In this Article
मुलांमध्ये दात येण्याचे वय हे सहा ते बारा महिन्यांच्या मध्ये असते. दात आल्यामुळे घनपदार्थ चावण्याची आणि ते गिळण्याची क्षमता बाळांमध्ये येते. परंतु तुम्ही तुमच्या बाळाला नक्की काय भरवू शकता?
तुमच्या १२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ
तुमच्या एक वर्षांच्या बाळासाठी विशेष अन्नपदार्थ करण्याचा ताण घेण्याची गरज नाही. तुम्ही घरातली मोठी माणसे जे खाता तेच तुमचे बाळ खाऊ शकते. फक्त तुम्ही एक काळजी घेतली पाहिजे की बाळाच्या जेवणामध्ये कमीत कमी मीठ घाला. अर्थातच, त्यामुळे हॉटेलमधील अन्नपदार्थ टाळले पाहिजेत कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते.
१. सीरिअल
नेहमीच हा पदार्थ क्लासिक समजला जातो! मक्याचे सीरिअल्स दुधात घालून मऊ होतात आणि ते पचायला सुद्धा हलके असतात. संपूर्ण धान्य सीरिअल शक्यतोवर प्राधान्य द्या.
२. काकडी
चिरलेली काकडी हा ताजेतवाने वाटण्यासाठी दिवसातून केव्हाही खाण्यासारखा नाश्ता आहे. बाळाला खाण्यास सोपे जावे म्हणून फ्रेंच फ्राय सारखे काकडीचे लांब काप करा. जर उन्हाळ्याचे गरम दिवस असतील तर काकडीमुळे निर्जलीकरणाला आळा बसतो.
३. डाळ
डाळीमध्ये प्रथिने खूप प्रमाणात असतात आणि त्याचा स्नायूंच्या विकासासाठी फायदा होतो. डाळीचे फोडणी घालून वारं केल्यास ते भट किंवा चपाती सोबत खाता येते आणि त्यास उग्र वास राहात नाही. तुम्ही चपातीचे छोटे तुकडे करत आहात ना ह्याची खात्री करा.
४. भाज्यांचे सूप
तुमच्या एक वर्षांच्या बाळासाठी हे एक चांगले अन्न आहे आणि त्यामध्ये तुम्ही घातलेल्या सगळ्या भाज्यांचे सत्व असते. उदा: गाजराचे सूप हे डोळ्यांसाठी चांगले असते आणि बटाट्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात.
५. सोया
भाज्यांऐवजी सोया हा एक प्रथिनांसाठी चांगला पर्याय आहे. शिजवल्यानंतर त्याचा सोया मऊ होत असल्याने बाळासाठी तो अगदी उत्तम अन्नपदार्थाचा पर्याय आहे.
६. पराठा
कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी नियमित बनवला जाणारा हा अन्नपदार्थ आहे आणि बाळ सुद्धा तो सहजगत्या खाऊ शकते. भाज्या आणि पनीर ह्यांचे सारण पराठ्यामध्ये घातल्यास तो एक संतुलित जेवणाचा पर्याय होऊ शकतो.
७. चिकन
ज्या चिकन वर संप्रेरकांची प्रक्रिया केलेली नाही असे प्रमाणित केलेले असते असे ऑरगॅनिक चिकन आणण्याची काळजी घ्या. तुमच्या बाळासाठी ते खूप चांगले शिजवून घ्या. तसेच त्यामध्ये खूप जास्त मसाले घालू नका आणि हे शिजवलेल्या मांसाचे छोटे तुकडे करा, आणि बाळाला भरवण्याचा आधी हाडे वेगळी करा.
८. फिश
मासे करताना कायम लक्षांत ठेवा की तळल्याने पोषणमूल्यांचा ऱ्हास होतो त्यापेक्षा माश्याचे सार केलेले चांगले. चिकन प्रमाणेच बाळाला भरवण्याआधी मांस वेगळे काढून घ्या आणि बाळाला भरवण्याआधी हाडे वेगळी केली आहेत ना ह्याची खात्री करा. समुद्री माशांमधील अगदी छोटे आणि मऊ काटे बाळाच्या घशात अडकू शकतात.
१ वर्षांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता/ बाळाला भरवण्याचे वेळापत्रक
तुमच्या १ वर्षाच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता करण्यासाठी तुम्हाला नेहमीच्या पदार्थांपेक्षा खूप काही वेगळे करायला नको. जर तुमचा आठवड्याचा आठवड्याचा खाण्याचा तक्ता एकसुरी होत असेल तर त्यास थोडी रंगत आणण्यासाठी तसेच तुम्हाला आणि तुमच्या बाळाला संतुलित आहार मिळण्यासाठी इथे बाळासाठीच्या अन्नपदार्थांचा एक सोपा तक्ता दिला आहे.
-
१२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – १ ला आठवडा
दिवस | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | व्हेजिटेबल उपमा + दूध |
१/२ उकडलेले अंडे + १ छोटे केळं |
ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | पनीर –खजूर लाडू | पालक खिचडी आणि दही |
दिवस २ रा | नाचणी डोसा + दूध | १/२ अंडयांचे ऑम्लेट + संत्र्याच्या काही
फोडी |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे तुकडे + हातसडीच्या तांदळाचा भात | छोटी इडली + डाळ | मेथी ठेपला + दुधी भोपळा कोफ्ता |
दिवस ३ रा | सफरचंदाची खीर + गाजराचा पराठा | १/२ अंड्याची भुर्जी + १/२ पेरू | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | मिक्स धान्याचे धिरडे | पराठा + पनीर भुर्जी |
दिवस ४ था | दलिया | दही, गूळ घातलेले + १/२ आंबा | ज्वारी –गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | दही | पोळी+ भाजी + दाल फ्राय |
दिवस ५ वा | ज्वारीच्या लाह्यांची खीर | १–२ पनीर लाडू + १/२ कप पेअर | व्हेजिटेबल सूप + फ्राईड राईस + गाजराचे काही काप | फ्रुट कस्टर्ड | भाज्या–मसूर डाळ पुलाव |
दिवस ६ वा |
खीर |
१/२ ऑम्लेट किंवा बेसन धिरडे + १/२ कप कलिंगड किंवा पपई | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | पनीर–सफरचंद कुस्करून | डोसा – सांबार |
दिवस ७ वा | शेवयांचा उपमा + चॉकलेट मिल्क | १ छोटा चिकू किंवा सफरचंद + ताजी नारळाची बर्फी किंवा खजूर –बदाम लाडू | ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | पोहे पुडिंग | भात + अंड्याचा किंवा पनीर रस्सा |
-
१२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – २ रा आठवडा
दिवस | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | जव–सफरचंद लापशी, दुधात शिजवलेली | १/२ अंड्याचे कस्टर्ड किंवा पॅनकेक | रोटी+ डाळ+ आवडीची भाजी + काकडीचे काही काप | चीझ सँडविच, खजूर आणि टोमॅटो चटणी | व्हेजिटेबल सूप + फ्राईड राईस + गाजराचे काही काप |
दिवस २ रा | राजगिरा–गहू शिरा, गोडीसाठी कुस्करलेले मनुके घालून + दूध | १/२ अंड्याची भुर्जी किंवा पनीर
लाडू |
ज्वारी – गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | उकडलेले बटाटे, बटर घालून | रोटी+ गाजर–भोपळी मिरची भाजी + मूग डाळ |
दिवस ३ रा | शेवया किंवा रव्याचा उपमा + आंबा किंवा केळ्याचा मिल्कशेक | १/२ अंड्याचे ऑम्लेट किंवा १–२ ताजी नारळाची बर्फी | रोटी + तुमच्या आवडीची भाजी + दालफ्राय | १–२ पनीर लाडू + १/२ कप पेअर | ज्वारी –गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो |
दिवस ४ था | नाचणी सत्व. १ टी स्पून बदामाची पावडर घालून | पनीर –सफरचंद मॅश | आलू पराठामी घरी केलेले लोणी + लस्सी | फ्रुट कस्टर्ड | मेथी ठेपला + दुधी भोपळा कोफ्ता |
दिवस ५ वा | दूध पोहे आणि सफरचंदाचे काप | पोहे पुडिंग | पराठा + पनीर भुर्जी | फळांचे मिश्रण |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
दिवस ६ वा | ज्वारीच्या लाह्यांची खीर | १ छोटे केळं | रोटी +डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | शिजवलेले सफरचंद + मुरमुरे पावडर | टोमॅटो आणि भोपळा सूप + रोटी किंवा पराठा |
दिवस ७ वा | नाचणी डोसा + चॉकलेट मिल्क | फ्रुट कस्टर्ड | ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | गहू–केळ्याचा शिरा | बाजरीची भाकरी आणि घोसाळे–मूग डाळ भाजी |
-
१२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – ३ रा आठवडा
दिवस | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | साबुदाणा खीर | किसलेले सफरचंद | ज्वारी–गहू रोटी + डाळ पालक + काही चेरी टोमॅटो | फळांचे शिजवलेले मिश्रण | भोपळ्याचे सूप आणि चीझ सॅन्डविच |
दिवस २ रा | नाचणीचा डोसा, कमी तिखट सांबार + दूध | साल काढून कापलेले पीच किंवा उकडलेले सफरचंद | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | मूग डाळ लाडू | कोबी पराठा आणि दही |
दिवस ३ रा | शेवया किंवा रव्याचा उपमा + आंबा किंवा केळ्याचा मिल्कशेक | उकडलेली फळे | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | रताळे + पोहे पावडर | पराठा + पनीर किंवा अंडा भुर्जी |
दिवस ४ था | गव्हाची लापशी | स्ट्रॉबेरी किंवा सफरचंद काप करून | ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | जव लाडू | जिरे भात आणि डाळ |
दिवस ५ वा | ओट्स लापशी | १/२ अंड्याचे कस्टर्ड किंवा पॅनकेक | व्हेजिटेबल सूप + फ्राईड राईस + गाजराचे काही काप | फ्रुट योगर्ट | बाजरीची भाकरी + वांग्याची भाजी + उडीद डाळ |
दिवस ६ वा | केळ्याचा मिल्कशेक + पोहे | १/२ अंड्याची भुर्जी किंवा पनीर लाडू | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | रताळे उकडलेले | व्हजिटेबल–मसूर डाळ पुलाव आणि नारळाची
आमटी |
दिवस ७ वा | थालीपीठ + दूध | राजगिरा लाडू | ज्वारी– गहू रोटी + दुधी भोपळ्याची भाजी + चना डाळ + काही चेरी टोमॅटो | खजुराचे लाडू | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप |
-
१२ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – ४ था आठवडा
दिवस | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | पालक–पुरी भाजी + लस्सी | बेसन लाडू | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | उकडलेले मूग चाट मसाला घालून | कांद्याचे थालीपीठ आणि लोणी |
दिवस २ रा | चीझ–व्हेजिटेबल पॅनकेक + दूध | पेरूचे काप किंवा उकडलेल्या गाजराचे तुकडे | ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो | मँगो/स्ट्रॉबेरी योगर्ट आणि ओट्स किंवा दह्यात भिजवून पोहे आणि कुस्करलेले केळं | दही भात आणि काकडी |
दिवस ३ रा | छोट्या इडल्या आणि सांबार,चटणी + दूध | उकडलेले चना चाट | रोटी + आवडीची भाजी + दाल फ्राय | शेवया किंवा रव्याचा उपमा + केशर–वेलची दूध | पनीर कटलेट्स |
दिवस ४ था | ज्वारीच्या लाह्यांची लापशी | पोहे पुडिंग | आलू पराठा आणि घरी केलेले लोणी + लस्सी | पनीर मध किंवा चाट मसाल्यासोबत | कमी तिखट पावभाजी आणि मसूरच्या डाळीचे सूप |
दिवस ५ वा | १/२ अंड्याचे ऑम्लेट + केळ्याचे मिल्कशेक | शिजवलेले पेअर किंवा सफरचंद | पराठा + पनीर भुर्जी | भाजलेले रताळे | व्हेजिटेबल खिचडी आणि दही किंवा कढी |
दिवस ६ वा | तांदूळ–सफरचंद खीर | केळ्याचे काप | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप | १ वाटी गव्हाची लापशी आणि अक्रोड पावडर | १–२ छोटे, चांदणीच्या आकाराचे ज्वारी–पनीर–पालक पराठा |
दिवस ७ वा | राजगिरा– ज्वारी पॅनकेक + केळ्याचे पॅनकेक | दही | रोटी + आवडीची भाजी + डाळ + काकडीची कोशिंबीर | खजूर आणि टोमॅटो चटणी आणि चीझ सँडविच | मटार आणि बटाटा भाजी आणि पराठा |
१ वर्षाच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थांच्या पाककृती
तुमच्या बाळासाठी तुम्ही खालील पदार्थ करून पहा
१. सफरचंदाच्या तळलेल्या रिंग्स
अगदी झटपट आणि गोड नाश्ता!
साहित्य:
- १ सफरचंद
- १/४ कप पीठ
- १/२ टी स्पून साखर
- चिमूटभर दालचिनी
- १/२ फेटलेले अंडे
- १/४ कप ताक
- चिमूटभर मीठ
कृती:
- पीठ, साखर, मीठ, दालचिनी मिक्स करून बाजूला ठेवा
- अंडे आणि ताक एका दुसऱ्या भांड्यात मिक्स करून ठेवा
- सफरचंदाचे १/४ तुकडे करा आणि मधला गाभा काढून टाका
- दोन्ही भांड्यातील मिश्रण एकत्र करा नि त्यामध्ये सफरचंदाच्या रिंग्स घालून चांगले तळून घ्या
मोठ्या मुलांसाठी तुम्ही तळलेल्या तुकड्यांवर पिठीसाखर लावा!
२. बेसन पराठा
डाळीच्या पिठातील प्रोटीन आणि पराठ्यातील कर्बोदकांमुळे दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा एक संतुलित मार्ग आहे.
साहित्य:
- गव्हाचे पीठ
- २ टेबल स्पून बेसन
- १/२ चिरलेला कांदा
- चवीनुसार मीठ
- १ टेबल स्पून धान्याची पूड
- १ टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर
- १ टेबल स्पून गरम मसाला
- १ टेबल स्पून ओवा
- ३–४ टेबल स्पून तेल
कृती:
- बेसन, कांदा, कोथिंबीर पावडर, चिरलेली कोथिंबीर, ओवा आणि गरम मसाला
- हे मिश्रण थोडे तेल लावून चांगले मळून घ्या. ( पाणी घालू नका!)
- गव्हाचे पीठ चपाती करण्यासाठी वापरा आणि बेसन पीठ हे सारणासाठी वापरा
- तव्यावर थोडे तूप सोडून भाजून घ्या
- बटर किंवा दह्यासोबत खाण्यास द्या
३. नाचणीचे लाडू
नाचणी म्हणजे लोहाचे समृद्ध स्रोत आहे आणि त्यामुळे ऍनिमिया होत नाही आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते
साहित्य:
- १ किलो नाचणी पावडर
- १/२ किलो पिठीसाखर
- १/२ किलो शुद्ध तूप
- बदाम आणि काजूचे बारीक तुकडे
- वेलची पावडर
कृती:
- २५० ग्रॅम तूप एका पॅन मध्ये गरम करा आणि त्यावर नाचणी पीठ घाला
- मंद आचेवर ४५ मिनिटांसाठी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या
- उरलेले तूप आणि सुकामेवा व दालचिनी पावडर घाला
- १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मंद आचेवर भाजून घ्या
- थंड झाल्यावर पिठी साखर घाला आणि चांगले मिक्स करा
- आणि मग नाचणीचे लाडू वळून घ्या
४. साधी खिचडी
खिचडी तयार करण्यासाठी सोपी असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारची करता येते. उदा: टोमॅटो खिचडी, गाजर घालून केलेली खिचडी, पालक खिचडी इत्यादी. परंपरेनुसार खिचडी हा पहिला घन पदार्थ बाळे खातात.
साहित्य:
- २/३ कप तांदूळ
- १/३ कप मूग किंवा तूर डाळ
- आले (हवे असल्यास)
- हिंग (हवे असल्यास)
कृती:
- डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवा आणि १/२ तास पाण्यात भिजवत ठेवा
- पाणी काढून टाका
- सगळे साहित्य प्रेशर कुकर मध्ये ३ कप पाण्यात चांगले शिजवून घ्या
- तूप घालून वाढा
५. फ्रेंच टोस्ट
सकाळ आणि दुपारचा नाश्त्यासाठी पटकन करता येण्याजोगा हा नाश्ता आहे. तुम्हाला माहित आहे का इंग्रजीशिवाय बऱ्याच युरोपिअन भाषांमध्ये फ्रेंच टोस्ट चे भाषांतर हे “poor Knightsa” असे होते?
साहित्य:
- ब्राऊन ब्रेडचे २ स्लाइस
- १ अंडे
- १ छोट्या केळ्याची प्युरी
- १/२ कप दूध
- तेल
कृती:
- दूध, केळ्याची प्युरी आणि अंडे
- हे मिश्रण फेटून सरसरीत करून घ्या
- पॅन मध्ये तेल गरम करून घ्या
- मिश्रणात ब्रेडचा तुकडा टाका आणि तळून घ्या
६. केळ घालून केलेली ज्वारीची लापशी
हि रेसिपी तुमच्या बाळासाठी पोटभरीची आणि चविष्ठ असेल आणि तुमचे बाळ ती खूप आनंदाने खाईल आणि पुन्हा मागेल
साहित्य :
- १ कप ज्वारी
- केळ
- ३ कप पाणी
कृती :
- ज्वारी आणि पाणी एका प्रेशर कुकर मध्ये घाला आणि ५ मिनिटांसाठी शिजवा
- कुकरची वाफ गेल्यानंतर ज्वारी मऊ झाली का ते पाहावे. जर मऊ नसेल तर मऊ होईपर्यंत शिजू द्या.
- पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मऊ होईपर्यंत मिक्सर मधून ब्लेंड करून घ्या.
- केळ्याचे छोटे तुकडे करा आणि लापशी मध्ये घाला आणि २ मिनिटांसाठी उकळू द्या
- गरम गरम खायला द्या.
भरवण्यासाठी काही टिप्स
- तुमच्या एक वर्षाच्या बाळासाठी घरी पदार्थ करणार असाल तर वेगवेगळे पदार्थ करण्याची भीती बाळगू नका! काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की एकाच पदार्थ खूप जास्त काळ बाळाला भरवला तर बाळ खाण्यास त्रास देते.
- वेगवेगळे अन्न पदार्थ देण्याची एक त्रुटी अशी आहे की बाळ खात असलेल्या पदार्थांपैकी कुठल्यातरी पदार्थाची बाळास ऍलर्जी असू शकते. बऱ्याच विकसित देशांमध्ये ऍलर्जी चाचण्या ह्या बाळासाठीच्या वैद्यकीय प्रक्रियेचा भाग असतो. त्यामुळे आम्ही तो पर्याय तुम्हाला सुचवतो.
- द्रव पदार्थांनंतर लगेच बाळाला घनपदार्थ भरवू नका. ही प्रक्रिया हळूहळू करा. सुरुवातीला मऊ पोत असलेले पदार्थ भरवा नंतर घनपदार्थ. तसेच भरवण्याआधी थोडे पातळ करून बाळाला भरवावे.
- घनपदार्थ बाळाला भरवण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्या उठल्या किंवा दुपारी झोपेतून उठल्यावर जेव्हा त्यांची ऊर्जा सर्वात जास्त असते!
- बाळाला भरवण्यासाठी उंच खुर्ची घेण्यास विसरू नका कारण बाळासाठी तर ती सुरक्षित तर आहेच आहेच पण तुमच्या पाठीला सुद्धा त्यामुळे आराम मिळेल कारण गर्भारपणाच्या ९ महिने आणि त्यानंतर तुमच्या बाळाला १ वर्षापर्यंत कडेवर घेतल्याने तुमच्यासाठी ते योग्य आहे.
- आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोषक आहाराची चव कळण्यास उशीर लागणार नाही. बाळाला नवीन अन्नाची चव कळण्यासाठी जवळजवळ १५ वेळा प्रयत्न करावे लागतील. म्हणून जर बाळाने समजा सोमवारी गाजर प्युरी खाल्ली नाही तर बुधवारी प्रयत्न करणे सोडू नका आणि त्यानंतरच्या पुढील आठवड्यात सुद्धा प्रयत्न करत रहा
- बाळाला जबरदस्तीने भरवू नका. अशीही शक्यता असते की बाळाला अजिबात भूक लागलेली नसते किंवा बाळाला तो विशिष्ट अन्नपदार्थ आवडत नसतो. जर बाळ एखादा पदार्थ सतत नाकारत असेल तर ठीक आहे, जशी तुम्हाला विशिष्ट अन्नपदार्थांची आवड, नावड असते तस बाळाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते.
पोषक खाणे हे काही अवघड काम नाही तर ती एक सवय आहे. आणि त्यासाठी योग्य वेळ म्हणजे पोषक आहार खाण्यास सुरुवात करणे.
अस्वीकारण:
१. प्रत्येक मूल भिन्न आहे आणि म्हणून आपल्या विवेकबुद्धीनुसार या भोजन योजना एक विश्वसनीय मार्गदर्शक म्हणून वापरा. आपण आपल्या मुलाच्या आवडी / आवडीनुसार सुधारणा करू शकता.
२. बाळाला बळजबरीने भरवू नका.
३. फॉर्मुला तयार करताना, बॉक्स वरील सूचना नीट वाचा आणि त्याबरोबर दिलेल्या चमच्याने फॉर्मुला नीट मोजून घ्या.
४. बाळाला घनपदार्थांची सुरुवात करताना सुरुवातीला पाणी घालून सूप च्या स्वरूपात ते दिले पाहिजेत. जस जसे बाळ वाढेल तसे बाळाची काळजी घेणारी व्यक्ती किंवा आईने घनपदार्थाचा घट्टपणा थोडा वाढवला पाहिजे जेणेकरून बाळाला ते गिळता येतील. खूप घट्ट घनपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते/ जड होते. तसेच खूप पातळ केले तर बाळ भुकेले राहते.
५. काह बाळे काही दिवस कमी खातात आणि हे खूप योग्य आहे. तथापि जर बाळाने सलग ३–४ दिवस खाल्ले नाही तर मार्गदर्शनासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
६. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर बाळ कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला दूध जास्त प्रमाणात बाळाला देऊ शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा घनपदार्थ देण्यास सुरुवात करा.
७. जर बाळाला जुलाब होत असतील तर स्तनपान थांबवू नका
८. जर बाळाने अन्न खाण्यास सुरुवातीला नकार दिल्यास तुम्ही अन्नपदार्थाची चव वेलची, जिरे पावडर, लिंबाचा रस किंवा कढीपत्ता घालून बदलू शकता.
९. जर तुमच्या बाळाला सुक्यामेव्याची, अंडी किंवा ग्लुटेनची ऍलर्जी असेल तर कुठलेही अननपदार्थ भरवण्याच्या आधी डॉक्टरांशी संपर्क साधा.