Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी नवजात बाळाची काळजी – पालकांसाठी महत्वाच्या टिप्स

नवजात बाळाची काळजी – पालकांसाठी महत्वाच्या टिप्स

नवजात बाळाची काळजी – पालकांसाठी महत्वाच्या टिप्स

आपल्या नवजात बाळासोबतचे पहिले काही महिने पहिल्यांदाच पालक झालेल्या आई बाबांसाठी थोडे गोधळ उडवणारे असू शकतात. नवजात बाळाची काळजी घेण्याविषयी आपल्याला प्रत्येकाकडून सर्व प्रकारचे सल्ले दिले जातात. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या संदर्भात कोणता सल्ला घ्यावा हे ठरवणे गोंधळात टाकणारे असू शकते. नवजात बाळाची काळजी घेणे हे थकवा आणणारे आणि आव्हानात्मक आहे परंतु आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा अनुभव देखील आहे.

नवजात बाळाची काळजी घेण्याबाबतच्या काही टिप्स

जेव्हा आपली पहिली वेळ असेल तेव्हा नवजात मुलाची काळजी घेणे साहजिकच एक आव्हान आहे. तर, नवजात बाळाची काळजी घेण्यात तुम्हाला मदत करणारे हे दहा मार्ग आहेत:

. दूध देणे

बाळाला वेळेवर दूध देणे महत्वाचे आहे. नवजात बाळाला दर २३ तासांनी दूध दिले पाहिजे, म्हणजेच तुम्ही २४ तासांत ८१२ वेळा नर्सिंग करणे आवश्यक आहे. आयुष्याच्या पहिल्या ६ महिन्यांसाठी बाळाला फक्त आईचे दूध दिले पाहिजे. आईच्या दुधात आवश्यक पोषणमूल्ये आणि प्रतिपिंडे असतात. किमान १० मिनिटे बाळाला दूध पाजा. बाळ जोपर्यंत स्तनाला घट्ट तोंड लावत नाही आणि दूध पिण्यास सुरुवात करीत नाही तोपर्यंत स्तन बाळाच्या तोंडाजवळ धरून ठेवा. जर बाळाने योग्यरित्या स्तनाला लॅच केले असेल तर आई च्या स्तनाग्रांना कोणताही त्रास होणार नाही. एकदा बाळाला पाजल्यावर स्तन हलके आणि रिकामे वाटल्यास बाळाला पुरेसे दूध मिळते हे सूचित होते. जर स्तनपानाचा पर्याय नसेल तर बाळाला डॉक्टरांच्या शिफारशीने पोषित आहार द्या. बाळाला प्रत्येक आहारात ६० ते ९० मि.लि. फॉर्म्युला मिळाला पाहिजे.

. ढेकर काढणे

एकदा बाळाला पाजले की बाळाची ढेकर काढणे आवश्यक आहे. बाळाला आहार देताना बाळ हवा गिळते, ज्यामुळे पोटात वायू आणि पोटशूळ होतो. ढेकर काढल्याने ही जास्तीची हवा काढून टाकली जाते, असे केल्याने पचन वाढते आणि बाळाचे उलटी करणे आणि पोटशूळ टळते. एका हाताने बाळाला छातीजवळ धरा. बाळाची हनुवटी आपल्या खांद्यावर टेकवा. बाळ ढेकर काढेपर्यंत दुसऱ्या हाताने बाळाच्या पाठीवर हळूहळू थोपटा.

. आपल्या नवजात बाळाला कसे धरावे

आपण आपल्या बाळाच्या डोक्याला आणि मानेला एका हाताने आधार देत आहात याची खात्री करणे खूप महत्वाचे आहे. ह्याचे कारण असे आहे की बाळाच्या मानेचे स्नायू अद्याप मजबूत नसल्यामुळे बाळ स्वतंत्रपणे मान धरत नाही. बाळाच्या पाठीच्या काण्याची अद्याप वाढ होत आहे आणि तो मजबूत होत आहे. वयाच्या ३ महिन्यांनंतरच बाळ मान धरू लागेल. म्हणून नवजात मुलाची काळजी घेताना बाळाचे डोके व मानेकडे लक्ष द्या.

. नाभीजवळील भागाची काळजी

१ ल्या महिन्यात नवजात बाळाची काळजी घेण्याबाबतचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नाभीकडील भागाची काळजी घेणे. सुरुवातीच्या २३ आठवड्यांपर्यंत आपल्या बाळास आंघोळ घालू नका. कोमट पाण्याऐवजी बाळाला स्पंज बाथ द्या. नाभीचे क्षेत्र स्वच्छ व कोरडे ठेवा. बाळाचे डायपर दुमडलेले ठेवा जेणेकरून नाभीकडील भाग कोरडा होऊ शकेल. नाभी क्षेत्र हाताळण्यापूर्वी आपले हात निर्जंतुक करा. स्वच्छ करण्यासाठी, ओलसर कापड वापरा आणि स्वच्छ, शोषक कपड्याने पुसून घ्या. नाभिकडील भागात संक्रमणाची चिन्हे शोधा. जर नाभी जवळील भागात लालसरपणा, सूज, वासयुक्त स्त्राव किंवा पू आणि रक्तस्त्राव होत असेल तर बाळाला बालरोगतज्ञांकडे न्या.

. डायपरिंग

प्रसुतिनंतर नवजात बाळाची काळजी घेताना डायपर बदलणे ही एक महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्या बाळाला आईचे पुरेसे दूध किंवा फॉर्म्युला मिळत असेल तर बाळ नियमितपणे दिवसातून किमान ६ ते ८ डायपर ओले करेल. बाळाचा डायपर पूर्ण भरल्याबरोबर वारंवार बदला. तुम्हाला दिवसातून कमीत कमी १० वेळा बाळाचे डायपर बदलावे लागतील. गलिच्छ डायपर बदलण्यासाठी तुम्हाला डायपर बदलण्यासाठी एखादी शीट,मऊ डायपर वाइप्स, डायपर रॅश क्रीम किंवा बेबी पावडर आणि नवीन डायपरची आवश्यकता असेल. यूटीआय टाळण्यासाठी, बाळाला पुढून मागच्या दिशेने पुसून घ्या. आणि बाळाला दररोज काही तास डायपरविना राहू द्या.

. आंघोळ

नवजात बाळाला अंघोळ घालणे हे एक नाजूक काम आहे. नाभीजवळील नाळेचा भाग कोरडा होऊन पडल्यानंतर आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही बाळाला आंघोळ घालायला पाहिजे. बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी अंघोळीचे सर्व साहित्य आणि अंघोळीनंतर घालायचे कपडे तयार असल्याची खात्री करा. झोपेच्या वेळेपूर्वी अंघोळ घातल्याने मुलांना अधिक चांगली झोप लागण्यास मदत होते. तुम्हाला बाळासाठी बाथटब, कोमट पाणी, सौम्य साबण किंवा बॉडी वॉश, वॉशक्लोथ, मऊ टॉवेल, बेबी लोशन किंवा क्रीम, नवीन डायपर आणि बाळाचे कपडे इत्यादी गोष्टी आवश्यक असतील. आपल्या साथीदारास किंवा कुटूंबाच्या सदस्याला मदतीसाठी घ्या, जेणेकरून एक व्यक्ती बाळाची मान आणि डोके धरेल तर दुसरी मुलगा बाळाला स्नान करेल. थोड्या प्रमाणात साबण वापरा. बाळाचे गुप्तांग, टाळू, केस, मान, चेहरा आणि नाकभोवती गोळा झालेले श्लेष्मा वॉशक्लोथने स्वच्छ करा. बाळाचे शरीर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. एकदा हे झाल्यावर बाळाचे शरीर मऊ टॉवेलने कोरडे करा लोशन लावा आणि नवीन डायपर व बाळाचे कपडे घाला.

. मालिश करणे

मालिश करणे हा आपल्या बाळाशी बंध निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे बाळाला छान झोप लागते तसेच रक्ताभिसरण आणि पचन सुधारण्यास मदत होते. आपल्या हातावर थोडे तेल किंवा लोशन पसरवा. पुढे, बाळाच्या शरीराला हळूवारपणे आणि तालबद्धतेने स्ट्रोक द्या. बाळाकडे बघा तसेच बाळाच्या शरीरावर मालिश करताना बाळाशी बोला. बाळाची मालिश करण्याची चांगली वेळ म्हणजे बाळाच्या अंघोळीच्या आधीची होय.

. नवजात बाळ हाताळणे

तुमच्या बाळाबरोबर खेळताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत. आपल्या बाळाला कधीहीजोरजोरात हलवू नका कारण बाळाचे अंतर्गत अवयव नाजूक असतात आणि जोरदार हलवल्यामुळे बाळाचे नुकसान होऊ शकते. बाळाला हवेत टाकून झेलू नका कारण हे धोकादायक ठरू शकते. बाळाला हाताळण्यापूर्वी नेहमीच जंतुनाशक वापरा किंवा आपले हात धुवा, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण विकसित झालेली नसते आणि त्यांना संसर्ग होण्याची भीती असते. जर तुम्ही बाळाला बाहेर घेऊन जात असाल तर तुमच्या मुलास फिरण्यासाठी, कारच्या सीटवर किंवा बेबी कॅरियरमध्ये सुरक्षितपणे ठेवले आहे ह्याची खात्री करा. बाळाला रोज थोडावेळ त्याच्या पोटावर झोपवा. यामुळे त्याच्या मान आणि पाठीचे स्नायू मजबूत होतील, दृष्टी सुधारेल, कारण बाळ आता वर आणि आजूबाजूला बघू लागेल.

. झोप

पहिल्या २ महिन्यांत नवजात शिशुला दिवसाला सुमारे १६ तास झोपण्याची आवश्यकता असते. ते सहसा २ ते ४ तासांची झोप घेतात आणि भुकेले किंवा न्यापी ओली झाल्यास जागे होतात. बाळाला दर ३ तासांनी पाजण्याची आवश्यकता असल्याने बाळाला उठवून पाजण्याची आवश्यकता असू शकते. जर तुमचे बाळ आदर्श नवजात झोपेच्या पद्धतीचा अवलंब करीत नसेल तर काळजी करू नका. प्रत्येक बाळ वेगळे असते आणि प्रत्येक बाळाचे झोपेचे वेगवेगळे चक्र असते. बाळ झोपेत असताना आपल्या बाळाच्या डोक्याची स्थिती बदलण्यास विसरू नका त्यामुळे बाळाचे डोके सपाट होण्यास प्रतिबंध होतो. बाळ गुदमरू नये म्हणून त्यास पाठीवर झोपवले आहे ह्याची खात्री करा. .बाळ झोपलेले असताना आईने सुद्धा थोडा वेळ झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा बाळ झोपलेले असताना अंघोळीसाठी आणि शांतपणे जेवण्यासाठी वेळ काढला पाहिजे.

१०. नखे कापणे

नवजात बाळाची नखे खूप वेगाने वाढतात. हाताच्या हालचालीमुळे बाळ स्वतःचा चेहरा किंवा शरीर खाजवू शकते. म्हणूनच, बाळाची नखे वेळीच कापणे महत्वाचे आहे. बाळाची नखे मऊ असल्याने बेबी नेल क्लिपर्सचा वापर करा. जेव्हा बाळ झोपलेला असेल तेव्हा हळुवारपणे नखे ट्रिम करून पहा. नखे खूप कोमल असतात आणि बाळासाठी ते वेदनादायक असू शकते म्हणून जास्त खोलवर ट्रिम करु नका.

नवीन पालकांनी कुटूंब किंवा मित्रांकडून मदत घ्यावी जेणेकरून त्यांना विश्रांती मिळेल आणि स्वत: ची देखील काळजी घेता येईल. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या अनेक पैलूंबद्दल नवजात बाळाचे पालक आश्चर्यचकित होऊ शकतात. हा लेख नवीन मातांना त्यांच्या नवजात मुलांची काळजी आत्मविश्वासाने घेण्यास मदत करेल

आणखी वाचा: बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article