Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय

बाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय

बाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय

बाळांचा घसा खवखवणे, हे सर्व पालकांसाठी एक कठीण आव्हान आहे. घशाच्या संसर्गामुळे बाळाला काहीही गिळणे कठीण होते. परंतु, नेहमीच डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. जेव्हा असे होते तेव्हा घरगुती उपचार उपयोगी असतात. अगदी डॉक्टर सुद्धा काही वेळेला घरगुती उपचारांना अनुमती देतात. घरगुती उपचारांचे मुख्यतः कोणतेही दुष्परिणाम नसतात आणि वापरलेली उत्पादने नेहमीच घरात उपलब्ध असतात.

बाळांचा घसा खवखवण्याची कारणे

  • सर्दी
  • टॉन्सिलिटिस
  • हात, पाय आणि तोंडाचा आजार
  • घशाचा आजार

बाळांचा घसा खवखवल्यास तुम्हाला माहित असावेत असे घरगुती उपचार

घसा खवखवत असल्यास काही वेळेला डॉक्टरांकडे जाणे आणि औषधे आणणे आवश्यक असते. परंतु बहुतेकदा हा एक छोटासा आजार आहे जो घरगुती उपचारांद्वारे बरा केला जाऊ शकतो. त्यासाठी येथे दहा नैसर्गिक उपाय आहेत.

. केळी

घशासाठी केळी हा सर्वात चांगला उपचार आहे. केळी मऊ असतात आणि त्यामुळे सहजपणे मॅश होऊन ती गिळणे सोपे जाते. केळी व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील समृद्ध आहेत.

. सूप / मटनाचा रस्सा

बाळांचा घसा खवखवण्यावर नैसर्गिक उपाय म्हणजे कोमट सूप किंवा मटनाचा रस्सा देण्याइतका सोपा असू शकतो. सूप दिल्यास ते त्याला हायड्रेटेड ठेवेल आणि बाळाच्या घशाला बरे वाटेल. सूप/मटनाचा रस्सा फक्त कोमट आहे ह्याची खात्री करा आणि बाळाची जीभ भाजणार नाही ह्याची काळजी घ्या.

. तूप

आपल्या मुलाचे वय ६ महिने झाल्यावर, आपण त्याला चिमूटभर काळे मिरे पूड घालून तूप देऊ शकता. त्यामुळे बाळाच्या घशाला आराम मिळेल. तूपात दाहकविरोधी गुणधर्म आहेत जे घशात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.

. मध आणि लिंबाचा रस

घसा खवखवणे आणि सर्दी कमी करण्यासाठी मध एक उत्कृष्ट उपाय आहे. तसेच लिंबाचा रस व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतो त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. हे पेय एका कप गरम पाण्यात काही थेंब मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून तयार केले जाऊ शकते. बाळाला दिवसातून ३४ वेळा हे पाजल्यास त्याच्या घशातील खवखव कमी होते. परंतु एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कधीही मध देऊ नका, कारण यामुळे बाळांना बोटुलिझम होऊ शकतो.

. लसूण

पाण्यात लसणाच्या काही पाकळ्या ठेचून उकळवा. एकदा ते थंड झाले की ड्रॉपरच्या सहाय्याने बाळाला त्या द्रवाचे काही थेंब द्या. लसणाचे अँटीबॅक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म घशाची खवखव कमी करण्यापासून आराम देतात.

लसूण

. मोहरी तेल

मोहरीचे तेल गरम करा. त्यामध्ये तुम्ही काही लसूण आणि काही मेथीचे दाणे देखील मिसळू शकता. तेल थंड झाल्यावर तुम्ही बाळाच्या घशाला ह्या तेलाने हळूवारपणे मालिश करू शकता. तेलाने घशाला मालिश केल्याने बाळाला उबदार वाटेल आणि घसा खवखवण्यापासून बाळाला आराम मिळेल.

. वाफ देणे

गरम पाण्याने बादली किंवा टब भरा. बाथरूमचा दरवाजा आणि खिडकी बंद करा. एकदा आंघोळीची जागा वाफेने भरली की बाळाला आत घेऊन जा. वाफेमुळे बाळाच्या घशाला बरे वाटते आणि आराम पडतो.

. दही

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स घसा खवखवणाऱ्या जंतूंचा नाश करण्यास मदत करतात. शिवाय, दही मऊ आणि गिळायला सोपे आहे. मॅश केलेले सफरचंद, केळी किंवा ताज्या बेरीसारख्या काही फळांसह ते खाणे चांगले. दह्यामुळे व्हिटॅमिन सी च्या पातळीत वाढ होते , तसेच घसा खवखव बरी होण्यास मदत होते. रेफ्रिजरेटेड दही टाळा.

. स्तन पान

आईचे दूध नवजात मुलांसाठी रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून कार्य करते. दुधामध्ये असलेली प्रतिपिंडे सर्व प्रकारचे जंतू, जिवाणू आणि विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करतात. ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इतर कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही. आईच्या दुधात नवजात बाळांचा घसा खवखवण्यावर उत्तम उपाय आहे.

१०. ह्यूमिडिफायर

आपण बाळाच्या खोलीत एक आर्द्रता वाढवणारा ह्युमिडीफायर ठेऊ शकता आणि त्यामुळे बाळाचा घसा ओलसर राहू शकतो. तथापि, ह्युमिडिफायर नियमितपणे स्वच्छ करणे आणि त्यातले पाणी बदलण्याचे लक्षात ठेवा. तसे न केल्यास ते अधिक जीवाणूंचे प्रजनन केंद्र बनू शकते.

रात्रीच्या वेळी बाळाला त्रास झाल्यास त्याला इस्पितळात नेणे कठीण होते तेव्हा घरगुती उपचार सोयीस्कर असतात आणि मदत करतात. तथापि, मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करणे टाळावे.

आणखी वाचा:

बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय
बाळांच्या चोंदलेल्या नाकावर १४ सर्वोत्तम घरगुती उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article