Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांमधील कॅल्शिअमची कमतरता

बाळांमधील कॅल्शिअमची कमतरता

बाळांमधील कॅल्शिअमची कमतरता

जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत नसाल, तर तुम्ही बाळामध्ये आढळणाऱ्या कॅल्शिअम कमतरतेसारख्या आरोग्यविषयक समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाळाला स्तनपान देणे अवघड नाही. अर्भकासाठीचे अन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत, त्यामुळे कुपोषण होण्याचा धोका वाढतो. तसेच, आनुवंशिकतेपासून औषधापर्यंत अनेक जोखीम घटक असतात. त्यामुळे तुमच्या बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता आढळू शकते. कॅल्शियमची कमतरता म्हणजे काय, त्याचा तुमच्या बाळावर कसा परिणाम होऊ शकतो आणि त्यासाठी काय करावे ह्या विषयीची सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

व्हिडिओ: लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता चिन्हे, कारणे आणि उपाय

बाळासाठी कॅल्शियम महत्वाचे का आहे?

कॅल्शियम प्रामुख्याने हाडांच्या योग्य वाढीस मदत करते. तुमच्या बाळाची वाढ झपाट्याने होत असल्याने, बाळाची हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. ह्याचे दीर्घकाळ टिकणारे परिणाम आहेत, कारण प्रौढांच्या हाडांचे आरोग्य त्यांना बाल्यावस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत मिळणाऱ्या कॅल्शियमवरून ठरते. या व्यतिरिक्त, कॅल्शियम स्नायूंचे योग्य कार्य, हृदयाचे कार्य आणि मज्जातंतूंचा आवेग प्रसारित करण्यास देखील मदत करते.

लहान बाळांमध्ये आढळणाऱ्या कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे

 • बाळाच्या प्रसूतीदरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो
 • जिवाणू संसर्गावरील जेंटॅमिसिन सारखे काही औषधे, तुमच्या बाळाच्या कॅल्शियमच्या पातळीवर परिणाम करू शकतात.
 • पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. त्यामुळे तुमच्या बाळामध्ये कॅल्शियमची पातळी देखील कमी होते, कारण व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे योग्य शोषण करण्यास मदत करते.
 • डिजॉर्ज सिंड्रोम नावाच्या अनुवांशिक दोषाने ग्रस्त असलेल्या अर्भकांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते.
 • अभ्यासातून असे दिसून आले आहे की जन्मजात हायपरथायरॉईडीझम असलेल्या अर्भकांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
 • अभ्यासातून असे दिसून आले आहे की अकाली जन्मलेल्या बाळांना, विशेषत: ३२ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये कॅल्शियमची कमतरता होण्याची शक्यता असते.
 • मधुमेह असलेल्या स्त्रीच्या बाळांमध्ये हायपोकॅलेसीमिया होण्याची शक्यता असते. एका अभ्यासातून स्त्रीमध्ये असलेल्या हायपरथायरॉईडीझमचा सुद्धा त्याच्याशी संबंध असू शकतो असेही काही अनुमान आहेत.
 • गाईचे दूध भरपूर प्रमाणात घेतल्यास कॅल्शिअमची कमतरता होण्याची शक्यता असते. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे होते. पहिले म्हणजे, बाळाचे शरीर प्रथमतः गायीच्या दुधात असलेले कॅल्शियम शोषण्यास असमर्थ असते. दुसरे म्हणजे, दूध शरीराला आम्लयुक्त बनवते आणि हे आम्लीकरण नाकारण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम काढले जाते,आणि त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता भासू शकते.

बाळाच्या कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

लहान बाळामंध्ये कॅल्शियमच्या कमतरतेच्या लक्षणांचे निरीक्षण करणे कठीण आहे. म्हणूनच, लहान बाळांमधील कॅल्शियमच्या कमतरतेच्या काही लक्षणांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे:

 • बाळ झोपलेले असताना उशीखाली आणि त्याच्या केसांवर घामाचा पट्टा दिसणे
 • असामान्य स्वभाव, अस्वस्थता आणि तुमच्या बाळाला नियंत्रित करण्यात अडचण येणे असे अनियमित भावनिक वर्तन दिसून येईल.
 • दात तयार होण्यास उशीर होतो आणि एकदा वाढल्यानंतर दातांमध्ये ढिलेपणा आणि दात असमान असणे यांसारखे दोष असतात.
 • पसरलेले पोट. हे पोट बेडकाच्या पोटासारखे दिसू शकते.
 • मानसिक एकाग्रता नीट नसणे.
 • सभोवतालच्या वातावरणात रस नसलेला दृष्टीकोन.
 • भूक न लागणे.
 • कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे रोगांची उच्च संवेदनशीलता.
 • रात्रीच्या भीतीमुळे रात्री झोपायला त्रास होणे आणि नेहमीपेक्षा बाळ जास्त रडणे.
 • मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे झटके येणे.
 • चेहऱ्याच्या असामान्य हालचाली, उदा: जीभ आणि ओठ वळवळणे, डोळे फडफडणे इ.
 • सांध्यांची वाढ नीट न होणे आणि विकृती
 • रक्तदाब कमी होणे
 • हात आणि पायांमध्ये पेटके येणे. दिसताना ते फिट्स आल्यासारखे दिसते. हे एक धोकादायक लक्षण आहे आणि जर त्यावर नीट इलाज केला तर बाळाचा मृत्यू होऊ शकतो.

बाळाच्या कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

बाळाच्या कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार कसे करावे?

तुमच्या बाळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असले तरीही, ते काही सोप्या उपायांनी सुधारले जाऊ शकते जसे की:

 • बाळांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे ना ह्याची खात्री करा. व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे योग्य शोषण करण्यास मदत करते.
 • आईचे दूध हे लहान मुलांसाठी कॅल्शियमच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे.
 • ज्या अर्भकांना फेफरे येतात त्यांच्यासाठी, कॅल्शियम थेट रक्तप्रवाहात सोडले जाऊ शकते. परंतु, या पद्धतीचा एक मोठा दोष आहे, तो म्हणजे जर ते खूप लवकर इंजेक्शनने दिले तर ते हृदय फेल होण्यास कारणीभूत होऊ शकते.

कॅल्शियमच्या कमतरतेवर तातडीने लक्ष दिले पाहिजे, परंतु वर नमूद केलेल्या पद्धतींद्वारे ते दुरुस्त केले जाऊ शकते. बऱ्याच नवजात बाळांमध्ये कॅल्शिअमची पातळी कमी असल्याचे आढळून आले आहे. परंतु, पटकन उपाय केल्यास गंभीर नुकसान होत नाही. तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यामध्ये कोणतीही गुंतागुंत होत नाही. आणि तुमच्या बाळाची चांगली वाढ होऊन ते उत्तम प्रौढ व्यक्ती बानू शकते.

आणखी वाचा:

बाळांना उचकी लागणे: कारणे, खबरदारी आणि उपाय
बाळाचे वजन का वाढत नाही? – कारणे, लक्षणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article