Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी कमी वजनाची बाळे: कारणे, उपचार आणि काळजी

कमी वजनाची बाळे: कारणे, उपचार आणि काळजी

कमी वजनाची बाळे: कारणे, उपचार आणि काळजी

गर्भधारणा झाली आहे हे समजताच, आपल्या उदरातील बाळ सर्वोतोपरी चांगले रहावे म्हणून प्रयत्न केले जातात. जरी आपण कितीही चांगली काळजी घेतली तरीही, काही वेळा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात आणि अशाच प्रकारची एक समस्या म्हणजे बाळांचे वजन कमी असणे होय.

बाळाचे वजन कमी आहे हे केव्हा मानले जाते ?

सरासरी बाळाचे वजन सुमारे ८ पौंड (.६ किलो) असते. जर आपल्या बाळाचा जन्म गर्भधारणेच्या ३७ ते ४२ आठवड्यांच्या दरम्यान झाला असेल आणि त्याचे वजन सुमारे ५ पाउंड (.५ किलोग्राम) किंवा त्यापेक्षा कमी असेल तर बाळ कमी वजनाचे असल्याचे मानले जाते. डब्ल्यूएचओ किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, जन्माच्या वेळी २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे बाळ मग गर्भावस्थेचे वय कितीही असो, कमी वजन असलेले बाळ आहे

जर बाळाचे जन्माच्या वेळचे वजन २००० ग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्याची विशेष निओनेटल काळजी घेतली जाईल आणि काही आठवडे किंवा घरी जाण्यास योग्य होईपर्यंत बाळाला दवाखान्यात रहावे लागेल.

अकाली जन्माला आलेले बाळ आणि कमी वजनाचे बाळ ह्यामधील फरक तुम्ही कसा ओळखू शकाल?

कमी वजनाचे बाळआणि अकाली जन्माला आलेल्या बाळाची वैशिष्ट्ये एकसारखी नसतात. गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या बाळाला अकाली जन्माला आलेले बाळ म्हणून संबोधले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, अकाली बाळ आपल्या आईच्या गर्भाशयात गर्भावस्थेच्या पूर्ण कालावधीसाठी राहत नाहीत.

अकाली बाळांसारखे, कमी जन्माचे वजन असलेल्या बाळांची एक विस्तृत श्रेणी आहे. ज्यामध्ये अकाली जन्माला आलेली बाळे आणि गर्भधारणेचा कालावधी पूर्ण केलेली बाळे ज्यांचे वजन २. ५ किलोपेक्षा कमी असते अशा बाळांचा समावेश केला जातो. जन्मतः कमी वजन असलेल्या बाळांना एसएफडी किंवा स्मॉल फॉर डेटअसेही म्हणतात.

बाळांचे वजन कमी कशामुळे होते?

बाळांमध्ये वजन कमी होण्याची काही सामान्य कारणे येथे आहेत

. एकाधिक बाळे

जर आईच्या पोटात एकापेक्षा जास्त बाळे असतील तर बाळांचे वजन जन्मतः कमी असण्याची शक्यता असते. ह्यामागचे कारण म्हणजे पोषण दोघांमध्ये विभागले जाते, गर्भाशय ताणले जाते आणि आईच्या गर्भाशयावर अतिरिक्त दाब पडतो.

. अकाली जन्म

जर बाळाचा जन्म गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वीच झाला असेल तर त्याला अकाली जन्म झालेले बाळ असे म्हणतात. मुदतीपूर्वी जन्माला आलेली बाळे सुद्धा सामान्यत: कमी वजनाची असतात.

. नाळेच्या समस्या

प्लेसेन्टा प्रीबिया किंवा प्रीक्लेम्पसियासारख्या गरोदरपणात प्लेसेंटाशी संबंधित समस्या गर्भाला पोषण आणि रक्ताचा पुरवठा करण्यात अडथळा आणू शकतात.

. आईला उच्चरक्तदाब असल्यास

आईला उच्चरक्तदाबाचा त्रास असल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते जे गर्भासाठी घातक ठरू शकते.त्याचा परिणाम र्भाच्या रक्ताच्या प्रवाहावर आणि आवश्यक पौष्टिक पदार्थांच्या शोषणावर होतो ज्यामुळे बाळाचे वजन कमी होते.

. गर्भाशयाच्या समस्या

कधीकधी गर्भाशयाच्या काही विकृती आपल्या बाळाच्या प्रतिबंधित वाढीचे कारण असू शकते. गर्भाशयातील दोष, फायब्रॉईड्स किंवा इतर अशा परिस्थितीमुळे बाळाच्या योग्य वाढीस त्रास होऊ शकतो आणि परिणामी त्याचे वजन कमी होऊ शकते.

. आईने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास

जर आईने गरोदरपणात औषधे, मद्यपान केले असेल किंवा धूम्रपान केले असेल तर त्यामुळे गर्भाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि परिणामी बाळाचे वजन कमी होऊ शकते.

. आययूजीआर किंवा इंट्रायूटरिन ग्रोथ रिस्ट्रिक्शन

गर्भाची वाढ उशिरा होणे म्हणजेच आययूजीआरमुळे असते. बाळाचे वजन जन्मतः कमी असू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, जर जन्मतः कमी वजन अनुवांशिक परिस्थितीमुळे असेल तर बाळ निरोगी असेल. आययूजीआर असे दोन प्रकार आहेत असिमेट्रिक आणि सिमेट्रिक आययूजीआर. नाळेच्या समस्या, आईचे कुपोषण, संसर्ग, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या आययूजीआरची कारणे आहेत.

. संक्रमण

गर्भवती महिलेसाठी गरोदरपणात विविध प्रकारचे संक्रमण होणे खूप सामान्य आहे आणि या संक्रमणांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे गर्भाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करतात, त्यामुळे बाळाचे वजन कमी असू शकते.

. मधुमेह

जर एखाद्या आईला मधुमेह असेल तर नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे बाळ होण्याची शक्यता जास्त असते. तथापि, काही प्रकरणांमध्ये, बाळ कमी वजनाचे होऊ शकते.

१०. ग्रीवाच्या समस्या

जर एखाद्या आईच्या गर्भाशयात समस्या असतील तर अकाली प्रसूती होऊ शकते आणि ती कमी वजन असलेल्या बाळास जन्म देईल. आपले डॉक्टर अशावेळी गर्भाशयाच्या मुखाला टाका घालण्याचा सल्ला देतील.

११. कमी वजनाचे बाळ होण्याचा इतिहास असणे

यापूर्वी जर कमी वजनाचे किंवा अकाली बाळ झाले असेल तर, नंतरच्या गरोदरपणात सुद्धा त्याच समस्येचा सामना करण्याची शक्यता वाढते.

१२. आईला पौष्टिकतेचा अभाव

जर गरोदरपणात आईने संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला नसेल तर त्याचा परिणाम तिच्या बाळाच्या वाढीवर होऊ शकतो आणि त्यामुळेही वजन कमी होऊ शकते.

बाळाच्या विकासावर जन्मतः कमी वजनाचा काय परिणाम होतो?

आपल्या बाळाच्या विकासावर कमी वजनाचा दुष्परिणाम:

 • संसर्ग होण्याची शक्यता वाढवते.
 • यामुळे जन्माच्या वेळेस ऑक्सिजनची पातळी अपुरी होऊ शकते.
 • गर्भाशयाच्या कमी ऑक्सिजन पातळीची भरपाई करण्यासाठी बऱ्याच लाल रक्तपेशी तयार होऊ शकतात.
 • यामुळे बाळांमध्ये श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.
 • यामुळे रक्तातील साखर कमी म्हणजेच हायपोग्लाइकेमिया होऊ शकतो.
 • आपल्या बाळाच्या स्वत: ला उबदार ठेवण्याच्या क्षमतेस बाधा आणू शकते.
 • ह्यामुळे बाळाच्या आहारात अडचणी येतात आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
 • ह्यामुळे सडन इनफंट डेथ सिंड्रोम होऊ शकतो.

गर्भधारणेदरम्यान बाळाच्या कमी वजनाचे निदान कसे केले जाते?

आपल्या बाळाचे वजन कमी आहे की नाही ह्याचे मूल्यांकन करण्यासाठी आपले डॉक्टर खालील निदान तंत्र अवलंबू शकतात:

. गर्भाशयाच्या वरच्या भागाचा (फंडस) आकार मोजणे

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर, डॉक्टर गर्भाशयाच्या वरच्या भागाच्या (फंडस) आकाराचे मापन करतील. फंडसची उंची आपल्या गर्भधारणेच्या आठवड्यांच्या संख्येशी संबंधित असली पाहिजेL २२ आठवड्यात, उंची सुमारे २२ सेमी असावी. जर फंडसची उंची कमी असेल तर ते कमी वजनाचे बाळ जन्मास येऊ शकते.

. अल्ट्रासाऊंड स्कॅन

अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये आपल्या मुलाच्या अंतर्गत संरचनेचे फोटो काढता येतातL जसे की बाळाचे डोके, फीमर बोन्स, ओटीपोट इ.चे फोटो काढणे ह्यामध्ये समाविष्ट आहे, जरी ही पद्धत तपासणीची प्राथमिक पद्धत नसली तरी, जन्मतः कमी वजन असलेल्या बाळांचे विश्लेषण करण्यास मदत करते.

अर्भकाचे वजन जन्मतः कमी असण्याचा धोका आपण कसा कमी करू शकता?

नवजात मुलाचे वजन कमी होण्याचा धोका कमी करण्यासाठी आपण आई म्हणून करू शकता अशा काही गोष्टी येथे आहेतः

 1. प्रसवपूर्व काळजी: जन्मपूर्व काळजी घेण्याकडे लक्ष द्या आणि आरोग्याच्या सर्व समस्यांना योग्य विवेकबुद्धीने सोडवा.
 2. वजन आणि आहार: संतुलित आणि पौष्टिक आहाराचे पालन करा आणि वजन वाढीवर लक्ष ठेवा.
 3. जीवनशैलीतील बदलः जर तुम्ही गर्भारपणाच्या आधी धूम्रपान किंवा मद्यपान करीत असाल असाल तर गर्भधारणेदरम्यान या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा कडक सल्ला दिला जातो.
 4. आपल्या आरोग्याची तपासणी कराः जर तुम्ही मधुमेह किंवा उच्चरक्तदाब यासारख्या आरोग्यविषयक गुंतागुंतमुळे ग्रस्त असल्यास, त्यास नियंत्रित ठेवा.

अर्भकांमधील कमी वजनाच्या समस्येवर कसे उपचार करावेत?

कमी वजनाच्या समस्येवरील उपचार बाळाचे गर्भावस्थेतील वय, बाळाचे सर्वांगीण आरोग्य, विशिष्ट औषधे आणि अशा इतर घटकांबद्दल बाळाची सहनशीलता यावर अवलंबून असू शकते. अर्भकांच्या कमी वजनाच्या समस्येवर उपचार करण्याचे काही मार्ग येथे आहेतः

 • जर बाळाला स्तनपान करणे शक्य नसेल तर बाळाला आयव्हीद्वारे किंवा त्याच्या पोटात ट्यूबद्वारे आहार दिला जाऊ शकतो.
 • बाळाला टेम्परेचर कंट्रोल बेड्स मध्ये ठेवले जाऊ शकते.
 • बाळाला काही दिवस नवजात निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट किंवा एनआयसीयूमध्ये ठेवले जाऊ शकते.

आपल्या बाळाच्या कमी वजनाच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल अशा काही टिप्स

आपल्या बाळाच्या कमी वजनाच्या समस्येवर मात करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

 • नियमित तपासणी: जर आपल्या बाळाचे वजन जन्मतः कमी असेल तर आपण त्याच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित तपासणीसाठी न्यावे. बाळाच्या वाढीचा चार्ट केल्याने सुद्धा मदत होते.
 • स्तनपानाचा सराव करा: घरी जन्मलेल्या कमी वजनाच्या बाळाची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्तनपानाचा सराव करणे. नवजात बाळासाठी आईचे दूध आदर्श आहे कारण यामुळे बाळास आवश्यक असलेले सर्व पोषण बाळास उपलब्ध होते. आपण जितके शक्य असेल तितक्या वेळा त्याला स्तनपान दिले पाहिजे. तसेच त्याचे वजन योग्य मार्गाने वाढते आहे याची खात्री करुन घेतली पाहिजे.
 • घन पदार्थांची ओळख: आपल्या बाळाचा विकास आणि वाढीस मदत करण्यासाठी, बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर घन पदार्थ द्यावेत. तथापि, जर डॉक्टरांनी त्याआधीच घनपदार्थांची ओळख करून देण्यास सांगितल्यास आपण तसे करू शकता.
 • आरोग्यपूर्ण पद्धतीने आपल्या बाळाचे वजन वाढविण्यास मदत करा: यात शंका नाही की आपल्या बाळाचे वजन वाढले पाहिजे परंतु ते निरोगी मार्गाने केले पाहिजे. आपल्या बाळाच्या आहारात कोणत्याही कृत्रिम पदार्थांचा समावेश करू नका
 • धीर धरा: आरोग्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दल चिंता करणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु आपल्या बाळाचे आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन वाढण्यासाठी धैर्य राखणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.

जरी आपले बाळ कमीतकमी वजनाचे बाळ असले तरीही योग्य वैद्यकीय काळजी घेतल्यास, आपले बाळ त्याचे विकासाचे सर्व टप्पे गाठू शकते आणि त्याची निरोगी वाढ होऊ शकते म्हणून काळजी करण्याची गरज नाही.

आणखी वाचा:

नवजात बाळाची काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article