Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी कस्टर्ड – तुम्ही करून पाहू शकता अशा पाककृती

बाळांसाठी कस्टर्ड – तुम्ही करून पाहू शकता अशा पाककृती

बाळांसाठी कस्टर्ड – तुम्ही करून पाहू शकता अशा पाककृती

घन पदार्थ पचवू शकणाऱ्या मोठ्या बाळांसाठी जेवण पूर्ण करण्यासाठी कस्टर्ड हे निश्चितच एक सुंदर मिष्टान्न आहे. मऊ आणि घट्ट असलेला हा पदार्थ मुलांसाठी गिळण्यास अगदी सोपा आहे. तुमच्या लहान बाळांना कस्टर्ड खायला घालण्याचा विचार तुमच्या मनात असेल, तर तुम्ही बाळाच्या वयानुसार सुरुवातीला बाळाला थोडे कस्टर्ड देऊन पहा आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा.

तुम्ही तुमच्या बाळाला कस्टर्ड देऊ शकता का?

जोपर्यंत तुमचे बाळ वेगाने धावत नाही, पळत नाही किंवा चालत नाही, तोपर्यंत त्यांच्या आहारात कस्टर्डचा समावेश करणे योग्य नाही. जसजसे तुमच्या बाळाची वाढ होते तसतसे तुम्ही त्याला दिलेले सर्व पदार्थ तो सहज पचवू शकतो. मग, प्रत्येक जेवणानंतर तुम्ही तुमच्या बाळासाठी मिष्टान्न म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कस्टर्ड बनवू शकता. येथे काही कस्टर्डच्या पाककृती आहे. ह्या पाककृती तुम्ही तुमच्या बाळासाठी तयार करू शकता.

लहान बाळांसाठी सोप्या कस्टर्ड रेसिपी

जर तुम्ही ह्याआधी तुमच्या बाळाला कस्टर्ड दिलेले नसेल, तर कदाचित तुम्ही ते बाळाला कसे खायला द्यायचे ह्याचा विचार करत असाल. लहान मुलांसाठी कस्टर्डच्या काही घरगुती पाककृती वाचा. ह्या पाककृती केवळ लहान मुलांमध्येच लोकप्रिय नाहीत, तर मोठ्यामाणसांना सुद्धा त्या खाण्याचा आनंद मिळतो.

कृपया लक्षात ठेवा, खाली दिलेल्या सर्व पाककृती केवळ एका सर्व्हिंगसाठी आहेत. अधिक सर्व्हिंग करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक घटकाचे प्रमाण वाढवावे लागेल.

. ओट्स कस्टर्ड

ओट्स कस्टर्ड

ओट्स कस्टर्ड हे कॅल्शियम युक्त कस्टर्ड आहे. हे कस्टर्ड अंड्यातील पिवळ बलक, दूध आणि ओट्सच्या मिश्रणाने बनवले जाते. ही रेसिपी पौष्टिक आहे आणि तुमच्या बाळाला नक्कीच ही डिश आवडेल.

तयारीसाठी लागणारा वेळ: ५ ते १० मिनिटे

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १५ ते २० मिनिटे

बाळाला देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त

लागणारे साहित्य:

  • २ टेबलस्पून ओट्स
  • १ कप दूध
  • अंड्यातील पिवळा बलक
  • १ टेबलस्पून ब्राऊन शुगर
  • १ टीस्पून ड्राय फ्रूट चूर्ण (पर्यायी)

कृती:

  • दूध गरम करून त्यात ब्राऊन शुगर घालून मिक्स करा.
  • दूध घट्ट होऊन क्रीम रंगाचे होईपर्यंत हलवत राहा. दूध सारखे हलवणे महत्वाचे आहे कारण दूध सहज करपते.
  • दुधामध्ये गुठळ्या नाहीत ह्याची खात्री करा.
  • आता ओट्स आणि ड्रायफ्रूट पावडर टाका.
  • चांगले एकत्र करा. ओट्स मऊ होईपर्यंत मिश्रण शिजवा (अंदाजे ५ मिनिटे).
  • शिजल्यावर गॅस बंद करा.
  • कस्टर्ड तुमच्या बाळाला देण्यापूर्वी खोलीच्या तापमानाला थंड करा.

. एग कस्टर्ड

एग कस्टर्ड

एक सोपी आणि पौष्टिक रेसिपी, म्हणजेच एग कस्टर्ड ही लहान मुलांसाठी देखील एक स्वादिष्ट डिश आहे आणि आम्हाला खात्री आहे कि हे घरी तयार केलेले कस्टर्ड खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरून कधीच कस्टर्ड मागवणार नाही

तयारीसाठी लागणारा वेळ: १५२० मिनिटे

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे

बाळाला देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील बाळांसाठी

लागणारे साहित्य:

  • एका अंड्यातील पिवळ बलक
  • १ टेबलस्पून मध/एरंडेल साखर
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • १ कप संपूर्ण दूध

कृती:

  • एक पॅन घ्या आणि सर्व साहित्य एकत्र फेटा.
  • पॅन मंद आचेवर ठेवा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
  • जेव्हा कस्टर्ड पळीच्या मागच्या बाजूस चिकटते, तेव्हा ते पॅनमधून काढून टाका आणि एक तासासाठी बाजूला ठेवा.
  • तुम्ही कस्टर्ड रेफ्रिजरेटर मध्ये ठेऊ शकता, परंतु ते थंड झाल्यावरच बाळाला द्या.

. फळे घालून केलेले कस्टर्ड

फळे घालून केलेले कस्टर्ड

ही रेसिपी लहान मुलांसाठी अजून एक स्वादिष्ट तसेच निरोगी कस्टर्ड रेसिपी आहे. ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडणारे कोणतेही फळ तुम्ही घालू शकता आणि ते तुमच्या बाळाला खायला देऊ शकता. जर तुमच्या बाळाला फळे खाणे आवडत नसेल तर तुम्ही बहुतेक फळे खाऊ शकता.

तयारीसाठी लागणारा वेळ: १० ते १५ मिनिटे

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे

बाळाला देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील

लागणारे साहित्य:

  • २ चमचे ताजी फळे, बारीक चिरलेली
  • /४ कप, बारीक केलेला मखाना किंवा संपूर्ण गव्हाची बिस्किटे
  • १ टीस्पून साखर
  • /२ कप संपूर्ण दूध

कृती:

  • कढईत दूध उकळा.
  • त्यात साखर घालून मिक्स करा.
  • मखाना घालून ढवळत राहा जेणेकरून ते करपणार नाही आणि गुठळ्या होणार नाहीत.
  • हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • चिरलेली फळे घालून चांगले मिक्स करून घ्या.
  • थंड झाल्यावर सर्व्ह करावे.

. ऍपल कस्टर्ड

ऍपल कस्टर्ड हे सफरचंद, बदाम, दूध आणि अंड्यातील पिवळ बलक घालून तयार केले जाते आणि ते आणखी एक कॅल्शियम समृद्ध कस्टर्ड आहे. आपल्या लहान मुलाच्या आहाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे ते एक परिपूर्ण मिष्टान्न आहे.

तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: १५ ते २० मिनिटे

बाळांना देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील बाळांसाठी

लागणारे साहित्य:

  • १ मध्यम आकाराचे सफरचंद
  • /२ टीस्पून दालचिनी पावडर
  • १ टेबलस्पून ओट्स (पर्यायी)
  • ५ कप दूध
  • एका अंड्यातील पिवळ बलक
  • २ टेबलस्पून ब्राऊन शुगर
  • १ टीस्पून ड्राय फ्रूट चूर्ण (पर्यायी)
  • १ टेबलस्पून चूर्ण/चिरलेले बदाम

कृती:

  • सफरचंद धुवून साल काढून घ्या.
  • सोललेली सफरचंद चिरून, वाफवून त्याची प्युरी बनवा.
  • एका मोठ्या भांड्यात अंड्यातील पिवळ बलक, ब्राऊन शुगर आणि दूध घालून चांगले फेटून घ्या.
  • गुठळ्या नाहीत याची खात्री करा आणि लहान बुडबुडे दिसेपर्यंत मिश्रण चांगले फेटून घ्या.
  • सतत ढवळत राहा, मंद आचेवर २३ मिनिटे मिश्रण गरम करा.
  • मिश्रण घट्ट होऊन पिवळसर झाल्यावर त्यामध्ये बदामाची आणि सुक्या मेव्याची पावडर घाला.
  • चांगले एकत्र करा आणि ओट्स पूर्णपणे शिजू द्या. (अंदाजे ५ मिनिटे).
  • नंतर, ज्योत बंद करा, सफरचंद प्युरी घाला आणि चांगले ढवळून घ्या.
  • सर्व्ह करण्यापूर्वी कस्टर्ड थंड होऊ द्या.

. बनाना कस्टर्ड

बनाना कस्टर्ड

अंड्यांऐवजी केळी वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. केळी, दूध आणि कस्टर्ड पावडर पासून बनवलेली ही एक विलक्षण रेसिपी आहे शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: २० ते २५ मिनिटे

बाळांना देण्यासाठी योग्य वय: १ वर्ष आणि त्यावरील बाळांसाठी

लागणारे साहित्य:

  • १ मोठे केळं
  • .५ कप दूध
  • १ टेबलस्पून कस्टर्ड पावडर
  • २ टेबलस्पून गूळ/ब्राऊन शुगर/मध
  • १ टेबलस्पून चूर्ण किंवा ड्रायफ्रूट पावडर (पर्यायी)

कृती:

  • केळी चिरून घ्या, काही तुकडे गार्निशिंगसाठी बाजूला ठेवा आणि बाकीचे तुकडे बारीक करा.
  • अर्धा कप दुधात कस्टर्ड पावडर घाला आणि गुठळ्या काढण्यासाठी चांगले फेटून घ्या.
  • उरलेले दूध एका कढईत मंद आचेवर गरम करा आणि सतत ढवळत असताना त्यात कस्टर्ड मिक्स घाला.
  • दूध उकळल्यावर, घट्ट होऊन मलईदार बनले तरी ढवळत रहा.
  • ड्राय फ्रूट पावडर घालून मिक्स करा.
  • गॅस बंद करा आणि प्युरी केलेली केळी घाला.
  • थंड झाल्यावर सर्व्ह करा.
  • तुम्ही ते रेफ्रिजरेट देखील करू शकता.

. बनाना कोकोनट कस्टर्ड

बनाना कोकोनट कस्टर्ड ही आणखी एक स्वादिष्ट कस्टर्ड रेसिपी आहे. तुमच्या बाळाचे वय १.५ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर त्याला नक्कीच ही रेसिपी आवडेल. बाळांना नारळाच्या चवीची ओळख करून देण्यासाठी ही रेसिपी एक चांगला मिष्टान्न पर्याय असू शकते.

तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे

तयार करण्यासाठी लागणारा वेळ: ३० ते ३५ मिनिटे

बाळांना देण्यासाठी योग्य वय: .५ वर्षे आणि त्याहून जास्त

लागणारे साहित्य:

  • १ चिरलेले केळं
  • /२ कप दूध
  • /२ कप नारळाचे दूध
  • १ टेबलस्पून डेसिकेटेड नारळ
  • १ टेबलस्पून साखर
  • २ अंडी
  • /४ चमचा व्हॅनिला एसेन्स
  • १ चिमूटभर मीठ

कृती:

  • सर्व साहित्य एकत्र करा आणि गुठळ्या काढून टाकण्यासाठी फेटून घ्या.
  • भांड्याला तेल किंवा बटर लावा आणि त्यामध्ये कस्टर्डचे मिश्रण घाला.
  • प्रीहिटेड ओव्हनमध्ये ५० मिनिटे ३५० अंशांवर बेक करावे.
  • गरम असताना आईस्क्रीम घालून सर्व्ह करा किंवा थंड झाल्यावर नुसतेच सर्व्ह करा.

कस्टर्ड बाळांना देता येते.परंतु तुमचे बाळ सक्रिय होईपर्यंत वाट पहा. पुडिंग हा बाळासाठी पोषक पर्याय आहे तसेच त्याची चव सुद्धा चांगली असते.

आणखी वाचा:

बाळांसाठी पालकाची भाजी – फायदे आणि पाककृती
बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article