Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३३वा आठवडा

गर्भधारणा: ३३वा आठवडा

गर्भधारणा: ३३वा आठवडा

तुम्ही आता ३३ आठवड्यांच्या गरोदर आहात आणि लवकरच तुमच्या गोड़ बाळाचं आगमन होणार आहे, आता आहार, औषधे आणि शरीरातील बदलांशी सामना करण्याचे फक्त काहीच दिवस राहिले आहेत. तिसरी तिमाही म्हणजे बाळाच्या जन्माची तयारी आणि तुमचे बाळ लवकरच तुमच्या जवळ असणार आहे,

गर्भारपणाच्या ३३व्या आठवड्यातील तुमचे बाळ

हा बाळाच्या विकासाचा शेवटचा टप्पा आहे. बाळाचे अवयव, हाडे आणि स्नायू हे संपूर्णतः विकसित झाले आहेत. जे बारकावे राहिले आहेत ते  पूर्ण होतील. नखे आणि केस जे अजून विकसित व्हायचे बाकी होते ते सुद्धा पूर्णपणे विकसित होतील. नाळेद्वारे बाळाला पोषणमूल्ये आणि ऑक्सिजन चा पुरवठा होतो परंतु तरीही बाळ गर्भजल गिळून स्वतःच्या श्वसनक्षमतेचा सराव करीत असते.

बाळाचा मेंदू कधीही नव्हे इतका वेगाने विकसित होत असतो, मज्जातंतू मध्ये बंध निर्माण होत असतात. तुमच्या बाळाला आता दिवस आणि रात्र ह्यामधील फरक कळू लागेल आणि त्यानुसार बाळाची झोपेची आणि उठण्याची वेळ ठरेल. बाळाची प्रतिकारयंत्रणा आता आधीपेक्षा खूप मजबूत झाली असून बाळाला नाळेद्वारे तुमच्या रक्तातून अँटीबॉडीएसचा पुरवठा होईल.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या ३३व्या आठवड्यात बाळाचा आकार कलिंगडाएवढा असतो आणि बाळाची लांबी डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत ४२सेंमी इतकी असते. बाळाचे वजन २ किलोंपेक्षा अधिक असते. बाळाची हाडे आता मजबूत होत आहेत. बाळाच्या डोक्याव्यतिरिक्त त्वचेवरील सुरकुत्या चरबीने भरल्या जातात. जन्माच्या वेळीजनन मार्गातून बाळाचे डोके सहज बाहेर यावे म्हणून ते लवचिक राहते. गर्भाशयात जास्त जागा नसल्यास, बाळाचे पाय मारणे कमी होते परंतु तुम्हाला बाळाची चुळबुळ नक्कीच जाणवते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात खूप नवीन बदल घडतील

. मूळव्याध

मुळव्याधीमुळे शौचाच्या जागेतून रक्त पडते आणि किंवा शौचाच्या जागेचा टिश्यू फाटल्यामुळे सुद्धा रक्त पडू शकते.  त्यावरील उपायासाठी (perineal massage) तुम्ही तुमच्या फिसिओथेरपीस्टशी संपर्क करा. वेदना कमी होण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या आणि मलम लिहून देऊ शकतात.

. व्हेरीकोस व्हेन्स

तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढत असल्यामुळे त्याचा दाब तुमच्या शरीराच्या खालच्या भागावर पडतो आणि त्यामुळे पायाच्या रक्तवाहिन्या प्रसारण पावतात त्यांना वेरिकोस व्हेन्स असे म्हणतात. जर त्या लाल आणि घट्ट असतील तर रक्त साकाळले असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

. स्तनाग्रांमधून दूध गळणे

तुमचे स्तन हे पिवळे द्रव तयार करीत आहेत ज्यास कोलोस्ट्रम असे म्हणतात आणि सुरुवातीच्या काही दिवसात बाळाचे पोषण त्यावर होत असते. तुमच्या ब्रा मध्ये ते शोषून घेण्यासाठी पॅड्स वापरल्याने त्याचे डाग दिसणार नाहीत.

. झोप न लागणे

ह्या लक्षणांबरोबरच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला झोप नीट लागत नाहीये. झोपेच्या वेळी खाणे टाळण्याचा प्रयत्न करा, तसेच त्यावेळेला व्यायाम करणे सुद्धा टाळा. मेडिटेशन आणि मालिश केल्याने फरक पडेल.

३३व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

३३ वा आठवडा हा खूप आव्हानात्मक असतो, तथापि ह्या वेदनांची आणि अस्वस्थतेची माहिती असल्यास तसेच त्यावरील उपाय सुद्धा तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला त्यातून लवकर बाहेर पडण्यास मदत होईल.

. श्वसनास त्रास

तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे, तुमच्या फुप्फुसांना हवा आत घेण्यासाठी प्रसारण पावणे शक्य होत नाही. त्यामुळे खूप जास्त कठीण क्रिया करू नका उदा: पळणे, वजन उचलणे वगैरे.

. तोल सांभाळणे

तुमच्या वाढत्या वजनामुळे तुम्हाला तोल सांभाळताना त्रास होऊ शकतो त्यामुळे सपाट टाचेच्या शूज घाला त्यामुळे तुम्हाला सांभाळता येईल, निदान घरात असताना तरी हे पाळा.

. चयापचयाचा दर वाढणे

जास्त ऊर्जेची गरज भागवण्यासाठी तुम्हाला जास्त भूक लागते.

. डोकेदुखी

पाणी कमी पिण्यामुळे तुमचे डोके गरगरणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात. जरी तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागत असेल तरीसुद्धा कमीत कमी दररोज ३ लिटर्स पाणी प्या.

गर्भधारणेच्या ३३व्या आठवड्यात पोटाचा आकार

जर तुम्हाला जुळी मुले होणार असतील तर ह्या आठवड्यात तुमचे वजन गर्भधारणेपासून १०-१५ किलो वाढलेले दिसेल. तुमच्या पोटाचा आकार ३५-३८ सेमी इतका असतो. त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी क्रीम जवळ ठेवा. गर्भजल पातळी वाढल्यामुळे होणाऱ्या स्थितीला पॉलिहायड्रॅमनिओज असे म्हणतात, आणि गर्भारपणाच्या ह्या आठवड्यात ही स्थिती दिसून येते. त्यामुळे जर तुमचे वजन खूप जास्त वाढले असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

गर्भानेचया ३३व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये तुम्हाला असे लक्षात येईल की तुमचे बाळ जागे असताना डोळ्यांची उघडझाप करते आहे. बाळाची हाडे मजबूत होत आहेत तसेच बाळाचे सर्व अवयव संपूर्णतः विकसित झाले आहेत. जर तुम्हाला वाटले तर तुम्ही बाळाचे biophysical profile पण करून घेऊ शकता, त्यामुळे जर काही धोका निर्माण करणारे घटक असतील आणि त्यामुळे पुढची गुंतागुंत होणार असेल तर ती टाळण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईलच.

अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये खालील गोष्टी दिसतील:

  • बाळाच्या शरीराचा आकार तुमच्या लक्षात येईल. तसेच हालचाली विषयी काही प्रश्न असतील, विशेषतः हातापायांच्या तर डॉक्टर ते तपासून पाहतील.
  • गर्भजल पातळी किती आहे हे कळते, कारण खूप जास्त किंवा कमी गर्भजलपातळीमुळे गरोदरपणामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे बाळाचा अकाली जन्म होणे किंवा बाळाचा पोटात मृत्यू होऊ शकतो.
  • बाळाचा श्वासोच्छवास नियमित आणि सामान्य आहे हे तपासून पहिले जाते.

आहार कसा असावा?

तुमच्या गर्भारपणातील ३३ व्या आठवड्यातील आहारात फळे, भाज्या, मटण, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि संपूर्ण धान्य ह्यांचा समावेश असला पाहिजे.

  • ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् जसे की docosahexanoic acid मुळे तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होतो.
  • संशोधनावरून असे लक्षात आले आहे की ज्या माता मासे आणि जवस खातात त्यांची मुले बुद्धीने हुशार होतात तथापि पारा असलेले मासे जसे की शार्क, टुना आणि मॅकेरेल खाणे टाळा.
  • जवस (फ्लॅक्ससीड्स) हा शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.

  • वेळ, पैसे किंवा उपलब्धता ह्यांच्या अभावी जर तुमचा आहार संपूर्ण नसेल तर तुमच्या डॉक्टरांना पूरक औषधांविषयी विचारा.
  • सर्व प्रकारचे मद्य टाळा, कारण संशोधनाद्वारे असे लक्षात आले की सर्व प्रकारच्या मद्यपानामुळे गर्भारपणावर हानिकारक परिणाम होतो.

काय काळजी घ्याल आणि त्याविषयी काही टिप्स

हे करा

  • प्रसूतीच्या वेळेसाठी वेगवेगळ्या स्थिती तुम्ही करून बघू शकता त्यापैकी काही म्हणजे हातांवर आणि गुडघ्यांवर वाकणे, जन्माच्या वेळी खुर्चीचा वापर करणे इत्यादी. तुम्हाला सर्वात आरामदायी स्थिती शोधून काढा. त्यामुळे तुम्हाला कळा सोसणे सुसह्य होईल.
  • मुळव्याधीमुळे तुम्हाला खूप वेदना आणि संकोचल्यासारखे वाटू शकते, परंतु भरपूर पाणी प्या आणि खूप जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ खा त्यामुळे तुमचा त्रास कमी होईल.

हे करू नका

  • बाळाच्या हालचालींमधील कुठल्याही बदलांकडे दुर्लक्ष करू नका. जर बाळाची हालचाल थांबली किंवा पाय मारणे कमी झाले तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा त्यामुळे काही चाचण्या करून शंकेचं निरसन करून घेता येईल.
  • व्हेरिकोज व्हेन्स हे दुसऱ्या आणि दुसऱ्या तिमाहीमधील एक सामान्य लक्षण आहे. ते कमी होण्यासाठी  नियमित व्यायाम जसे की जॉगिंग, पोहणे इत्यादी करा तसेच एकाच स्थितीत बसून राहणे किंवा झोपणे टाळा.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

ब्रेस्ट पंप्स आणि बाटल्या ही वेळेची गरज आहे. तुम्ही मॅटर्निटी कपडे, नॅपी, बाळाचे कपडे तसेच बाळाला झोपण्यासाठी क्रिब आणून ठेवू शकता. तसेच बाळाला इकडे तिकडे फिरायला नेण्यासाठी बाबागाडी घेण्यास विसरू नका कारण तुम्हाला खूप वेळ बाळाला कडेवर घेणे शक्य होणार नाही.

३३ व्या आठवड्यात तुम्ही प्रसूतीच्या अगदी जवळ आला आहात आणि त्यामुळे लागणाऱ्या सर्व गोष्टी आणून ठेवणे महत्वाचे आहे, त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर ऐनवेळेला धावपळ होणार नाही.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३२वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३४वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article