In this Article
- अर्भके आणि बाळांमध्ये वजन वाढण्याचा अपेक्षित दर काय आहे?
- जर तुमच्या बाळाचे वजन कमी होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता आहे का?
- बाळाचे वजन कसे मोजले जाते?
- बाळाचे वजन न वाढण्याची कारणे
- वजन वाढत नसल्याची चिन्हे आणि लक्षणे
- बाळांचे वजन हळू वाढत असल्याचे निदान
- बाळाच्या हळू वजनवाढीमुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो का?
- तुमच्या बाळाचे वजन वाढविण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
- बाळाला स्तनपानातून पुरेसे पोषण मिळते आहे का?
- वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
बाळाच्या वाढीसाठी बरेच प्रयत्न आवश्यक असतात तसेच त्याची चिंता सुद्धा असते. निरंतर व निरोगी वजन वाढणे ही वाढीच्या महत्त्वपूर्ण बाबींपैकी एक आहे. वजन कमी करण्यासारखेच, वजन वाढवणे ही देखील एक कठीण आणि कंटाळवाणी प्रक्रिया असू शकते.
अर्भके आणि बाळांमध्ये वजन वाढण्याचा अपेक्षित दर काय आहे?
बालपणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात कुपोषण ही सर्वात गंभीर आणि टाळता येण्यासारखी परिस्थिती आहे. आपले मूल कुपोषित आहे की नाही हे शोधणे म्हणजे ही समस्या सोडवण्याची पहिली पायरी आहे. बाळाच्या वाढीसाठी डब्ल्यूएचओच्या वाढीच्या मानदंडांचा उपयोग होतो. एखाद्या मुलाच्या निरोगी आरोग्यासाठी वजन किती असावे हे समजण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे.
ऑस्ट्रेलियन ब्रेस्टफीडिंग असोसिएशन बाळाच्या वाढीसाठी डब्ल्यूएचओ सारख्याच मानकांचा वापर करते. त्यांच्या मते बाळाचे वजन कमी करण्यासाठी आणि वाढण्यासाठी सामान्य मानक खालीलप्रमाणे आहेतः
- प्रसूतीनंतर पहिल्या आठवड्यात नवजात बाळाचे वजन जन्माच्या वेळेच्या वजनापेक्षा सुमारे ५% ते १० % कमी होते.
- प्रसूतीच्या पहिल्या तीन आठवड्यांत नवजात बाळाचे कमी झालेले वजन पुन्हा वाढण्यास सुरुवात होते.
- बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन ते चार महिन्यांच्या आत त्यांचे वजन दुप्पट होते.
- पहिल्या वर्षाच्या आत मुले जन्माच्या वेळेपेक्षा जवळजवळ तीन पटीने वजन वाढवू शकतात, तर मुलींना आपल्या जन्माच्या वेळचे वजन तिप्पट करण्यास सोळा महिने लागू शकतात.
- पहिल्या वर्षाच्या आतच आपल्या मुलाची लांबी जन्मवेळच्या लांबीपेक्षा दीडपट वाढेल.
- मुलाच्या वाढदिवसाच्या आधी किंवा त्याच्या आसपास डोक्याचा घेर सुमारे ११ इंचाने वाढण्याची अपेक्षा आहे.
टीपः ही एक यूएन अभ्यासावर आधारित मार्गदर्शक तत्वे आहेत आणि आपल्या बाळाच्या वाढीतील फरक अपेक्षित केले जाऊ शकतात. जर आपले बाळ या मानकांचे पालन करीत नसेल तर कृपया आपल्या बाळाचा नैसर्गिकरित्या विकास होत आहे की नाही याविषयी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
जर तुमच्या बाळाचे वजन कमी होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता आहे का?
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपले मूल अद्वितीय आहे. कोणतीही दोन बाळे एकसारखी नसतात. कधीकधी मुलाची वाढ कमी होते. आपल्या मुलाचे वजन नक्कीच वाढले आहे याची खात्री करुन घ्या, तथापि, वाढीची गती अत्यंत कमी असल्यास ते चिंताजनक असू शकते. आपल्या मुलाच्या बालरोगतज्ञांशी बोला, निरोगी पौष्टिक आहाराचे अनुसरण करा आणि घाबरू नका. आपल्या मुलाला जास्त आहार देऊ नका. जन्मापासूनच निरोगी अन्नाची सवय लावल्यास तुमचे मूल नेहमीच निरोगी खाईल हे सुनिश्चित होते.
प्रत्येक मुलाची पूर्ण वाढ अनोखी असते. म्हणून, जोपर्यंत आपल्या डॉक्टरांना काळजी वाटत नाही आणि तुमचे मूल पोषक अन्न घेत आहे तोपर्यंत तुम्ही सहज आरामात राहू शकता कारण त्याच्या वाढीच्या नैसर्गिक दराच्या आधारावर त्याचे वजन वाढेल. अर्भकांचे वजन हळू वाढणे सामान्य आहे परंतु त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
बाळाचे वजन कसे मोजले जाते?
विकासात्मक टप्पे म्हणून ओळखल्या जाणार्या टप्प्यांचा वापर करून डॉक्टर आपल्या मुलाचे वजन मोजण्यास सुरवात करतात आणि निरोगी विकासासाठी आवश्यक वजन किंवा वजन कमी करण्याचे मूल्यांकन करू शकतात. हे टप्पे प्रत्येक मुलानुसार बदलतात. त्यामध्ये केवळ वजन आणि उंचीच नाही तर तुमच्या मुलास पहिल्यांदा हसू कधी आले, त्याने हासू आल्यानंतर मान फिरवणे केव्हा सुरु केले, त्याने तोंडात हात घालण्यास केव्हा सुरुवात केली, तसेच आधाराशिवाय मान धरण्यास केव्हा सुरुवात केली इत्यादी मुद्द्यांचा समावेश होतो.
पहिल्या दोन आठवड्यात बाळाचे संपूर्ण परीक्षण झाल्यावर विकासाचे टप्पे ठरतात. डॉक्टर आपल्याला काही विकासात्मक वैशिष्ट्यांवर नजर ठेवण्यास सांगतील जसे की तो केव्हा ओरडतो किंवा वेगवेगळे आवाज काढतो इत्यादी. एकदा परीक्षण संपल्यानंतर, काही समस्या असल्यास त्या समजून घेण्यासाठी डॉक्टर बाळाच्या विकासासंदर्भात काही नित्य प्रश्न विचारतील. त्यांनी एखादी समस्या ओळखल्यास ते मूळ कारण शोधण्यासाठी प्रश्न विचारतील आणि वैद्यकीय चाचण्या करतील.
अकाली जन्मलेल्या मुलांसाठी वजन वाढण्यास अडचण निर्माण होणे ही एक सामान्य समस्या असू शकते. जरी लहान मुलाला बालपणात वजन कमी होण्याचा धोका कमी असतो, तरीही असे होण्याची शक्यता आहे.
बाळाचे वजन न वाढण्याची कारणे
आधीपासूनच नमूद केलेल्या तंत्राचा वापर करून तुमचे मूल नैसर्गिकरित्या वाढत आहे की नाही हे ओळखण्यासाठी डॉक्टर खालील निकष वापरतील.
- डॉक्टरांनी त्याला नियुक्त केलेल्या वाढीच्या तक्त्यावर वजनासाठी थर्ड पेर्सेन्टाइलवर उतरणे.
- अत्यंत कमी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असणे. ह्याचा अर्थ असा आहे की तो त्याच्या उंचीच्या आधारावर अपेक्षित असलेल्या वजनाच्या २०% पेक्षा कमी आहे.
- शेवटच्या तपासणीनंतर बाळ त्याच्यासाठी नियुक्त केलेल्या वाढीच्या चार्टवर दोन पेर्सेन्टाइल पेक्षा कमी असणे.
अशा परिस्थितीत, हे निकष वजन वाढण्याच्या समस्येस सूचित करतात. म्हणूनच, वजन वाढण्याचा दर कमी असण्याचे कारण निश्चित करण्याचा प्रयत्न डॉक्टर करतील. बाळांमध्ये वजन कमी होण्याची काही कारणे आहेतः
- पोषण आहारात अडचणी – आपल्या बाळाचे वजन न वाढण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे त्याला पुरेसा आहार मिळत नाही किंवा पुरेसे दूध मिळत नाही. हे असंख्य कारणांमुळे असू शकते, बाळाची जीभ चिकटलेली असू शकते किंवा तुम्हाला पुरेसे दूध तयार करण्यात समस्या येऊ शकतात. स्तनपान तज्ञाशी बोलल्याने आपल्या बाळाच्या प्रत्येक आहार सत्राची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. तथापि, हे करण्यापूर्वी आईच्या दुधाचा कमी पुरवठा किंवा बाळाला काही वैद्यकीय स्थिती तर नाही ना ह्याचे कारण ओळखण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा दुग्धपानतज्ञाचा सल्ला घ्या.
- आधीच असलेल्या वैद्यकीय समस्या – आपल्या बाळाचे वजन न वाढण्याचे कारण पूर्व-अस्तित्वात असलेल्या स्थितीमुळे देखील असू शकते. उदाहरणार्थ, वरील मुद्द्यामध्ये नमूद केल्यानुसार, तुमच्या बाळाची जीभ चिकटलेली असणे हे एक कारण असू शकते. आईची स्तनाग्रे आत गेलेली असल्यास ती आणखी एक शक्यता असू शकते. अशा असंख्य वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो आणि परिणामी आहार घेण्यास कमी वेळ मिळतो. तुम्ही किंवा तुमचे बाळ तोंड देत असलेल्या वैद्यकीय स्थितीची ओळख करुन घेण्यासाठी डॉक्टरांशी बोलण्यास आणि संपूर्ण चाचण्या करून घेण्यास सांगितले जाऊ शकते. एकदा कारण ओळखल्यावर आहारात सुधारणा करण्यासाठी डॉक्टर मदत करू शकतील.
वजन वाढत नसल्याची चिन्हे आणि लक्षणे
आपल्या बाळाचे पुरेसे वजन वाढत आहे की नाही हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नियमित वजन-तपासणी. तुम्ही बाळाच्या शौचाच्या आणि लघवीच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे तसेच त्याच्या आहारावर लक्ष ठेवा आणि ह्या सगळ्याची नोंद ठेवा. काही अनियमितता असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वजन कमी झाल्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे आपले मूल आजारी पडणे. जर तुमचे बाळ फ्लूसारखी लक्षणे दर्शवित असेल तर त्याचा आहार वाढवण्याची आवश्यकता असू शकते. याचे कारण असे आहे की जेव्हा तो आजारी असतो तेव्हा नियमित आहारातून त्याला पुरेसे पोषण मिळू शकणार नाही.
बाळांचे वजन हळू वाढत असल्याचे निदान
उशीरा वजन वाढण्याचे निदान करण्यासाठी डॉक्टर असंख्य मार्गांचा उपयोग करू शकतात. काही सामान्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
1. तुमच्या बाळाच्या वाढीचे पेर्सेन्टाइल चार्टच्या तळाशी आहे.
यापूर्वी उल्लेखित डब्ल्यूएचओ चार्टमध्ये एक आलेख दर्शविला आहे जो पेर्सेन्टाइल आणि सेंटिल्स दर्शवितो. जर आपले मूल चार्टच्या तळापेक्षा ३% वर असेल तर याचा अर्थ १०० मुलांपैकी फक्त ३ बाळे एकतर आपल्या मुलापेक्षा लहान किंवा तुमच्या बाळाच्या आकाराचे असतील. बाळांच्या कमी वजनाचे निदान करण्याचा हा वेगवान मार्ग आहे.
2. दोन चेकअपच्या दरम्यान किंवा दोन आठवड्यांनंतर तुमच्या बाळाचे वजन वाढलेले आढळत नाही
हे बाळ कुपोषित असल्याचे निर्देशक आहे
3. रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर बाळाची वजनवाढ कमी गतीने का होत आहे त्यामागचे कारण समजेल.
निदानाची ही पद्धत सुचविण्यापूर्वी डॉक्टर अनेकदा प्रतीक्षा करण्यास आणि लक्ष ठेवण्यास सांगतात. रक्त चाचणीचा प्रकार आपल्या मुलाच्या लक्षणांवर अवलंबून असतो आणि त्याबाबतचा निर्णय प्रत्येक प्रकरणानुसार बदलतो.
4. कौटुंबिक इतिहासाची तपासणी केली जाऊ शकते.
तुमचे डॉक्टर तपासणीसाठी कौटुंबिक इतिहासाबद्दल तुम्हाला विचारू शकतात. बाळाचे वजन कमी गतीने वाढण्यामागे काही आनुवंशिक घटक तर कारणीभूत नाही ना हे डॉक्टर तपासून पाहू शकतील.
बाळाच्या हळू वजनवाढीमुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो का?
जर लक्ष दिले नाही तर अर्भकांच्या कमी वजनामुळे खालील गुंतागुंत होऊ शकते
- हृदय समस्या
- वाढ अस्थिरता
- कुपोषण
- दुर्बल प्रतिकार प्रणाली
- कमकुवत स्नायू रचना
- ऊर्जेचा अभाव
- ताप
आपल्या बाळाचे कुपोषण आहे की नाही हे पहाण्यासाठी तसेच त्याचे वजन कमी असण्यामागे काही मूलभूत समस्या आहेत का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. नवजात मुलांमध्ये वजन कमी असण्याच्या समस्येवर अनेक उपाय आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या मुलास योग्य प्रकारचे पोषण मिळण्यासाठी आणि उपचारांसाठी आपल्या डॉक्टरांशी बोला.
जेव्हा मुलाचे वजन बराच काळ वाढत नाही आणि त्याच्या वाढीच्या वयात सुद्धा त्यामध्ये काही फरक पडत नाही तेव्हा त्याला ‘फेल्युअर टु थ्राईव’ ’असे म्हणतात. ह्याचाच अर्थ असा की मूल आवश्यक उष्मांक आणि पौष्टिक आहार घेत असेल तरीही ते त्याचे वय आणि उंचीनुसार वजन वाढवण्यास अक्षम ठरते.
मुलांमध्ये वजन कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांचा जन्म अकाली आणि/किंवा असामान्यतेमुळे झाला असेल तर त्यांचे शरीर योग्यरित्या श्वासोच्छवासासारख्या साध्या कामांसाठी देखील जास्त कॅलरी घेतात. अशा मुलांच्या बाबतीत त्यांच्या पौष्टिक गरजांवर तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून दीर्घकाळ त्यांचे आरोग्य टिकून राहू शकेल.
तुमच्या बाळाचे वजन वाढविण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
आपल्या बाळाचे वजन वाढविणे हळूहळू आणि नियमित केले पाहिजे. तुमच्या मुलाचे वजन योग्य प्रकारे वाढविण्यात मदत करण्यासाठी आपण करु शकता अशा काही गोष्टी येथे आहेत.
उपचार
आपल्या बाळाचे वजन सुधारण्यासाठी असंख्य उपचार पद्धती आहेत. काही सामान्य म्हणजे:
- स्तनपानास मदत करण्यासाठी स्तनाग्र कवच वापरणे
- ड्रॉपर किंवा बाटलीमधून बाह्य आहार देणे
- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टद्वारे लिहून दिली जाणारी औषधे
- आहारतज्ञांनी लिहून दिलेला पूरक आहारदेणे
घरगुती उपचार
कधीकधी, बाळाच्या वजन वाढीसाठी ‘वेट अँड वॉच’ दृष्टिकोन ठेवणे उत्तम असू शकते. आपल्या बाळाला त्वरेने वजन वाढविणे आवश्यक आहे असे आपल्या डॉक्टरांना वाटू शकते परंतु ते औषधाची शिफारस करु शकत नाहीत. ह्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल तर ते जास्त वेळा द्या किंवा जास्त वेळ द्या.
बाळाला स्तनपानातून पुरेसे पोषण मिळते आहे का?
पहिल्या ३ महिन्यांत, जर तुम्ही बाळाला केवळ स्तनपान देत असाल तर, खालील चिन्हांद्वारे बाळाचे वजन वाढत नाही हे तुम्ही ओळखू शकता.
- स्तनपानासाठी बाळ धडपड करेल आणि त्याचे जबडे सामान्यांपेक्षा जास्त हलवत असेल आणि स्तनपान घेताना आवाज काढेल. कधीकधी, गिळताना मोठा आवाज काढेल.
- जर तुमचे स्तन,स्तनपानाच्या आधी असतात तसे जास्त कोमल आणि मऊ वाटत नसतील तर बाळ योग्यप्रकारे लॅच होऊ शकत नाही आणि यामुळे त्याला पुरेसे पोषण मिळत नाही.
- जर पहिल्या तीन महिन्यांनतर बाळाचे वजन वाढणे थांबले तर ते खराब पोषणाचे लक्षण आहे.
वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
आपल्या मुलाच्या वजन वाढीच्या समस्यांबाबत आपण शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सल्ला घ्या नाहीतर पुढील गुंतागुंत वाढू शकते. तथापि, घाबरून जाण्याची गरज नाही, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये, बाळाच्या वजनातील वाढ किंवा घट पोषणातील किंवा रुटीन मधील बदलांद्वारे नियमित केली जाऊ शकते.
आपल्या बाळाच्या कमी वजनाबाबत चिंता वाटणे स्वाभाविक आहे, परंतु लक्षात ठेवा की त्यामागील बरेच घटक आपल्या नियंत्रणाखाली आहेत. तुमच्या बाळासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्यास आणि त्याची वजनवाढ नियमित करण्यास त्यांची मदत होईल.
आणखी वाचा: