Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती

बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती

बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती

मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांच्या पोषणविषयक गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांचा आहार आपल्यापेक्षा वेगळा असणे आवश्यक आहे. मुलांसाठी आहाराचे नियोजन करताना विचारात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे छोटी बाळे खाण्याच्या बाबतील लहरी असू शकतात. म्हणूनच आपल्या लहान मुलासाठी आहाराचे नियोजन करताना खाद्यपदार्थांची चव तसेच त्यांचे पौष्टिक मूल्य विचारात घेणे आवश्यक आहे, म्हणूनच या समस्येवर काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फळांचा आहारात समावेश करणे. आपल्या मुलाच्या आहारात समावेश करण्यासाठी सर्वोत्तम फळांपैकी एक म्हणजे ब्लूबेरी.

ब्लूबेरी बाळांसाठी चांगल्या आहेत का?

ब्लूबेरी, अँटिऑक्सिडंट्स, झिंक, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांचा तसेच व्हिटॅमिन सी, के आणि बी 6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फ्रुक्टोज नावाच्या निरोगी नैसर्गिक फळांच्या साखरेचा समृद्ध स्त्रोत आहेत. यामुळे तुमचे बाळ उत्साही आणि सक्रिय राहील. रक्ताभिसरण नियंत्रित करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, हाडांच्या विकासास आणि वाढीस ब्लूबेरी मदत करते आणि संज्ञानात्मक विकासाचा दर वाढवण्यासाठी देखील ब्लूबेरीचा उपयोग होतो.

१ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लूबेरीसह कोणत्याही बेरी खाऊ नयेत, कारण त्यामुळे त्वचेवर ऍलर्जी किंवा रॅशेस होऊ शकतात.

ब्लूबेरीचे पौष्टिक मूल्य

ब्लूबेरीचे पौष्टिक मूल्य

ब्लूबेरीचे पौष्टिक मूल्य खूप चांगले आहे. येथे १०० ग्रॅम ब्लूबेरीच्या पौष्टिक मूल्याचे टेबल दिलेले आहे.

पौष्टिक घटक मूल्य दर १०० ग्रॅम
तंतुमय पदार्थ .४ ग्रॅम
प्रथिने .७४ ग्रॅम
नैसर्गिक साखर .९६ग्रॅम
पोटॅशियम ७७ मिग्रॅ
फॉस्फरस १२ मिग्रॅ
कॅल्शियम ६ मिग्रॅ
मॅग्नेशियम ६ मिग्रॅ
व्हिटॅमिन ई .५५ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी .५ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी ३०.४२ मिग्रॅ
व्हिटॅमिन के १०.३ मिग्रॅ

लहान बाळे ब्लूबेरी कधी खाऊ शकतात?

बहुतेक पालकांना पुढील प्रश्न पडतात, जसे कि, मुले कुठल्या वयात ब्लूबेरी खाऊ शकतात किंवा ब्लूबेरी खाण्यासाठी कोणते वय सुरक्षित आहे? वर नमूद केल्याप्रमाणे, मूल एक वर्षांचे झाल्यानंतर किंवा घनपदार्थ खाण्यासाठी जेव्हा त्यास आत्मविश्वास येईल आणि ते आरामदायक असेल तेव्हा ब्लूबेरी खाण्यास सुरुवात करू शकते. जर बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल तर ब्लूबेरी देणे पूर्णपणे टाळा. जर तुम्ही तुमच्या मुलाला ६८ महिने वयाच्या बाळाला ब्लूबेरी देऊ इच्छित असाल तर ते प्युरीच्या स्वरूपात द्या. परंतु सर्व्हिंग शक्य तितके मध्यम प्रमाणात असावे. बाळाला जास्त प्रमाणात बेरी खायला घालू नका कारण त्यामुळे इतर अन्नपदार्थांचे शोषण नीट होत नाही.

लहान मुलांसाठी ब्लूबेरीचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे

ब्लूबेरीला सुपरफूड मानले जाते, याचे कारण त्यांचे असंख्य फायदे आहेत, त्यापैकी काही येथे दिलेले आहेत:

. हाडांच्या वाढीस मदत होते

ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर असतात. हाडांच्या विकासासाठी ते आवश्यक असतात. व्हिटॅमिन के, विशेषतः, कॅल्शियमसह, हाडांच्या विकासास मदत करणारा ऑस्टियोकाल्सीन नावाचा घटक तयार करण्यास मदत करते.

. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते

ब्लूबेरीमध्ये भरपूर घटक असतात आणि हे घटक कार्डिओप्रोटेक्टिव्ह म्हणून ओळखले जातात. यामध्ये तंतुमय पदार्थ आणि पॉलीफेनॉल हे घटक असतात. हे दोन घटक निरोगी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली मजबूत राखण्यासाठी ओळखले जातात.

. रक्ताभिसरण नियंत्रित करते

लहान मुलांची रक्ताभिसरण प्रणाली अद्याप विकसित होत असते त्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन के असल्यामुळे ही समस्या प्रतिबंधित करण्यात मदत होते.

. रक्तदाब नियंत्रित करते

पोटॅशियम हा आहारातील एक घटक आहे त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होऊ शकतो. ब्ल्यूबेरी मध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात त्यामुळे ब्ल्यूबेरी रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात.

. कर्करोग प्रतिबंधित करते

ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि ते कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करतात.

. मुक्त रॅडिकल्स नियंत्रित करण्यास मदत करते

ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्सची चांगली मात्रा असते. हे अँटिऑक्सिडंट्स, रॅडिकल्सपासून बचाव करण्यास मदत करतात. कोणत्याही वयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात.

. डोळ्यांचा थकवा कमी करते आणि दृष्टी सुधारते

ब्लूबेरी मध्ये डोळ्यांसाठी चांगली असलेली हायड्रेटिंग खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे आपल्या बाळाचे डोळे बरे होतात आणि डोळ्यांना आराम मिळतो. तसेच, ब्लूबेरीमध्ये असलेले अँथोसायनिन (फ्लेव्होनॉइड रंगद्रव्ये जी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात) दृष्टी सुधारण्यास मदत करते.

. मज्जासंस्था आणि संज्ञानात्मक विकास राखण्यास मदत करते

ब्लूबेरीमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे मज्जासंस्थेचा ऱ्हास कमी करण्यास मदत होते तसेच हे संयोजन मज्जासंस्था दुरुस्त करण्यास आणि ती टिकवून ठेवण्यास देखील मदत करते.

तुमच्या बाळाला ब्लूबेरी ऍलर्जी होऊ शकते का?

बहुतेक बेरीमध्ये ऍलर्जिक गुणधर्म असू शकतात. परंतु ब्लूबेरीच्या बाबतीत हे खरे नाही ते नॉनएलर्जेनिक आहेत. याचा अर्थ असा नाही की तुमच्या बाळाला ब्लूबेरीची ऍलर्जी होणार नाही जर तुम्ही तुमच्या बाळाला ८ महिन्यांपेक्षा कमी वयात ब्लूबेरीची ओळख करून दिली तर असे होऊ शकते. ऍलर्जी झाली आहे किंवा नाही हे लक्षणांद्वारे ओळखली जाऊ शकते:

 • पुरळ
 • डोळे सुजले
 • सुजलेले ओठ
 • बिघडलेले पोट

जर तुमच्या बाळाला एक्जिमासारखी त्वचेची समस्या असेल किंवा आहारात नवीन पदार्थांचा समावेश केल्यानंतर बाळांना ऍलर्जिक प्रतिक्रिया येत असेल तर तुम्ही थोड्या काळासाठी ब्लूबेरी टाळण्याची शिफारस डॉक्टरांनी केली आहे. मोठ्या माणसांना ब्लूबेरीची ऍलर्जी होत नाही.

ब्लूबेरीमुळे बाळांना बद्धकोष्ठता होऊ शकते का?

ब्लूबेरीचा जास्त वापर केल्याने बहुतेक लोकांना अतिसार किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. लहान मुलांमध्ये, जर त्यांना ब्लूबेरीची ऍलर्जी असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले तर ते देखील बद्धकोष्ठता होण्याचे कारण असू शकते. अतिसंवेदनशील पचनसंस्था असल्यास ब्लूबेरी बद्धकोष्ठतेचे संभाव्य कारण असू शकते. हे टाळण्यासाठी, कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बाळांसाठी ब्लूबेरी कशी निवडावी आणि साठवावी?

ब्लूबेरी कशी निवडावी आणि ती कशी साठवावी ह्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ताजी आणि सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली ब्लूबेरी खरेदी करा. त्यामध्ये पौष्टिक मूल्य जास्त प्रमाणात असते आणि त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते. आपण सेंद्रिय ब्लूबेरी खरेदी करत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी, पॅकेजिंगवर सेंद्रिय प्रमाणित स्टिकर आहे की नाही ते पहा. ब्लूबेरी ताज्या असल्याची खात्री करण्यासाठी, गडद निळ्या रंगाची ब्लूबेरी खरेदी करा आणि त्या कडक असाव्यात परंतु कच्च्या नसाव्यात. जर हे निकष जुळले नाहीत तर त्या शिळ्या असतील. ब्लूबेरी साठवण्यासाठी, त्या पूर्णपणे धुवा आणि ०३ अंश सेल्सिअस तापमानाला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

जर तुम्ही फ्रोझन ब्लूबेरी खरेदी करत असाल तर ते एक्स्पायरी डेट नीट तपासून पहा. पॅकेजिंगवर उत्पादित आणि कालबाह्यता तारीख नमूद नसल्यास, ती ब्लूबेरी खरेदी करू नका. गोठवलेल्या ब्लूबेरीचे पॅकेजिंग घट्ट बंद असल्याची खात्री करा. जेव्हा तुम्ही पॅकेट उघडता तेव्हा बेरीला हवाबंद झिपलॉक बॅगमध्ये पुन्हा फ्रीझ करून ठेवा.

आपल्या बाळासाठी चविष्ट ब्लूबेरी पाककृती

आपल्या बाळासाठी चविष्ट ब्लूबेरी पाककृती

बाळासाठी ब्लूबेरी कशी तयार करावी हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हे त्यांच्या वयावर अवलंबून आहे कारण ब्लूबेरी एकतर फळ म्हणून दिली जाऊ शकते किंवा एखाद्या पाककृतींमध्ये वापरली जाऊ शकते.

. ब्लूबेरी प्युरी

एका वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना ब्लूबेरी प्युरीच्या स्वरूपात देणे सामान्य आहे. बाळासाठी ब्लूबेरी प्युरी कशी करायचे ते येथे दिलेले आहे.

साहित्य

 • ताजी ब्लूबेरी १ कप
 • पाणी/२ कप

कृती

पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये ब्लूबेरी घाला. ब्लूबेरी थोडी मऊ होईपर्यंत वाट पहा आणि नंतर ब्लूबेरी पूर्णपणे मॅश करा. पाणी आणि ब्लूबेरी मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत भांडे गॅस वर राहू द्या. नंतर काही मिनिटे थंड होऊ द्या आणि ते ब्लेंडरमध्ये घाला आणि ब्लेंड करून घ्या. जास्तीचे पाणी गाळून तुमच्या बाळाला द्या.

. ब्लूबेरी ओटमील

आपल्या बाळासाठी हा एक अत्यंत निरोगी नाश्ता आहे. हा बनवणे सोपे आहे आणि आपल्या बाळाला तो खूप आवडेल.

साहित्य

 • ब्लूबेरी प्युरी /२ कप
 • अनफ्लेवर्ड ओटमील १/२ कप

कृती

ओट्सचे जाडे भरडे पीठ बारीक करून घ्या. ब्लूबेरी प्युरीमध्ये ते चांगले मिसळा. आपल्या बाळासाठी योग्य पेस्ट करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही कोमट पाणी घालू शकता.

. ब्लूबेरी ऍपल पुरी

ब्लूबेरी प्युरी सारखीच, ही पाककृती सुद्धा आपल्या बाळासाठी बनवणे सोपे आहे आणि बाळाला ही डिश नक्कीच आवडेल.

साहित्य

 • ताजी ब्लूबेरी १ कप
 • ताजे सफरचंद
 • पाणी /२ कप
 • मध (१ वर्षाखालील मुलांसाठी योग्य नाही)

कृती

एका भांड्यात पाणी उकळून घ्या. नंतर मंद आचेवर ब्लूबेरी आणि चिरलेली सफरचंद घाला. ते मऊ होईपर्यंत मंद आचेवर उकळा. नंतर हे मिश्रण भांड्यात मॅश करा, जास्तीचे पाणी गाळून घ्या. ब्लेंडरमध्ये ठेवा आणि एकजीव होईपर्यंत ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या. थोडे मध घाला आणि बाळाला द्या.

. ब्लूबेरी केळी पुरी

ही प्युरी तुमच्या बाळासाठी सर्वात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी डिश आहे.

साहित्य

 • केळी
 • ताजी ब्लूबेरी १ कप
 • पाणी /२ कप

कृती

एका भांड्यात, अर्धा कप पाणी उकळून घ्या आणि गॅस मंद आचेवर ठेवा. एक कप ब्लूबेरी घाला आणि ब्लूबेरी मऊ होईपर्यंत गरम करा. त्यांना पूर्णपणे मॅश करा, केळी घाला आणि मॅश करून भांड्यात मिश्रण एकत्र करा. ते थंड होऊ द्या, थंड झाल्यावर, सर्व अतिरिक्त पाणी गाळून घ्या आणि ब्लेंडरमध्ये घालून प्युरी तयार करा. आवश्यक असल्यास मधासोबत सर्व्ह करा.

ब्लूबेरी एक सुपरफूड मानली जाते, परंतु कोणत्याही सुपरफूड प्रमाणेच ब्लूबेरीतील पोषक घटकांचा बाळाला उपयोग होण्यासाठी बाळाला ब्लूबेरी योग्य प्रमाणात देणे चांगले. बाळाच्या आहारात ब्ल्यूबेरीचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

आणखी वाचा:

बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके
बाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article