Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) प्रीस्कूलर (३-५ वर्षे) बाळ मोठी मुले (५-८ वर्षे) लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय

लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय

लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय

मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे अणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते.

योग्य निर्णय घेण्यासाठी, तापाचे कारण काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ताप येणे ही संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाणारी एक स्वसंरक्षण यंत्रणा आहे. उच्च तापमानात, शरीर पांढऱ्या रक्त पेशी तयार करते ज्या शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करतात. तसेच विषाणू किंवा जिवाणूंची वाढ व विकासही थांबवतात. महत्वाचे असे की, ताप कमी करणे म्हणजे शरीराच्या संसर्गाविरुद्ध लढणाऱ्या नैसर्गिक यंत्रणेस बाधा आणणे होय.

मुलांना ताप येण्यामागील कारण

बऱ्याच पालकांना मुलांना ताप आला की चिंता वाटते आणि मग ताप कमी करण्यासाठी ते सर्व उपचार करू लागतात. तथापि तापमानाचे मोजमाप हे काही तापाची चिंता करण्याचे कारण नाही. पालक म्हणून, आपल्या मुलाला बरे वाटत आहे की नाही ह्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्या मुलास ताप आला असेल आणि तो सक्रिय असेल तर आपल्याला हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. तथापि, अन्न आणि द्रवपदार्थांचे सेवन आणि त्याच्या लघवीच्या स्वरूपाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे सामान्य असल्यास, घाबरून बालरोगतज्ञांकडे जाण्याची गरज नाही. फक्त मुलाच्या सुधारणेवर लक्ष ठेवा आणि बदलांचे निरीक्षण करा. तथापि, जर आपल्या मुलास अस्वस्थ वाटत असेल आणि ताप १०४ अंश ओलांडत असेल किंवा सतत दोन दिवस टिकत असेल, तर मात्र ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

ताप कमी होण्यासाठी पातळ औषध घेणे हा सोपा उपाय वाटत असला तरीही तो सर्वोत्तम पर्याय नाही. तापासाठी नैसर्गिक उपचारांची निवड केल्यास आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. औषधे शरीरासाठी विदेशी पदार्थ आहेत ज्यांचे चयापचय होणे आवश्यक आहे. शिवाय, टायलेनॉल, आयबुप्रोफेन आणि ऍडविल सारखी औषधे सामान्यतः ताप कमी करण्यासाठी दिली जातात. ह्या औषधांमुळे यकृताला हानी पोहोचू शकते आणि नियमितपणे ही औषधे खाल्ल्यास अस्थमा किंवा आंतरिक रक्तस्त्राव ह्यासारखे इतर हानिकारक परिणाम होऊ शकतात. ताप कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग अपयशी ठरल्यास किंवा खालील परिस्थितीमध्ये आपण आपल्या बालरोगतज्ञांशी त्वरित संपर्क साधा.

  • जर ते मूल लहान अर्भक असेल आणि त्यास १००.४ डिग्री किंवा त्याहून अधिक ताप येत असल्यास.
  • केमोथेरपीसारख्या दुसऱ्या समस्येमुळे मुलाची प्रतिकार प्रणाली कमकुवत असल्यास.
  • खोकला, सर्दी किंवा वेदना ह्यापैकी काहीही नसताना मुलाचा ताप दोन ते तीन सलग दिवस टिकत असल्यास.
  • जर मुलाला तापामुळे श्वासोच्छवासास त्रास होत असल्यास.

मुलांच्या तापावर उपचार करण्यासाठी १४ घरगुती उपाय

जर तुम्हाला रात्री जाग आली आणि आपल्या मुलाचं कपाळ गरम लागलं तर घाबरू नका. खोल श्वास घ्या आणि खालील विश्लेषण करा:

  • जर आपल्या बाळाला सर्दी होत असेल तर त्यामुळे बाळाला ताप आला असेल.
  • आपल्या मुलास लसीकरणानंतर ताप येऊ शकतो.
  • बऱ्याच बाळांना दात येत असताना असताना ताप येतो.

मुलांच्या तापावर काही प्रभावी उपाय येथे आहेत, थेट आजीबाईंच्या बटव्यातून घेतलेले !

१. कांदे

जर आपण भारतीय असाल तर आपल्या आई किंवा आजीने कांद्याच्या औषधी गुणांविषयी आपल्याला सांगितलेच असेल. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो तसेच त्यामुळे वेदनाही कमी होतात. यासाठी फक्त अख्ख्या कांद्याचे बारीक तुकडे करावेत आणि काही मिनिटे आपल्या मुलाच्या पायांवर २ ते ३ तुकडे घालावेत. ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया दिवसातून दोनदा केली जाऊ शकते.

२. आलं

तापासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आल्यामध्ये असते. आल्यामुळे शरीरास घाम येण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये २ चमचे आलं पावडर घाला. पावडर घालून चांगले हलवणे आवश्यक आहे. आपण आपल्या आजारी मुलाला उबदार “जिंजर बाथ ” देऊ शकता. त्यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. लहान मुलांच्या तापावर आलं एक प्रभावी घरगुती उपाय आहे. आंघोळ घालताना, आपल्या मुलाच्या डोळ्यांची काळजी घ्या.

३. कॅमोमाइल चहा (Chamomile Tea)

कॅमोमाइल-चहा

हा तापासाठी चांगला उपाय आहे. पाणी एक मिनिटासाठी उकळा आणि कॅमोमाईल पाने त्यात घाला, मध घाला आणि आपल्या मुलाला दिवसातून दोन वेळा जितके थेंब तो घेईल तितके द्या. काही मुलांना ह्याची चव आवडत नाही.

४. मध आणि लिंबाचा रस

लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करते. मध आपल्या शरीराला पोषण देते. ताप कमी करण्यात दोघांचे मिश्रण प्रभावी आहे. आपण लिंबू रस १ टेबल स्पून आणि मध १ टेबल स्पून असे मिश्रण करा. चांगले मिक्स करा आणि आपल्या बाळाला द्या. त्याचा ताप निश्चितपणे कमी होईल.

५. लसूण घातलेल्या मोहरीचे तेल

आपण ऐकले असेल की मोहरीचे तेल आणि लसूण प्रभावीपणे ताप कमी करतात. हे खरंच सत्य आहे. याव्यतिरिक्त, ते शरीराच्या वेदना कमी करते आणि घामाद्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. फक्त २ चमचे मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात १ चमचा लसूण पेस्ट घाला. २ मिनिटे मिश्रण तसेच ठेवा. हे मिश्रण आपल्या मुलाच्या छाती, पाय, तळहात, पाठ आणि मानेला झोपण्याच्या आधी लावा.

६. अंड्याचे पांढरे बलक

अंड्याच्या पांढऱ्या भागाचे ३ चमचे घ्या आणि एका लहान बाऊल मध्ये चांगले फेटून घ्या. त्यात कापडाचा एक स्वच्छ तुकडा थोडावेळ भिजवून घ्या. नंतर ते कापड मुलाच्या पायावर घाला आणि एका तासासाठी ते तसेच ठेवा. हे आपल्या बाळाच्या शरीराचे तापमान कमी करेल. ताप प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपण ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.

७. मनुके

अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे मनुकांमुळे प्रभावीपणे ताप कमी होतो. आपण १/२ कप पाण्यात साधारण २५ मनुका एक तासासाठी भिजत घालू शकता. मनुका मऊ झाल्या की थोड्या क्रश करून घ्या, पाणी काढून टाका. अर्ध्या लिंबाचा रस त्यात घाला, आणि हे मिश्रण बाळाला दिवसातून दोन वेळा द्या. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.

विषाणूजन्य तापासाठी घरगुती उपाय

विषाणूजन्य ताप म्हणजे हवेमधील बदलामुळे झालेला संसर्ग होय. आणि त्याची घरी काळजी घेतली जाऊ शकते. लहान मुलांकरिता विषाणूजन्य तापावर काही घरगुती उपचार आहेत.

१. धणे

धणे बियाणांमध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. हे आपल्या मुलाचे विषाणूजन्य तापापासून प्रभावीपणे संरक्षण करतात. उकळत्या पाण्यात थोडे धणे घाला. थंड झाल्यावर गाळून घ्या, थोडी साखर आणि दूध घालून ते आपल्या मुलाला द्या. हे पेय दिल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.

२. बडीशेप

बडीशेप मध्ये मोनोटेरपेन्स आणि फ्लेव्होनोइड्स असतात. जे शरीराचे तापमान प्रभावीपणे कमी करून विषाणूजन्य तापाविरूद्ध प्रतिजैविक म्हणून कार्य करतात. ताप कमी होण्यासाठी आपण ह्याचा काढा तयार करुन आपल्या मुलास देऊ शकता.

३. तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये प्रतिजैविक तसेच जंतूनाशक गुणधर्म असतात. तुळस बऱ्याच कालावधीपासून विषाणूजन्य तापावर इलाज म्हणून वापरली जाते. साधारण २० तुळशीची पाने एक लिटर पाण्यात उकळून घ्या, आणि त्यामध्ये अर्धा चमचा लवंग पूड घाला. हे मिश्रण अर्धे होईपर्यंत आटवा. थंड झाल्यावर प्रत्येक २ तासांनी ते आपल्या मुलाला पाजा. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होते.

४. तांदळाची पेज

शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत करण्यास मदत करते. हे लघवीचे प्रमाण वाढवते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. विषाणूजन्य ताप प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपण तांदळाच्या पेजेचा वापर करू शकता.

५. मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये अल्कोलोइड, सॅपोनिन्स आणि डायओसजेनिन असतात. ज्यामध्ये प्रचंड औषधी मूल्ये असतात. ते प्रभावीपणे विषाणूंचा संसर्ग कमी करू शकतात. मेथीचे दाणे रात्रभर भिजत घाला, आणि सकाळी पाणी गाळून घ्या. आपल्या मुलाला ते पाणी थोडे थोडे देत रहा. ह्यामुळे ताप कमी होतो.

६. नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. तुम्ही तुमच्या मुलास ते थोड्या प्रमाणात जेवणातून देऊ शकता.

७. कॉड लिव्हर ऑइल

हे घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नेहमी दिल्याने आपल्या मुलास हवामानातील बदलामुळे होणारे संसर्गजन्य आजार होणार नाहीत.

नैसर्गिकरित्या ताप कमी करण्यासाठी काही उपाय

नैसर्गिकरित्या ताप कमी करण्यासाठी खालील काही उपाय ध्यानात असू द्या.

१. स्पंज बाथ किंवा कोमट पाण्याने आंघोळ

नवजात मुलांसाठी, उबदार स्पंज बाथ आणि मोठ्या मुलांसाठी, टबमध्ये कोमट पाण्याने आंघोळ करणे, ताप असताना खरोखरच सुखकारक असू शकते. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. ताप असताना थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. थंड पाण्यामुळे हुडहुडी भरते आणि शरीराचे तापमान आणखी वाढते.

टीप: जुन्या काळात, तापावर उपचार करण्यासाठी विशिष्ट अल्कोहोलसह मालिश करणे ही सामान्य सराव पद्धती होती. तथापि, संशोधन असे दर्शविते की अल्कोहोल तापमान वाढवू शकते आणि अल्कोहोलमुळे विषबाधा देखील होऊ शकते. त्यामुळे हा उपाय टाळणे उत्तम.

२. पंख्याचा वापर योग्यरीत्या करा

आपल्या मुलास ताप आला असेल तर आपण जुन्या कल्पनांवर विश्वास ठेऊन पंखा बंद कराल. आपल्या मुलास एका खोलीत ठेवा. ती खोली हवेशीर आणि उबदार असेल याची खात्री करा. हवा खेळती राहण्यासाठी आपण पंख्याचा वापर करू शकता. फक्त पंख्याची गती कमी ठेवा, जेणेकरून आपले मूल थंडीने कुडकुडणार नाही.

३. आपल्या मुलाला नियमित अंतरावर आहार द्या

ताप असताना शरीराला जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, सोडियम आणि लोहाची आवश्यकता असते. शिफारस केलेला आहार उच्च-कॅलरी, उच्च-प्रथिने, कमी-चरबी आणि उच्च द्रव आहार आहे. भाज्यांसह चिकन सूप आपल्या मुलास द्या. असे केल्याने संसर्गाशी सामना करणाऱ्या पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होते.

आपल्या मुलास सहजतेने पचण्यायोग्य अन्न देत आहोत ह्याची खात्री करा. सुरुवातीला प्रत्येक दोन तासांनी खायला द्या आणि जेव्हा त्याला बरे वाटेल तेव्हा दर चार तासांनी द्या. आपल्या मुलाला खाण्यासाठी जबरदस्ती करू नका. मसालेदार, चरबीयुक्त पदार्थ टाळणे आवश्यक आहे कारण ते पचायला कठीण असतात. डाळ, अंडी, भाजलेले मासे, अन्नधान्य, उकडलेल्या भाज्या आणि सुकामेवा असे अन्नपदार्थ निवडावेत. छोट्या बाळासाठी कुस्करलेले केळं, उकडलेला बटाटा ही अगदी योग्य निवड आहे. मसुराची डाळ घालून केलेली खिचडी हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

४. तुमच्या बाळाला सजलीत ठेवा

सूप आणि घन पदार्थांव्यतिरिरिक्त, पाणी आणि ज्यूसच्या स्वरूपात द्रवपदार्थांचे सेवन महत्वाचे आहे. फळांचा रस, ग्लुकोजचे पाणी, दूध, नारळपाणी, ताक अशा द्रवपदार्थांमुळे ऊर्जा वाढते आणि लवकर बरे होण्यास मदत होते. जर तुमचे बाळ बाटलीने दूध पीत असेल तर दूध पाजण्याची वारंवारिता वाढवा. शरीरातील कमी झालेल्या द्रवपदार्थांची पातळी पुन्हा भरून येईल. अशा परिस्थितीत नवजात शिशूला प्रत्येक वेळी ३० मिली जास्त द्रव्याची गरज असते. एक वर्षाच्या मुलाला ९० मिली जास्त द्रव्याची गरज असते. जर आपल्याला शंका असेल असेल तर याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ORS (oral rehydration solution) मुळे सुद्धा द्रव्याची पातळी भरून येण्यास मदत होते.

५. हलक्या फुलक्या कपड्यांची निवड करा

ताप आलेला असताना शरीराची उष्णता कमी करण्यासाठी मुलांनी हलके कपडे घातले पाहिजे. कपड्यांच्या अनेक स्तरांमुळे ताप वाढतो. मुलाला थंडी वाजत असल्यास ब्लॅंकेट चा वापर करा.

६. घरामध्ये रहा

आपल्या मुलाला ताप असताना थेट सूर्यप्रकाशात आणू नका. मुलास विशेषत: घरामध्ये थंड आणि सावली असलेल्या जागी ठेवा. सार्वजनिक ठिकाणी जास्त संपर्कात रहाणे टाळणे चांगले आहे कारण कमकुवत शरीराला संक्रमण होण्याची शक्यता असते.

७. विश्रांती आणि झोप

विश्रांती-आणि-झोप

पुरेशी विश्रांती आणि झोप मुलास उत्साहित करू शकते. विश्रांती दरम्यान, शरीराकडून ऊर्जा इतर कार्याला वापरण्याऐवजी ती शरीराची झीज भरून काढण्यास वापरली जाते. जर आपल्या मुलाला झोपायला आवडत असेल तर अशा क्रिया निवडा. ज्यामुळे शरीराची कमीत कमी हालचाल होईल. उदा: कोडी सोडवणे, आवडत्या खेळण्याशी खेळणे, चित्र रंगवणे. आपल्याकडे वेळ असल्यास, त्यांना कथा सांगा, व्हिडिओ एकत्र पहा किंवा त्यांना गायन शिकवा. अशाप्रकारे, कमी हालचालीमुळे, ऊर्जा योग्य ठिकाणी वापरल्यामुळे लवकर बरे वाटते.

८. सलाईनचे थेंब

२३० मिलीलीटर पाण्यात १/४ चमचे मीठ घालून सलाईन थेंब तयार करता येतात. मीठ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा. आपल्या मुलाच्या प्रत्येक नाकपुडीत काळजीपूर्वक २ थेंब घाला. खारट थेंबांमुळे नाक साफ होते आणि ताप कमी होतो.

९. धूम्रपानापासून दूर रहा

धूम्रपान शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत करते. धुम्रपान केल्यास, शरीराला विषाणू आणि जीवाणूंविरुद्ध लढण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढवते. म्हणूनच, आपल्या लहान मुलास सिगारेट, निकोटीन किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या निष्क्रिय धूम्रपानापासून दूर ठेवा.

१०. थंड पाण्याच्या पट्ट्या वापरा

तापामध्ये कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे हा नैसर्गिक उपाय आहे. कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यास लहान मुलांमध्ये ताप कमी होऊ शकतो. थंड पाण्यामध्ये २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. ते शरीरापासून उष्णता काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. वरील सर्व साहित्य चांगले मिसळा. एक स्वच्छ कापडाचा तुकडा वरील मिश्रणात भिजत ठेवा. अतिरिक्त पाणी काढा आणि आपल्या मुलाच्या कपाळावर काही मिनिटे ठेवा.

११. वाफ घेतल्याने मदत होते

जर तापाबरोबर सर्दी सुद्धा असेल तर ताप येण्यास जबाबदार असलेला श्लेष्म काढण्यास मदत करू शकेल. घरी स्टीम बाथ ही प्रभावी उपचार पद्धती असू शकते. गरम पाणी व्हेपोरायझर मध्ये भरा आणि त्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब घाला. आपल्या मुलास वाफ घेण्यास मदत करा. उबदार आणि आर्द्र हवा नाकात घेतल्यामुळे श्लेष्म काढण्यास मदत होते आणि त्यामुळे ताप कमी होतो.

फेब्रील सिजर्स (Febrile Seizures) चा सामना करणे

लहान मुलांमध्ये फेब्रील सिजर्स खूप सामान्य आहे. तुम्हाला फेब्रील सिजर्स म्हणजे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना? ६ महिने ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये खूप ताप येऊ शकतो. ह्या तापामध्ये कधी कधी लहान मुले डोळे वर फिरवतात, तसेच त्यांना उलट्याही होऊ शकतात. हे देखील शक्य आहे की त्यांना झटके येऊन शरीर कठोर होऊ शकते. ही स्थिती काही सेकंदांपासून १५ मिनिटांपर्यंत टिकू शकते जी सामान्यतः खूप मोठी मानली जाते. हे ३ मिनिटांपेक्षा अधिक काळ चालू राहिल्यास आपल्या बालरोगतज्ञांशी त्वरित संपर्क साधा. सतत आपल्या बाळाच्या जवळ राहा. उलट्या होताना, त्याचे डोके काळजीपूर्वक एका बाजूला बदला. जबरदस्तीने त्याला काहीही खायला घालू नका, औषध सुद्धा नको.

म्हणून, तापासाठी भारतीय घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्याने कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि, जर आपल्याला सुधारणा दिसली नाही किंवा लक्षणे खराब होत असल्याचे लक्षात आले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article