In this Article
- पिनकृमींचा संसर्ग म्हणजे काय?
- पिनकृमींचा संसर्ग कसा पसरतो?
- लहान बाळांमध्ये पिनकृमी होण्याची कारणे
- लहान मुलांमध्ये पिनकृमी झाल्याची लक्षणे
- पिनकृमींचे निदान कसे केले जाते?
- लहान मुलांना पिनकृमी संसर्ग झाल्यास त्यासाठी उपचार
- आपल्या बाळाला पिनकृमी संसर्ग झालेला असल्यास अनुसरण करण्यासाठी काही टिप्स
- लहान मुलांमधील पिनकृमी संसर्गावर प्रभावी घरगुती उपचार
- पिनकृमी संसर्ग फॉलोअप
- लहान मुलांमध्ये पिनकृमीचा उपचार केला नाही तर काय होते?
- लहान मुलांमध्ये पिनकृमी संसर्ग कसा प्रतिबंधित करावा?
मुले मोठी झाल्यावर बऱ्याचदा अनेक आजारांना बळी पडतात. लहान मुले आणि लहान बाळांमध्ये पिनकृमीची समस्या आढळणे खूप सामान्य आहे परंतु त्यावर सहज उपचार केला जाऊ शकतो. ज्यांच्यामुळे पिनकृमी संसर्ग होतो त्या आतड्यांमधील परजीवींना थ्रेडवर्म किंवा सीटवर्म असेही म्हणतात. प्रौढ आणि मुलांना त्यांचा सारख्याच प्रमाणात संसर्ग होतो. परंतु संसर्ग दूर होण्यास वेळ लागत नाही.
पिनकृमींचा संसर्ग म्हणजे काय?
पिनकृमी हे लहान पांढऱ्या रंगाचे किडे असतात. त्यांची लांबी २ मिमी ते ३१ मिमी इतकी असू शकते. ते दातांसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लॉससारखे किंवा अगदी पातळ पांढऱ्या सूती धाग्यासारखे दिसतात (म्हणून त्यांना थ्रेडवर्म म्हणतात). कीटक किंवा त्याच्या अंड्यांमुळे दूषित झालेल्या वस्तू किंवा व्यक्तींशी थेट संपर्क आल्यास ते अत्यंत संसर्गजन्य असतात.
पिनकृमींचा संसर्ग कसा पसरतो?
एकदा तुमच्या बाळाला संसर्ग झाला की, तुमचे बाळ शांत झोपेत असताना मादी किडे कामाला लागतात. किडे आतड्यांमध्ये प्रवेश करतात. मोठे आतडे आणि गुदाशयच्या सभोवतालच्या त्वचेला चिकटून अंडी घालतात.
पिनकृमींची अंडी मानवी शरीराबाहेर तीन आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला संसर्ग झालेला असल्यास कुटुंबातील निरोगी व्यक्तीला संसर्ग होणे खूप सोपे आहे. हे टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करणे आवश्यक आहे: संसर्ग झालेल्या व्यक्तीस वेगळे ठेवणे शक्य नसले तरी, त्या व्यक्तीच्या कोणत्याही वस्तू शेअर न करण्याचा आणि त्यांना स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, प्रभावित व्यक्तीची काळजी घेतल्यानंतर तुम्ही तुमचे हात अँटीसेप्टिक साबणाने चांगले धुवा.
लहान बाळांमध्ये पिनकृमी होण्याची कारणे
जर घरातील एखाद्या प्रौढ व्यक्तीला हा आजार झाला असेल तर लहान मुलांना सहजपणे पिनवर्म संसर्ग होईल. हा संसर्ग कसा होऊ शकतो ते इथे दिलेले आहे
- कोणत्याही दूषित वस्तूच्या थेट संपर्कात असणे
- दूषित अन्न घेणे
- कपडे किंवा चादरीला चिकटलेली अंडी श्वासाद्वारे आत जाणे. जेव्हा संक्रमित वस्तू हलवली जात असेल तेव्हा हे होऊ शकते
- विशेषत: गुद्द्वार क्षेत्राभोवती खाज सुटल्याने, मुलाच्या नखांना पिनवर्म अंडी चिकटू शकतात
लहान मुलांमध्ये पिनकृमी झाल्याची लक्षणे
पालकांनो, जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या बाळाला पिनकृमींसंसर्ग झालेला आहे, तर खालील चिन्हे आणि लक्षणे पहा.
- गुद्द्वार क्षेत्राभोवती खाज सुटल्यामुळे अस्वस्थ झोप
- जिवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे तसेच जास्त खाज सुटल्यामुळे पिनवर्मचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते त्यामुळे गुद्द्वार क्षेत्राभोवतीची त्वचा फाटली जाण्याची शक्यता असते
- मुलींमध्ये, पिनकृमीं संसर्गाचा योनिमार्गावर परिणाम होतो त्यामुळे योनीला खाज येते आणि/किंवा स्त्राव होतो
- काही प्रकरणांमध्ये, आतड्यात जास्त पिनवर्म संक्रमण झाल्यामुळे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. पिनकृमींमुळे क्वचित प्रसंगी मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
जर तुम्हाला इतर कोणतीही गंभीर लक्षणे दिसली तर ताबडतोब तुमच्या मुलाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या
पिनकृमींचे निदान कसे केले जाते?
जर तुम्हाला पिनकृमीं संसर्गाचा संशय असेल तर तुम्ही तुमच्या बाळाची तपासणी करू शकता असे काही मार्ग येथे दिलेले आहेत:
- गुद्दद्वाराभोवतीचा भाग तपासण्यासाठी फ्लॅशलाइट वापरा. किडे रात्री अंडी घालतात, सकाळी तपासणी करणे चांगले आहे
- आपल्या मुलाच्या विष्ठेची पृष्ठभाग किंवा योनीच्या मुखाची तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते
- आपल्या मुलाला संसर्ग झाला आहे का हे पाहण्यासाठी पारदर्शक टेप गुदद्वाराभोवती हळुवारपणे दाबा. पिनकृमीं त्या प्रदेशाभोवती अंडी घालत असल्याने, संसर्ग ओळखणे सोपे होईल
लहान मुलांना पिनकृमी संसर्ग झाल्यास त्यासाठी उपचार
तुमच्या मुलाला पिनकृमींचा संसर्ग झालेला असल्यास, खाज सुटणे आणि झोपेमध्ये व्यत्यय येतो आहे का ह्या लक्षणांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. गंभीर संसर्गामुळे समस्या उद्भवू शकतात, म्हणून त्या नियंत्रणात आणणे ही मुख्य प्राथमिकता आहे.
सुरक्षिततेसाठी, डॉक्टर तुमच्या मुलाला आणि कुटुंबाला खालील प्रक्रिया सुचवतील. त्यांचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे.
- औषधे: पिनकृमी दूर करण्यासाठी मेबेन्डाझोल, पायरेन्टेल किंवा अल्बेंडाझोल सारख्या ‘ओव्हर द काउंटर‘ औषधांचा वापर करणे सामान्य आहे. तथापि, योग्य डोससाठी तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.
- पुनरावृत्ती: औषधांमुळे एका आठवड्यात सगळे पिनकृमी मारले जातील परंतु दोन आठवड्यांनंतर औषधांची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून आधी घातलेल्या अंड्यांमधून तयार झालेल्या पिनकृमीला मारता येईल.
आपल्या बाळाला पिनकृमी संसर्ग झालेला असल्यास अनुसरण करण्यासाठी काही टिप्स
बाळांवर उपचार करण्यासाठी नेहमीच ऍलोपॅथी निवडण्याची शिफारस केली जात नाही. तुम्ही प्रयत्न करून बघू शकता अशा काही इतर गोष्टी येथे आहेत:
- बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार तुमच्या लहान मुलासाठी वैद्यकीय उपचारांचे अनुसरण करा
- दररोज सकाळी, आपल्या मुलाला अंघोळ घाला कारण यामुळे रात्रभर घातलेली अंडी काढून टाकण्यास मदत होईल
- डायपर बदलताना, प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या बाळाला पुसून स्वच्छ करा
- वारंवार होणारा संसर्ग टाळण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा. घर स्वच्छ करणे आणि सर्व कपडे, चादरी आणि टॉवेल गरम पाण्यात धुणे हे पिनकृमी आणि त्याची अंडी मारून टाकण्यासाठी चांगला उपाय आहेत
- आपल्या मुलाची खेळणी साबण आणि गरम पाण्याने निर्जंतुक करा
- पिनकृमी अंडी सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्याने, भरपूर सूर्यप्रकाश घरात येण्यासाठी आपले सर्व पडदे उघडे ठेवा
लहान मुलांमधील पिनकृमी संसर्गावर प्रभावी घरगुती उपचार
तुमच्या लहान मुलाला पिनकृमी संसर्ग झाल्यास घरगुती उपचार आहेत त्यांचा तुमच्या लहान मुलाला उपयोग होऊ शकेल. हे उपचार करण्यापूर्वी ऍलर्जीची तपासणी करून घ्या
१. लसूण: लसणामध्ये तुमच्या बाळाच्या आतड्यांमधील पिनकृमी काढून टाकण्याची क्षमता असते
२. द्राक्षांच्या बियांचा अर्क: आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यासाठी हे उपयोगी ठरते ह्यामुळे पिनकृमी व्यवस्थित बाहेर काढण्यास मदत होते
३. नारळाचे तेल: बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा हा पदार्थ आहे आणि त्यामध्ये विषाणूविरोधी गुणधर्म आहेत आणि ते तुमच्या मुलाच्या पिनकृमी संसर्गावर एक चांगला उपाय आहे
पिनकृमी संसर्ग फॉलोअप
पिनवर्म संक्रमण पुन्हा होऊ शकते. तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता, परंतु तुमचे मूल योग्यरित्या कृमिविरहित होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याला बालरोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी न्या.
लहान मुलांमध्ये पिनकृमीचा उपचार केला नाही तर काय होते?
पिनकृमीचा संसर्ग गंभीर असल्याने, विशेषत: लहान मुलांमध्ये, त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. हे उपचार केले नाहीत तर त्याचे खालीलप्रमाणे परिणाम होतात:
- गुदद्वाराच्या भागात खाज सुटणे आणि पुरळ येणे
- योनीतून स्त्राव येणे आणि खाज सुटणे
- अतिसार
- अंथरूण ओले करणे
लहान मुलांमध्ये पिनकृमी संसर्ग कसा प्रतिबंधित करावा?
- स्वच्छता राखल्यास पिनकृमी संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते. आपल्या मुलाची नखे लहान आणि स्वच्छ ठेवणे हा उपाय तुम्ही करू शकता
- सकाळी आंघोळ केल्याने रात्रभर घातलेल्या अंड्यांपासून सुटका होऊ शकते
- आपल्या मुलाचे डायपर आणि अंडरवेअरचा मागोवा ठेवा. नियमित अंतराने डायपर बदलणे आणि दररोज अंडरवेअर बदलणे आवश्यक आहे
- आपल्या मुलाच्या खोलीत आणि घराच्या आसपास भरपूर सूर्यप्रकाश येऊ द्या. असे केल्याने सुटका होऊ अंडी काढून टाकण्यास मदत होऊ शकते
- तुमच्या मुलाला नखे चावण्यापासून किंवा बोटं चोखण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करा
- हात स्वच्छ ठेवा कारण पिनवर्म हा संसर्गजन्य संसर्ग आहे. आपले हात सतत धुवा
- खाण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर तुमच्या मुलाचे हात धुतले आहेत याची खात्री करा
- पुनर्प्राप्ती कालावधी दरम्यान, आपण सर्व कपडे, आणि टॉवेल गरम पाण्यात धुतल्याची खात्री करा
- पिनकृमी संसर्ग वाढू नये म्हणून शौचालय दररोज स्वच्छ केले पाहिजे
- तुमचे मूल इतर मुलांच्या संपर्कात येण्यापूर्वी ते संसर्गमुक्त असल्याची खात्री करा
तुमच्या मुलाला अनेक प्रकारचा संसर्ग होऊ शकतो आणि पिनकृमी संसर्गामुळे तुमच्या मुलाला अस्वस्थता येऊ शकते. त्यावर लवकरात लवकर उपचार केले पाहिजेत आणि लक्षात ठेवा की आजार बरा करण्यापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो!
आणखी वाचा:
बाळांना डास चावल्यास त्यावर १० नैसर्गिक उपाय
बाळाच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे – कारणे आणि उपाय