Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य गुढीपाडव्यासाठी ५ चविष्ट आणि विशेष पाककृती

गुढीपाडव्यासाठी ५ चविष्ट आणि विशेष पाककृती

गुढीपाडव्यासाठी ५ चविष्ट आणि विशेष पाककृती

गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नवीन वर्षाची सुरुवात होते. प्रत्येक कुटुंब गुढीपाडव्याला खास पदार्थ बनवून हा सण साजरा करतात.  हे पदार्थ तयार करण्यास अगदीच सोपे असल्याने तुम्ही काही तासातच हे चविष्ट पदार्थ तयार करू शकता.

खास गुढीपाडव्यासाठी काही रेसिपीज

इतर कोणत्याही सणाप्रमाणेच तुम्ही ह्या गुढीपाडव्याला काही उत्तम खाद्यपदार्थांवर ताव मारण्यास उत्सुक असाल ना! ह्या सणासाठी सर्वोत्तम ५ पाककृती आम्ही इथे तुमच्यासाठी देत आहोत. त्या तयार करण्यास सोप्या आहेत.

१. कैरीचे पन्हं

गुढीपाडव्याच्या सणाच्या कालावधीत हे पेय दुकानांमध्ये आणि सटॉल्स मध्ये सुद्धा विक्रीस उपलब्ध असते.

कैरीचे पन्हं

स्त्रोत: Pinterest

तयार करण्यास लागणारा वेळ: १ तास

सर्व्हिंग्ज: १२ ग्लास

साहित्य:

 • साखर – ३ कप
 • मीठ
 • काळे मीठ – २ टीस्पून
 • जिरेपूड – ४ टीस्पून, भाजलेले
 • कैरी -१ किलो

कृती:

 • कच्ची कैरी नीट उकडून घ्या. एकदा उकडून झाल्यावर ती थंड होऊ द्या आणि सोलून घ्या. कैरीचा गर काढून घ्या.
 • एका मोठ्या भांड्यात सुमारे ५ कप पाणी घालून त्यात उकडलेल्या कैरीचा गर घाला. तो व्यवस्थित मिसळा. घट्ट होईपर्यंत आणि सुसंगत होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या.
 • साखर, मीठ, काळे मीठ आणि जिरेपूड घाला आणि सर्व एकत्र करा. आणखी थोडा वेळ शिजवा आणि नंतर गॅस बंद करा.
 • हे मिश्रण सामान्य तापमानावर आल्यानंतर शक्य असल्यास फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. प्यायला देताना, आपण आपल्या आवडीच्या सुसंगततेनुसार ते तुम्ही पातळ करू शकता.

२. गोड शीरा

गुढीपाडव्याला केल्या जाणाऱ्या ह्या पदार्थाची एकाधिक नावे आहेत. दक्षिणेमध्ये त्यास केशरी भात,  महाराष्ट्रामध्ये शीरा आणि उत्तरेस सूजी हलवा असे म्हणतात. त्याची अनेक रूपे असली तरी सुद्धा प्रत्येक गुढीपाडव्याला हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे.

गोड शीरा

स्त्रोत: Pinterest

तयार करण्यासाठी लागणारा वेळः ११/२ तास

सर्व्हिंग्ज: ४-६ प्लेट्स

साहित्य:

 • साखर – १/२ कप
 • तूप – १ टेस्पून
 • मनुका – १ टेस्पून
 • काजू – १ टेस्पून
 • वेलची पूड – टीस्पून, हिरवी
 • साखर – २५ ग्रॅम
 • केशर
 • बासमती तांदूळ – १ वाटी

पद्धत:

 • तांदूळ एक तास चांगला पाण्यात भिजवून घ्या. तसेच, थोडे केशर कोमट पाण्यात भिजवून ठेवा.
 • दरम्यान, मनुका आणि काजू एका कढईत घ्या आणि तुपात तळून बाजूला ठेवा.
 • तूप असलेल्या पॅनमध्ये तांदूळ घाला आणि व्यवस्थित भाजून घ्या. नंतर पॅनमध्ये पाणी आणि केशर घाला. हे मिश्रण थोडावेळ शिजू द्या.
 • साखर किंवा खडी साखर घाला आणि पाणी पूर्णपणे आटेपर्यंत मंद आचेवर ठेवा.
 • सर्व्ह करण्यासाठी एखाद्या भांड्यात काढून घ्या आणि त्यावर थोडी खाडी साखर आणि सुका मेवा घालून गरम गरम सर्व करा.

३. साबुदाणा वडा

जे लोक उपवास करतात त्यांच्यासाठी हा लोकप्रिय पदार्थ न्याहारी किंवा स्नॅक्ससाठी देखील आवडीचा  आहे. कैरीच्या चटणी सोबत साबुदाणा वाड्याची चव अप्रतिम लागते.

साबुदाणा वडा

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १/२ तास

सर्व्हिंग्ज: ४-५ प्लेट्स

साहित्य:

 • तेल
 • मीठ
 • लिंबाचा रस – १ टेस्पून
 • धणे पाने – २ चमचे
 • हिरव्या मिरच्या -३
 • शेंगदाणे – १कप, भाजलेले
 • बटाटे – ३
 • साबुदाणा – १.५ कप

पद्धत:

 • सुरुवातीच्या तयारीसाठी साबुदाणा कमीत कमी पाण्यात भिजवा.
 • बटाटे व्यवस्थित उकडून घेऊन एकत्र मॅश करा.
 • पाणी काढून टाका आणिसाबुदाणा मॅश केलेल्या बटाट्यांसह एकत्र करा. मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, आणि शेंगदाण्यांचा कूट  एकत्र मिक्स करून छान पीठ तयार करा.
 • ह्या कणकेचे छोटेसे भाग घ्या आणि त्याची सपाट पॅटी तयार करा. आवश्यक तेवढ्या अश्या सपाट पॅटी बनवून घ्या.
 • कढईत थोडे तेल घाला आणि गरम होऊ द्या. त्यामध्ये ह्या पॅटी एक एक करून ठेवा आणि सोनेरी होईपर्यंत प्रत्येक बाजू व्यवस्थित तळा.
 • ह्या साबूदाण्याच्या वड्यांना थंडेसे दही किंवा हिरव्या चटणीसोबत चांगले सर्व्ह करा.

४. श्रीखंड

गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी बोलताना श्रीखंड वगळून चालणार नाही. तुम्हाला दुकानात नेहमीच श्रीखंडाचा बॉक्स विकत मिळू शकतो. परंतु तो खास पद्धतीने घरी तयार केल्यास त्याला एक अनोखी चव मिळू शकते.

श्रीखंड

तयार करण्यास लागणारा वेळः १ १/२ तास

सर्व्हिंग्ज: ४ प्लेट्स

साहित्य:

 • पिस्ता – १०
 • बदाम – ६
 • वेलची पूड – टीस्पून, हिरवी
 • जायफळ पावडर – १/८ टीस्पून
 • दूध – २ टेस्पून, उबदार
 • साखर – १/२ कप
 • दही – १किलो
 • केशर

पद्धत:

 • तयारीला एक दिवस अगोदर सुरुवात करणे आवश्यक आहे. श्रीखंड तयार करण्यासाठी त्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी ते मलमलच्या कपड्यात बांधून ठेवा. त्यातील सर्व पाण्याचा निचरा होऊ द्या.
 • एकदा सर्व पाण्याचा निचरा झाल्यावर, हे दही एका भांड्यात घ्या आणि त्यात साखर व्यवस्थित मिसळा. कोमट दुधात थोडे केशर घालाव आणि थोडे केशर दह्यात मिक्स करा. वेलची आणि जायफळ पावडर घालून मिश्रण एकत्र मिसळा.
 • हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या. सर्व्ह करण्यापूर्वी थोडा सुकामेवा घालून ते सजवा.

५. पुरण पोळी

होळी असो की गुढी पाडवा, पूरण पोळी ही पारंपारिक पाककृती प्रत्येक घरात बनविली जाते. हा एक गोड पदार्थ आहे आणि नवीन वर्षाचे औत्सुक्य आणि गोडी राखण्यासाठी हा पदार्थ केला जातो.

पुरण पोळी

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: २ तास

सर्व्हिंग्ज: ४ पूर्ण पोळ्या

साहित्य:

 • तूप – १/२ कप
 • मीठ
 • मैदा – १.५  कप
 • जायफळ पावडर – १/८ टीस्पून
 • हिरवी वेलची पूड – १/४ टीस्पून
 • केशर
 • गूळ – १.५ कप
 • चणा डाळ – १.५  कप

पद्धत:

 • धुतलेली चणा डाळ शिजवून वाटून घ्या.
 • चना डाळीमध्ये जायफळ आणि वेलची पावडर घाला तसेच त्यामध्ये केशर आणि गूळ मिसळा.
 • कढईत मिश्रण घाला आणि मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. ते थंड होऊ द्या आणि बाजूला ठेवा. हे आपले पुरण तयार झालेले आहे.
 • वेगळ्या भांड्यात तूप, मीठ आणि मैदा एकत्र करून पीठ तयार करा. हे मळून घ्या आणि त्यावर ओलसर कापड ठेवा. एक तास ते तसेच राहूद्या.
 • आता पिठाचा एक भाग घेऊन त्याची छोटी पोळी लाटून त्यामध्ये पूरण भरून घ्या आणि पोळी लाटून घ्या.
 • एका मोठ्या तव्यावर पोळी दोन्ही बाजूनी भाजून घ्या. उर्वरित कणिक आणि पुरणासाठी पुन्हा हीच प्रक्रिया करा.
 • सर्व्ह करताना पोळीसोबत दूध किंवा तूप द्या.

गुढी पाडव्याच्या गोड जेवणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. हे पदार्थ घरी केल्याने ते करताना घरातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि ह्या सगळ्या आठवणी संस्मरणीय होऊ शकतात.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article