Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांना डास चावल्यास त्यावर १० नैसर्गिक उपाय

बाळांना डास चावल्यास त्यावर १० नैसर्गिक उपाय

बाळांना डास चावल्यास त्यावर १० नैसर्गिक उपाय

घरात आणि घराबाहेर, आजकाल अक्षरशः सगळीकडे डास आहेत. डास चावणे वेदनादायक असते, डास चावल्यावर खाज सुटून व्रण पडू शकतात. तुमचे बाळ अस्वस्थतेने रडू शकते. प्रत्यक्षात, डास चावू नयेत म्हणून बचाव करण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नाही. परंतु त्यावर उपचार नक्कीच आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

लहान मुलांना डास चावल्यावर त्यासाठी घरगुती उपाय

लहान मुलांना डास चावल्यावर त्यासाठी घरगुती उपाय

आपल्या बाळाची त्वचा संवेदनशील आहे म्हणूनच ती निरोगी ठेवण्यासाठी, रसायने असलेल्या स्थानिक औषधांचा वापर करणे टाळले पाहिजे.

इथे बाळाला डास चावल्यास त्यावर १० सोपे आणि परिणामकारक नैसर्गिक उपाय दिलेले आहेत

. बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामुळे पी एच नियमित होते. १ कप पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घाला आणि ते पाणी बाळाच्या डास चावलेल्या त्वचेच्या भागावर स्वच्छ कापडाने लावा आणि १० मिनिटांनंतर धुवून टाका. असे केल्याने खाज त्वरित कमी होईल. जर तुमच्या बाळाच्या त्वचेला खाज येऊ लागली तर वापर बंद करा.

. लिंबू

लिंबामध्ये ऍनेस्थेटिक आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत. लहान मुलांवर डासांच्या चाव्यासाठी हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. एका लिंबाचे दोन तुकडे करा आणि प्रभावित भागांवर हळूवारपणे चोळा. दुसरा पर्याय म्हणजे ताज्या लिंबाचे काही थेंब पिळून त्वचेवर लावा.

. ऍपल सायडर व्हिनेगर

अंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर घाला आणि डास चावलेल्या भागावर लावा. त्याचा चांगला उपयोग होतो. तुम्ही स्वतः हे करून पहा. यामुळे कोरडेपणा येऊ शकतो, म्हणून जर तुमच्या बाळाची त्वचा नेहमीपेक्षा कोरडी वाटत असेल तर हा उपाय करणे बंद करा.

. कोरफड

खाज, सूज, वेदना ह्यावर कोरफडीचा खूप उपयोग होतो. कोरफडीमध्ये नैसर्गिक एन्टीसेप्टिक गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे लहान मुलांना डास चावल्यावर हा एक चांगला उपाय आहे. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे कोरफड फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर प्रभावित भागावर हळूवारपणे लावा.

. टूथपेस्ट

फ्लोराईड आणि सोडियम लॉरिल सल्फेट नसलेली टूथपेस्ट निवडा. अशा टूथपेस्टचा वापर लहान मुलांच्या डासांच्या चाव्यावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. खाज सुटणे आणि वेदनादायक सूज दूर करण्यासाठी टूथपेस्ट प्रभावित भागावर लावा. तथापि, हे काळजीपूर्वक वापरा कारण टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असते.

. टि बॅग्ज

लहान मुलांना डास चावल्यावर टीबॅग्ज चा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. टीबॅगमध्ये टॅनिन हा तुरट घटक असतो प्रभावित भागातून द्रव काढून टाकण्यासाठी डासांच्या चाव्यावर हा योग्य उपचार आहे.

. बर्फ

बर्फामुळे वेदना कमी होतात आणि डास चावलेल्या भागातील सूज कमी होते. लहान मुलांना डासांच्या चाव्यापासून आराम देण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. फक्त बर्फाचे दोन तुकडे घ्या आणि त्यांना स्वच्छ कापडाने गुंडाळा. आता ते प्रभावित भागावर ठेवा आणि प्रभावी उपचारांसाठी सुमारे १५ मिनिटे ते हळुवारपणे दाबा.

. मध

नैसर्गिक उपचारांसाठी आपल्या मुलाच्या त्वचेच्या प्रभावित भागावर मधाचा एक पातळ थर लावा. मधामुळे सूज आणि जळजळ कमी होते.

. लसूण

वर्षानुवर्षे सूज आणि जळजळ यावर उपचार करण्यासाठी लसणाचा उपाय केला जातो. डास चावल्यावर देखील लसणाचा वापर केला जातो आणि डास चावलेल्या त्वचेच्या भागावर लसूण चोळा. काही मिनिटे थांबा आणि नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.

१०. समुद्री मीठ

समुद्री मीठामध्ये अँटीइंफ्लामेंटरी आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे बाळाला डास चावल्यावर हा सोपा आणि परिणामकारक गुणधर्म आहे. त्यासाठी स्वयंपाकघरातून थोडे मीठ घेऊन कोमट पाण्यात मिसळा. सूज आणि दाह कमी करण्यासाठी प्रभावात भागावर लावा. डोळे आणि संवेदनशील भागावर लावणे टाळा.

लहान मुलांना डास चावल्यावर त्यावर उपचार करण्यासाठी हे काही सोपे, पण प्रभावी उपचार आहेत. फक्त ते करून पहा आणि तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. परंतु मुलांना डास चावल्यावर तापाची लक्षणे दिसली किंवा पुरळ आले आणि ते कमी झाले नाहीत तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

बाळाच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे – कारणे आणि उपाय
तुमच्या बाळाचे कान कसे स्वच्छ कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article