Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी पालकाची भाजी – फायदे आणि पाककृती

बाळांसाठी पालकाची भाजी – फायदे आणि पाककृती

बाळांसाठी पालकाची भाजी – फायदे आणि पाककृती

पालकाच्या भाजीत सर्वोत्तम पोषक घटक थोड्या थोड्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच पालकाचे सेवन केल्यास शरीरातील पोषक घटक संतुलित होतात.

तुम्ही लहान मुलांना पालक कधी देऊ शकता?

हा एक सामान्य प्रश्न आहे जो बहुतेक मातांना त्यांच्या लहान मुलांना नवीन आहाराची ओळख करून देताना पडतो. तुमचे बाळ आठ नऊ महिन्यांचे झाल्यानंतर तुम्ही त्याला पालक देऊ शकता. थोड्या प्रमाणात सुरुवात करून तुम्ही हळू हळू प्रमाण वाढवू शकता.

पालकाचे पौष्टिक मूल्य

पालकामध्ये आढळणारी काही महत्वाची पोषक तत्वे खाली दिलेली आहेत. १०० ग्रॅम पालकाच्या भाजीमध्ये मिळणाऱ्या पोषक तत्वांची यादी खाली दिलेली आहे.

पोषक घटक प्रमाण (प्रति १०० ग्रॅम)
फायबर .२ ग्रॅम
प्रथिने .९ ग्रॅम
कार्बोहायड्रेट .६ ग्रॅम
चरबी .४ ग्रॅम
ओमेगा .०३ ग्रॅम
कॅलरीज २३
कॅल्शियम १० %
पोटॅशियम ५५८ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी ४७ %
व्हिटॅमिन ए १८८ %
लोह १५ %

म्हणूनच, जर तुम्ही विचार करत असाल की पालक बाळांसाठी चांगला आहे का?”, तर आता तुम्हाला उत्तर माहित आहे!

बाळाच्या आरोग्यासाठी पालकाचे फायदे

बाळासाठी पालकाचे काही आरोग्यविषयक फायदे खालीलप्रमाणे आहेत

. शरीर हायड्रेटेड ठेवते

पालकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते बाळाला हायड्रेटेड ठेवते

. यकृताचे रक्षण करते

यकृताचे वेगवेगळ्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी पालकाचा चांगला उपयोग होतो

. जंतांना मारू शकतो

पालक एक सुपरफूड आहे कारण ते शरीराला परजीवी जंतांशी लढण्यास मदत करते हे जंत प्रत्यक्षात बाळावर हल्ला करतात आणि त्यास कमकुवत बनवतात

. जठरासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते

लहान मुले जठरासंबंधी समस्यांशी संघर्ष करतात कारण त्यांच्या शरीरात पूर्णपणे परिपक्व प्रणाली नसते. त्यामुळे लहान मुलांना अस्वस्थता देखील येऊ शकते. आपल्या लहान मुलामध्ये असलेल्या जठरासंबंधी समस्या दूर करण्यासाठी पालक खाणे हा एक चांगला मार्ग आहे.

जठरासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते

. हाडांसाठी चांगले

पालकांमध्ये असलेले कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे हाडांच्या बळकटीसाठी एक उत्तम स्त्रोत आहेत

. स्नायूंसाठी चांगले

पालकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते आणि ते शरीरातील स्नायू तयार करण्यास मदत करतात

. रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवते

पालकांमध्ये व्हिटॅमिन के आणि इतर सर्व पोषक घटक असतात. हे पोषक घटक अनेक आजार आणि परजीवींपासून शरीराचे संरक्षण करतात. पालक, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अन्नपदार्थाचा एक उत्तम स्त्रोत आहे आणि मुलांच्या आरोग्याच्या अनेक समस्यांपासून त्यांना सुरक्षित ठेवते.

. नैसर्गिक रेचक

पालकामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते आणि ते बाळाच्या पाचन तंत्राला अनेक प्रकारे मदत करते. पालकामध्ये आढळणारे वेगवेगळे घटक बाळाला आतड्याना गुळगुळीत होण्यास मदत करतात आणि बद्धकोष्ठतेशी सामना करण्यासाठी मदत करतात. बाळाला अपचनाचा त्रास होत असेल तर त्यास मदत करण्यासाठी पालकाची भाजी देणे हा एक चांगला मार्ग आहे.

पालक खरेदी करताना आणि साठवण्यासाठी काही टिप्स

बाजारात मिळणाऱ्या पालकाच्या भाजीवर बऱ्याचदा कीटक नाशके मारलेली असतात. आणि जेव्हा तुम्ही बाळासाठी पालक खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा हे खूप निराशाजनक आहे. पालक खरेदी करण्यासाठी आणि साठवण्यासाठी काही टिप्स इथे दिलेल्या आहेत.

 • मऊ पाने असलेला पालक खरेदी करा कारण तो ताजा असतो
 • पालकाचे देठ तपासून पहा ते मऊ आणि लवचिक असल्यास तो पालक ताजा असतो
 • पालक निवडताना, पिवळी आणि तपकिरी पाने टाळा
 • पालक साठवताना, तुम्ही तो आपल्या रेफ्रिजरेटरच्या व्हेजिटेबल क्रिस्पर मध्ये ठेवू शकता
 • पालक साठवताना तो फ्रीझ करू नका फक्त रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा
 • पालक साठवताना त्यामध्ये पाणी शिरण्यासाठी जागा नाही याची खात्री करा
 • पालक साठवण्यापूर्वी किंवा फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तो धुवू नका. त्याऐवजी तो शिजवण्यापूर्वी धुवा
 • झिपलॉक किंवा प्लास्टिक कव्हरमध्ये साठवणे सर्वात सुरक्षित आहे
 • सेंद्रीय किंवा स्थानिक पालक खरेदी करा. हा सर्वात सुरक्षित पर्याय असू शकतो

लहान मुलांसाठी पालक कसा शिजवावा?

आपल्या बाळाला आवडेल त्याप्रमाणे पालक शिजवा. फक्त तो चांगला शिजला आहे ह्याची खात्री करा आणि पालकाची पाने बाळाच्या घशात अडकणार नाहीत ह्याची खात्री करा.

बाळांसाठी निरोगी आणि स्वादिष्ट पालक पाककृती

खाली दिलेल्या काही चविष्ट पाककृती तुम्ही तुमच्या बाळासाठी बनवू शकता.

. पालक प्युरी

पालक प्युरी बाळासाठी एक उत्तम रेसिपी आहे आणि आपल्याला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करू शकता.

साहित्य

 • पालक

कृती

 • पालक चिरून वाहत्या पाण्याखाली धुवा
 • पालक धुवून घ्या
 • पालक सुमारे पाच मिनिटे वाफवा
 • पाणी काढून टाका.
 • पालक शिजल्यावर तीन मिनिटे थंड होऊ द्या
 • पालक घ्या आणि ब्लेंडरमध्ये प्युरी करा
 • आपल्याला हवे तसे सरसरीत करण्यासाठी थोडे पाणी घाला
 • गाजर, रताळे किंवा चिकन प्युरीमध्ये मिक्स करू शकता

. रताळे, पालक आणि टोमॅटो करी

भातासोबत खाण्यासाठी ही रेसिपी छान आहे

साहित्य

 • कांदा १ लहान
 • कोथिंबीर पूड १ चिमूटभर
 • जिरे पूड १ चिमूटभर
 • हळद १ चिमूटभर
 • ठेचलेली लसूण पाकळी
 • सोललेले आणि बारीक किसलेले आले १ टीस्पून
 • ऑलिव्ह तेल २ टेस्पून
 • सोललेली आणि बारीक चिरून रताळी १ कप
 • पिकलेल्या टोमॅटोच्या फोडी टोमॅटो
 • चिरलेली पालक पाने सुमारे १ १/२ कप
 • पाणी /२ कप

कृती

 • कांदा थोड्या तेलात परतून घ्या. आणि मऊ होईपर्यंत थांबा
 • नंतर, मसाले, आले घाला
 • ५ मिनिटे शिजू द्या
 • ढवळत राहा
 • ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा
 • ढवळत रहा
 • रताळे आणि टोमॅटो घाला
 • पाणी घाला
 • मिश्रण उकळून घ्या आणि नंतर मंद आचेवर ठेवा
 • योग्य सुसांगतेसाठी वाट पहा
 • चिरलेला पालक घाला आणि हलवा
 • गॅस वरून खाली उतरावा आणि थंड होऊ द्या

. पालक सफरचंद पुरी

हे डिश चवदार आहे आणि पचनासाठी उत्तम आहे.

साहित्य

 • सोललेली आणि चिरलेली सफरचंद
 • ताजा पालक २ कप
 • पाणी /२ कप
 • दालचिनी /२ टीस्पून
 • आले पावडर /८ टीस्पून
 • लवंगा /८ टीस्पून

कृती

 • सफरचंद, पाणी, दालचिनी, आले आणि लवंगा एका सॉसपॅनमध्ये घेऊन मध्यम आचेवर ठेवा
 • १५ मिनिटे शिजू द्या. आणि ते झाकून ठेवा
 • अधून मधून हलवा
 • आता सफरचंदात पालक घाला
 • आणखी दोन मिनिटे शिजवा. थोडे थंड होऊ द्या
 • सर्व साहित्य मिक्सीमध्ये घालून एक मिनिट फिरवा. प्युरी करा
 • प्युरी सर्व्ह करा

4. बाळासाठी पालकाचे सॉफल

ही डिश तुमच्या बाळाला खूप आवडेल!

साहित्य

 • ताजा किंवा फोझन पालक १०१६ औंस
 • रिकोटा किंवा कॉटेज चीज /३ कप
 • २ अंडी किंवा ४ अंड्यातील पिवळ बलक
 • लसूण १ चिमूटभर
 • तुळस १ चिमूटभर

कृती

 • सर्व साहित्य एकत्र करा आणि तेल लावलेल्या बेकिंग डिश मध्ये घाला
 • ३७५ एफ वर मिश्रण जोपर्यंत ते सोनेरी दिसत नाही तोपर्यंत १५ मिनिटे बेक करावे
 • बाहेर काढण्यापूर्वी आणि सर्व्ह करण्यापूर्वी आतील भाग नीट बेक झालेला आहे का ते तपासा

. ओट्स, एवोकॅडो, पालक

ह्या डिशमध्ये निरोगी चरबी असते

साहित्य

 • वाळलेल्या जुन्या पद्धतीचे ओट्स/४ कप
 • एवोकॅडो /
 • पालक /४ कप
 • पाणी, आईचे दूध किंवा स्टॉक /२ कप

कृती

 • प्रथम, ओट्स आणि पाणी एका कढईत घ्या आणि मंद आचेवर १० मिनिटे गरम करा
 • ढवळत राहा
 • पालक घाला आणि दोन मिनिटे शिजवा
 • प्युरी होईपर्यंत ब्लेंडरमध्ये सर्व फिरवून घ्या

ओट्स, एवोकॅडो, पालक

पालकाचे वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन्स

येथे काही स्वादिष्ट जोड्या आहेत आणि ते आपल्या बाळाला नक्कीच आवडतील.

. लसाग्ना + पालक

लसग्नासह चिरलेला पालक एक निरोगी आणि चवदार संयोजन आहे.

. परमेसन + पालक

तुम्ही पालकामध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल, लसूण मिक्स करू शकता त्यानंतर तुम्ही ते किसलेल्या परमेसन बरोबर सर्व्ह करू शकता.

. पालक + सूप

भाजीच्या सूपमध्ये चिरलेला पालक तुम्ही घालू शकता. बाळासाठी पालक सूप अत्यंत पौष्टिक आहे.

. पालक + क्रीम चीज

चिरलेला पालक शिजवून आणि क्रीम चीजसह डिप म्हणून सर्व्ह करू शकता.

लहान मुलांना पालक देताना घ्यायची खबरदारी

. चावता येणे आवश्यक

पालकाची पाककृती बाळाला चावून खाता येणे आवश्यक आहे

. ताजी पाने निवडा

आपल्या बाळासाठी ताजे पदार्थ निवडणे महत्वाचे आहे कारण त्यात सर्व पोषक असतात.

. चांगले धुवा

शिजवण्यापूर्वी पालक खरोखर चांगले धुणे आवश्यक आहे कारण पालकावर बरीच रसायने असतात

. योग्य प्रमाण

किती प्रमाणात द्यावे ह्याचा काही निश्चित नियम नाही, तुम्हाला प्रयोग करून बाळ किती खाऊ शकते ते पहावे लागेल. एक चमचाभर इतके प्रमाण सुरुवातीला ठेवा पण एक कप पेक्षा जास्त देणे टाळा.

बाळांना पालकाची ऍलर्जी होऊ शकते का?

काही बाळांना पालकाची ऍलर्जी असते. या लक्षणांवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आणि बाळाला पालकाची ऍलर्जी असल्यास बाळाला पालक देणे टाळा.

पालकाची ऍलर्जी असल्यास लक्षणे खालीलप्रमाणे

 • लहान पुरळ येऊन त्यांना खाज सुटते
 • बाळाचे पोट दुखून जुलाब होणे
 • नाक, पापण्या आणि डोळ्यांभोवती सूज दिसून येते
 • बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याला दम लागतो

बाळाला पालकाची चव आवडत नाही त्यामुळे बाळाला पालक खायला देणे हे एक आव्हान आहे त्यासाठी एक युक्ती म्हणजे त्यांना पोपई द से पालकाचे पदार्थ लर मॅनहे कार्टून पाहायला लावणे आणि तुम्हाला माहित आहे की ते फक्त त्यांच्या पोपईच्या प्रेमाखातर पालकाचे पदार्थ तोंडात घेतील!

आणखी वाचा:

बाळांच्या आहारात चिकनचा समावेश करणे
बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article