापरू शकता. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही भाज्या  भांड्यामध्ये उकडू शकता.

आता, तुमच्या बाळासाठी ५ सर्वोत्तम, पोषक आणि रंगीबेरंगी व्हेजिटेबल प्युरी कशा करायच्या त्या पाहुयात.

प्युरी तयार करण्याआधी, तुम्ही वाट्या आणि चमचे गरम पाण्याने  निर्जंतुक करून घेतले आहेत ना ह्याची खात्री करा आणि ते जोपर्यंत तुम्ही वापरत नाही तोपर्यत पाण्यात बुडवून ठेवा.

१. भोपळ्याची प्युरी

भोपळ्याची प्युरी

भोपळा हा बीटा कॅरेटिन , प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. सशक्त प्रतिकार प्रणालीसाठी ह्याची मदत होते. भोपळा गोड असतो त्यामुळे बाळाला तो आवडतो. तुमचे बाळ  जेव्हा ६ महिन्याचे होते तेव्हा तुम्ही भोपळ्याची प्युरी देण्यास सुरुवात करू शकता.  भोपळ्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही  कारण भोपळ्यात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तसेच अँटिऑक्सिडंट्सने सुद्धा तो समृद्ध असतो. भोपळ्याचा प्रतिजैविक गुणधर्ण आतड्यातील जंतू  मारण्यास मदत करू शकतो.

साहित्य: 

 • भोपळा -१/२ कप बारीक चिरलेले तुकडे
 • पाणी – लागेल तसे

कृती

 • वाहत्या पाण्याखाली भोपळा स्वच्छ धुवून घ्या
 • साल काढणीने साल काढा
 • बिया काढा
 • भोपळ्याचे साधारण एक सारख्या आकाराचे बारीक तुकडे करा
 • भोपळ्याचे तुकडे स्टीमर मध्ये १५ मिनिटांसाठी उकडून घ्या किंवा ते चांगले शिजेपर्यंत उकडा.
 • उकडलेला भोपळा चांगला मॅश करून घ्या आणि ब्लेंडर मधून त्याची चांगली पेस्ट तयार करा.
 • गरम असताना वाढा

२. बटाट्याची प्युरी

बटाट्याची प्युरी

बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात आणि पुष्कळ प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. जरी बटाट्यामध्ये भरपूर मूल्ये असली तरी त्यामुळे बाळाला गॅस होऊ शकतो. म्हणून बाळ ८ महिन्यांचे होईपर्यंत वाट बघण्याचा सल्ला दिला जातो, आणि मग बाळाला मॅश पोटॅटो किंवा त्याची प्युरी द्यावी असे सांगितले जाते. बटाट्यामध्ये असलेले फॉस्फरस हे हाडांच्या विकासासाठी मदत करते.

साहित्य:

 • बटाटे- १ माध्यम आकाराचा
 • बटर – १ टीस्पून
 • स्तनपानाचे दूध/ फॉर्मुला दूध/ गायीचे दूध – १ टेबल स्पून
 • हिंग – एक चिमूट
 • मीठ – चवीपुरते
 • मिरपूड – चवीपुरती
 • पाणी – लागेल तसे

कृती

 • वाहत्या पाण्याखाली बटाटे स्वच्छ धुवा

किंवा तुम्ही

 • अ . तुम्ही साल काढून बटाट्याचे छोटे तुकडे करू शकता किंवा
 • ब. सालासकट बटाट्याचे चौकोनी तुकडे करू शकता
 • एक कप पाण्यात बटाटे उकडून घ्या. तुम्ही बटाटे भांड्यात उकडू शकता किंवा प्रेशर कुकर मध्ये उकडू शकता
 • बटाटे उकडल्यावर जास्तीचे पाणी काढून टाका
 • साल काढून टाका ( जर तुम्ही सालासकट बटाटे उकड्ण्यास ठेवले असतील तर )
 • मोठ्या वाटीत बटाटे ठेवा, बटर आणि हिंग घाला
 • बटाटे मॅश करून घ्या

त्यामध्ये खालील गोष्टी टाका

 • अ. स्तनपानाचे दूध, फॉर्मुला दूध किंवा गायीचे दूध
 • ब. मीठ
 • क. मिरे
 • प्युरी बनवण्यासाठी चांगले मिक्स करा किंवा मिक्सर अथवा ब्लेंडर मध्ये फिरवून घ्या.

३. रताळ्याची प्युरी

रताळ्याची प्युरी

रताळ्याची प्युरी ही खूप सुप्रसिद्ध आहे कारण तिचा पोत मऊ असतो, चव गोड़ असते आणि कमी ऍलर्जिक असते. बाळाचे वय जेव्हा ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते बाळाला देऊ शकता. ही प्युरी  तंतुमय पदार्थानी समृद्ध असते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. रताळ्याच्या प्युरीमध्ये  व्हिटॅमिन अ, सी, इ. कॅल्शिअम आणि लोह  जास्त प्रमाणात  असते. ह्या सगळ्या पोषणमूल्यांमुळे दृष्टी चांगली राहते, त्वचा निरोगी राहते आणि पचनसंस्थ सुद्धा निरोगी राहते.

साहित्य:

 • रताळी – १ माध्यम आकाराचे
 • बटर किंवा घरी केलेले तूप – १ टीस्पून
 • वेलदोडा पूड – १/८ टीस्पून ( ऑप्शनल )

कृती

 • वाहत्या पाण्याखाली रताळी स्वच्छ धुवा.
 • रताळ्याचे तुकडे करा.
 • प्रेशर कुकर मध्ये रताळी उकडून घ्या, ३ शिट्ट्या करा. तुम्ही रताळी उकडू शकता, वाफवू शकता किंवा भाजून घेऊ शकता.
 • तुमच्या हाताने रताळ्याचे साल काढा.
 • शिजवलेले रताळे मोठ्या बाउल मध्ये ठेवा.
 • काटे चमच्याने चांगले मॅश करून घ्या किंवा ब्लेंडर अथवा मिक्सर वापरून ब्लेंड करून घ्या.
 • तूप गरम करून घ्या आणि त्यात कुस्करलेले रताळे घाला, हवे असल्यास वेलदोडे पूड घाला.
 • मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. मिश्रण तुपावर चांगले परतून झाल्यावर तुम्ही ते आचेवरून बाजूला काढू शकता
 • प्युरीचा पोत पाणी, स्तनपानाचे दूध, फॉर्मुला दूध किंवा गाईचे दूध वापरून बदलू शकता.

४. मटार प्युरी

मटार प्युरी

मटार  हे कॅल्शिअम, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन अ आणि सी ने समृद्ध आहेत. मटार बाळाच्या हाडांसाठी आणि स्नायूंसाठी चांगले असतात. बाळाचे वय ६ महिने आणि त्यापेक्षा जास्त होईल तेव्हा तुम्ही मटारची  प्युरी बाळाला देऊ शकता. कोवळे मटार घेतलेले चांगले कारण ते मऊ आणि गोड़ असतात. हवाबंद केलेले वाटणे घेणे टाळा आणि ताजे वाटणे घ्या. तुम्ही फ्रोझन वाटणे सुद्धा निवडू शकता.

साहित्य

 • हिरवे मटार – मूठभर
 • पाणी – जरुरीप्रमाणे

कृती

 • जर तुम्ही ताजे मटार वापरणार असाल तर शेंगा निवडून घ्या
 • मटार  पाण्यात स्वच्छ धुवून घ्या
 • स्टीमर मध्ये मटार मऊ होईपर्यंत चांगले निवडून घ्या. तुम्ही पाण्यात ते वाटणे शिजेपर्यंत उकळून घेऊ शकता.
 • मटार चांगले मॅश करून घ्या किंवा मिक्सर मध्ये त्याची चांगली पेस्ट करून घ्या.
 • वाटण्याची सालं तुम्ही गाळणीने बाजूला करू शकता
 • पाणी, स्तनपान दूध, फॉर्मुला दूध किंवा गायीचे दूध घालून तुम्ही मिश्रणाचा पोत कसा हवा तास करून घेऊ शकता

५. गाजर, बीटरूट, बटाटा प्युरी

गाजर, बीटरूट, बटाटा प्युरी

बीटरूट हे लोह आणि व्हिटॅमिन अ ने समृद्ध आहे. गाजर हे बीटा कॅरेटिन  आणि व्हिटॅमिन अ ने समृद्ध आहे. बाळाच्या दृष्टीसाठी ते चांगले असते आणि संसर्गास सामना करता यावा म्हणून ते शरीरास मदत करते. बटाटे हे कर्बोदकांनी समृद्ध असतात. काही बाळांना बीटरूट प्युरी आवडत नाही, त्यामुळे तुम्ही बीटरूट, गाजर आणि बटाटा घालून एकत्र प्युरी करू शकता. जेव्हा बाळ ८ महिन्यांचे होते ठेवा तुम्ही हे मिश्रण त्यास देण्यास सुरुवात करू शकता.

साहित्य

 • गाजर – १ मध्यम आकाराचे
 • बीटरूट – १/२ छोट्या आकाराचे बिट रूट
 • बटाटा – १ मध्यम आकाराचा
 • पाणी -जरुरीप्रमाणे

कृती

 • वाहत्या पाण्याखाली भाज्या स्वच्छ धुवा आणि भाज्यांचे साल काढून टाका
 • त्यांचे सारख्या आकाराचे चौकोनी तुकडे करा
 • चिरलेल्या भाज्या १५ मिनिटे वाफवून घ्या. तुम्ही प्रेशर कुकर मध्ये एक कप पाण्यात २ शिट्ट्या करून घेऊ शकता
 • भाज्या उकडल्यानंतर तुम्ही त्या मिक्सर मधून काढून त्याची पेस्ट करून घेऊ शकता
 • तुम्ही पाणी,स्तनपान, फॉर्मुला दूध किंवा गायीचे दूध घालून मिश्रणाचा पोत मिक्सर मध्ये हवा तसा करून घेऊ शकता.

लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा गोष्टी

भाज्यांची प्युरी ही पोटभरीचे आणि पोषक अन्न आहे. आपण जरी काही भाज्यांच्या प्युरीच्या रेसिपीची चर्चा केली असली तरी  तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करू शकता तसेच तुमच्या बाळाला सर्वात जास्त आवडणारी भाजी सुद्धा निवडू शकता आणि बाळासाठी व्हेजिटेबल  प्युरी करू शकता.

खाली काही मुद्दे आहेत जे तुम्ही ह्या भाज्यांच्या पोषक प्युरी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत

 • पोषणमूल्ये टिकून रहावीत  म्हणून तज्ञ सांगतात की भाज्या शिजवण्याच्या ऐवजी उकडून घ्या
 • बाळाला गरम आणि ताजी प्युरी द्या. प्युरी तयार झाल्यापासून २ तासाच्या आत बाळाला भरवा
 • चांगले बटाटे निवडा, भेगा पडलेले बटाटे नकोत. तसेच ज्या बटाट्यांना कोंब आले आहेत किंवा मऊ पडले आहेत असे सुद्धा बटाटे नकोत
 • जरी तुम्ही मिक्सर वापरू शकत असाल तरीसुद्धा तुम्ही उकडलेल्या भाज्या मॅशरने मॅश करून घ्या
 • तुम्ही स्तनपान, गाईचे दूध, फॉर्मुला दूध किंवा कोमट पाणी वापरून ते मिश्रणात घालून तुम्हाला हवा तसा त्याचा पोत करून घेऊ शकता. दूध घातल्यानंतर तुम्ही प्युरी उकळू नका.
 • जर बाळे कुठल्याही घटकाला ऍलर्जिक असतील तर तो घटक प्युरी करताना त्यात घालू नका.
 • बाळाला भरवताना निर्जंतुक केलेले वाटी चमचा वापरा
 • हे काही अगदी आवश्यक नाही परंतु घनपदार्थ सुरु करताना ‘३ दिवसांचा नियम’ पाळणे ही एक चांगली सवय आहे. हळू हळू ह्या घनपदार्थांची ओळख बाळाला करून द्या त्यामुळे त्यांना त्या अन्नाची ऍलर्जी तर नाही ना हे समजणे सोपे जाईल. तुम्ही खालील कृती पाळू शकता
 • दिवस १ला – १ टेबल स्पून, दिवसातून एकदा
 • दिवस २रा – २ टेबल स्पून, दिवसातून दोनदा
 • दिवस ३ रा – ३ टेबल स्पून, दिवसातून तीनदा
 • अंदाजे, १ टेबल स्पून म्हणजे १५ मिली. म्हणून ३ दिवसांनंतर, तुम्ही बाळाला ९० मिली दिले आहे.
 • जेव्हा  तुम्ही नवीन अन्नपदार्थाची ओळख करून द्याल तेव्हा बाळाची प्रतिक्रिया नीट तपासून पहा. काही असामान्य स्थिती आढळल्यास ते अन्न भरवणे तिथेच थांबवा आणि तुमच्या डॉक्टरशी त्वरित संपर्क साधा.

तुमच्या बाळासाठी आरोग्यपूर्ण, संपूर्ण आणि चविष्ट अन्न तयार करणे हे थोडे कठीण आहे, परंतु तो नक्कीच आनंददायी अनुभव आहे. तुम्ही अति उत्साही असाल परंतु लक्षात ठेवा की तुमचे बाळ ते अन्न सहज पचवू शकत नाही म्हणून हळू हळू तुमच्या बाळाला ह्या चवीच्या, रंगाच्या आणि वेगवेगळे पोत असलेल्या अन्नपदार्थांच्या दुनियेची ओळख करून द्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article