Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण आरोग्य केळं बाळांसाठी चांगले आहे का?

केळं बाळांसाठी चांगले आहे का?

केळं बाळांसाठी चांगले आहे का?

केळं हे बाळाला स्तनपान सोडवताना देण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते. ते गोड आणि क्रीमयुक्त असल्याने, केळं खाताना बाळाला मजा येते

केळ्याचे पौष्टिक मूल्य

एका केळ्याचे पौष्टिक मूल्य (१०० ग्रॅम)

  • कॅलरी: ८९
  • एकूण चरबी: .३ ग्रॅम
  • कोलेस्टेरॉल: ० मिग्रॅ
  • सोडियम: १ मिलिग्रॅम
  • पोटॅशियम: ३५८ मिलिग्रॅम
  • एकूण कार्बोहायड्रेट: २३ ग्रॅम (आहारातील फायबर: .६ ग्रॅम; साखर: १२ ग्रॅम)
  • प्रथिने: .१ ग्रॅम
  • व्हिटॅमिन ए: %
  • व्हिटॅमिन सी: १४%
  • लोह: %
  • व्हिटॅमिन बी ६: २०%
  • मॅग्नेशियम: %

केळ्याची ओळख बाळांना कधी करून द्यावी?

डॉक्टरांनी अशी शिफारस केली आहे की तुम्ही तुमच्या बाळास वयाच्या ६ व्या महिन्यापासूनच केळं देण्यास सुरुवात करावी. ६ महिन्यांच्या बाळासाठी दररोज एक लहान केळं देणे योग्य आहे.

बाळांसाठी केळ्याचे आश्चर्यकारक आरोग्यविषयक फायदे

आपल्या बाळाला घनपदार्थांचा परिचय देताना निःसंशय आईची पहिली निवड म्हणजे केळी असते. नुकत्याच स्तनपान सोडणाऱ्या बाळांसाठी हे सर्वोत्तम अन्न आहे. तथापि, मातांमध्ये एक सामान्य प्रश्न असतो आणि तो म्हणजे: केळ्यामुळे बाळाला बद्धकोष्ठता होते का?

केळ्याचे काही फायदे खाली दिलेले आहेत.

  • तंतुमय पदार्थ जास्त असणे: केळ्यामध्ये उच्च फायबर सामग्री असते ज्यामुळे बराच काळ भूक लागत नाही. शिवाय, तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
  • लघवीच्या संसर्गाशी लढा देण्यास चांगले: केळी मूत्रमार्गाच्या संसर्गातून विषाक्त पदार्थ मूत्रमार्गातून बाहेर टाकले जातात, ज्याचा सामान्यतः मुलांना त्रास होतो.
  • पौष्टिक पदार्थांनी परिपूर्णः केळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन आणि व्हिटॅमिन बी सारखी पोषणमूल्ये भरपूर प्रमाणात असतात. केळी बाळांना वजन वाढविण्यात मदत करते.
  • हाडांसाठी चांगलेः केळ्यातील पोटॅशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
  • ऍनिमियापासून बचाव करते: केळ्यामध्ये लोहयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. हे शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यास देखील मदत करतात.
  • मेंदूची शक्ती सुधारते: केळ्यामध्ये असलेले फोलेट मेंदूच्या विकासात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. हे मेंदूच्या नुकसान होण्यास प्रतिबंधित करते.
  • दृष्टी सुधारते: केळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते कारण ते कॉर्नियाच्या संरक्षणास मदत करते.
  • बद्धकोष्ठता: केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे आतड्यांच्या चांगल्या हालचाली होण्यास मदत होते, अशा प्रकारे बाळांमध्ये बद्धकोष्ठता दूर होते

तुम्ही तुमच्या बाळाला केळं कसे देऊ शकता?

आपल्या बाळाला केळी देण्यासाठी काही वयविशिष्ट पॉईंटर्स खाली सूचीबद्ध आहेत.

. ६ महिन्यांच्या बाळाला केळी देणे: केळी सोलून त्याचे तुकडे करा. काटे चमच्याने मॅश करा. असे केल्याने ते अत्यंत मऊ होते. यामुळे बाळाला ते गिळणे सोपे होते

तुम्ही तुमच्या बाळाला केळं कसे देऊ शकता?

. ९ महिन्यांच्या बाळाला केळी देणे: ९ महिन्यांपर्यंत, प्युरी खाणाऱ्या बाळाची प्रगती घनपदार्थांचे छोटे तुकडे खाण्यापर्यंत होते. म्हणून, तुम्ही मॅश केलेले केळं किंवा त्याचे छोटे तुकडे करून देऊ शकता.

. एक वर्षाच्या बाळाला केळी देणे: केळं अर्धे सोलून आपल्या बाळाला देऊ शकता. अशाप्रकारे, केळं हातातून घसरणार नाही आणि बाळाला त्यावर चांगली पकड मिळू शकेल. तथापि, कात्रीने अतिरिक्त साल काढून टाकले आहे ना ह्याची खात्री करा जेणेकरून ते त्याच्या तोंडात जाऊ नये. आपण केळी सोलून घेऊ शकता, त्याचे लहान, गोल तुकडे करू शकता आणि आपल्या लहान बाळाला काटेचमचा वापरुन खाण्यास प्रोत्साहित करू शकता

आपल्या बाळाला केळी भरवताना घ्यावयाच्या खबरदारी

आपल्याला घ्यावयाच्या काही खबरदारी

  • आपल्या बाळाला पचायला कठीण असल्याने कच्चे केळी देऊ नका. आपण सर्व्ह करत असलेली केळी योग्य आणि पिवळ्या रंगाची असल्याचे सुनिश्चित करा.
  • ज्या मुलांनी नुकतेच अर्धघन पदार्थ खाणे सुरू केले आहे त्यांच्यासाठी केळी योग्यरित्या मॅश करा जेणेकरून ते घशात अडकणार नाही.

सर्दी आणि खोकला दरम्यान केळी मुलांसाठी चांगले आहे का?

केळ व्हिटॅमिन बी ६ ने भरलेले असते जे ब्रोन्कियल स्नायू ऊतींना आराम करण्यास मदत करते. केळी रोगप्रतिकार शक्ती देखील सुधारण्यासाठी मदत करतात तसेच खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी केळ्याची मदत. तथापि, हे एक श्लेष्मल तयार करणारे अन्न आहे. त्यामुळे खोकला आणि सर्दी वाढू शकते.

बाळाला केळी देण्याचे कोणतेही हानिकारक परिणाम आहेत काय?

दिवसाला एक केळे दिल्यास ते बाळाला इजा करणार नाही. तथापि, कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते म्हणून, केळी देखील, मध्यम प्रमाणात बाळाला दिली पाहिजे.

एका दिवसात एक बाळ किती केळी खाऊ शकतो?

दररोज केळं देणे बाळांसाठी चांगले असते का? उत्तर होय आहे. तथापि, बाळाला दिवसातून एकदा फक्त एक लहान केळं दिले पाहिजे. एकाच वेळी बर्‍याच गोष्टी खाल्ल्यास बाळाच्या आरोग्यास त्रास होतो.

बाळांसाठी स्वादिष्ट केळी रेसिपी

ते फळ म्हणून खाण्याव्यतिरिक्त केळी वापरून वेगवेगळ्या पाककृती देखील तयार केल्या जाऊ शकतात. येथे आहेत ४ सोप्या पाककृती तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी तयार करण्याचा प्रयत्न करू शकता.

. बनाना राईस पुडिंग

ग्लूटेन नसलेले पौष्टिक जेवण आणि फायबरचे प्रमाण जास्त.

साहित्य

  • १ लहान केळं
  • १ कप शिजवलेले तपकिरी तांदूळ
  • ¼ – ½ कप कोमट दूध
  • एक चिमूटभर दालचिनी
  • एक चिमूटभर जायफळ

कृती:

एका फूड प्रोसेसरमध्ये सर्व घटक एकत्र करा आणि मऊ पेस्ट तयार करा.

. केळी आणि स्ट्रॉबेरी स्मूदी

या स्मूदी मध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात जे पचनास मदत करतात

केळी आणि स्ट्रॉबेरी स्मूदी

साहित्य:

  • २ संपूर्ण पिकलेली केळी (सोललेली आणि चिरलेली)
  • ताज्या स्ट्रॉबेरी १कप
  • दूध

कृती:

सर्वकाही एकत्रित ब्लेंड करून ताबडतोब सर्व्ह करा.

. बाळांसाठी नाचणी आणि केळी लापशी

तुम्ही तुमच्या बाळास ग्लूटेन आणि दुग्धशर्कराशिवाय काही देऊ इच्छित असल्यास हे अन्न आदर्श आहे.

साहित्य:

  • १ चमचा नाचणीचे पीठ
  • १ लहान केळं

कृती

  • एका कढईत, /४ कप पाणी उकळा
  • उकळी आल्यावर गॅस कमी करा आणि नाचणी पीठ घाला
  • लापशी थोडी घट्ट होईपर्यंत ढवळत रहा
  • मिश्रण गॅस वरून खाली घ्या आणि लापशी थंड होऊ द्या
  • लापशी मध्ये मॅश केलेले केळी घाला आणि नीट ढवळून घ्या
  • एकदा हे झाल्यावर,तुम्ही बाळाला ते देऊ शकता

. फ्रुटी बार

ह्यामध्ये कोलेस्टेरॉल कमी असते आणि ते पचनास चांगले असते.

साहित्य:

  • अर्धे केळं (मॅश केलेले)
  • ४ चमचे. रोल केलेले ओट्स

कृती:

  • ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करावे.
  • फूड प्रोसेसरमध्ये ओट्स बारीक करा (थोडा खडबडीत ठेवा)
  • नंतर ओट्स मॅश केलेल्या केळीमध्ये मिसळा आणि चांगले मळून पीठ तयार करा
  • आपल्या हातांनी मिश्रणाचे लहान बार बनवा
  • त्यांना हळूच ग्रीस केलेल्या बेकिंग शीटवर ठेवा
  • टणक आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत सुमारे १०१५ मिनिटे बेक करा
  • एकदा थंड झाल्यावर सर्व्ह करा

. केळी आणि दही मिक्स

प्रोबायोटिक्स असल्यामुळे हे आतड्याच्या योग्य कार्यात मदत करू शकते.

साहित्य:

  • १ पिकलेले केळं
  • दही

कृती:

केळी सोलून घ्या आणि त्याचे लहान गोलाकार काप करा. दही मिसळा. ही आरोग्यदायी पाककृती तयार आहे!

अधिक मजेदार पाककृतींसाठी तुम्ही केळ्यामध्ये मिसळू शकता अशी काही इतर उत्पादने आहेत:

  • बेरी
  • रताळे
  • सफरचंद
  • पेअर
  • अवोकॅडो
  • किवी

सेमी सॉलिड पदार्थ घेणे सुरू केल्यावर केळी हे बहुधा बाळाला दिले जाणारे पहिले फळ असते. कारण हे फळ मऊ आहे आणि त्याचा पोत मलईदार असल्याने बाळांना हा पदार्थ गिळणे सोपे जाते. ह्यामधील पोषकद्रव्य बाळाच्या हाडांच्या विकासास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारित करते आणि इतर अनेक फायद्यांव्यतिरिक्त दृष्टी सुधारते आणि आपल्याला हे सर्व माफक किमतीमध्ये मिळते!

स्रोत अणि सन्दर्भ:
आणखी वाचा:
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article