Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय

गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय

गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय

गरोदरपणाचा अनुभव हा जत्रेतल्या फिरत्या चक्रात बसल्याच्या अनुभवापेक्षा कमी नाही. कारण गरोदरपणात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. ह्या काळात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे ढेकर येणे, छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, अपचन इत्यादी प्रकारांमुळे बरीच अस्वस्थता येते. बर्‍याच गरोदर स्त्रियांमध्ये उचकीचा त्रास होणे हा देखील एक प्रमुख दुष्परिणाम आहे. दररोज काही तासांनी पुन्हा पुन्हा उचकी येत असल्याने दररोजच्या क्रियाकलापांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि ते त्रासदायक ठरू शकते.

गरोदरपणात उचकी लागणे म्हणजे काय?

सामान्यत: पहिल्या तिमाहीच्या शेवटी आणि दुसऱ्या तिमाहीच्या सुरूवातीच्या काळात, बहुतेक स्त्रियांना वारंवार उचकीचा सामना करावा लागतो. वारंवार येणारी उचकी ही खूपच त्रासदायक असली तरी त्याचा कोणताही शारीरिक त्रास होत नाही आणि ते मोठ्या चिंतेचे कारण नसते. श्वास लागणे किंवा खाण्याच्या अयोग्य सवयीमुळे गरोदरपणात बऱ्याचदा उचकी लागते. हळूहळू आणि निवांतपणे खाल्ल्यास उचकी टाळता येते.

उचकीची कारणे

गरोदर स्त्रियांना उचकी लागण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

 • जास्त ऑक्सिजन:

सर्वसाधारणपणे, गरोदरपणात, श्वास घेण्याची क्षमता अंदाजे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढते. गर्भाला ऑक्सीजन देण्याची ही शरीराची एक नैसर्गिक यंत्रणा आहे. तथापि, ऑक्सिजनच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्यामुळे आईला श्वास घेण्याची भावना निर्माण होते. श्वास लागल्याने सामान्यत: डायाफ्राममध्ये उबळ उद्भवते, आणि ह्यालाच उचकी असेही म्हणतात.

 • ऍसिड रिफ्लक्स:

अंतर्गत पचन संस्थेचे अवयव गरोदरपणात संकुचित झाल्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होतो ही एक सामान्य गोष्ट आहे. बर्‍याच वेळा घाईत खाण्यापिण्याच्या प्रवृत्ती मुळे उचकी लागू शकते, म्हणूनच होणाऱ्या आईने शांत आणि निवांत पद्धतीने खावे असे डॉक्टर सांगतात.

ऍसिड रिफ्लक्स:

बाळाला उचकी लागणे म्हणजे काय?

दुसऱ्या तिमाहीच्या आसपास, आईला गर्भाशयात सौम्य धक्क्यांची जाणीव होते. पहिल्यांदा काही वेळा, या धक्क्यांमुळे आईला भीती वाटू शकते. बाळाला काही त्रास होत नसेल ना असा ती विचार करू लागते. परंतु पुढे पुढे ह्या सौम्य धक्क्यांचा अनुभव बाळाला वारंवार येऊ लागतो. ह्यामध्ये काळजी करण्याचे काहीच कारण नाही पोटातील बाळाला उचक्या लागत असतात.

जेव्हा बाळ गर्भजलामध्ये तरंगत असते तेव्हा त्यातील एक छोटासा भाग ते गिळंकृत करते. त्यानंतर हा द्रव फुफ्फुसात प्रवेश करतो आणि बाळ ह्या उचक्यांद्वारे हा द्रव बाहेर टाकतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी बाळाच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही, कारण त्याला नाळेद्वारे आईकडून ऑक्सिजन मिळतो. खरं तर, बाळाला वारंवार येणारी ही उचकी बाळाच्या निरोगी विकासाची चिन्हे आहेत. तिसऱ्या तिमाही दरम्यान, ही उचकी वारंवार लागते आणि त्यावर लक्ष ठेवणे आईसाठी खूप आनंददायक ठरू शकते.

उचकीचा सामना करण्याचे मार्ग

काही चांगले घरगुती उपचार आहेत जे उचकीपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात उचकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय एक सुरक्षित मार्ग आहे आणि उचकी झटपट थांबवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते.

 • पाणी पिणे: उचकीसाठी हा एक सामान्य आणि सुप्रसिद्ध उपाय आहे. त्यासाठी एक ग्लास पाणी न थांबता प्या. न थांबता पाणी पिण्यामुळे, नकळत तुम्ही थोड्या काळासाठी आपला श्वास रोखू शकता. ह्यामुळे डायाफ्रामची हालचाल कमी होते . पाण्याने गुळण्या केल्यास सुद्धा त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
 • खोल श्वास घेणे: खोल श्वास घेऊन थोडा वेळ रोखून धरल्यास उचकी थांबण्यास मदत होऊ शकते. हे तंत्र फुफ्फुसांना भरते आणि डायाफ्रामची हालचाल प्रतिबंधित करते. या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटत असल्यास त्याबाबतची काळजी घ्यावी. तुम्ही फुफ्फुसांना व्यस्त ठेवण्यासाठी श्वासोच्छवासाचे इतर व्यायाम देखील करु शकता. कागदाच्या पिशवीत श्वास घेणे हे आणखी एक तंत्र आहे जे कदाचित उपयुक्त ठरेल.
 • लिंबू आणि आले: असे मानले जाते की लिंबू किंवा आल्याची फोड चोखल्यास उचकी थांबण्यास मदत होऊ शकते. चुना, आले आणि मध यांनी बनविलेले पेय देखील चमत्कार करू शकते. पाण्यासारखेच हा रस सुद्धा न थांबता एकदम प्यायला पाहिजे.

लिंबू आणि आले

 • साखर: एक चमचा साखर गिळणे हा सुद्धा उचकीवर जलद उपाय आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ह्या पद्धतीमध्ये मन दुसरीकडे वळवून उचकी थांबवली जाते. जिभेच्या खाली असलेल्या व्हागस मज्जातंतूला काही तरी गोड खाल्ले जात आहे असे संकेत मिळतात. आणि त्याबद्दल मेंदूला संकेत पाठवले जातात. त्यामुळे उचकीपासून लक्ष विचलित होते आणि उचकी दीर्घकाळासाठी थांबवली जाते.
 • आपली जीभ चिकटवा: आपली जीभ बाहेर चिकटविणे आणि एकाच वेळी आपले कान पुन्हा बंद केल्यास हा उपाय उचकीवर काम करतो. ह्या प्रक्रियेत, डायाफ्रामची हालचाल मर्यादित करण्यासाठी तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडू शकता.
 • मान वाकवा: तुम्ही अनुनासिक रस्ता बंद करण्याऐवजी, आपल्या मानेला शक्य तितक्या पुढे वाकवून आपल्या हवेच्या पाईपद्वारे हवेचा प्रवाह मर्यादित करू शकता. त्यामुळे उचकीवर नियंत्रण राहते.

उचकी टाळण्यासाठी टिप्स

 • खूप अंतर ठेऊन तीनदा जास्त जेवण्याऐवजी वारंवार थोडे थोडे खा.
 • तळलेले आणि मसालेदार पदार्थ आणि कार्बोनेटेड पेये आणि कॅफिन सारखी पेये टाळा.
 • जेवणानंतर सरळ उभे रहा किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स टाळण्यासाठी चालत रहा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुम्ही नियमितपणे बाळाच्या उचकीचा अनुभव घेत असाल किंवा दिवसातून तीन वेळा बाळाला उचकी लागत असेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. जरी बाळाला उचकी लागणे हा गरोदरपणाचा सामान्य भाग असला तरी सुद्धा एका दिवसात तसे वारंवार घडणे हे नाभीसंबधीच्या समस्येचे संकेत असू शकते. आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि बाळाच्या उचकीबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात उचकी लागण्याच्या समस्येमुळे अस्वस्थता येते. उचकी लागणे हे बाळ किंवा आई दोघांपैकी कुणालाही कोणत्याही गंभीर समस्येचे संकेत देत नाही . उचकी येणे हे शरीरात होणाऱ्या बदलांशी शरीर जुळवून घेत असल्याचे निर्देशक आहे. काही नैसर्गिक उपाय करून गरोदरपणाच्या आनंददायी प्रवासातील ही समस्या दूर केली जाऊ शकते.

स्रोत अणि सन्दर्भ:
स्रोत १
स्रोत २

आणखी वाचा:

गरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर १७ परिणामकारक घरगुती उपचार
गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article